Submitted by निल्स_23 on 17 September, 2026 - 14:04

स्पर्धेचा हा विषय इंटरेस्टिंग आहे फार.
मोहीतो हे आवडते पेय आहेच. तेच माॅडिफाय करून स्पर्धेच्या नियमात बसविले.
साहीत्य म्हणाल तर नेहमीचे आपले लिंबू सरबताचे. लिंबू, मीठ आणी साखर.
पण आधी एका ग्लासमध्ये मस्त हिरवागार पुदिना, खाता येणाऱ्या गुलाबाची पाने, एखाद दोन संत्र्याच्या फोडी छान खलून घ्यायच्या. त्यात थोडेसे पाणी आणी लिंबाच्या सरबताचे साहित्य घेऊन मिक्स करायचे.
नंतर एका ग्लासमध्ये भरपूर बर्फ घ्यायचा. त्यात हे सरबताचे मिश्रण, संत्र्याचा रस आणी हवा असल्यास सोडा घालायचा. आणी एक दालचिनीचा छोटा तुकडा.
छान मिसळून घ्यायचे आणी आपले रिफ्रेशिंग रोझ ऑरेंज मोहितो तयार.
एक विसरलेच कि थोडे रोझ वाॅटर किंवा रोझ सिरप घालायचे.
करून बघा नक्की.
मी सजावटीसाठी गुलाबाच्या पाकळ्या घालून आईस क्युब्ज बनवले.


विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
व्वा.. मस्त आणि सोपा प्रकार
व्वा.. मस्त आणि सोपा प्रकार
फारच छान पदार्थ आणि सादरीकरण
फारच छान पदार्थ आणि सादरीकरण खूपच सुंदर. गुलाबपाकळ्यांचा बर्फ वॉव!
तुमच्या एन्ट्री ची वाट पाहत
तुमच्या एन्ट्री ची वाट पाहत होते आणि आली
मस्त पेय .क्यूब्स ची आयडिया आवडली .
मस्त, रिफ्रेशिंग वाटलं.
मस्त, रिफ्रेशिंग वाटलं.
काय सुंदर दिसतंय हे सोनल!!
काय सुंदर दिसतंय हे सोनल!! यावेळच्या एन्ट्री डोळ्यांना अगदी सुखावणाऱ्या आहेत.
आहा! तुझ्या एन्ट्रीची वाटच
आहा! तुझ्या एन्ट्रीची वाटच बघत होते. सुंदर दिसतंय मॉकटेल!
मस्त क्लास दिसतेय.. सजावटीचे
मस्त क्लास दिसतेय.. सजावटीचे आईस क्यूब प्रकरण इंटरेस्टिंग
छानच. गुलाबाचा बर्फ ही
छानच. गुलाबाचा बर्फ ही कल्पनाच छाने.
छान.
छान.
छान दिसते आहे.
छान दिसते आहे.
गुलाबाच्या पाकळ्या घालून आईस
👌
गुलाबाच्या पाकळ्या घालून आईस क्यूब्ज ….
हे भारी !
मस्त!
मस्त!
व्वा मस्तच.
व्वा मस्तच.
तुमची एन्ट्री येणार ह्याची १००% खात्री होती.
गुलाब पाकळ्यांचा बर्फ...मस्तच
निल्स, सुंदर दिसतंय हे.
निल्स, सुंदर दिसतंय हे. पाकळ्यांचा बर्फ खास दिसतोय अगदी.
मस्त! मलाही ती गुलाबपाकळ्या
मस्त! मलाही ती गुलाबपाकळ्या घातलेल्या आइसक्यूब्जची कल्पना आवडली आहे.
आधी मला द्राक्षं आहेत असं वाटलं - तीही फ्रीझ करून आईसक्यूब्जसारखी वापरतात.