
जिन्नस एक पदार्थ अनेक स्पर्धेत मला भाग घेता येईल असं वाटलं नव्हतं. एखादा पदार्थ करणं तसं सोप्पं असतं. पण एकाच जिन्नसाचे ३-४ पदार्थ करणं म्हणजे स्वयंपाकघरात बराच वेळ घालवावा लागणार. पण काल मैत्रिणीशी बोलताना हे ब्रेकफास्ट प्लॅटर सुचलं. पदार्थ जरी मी केले असले तरी या प्लॅटरची मुळ कल्पना माझी दिल्लीतली मैत्रिण प्राजक्ता हिची आहे. मी दिल्लीत असते तर पदार्थ पण तिनेच केले असते कदाचित.
तर या स्पर्धेसाठी आमचा जिन्नस आहे राजगिरा. राजगिर्याचा वापर करून मी हे उपवासाला चालणारे ब्रेकफास्ट प्लॅटर बनवलं आहे. राजगिरा हा मुख्य घटक वापरून राजगिर्याच्या लाह्यांचा ग्रॅनोला, राजगिरा लाह्या आणि सफरचंद वापरून स्मुदी आणि राजगिर्याच्या पिठाचे पॅनकेक्स असे तिन पदार्थ या थाळीमध्ये आहेत. स्मुदी आणि गॅनोला हे दोन्ही पदार्थ गोड असल्याने मग नाश्त्यामध्ये जरा तिखटाचे काहीतरी करावे म्हणून पॅनकेक गोड न करता थोडे तिखट केले आहेत.
राजगिरा प्लॅटर मधल्या पदार्थांच्या पाककृती
१.राजगिरा लाह्यांचा ग्रॅनोला -
साहित्य - दोन वाट्या राजगिर्याच्या लाह्या, अर्धी वाटी मखाने,अर्धी वाटी काजू आणि अक्रोड, थोड्या भोपळ्याच्या बिया, थोडे मनुके, ३-४ चमचे गुळाची पावडर / पंजाबी शक्कर (साखरही चालेल), थोडे तुप
कृती -
राजगिर्याच्या लाह्या थोड्या भाजून घेतल्या. थोड्या तुपावर मखाने व्यवस्थित भाजून घेतले. मखान्यांचे थोडे तुकडे केले. थोड्याश्या तुपावर काजु, अक्रोड आणी भोपळ्याच्या बिया भाजून घेतल्या. हे सगळं साहित्य एका टोपळ्यात मिक्स केलं. एका पॅनमध्ये थोड्याश्या तुपावर पंजाबी शक्कर गरम करायला ठेवली. ती शक्कर भिजेल इतपत पाणी घालून त्याचे कॅरमल केलं. ते जरा जास्त घट्ट वाटलं म्हणून त्यात थोडं अजून पाणी घालून उकळू दिलं. हे कॅरमल तोपल्यातल्या लाह्या आणि ड्रायफ्रूट्सवर घालून मिक्स केलं. त्यात थोड्या मनुका घातल्या. थंड झाल्यावर हाताने त्या सगळ्याचे थोडे तुकडे केले.
२. राजगिरा लाह्या आणि सफरचंदाची स्मुदी
साहित्य - एक सफरचंद, दिड - दोन ग्लास दुध, थोडी दालचिनी पुड, चवीपुरता मध आणि वाटीभर राजगिर्याच्या लाह्या
कृती -मिक्सरमध्ये सोललेल्या सफरचंदाचे तुकडे, दालचिनी पुड आणि दुध घालून स्मुदी बनवली. त्यात चवीसाठी थोडा मध घातला. ग्लासमध्ये ही स्मुदी काढून त्यात वरून राजगिर्याच्या लाह्या घातल्या.
३. राजगिर्याच्या पिठाचे तिखट पॅनकेक
साहित्य - एक वाटी दही, राजगिर्याचे पिठ, हिरवी मिरची, जीरेपुड, मीठ आणि चिमुटभर बेकिंग पावडर, तुप, पनीर चे तुकडे
कृती - एका भांड्यात दही फेटून घेतलं. त्यात बारिक चिरून हिरवी मिरची, थोडी जीरेपुड आणि चवीप्रमाणे मीठ घातलं. यात मावेल इतकं राजगिरा पिठ घातलं. नेहेमीच्या पॅनकेक पेक्षा किंचित घट्ट ठेवावं लागलं पिठ नीट पॅनकेक जमण्यासाठी. या पिठात चिमुटभर बेकिंग पावडर घालून व्यवस्थित मिक्स केलं. २ मिनिटांनी गरम तव्यावर तुपावर पॅनकेक घातले. त्यावर झाकण ठेवून वरचा भाग शिजत आला कि त्यांना उलटवून दुसर्या बाजूने सुद्धा भाजून घेतलं.
सर्व्ह करताना त्यावर थोडे पनीरचे तुकडे घालून सर्व्ह केलं.
अधिक टिपा - नेहेमीच्या पॅनकेक पेक्षा हे पॅनकेक जरा नाजुक होतात. उलटताना हलक्या हाताने उलटावे लागले. यावर आम्हाला खरं तर रंगासाठी रंगित भोपळ्या मिरच्या पण ठेवायच्या होत्या पनीरसोबत. पण आज माझ्या एका बहिणीचा उपास होता आणि तिच्यासाठी हा ब्रेकफास्ट केला होता म्हणून दुसरं काही घातलं नाही. लाल भोपळ्याचे ओव्हनमध्ये ग्रील केलेले तुकडे किंवा रताळ्याचे तुकडे उपासाला चालले असते पण ते घरी नव्हते. यासोबत ओल्या नारळाची चटणी पण चालेल.
हे प्लॅटर सकाळच्या नाश्त्याला व्यवस्थित पोटभरीचे होते. एकच पॅनकेक, थोडा ग्रॅनोला आणी अर्धा ग्लास स्मुदी प्यायल्यानंतर मला दुपारच्या जेवायच्या वेळी अजिबात भुक लागली नव्हती.
काय सुंदर दिसतायत. फोटोपासून
काय सुंदर दिसतायत. फोटोपासून कृतीपर्यंत भा-री!! सुगरण आहेसच तू. निर्विवाद.
मस्त दिसतय प्लॅटर
मस्त दिसतय प्लॅटर
स्मुदी लवकरच म्हणजे उद्याच करुन बघेन. आवडेल याची खात्री आहे
अगं ते फोटोचं, मैत्रिणीने काल
अगं ते फोटोचं, मैत्रिणीने काल चक्क धमकावलं होतं, नेहेमीप्रमाणे नुसताच फोटो काढू नको. जरा चांगले फोटो काढ. मी आपलं तरी कुरकुर केली कि इथे माझ्याकडे फार काही क्रोकरी नाही, वेगवेगळ्या प्लेट नाहीत.
मग सकाळी फोटो काढताना डायनिंग टेबलावर गर्दी होती म्हणून टिपॉय वर प्लेट ठेवून फोटो काढले. त्याच्या खालचे टेबलक्लॉथ चांगलं दिसत नव्हतं, तर नुकतीच इस्त्री करून आलेली साडी अंथरून त्यावर सगळं मांडलं फोटो काढायला.
आयडियाची कल्पना आवडली आहे
आयडियाची कल्पना आवडली आहे
राजगिर्याच्या पिठाचे तिखट पॅनकेक करून बघणार 👍
आई ग्ग!! साडी आहे होय. कसली
आई ग्ग!! साडी आहे होय. कसली गोड आहे. काळी भोर आणि चंदेरी ठिपके - चंद्रखडी.
बांबू चे रोप खलास सुंदर दिसतय.
पौष्टिक न्याहारी! आवडली.
पौष्टिक न्याहारी! आवडली. धिरडे उलटतेवेळी हमखास तुटतातच.. छान जमलेत
मस्त दिसतय प्लॅटर. ऊपवासाला
मस्त दिसतय प्लॅटर. ऊपवासाला फार उपयोगी आहे. साखिला चांगला हेल्दी पर्याय .
मस्त उपवास प्लॅटर.
मस्त उपवास प्लॅटर.
हटके plater.. छान आहे.
हटके plater.. छान आहे.
दिसतंय छान आणि अॅपल स्मूदी
दिसतंय छान आणि अॅपल स्मूदी तरी नक्कीच करून बघेन.
मी लहान वाडग्यात राजगिर्याचा लाडू ठेवून त्याला दुग्धाभिषेक करून थोड्या वेळाने खातो. ही स्मूदी पोटभरीची होईल आणि फायबरसुद्धा जास्त मिळेल.
गेल्या मायबोली गणेशोत्सवात पडद्यामागून सामील होती , तीच ही मैत्रीण का?
तीच ही. मी तिला म्हटलं सुद्धा
गेल्या मायबोली गणेशोत्सवात पडद्यामागून सामील होती , तीच ही मैत्रीण का?>>> तीच ही. मी तिला म्हटलं सुद्धा की तू आयडी काढ आणि दे प्रवेशिका. पण नको म्हणतेय.
कल्पक प्रवेशिका!
कल्पक प्रवेशिका!
राजगिर्याच्या थालिपिठाचा मेकओव्हर!
ग्रॅनोलाचे बारही करून ठेवता येतील.
मी लहान वाडग्यात राजगिर्याचा
मी लहान वाडग्यात राजगिर्याचा लाडू ठेवून त्याला दुग्धाभिषेक करून थोड्या वेळाने खातो.>> मी ही असा ब्रेफा करते. वाडग्या ऐवजी कपातच लाडू घालते
मस्त!
मस्त!
माझा एकदम फेवरेट जोक आहे.
काय इनोव्हेटिव्ह लोक आहेत एकेक मायबोलीवर. टमेटो, दोडका, राजगिरा...
कविन, 'आज लाडू कपात आहे' जोक करतेस की नाही!?
अमित हो हो असले पिजे
अमित
हो हो असले पिजे मारण्यात जी मजा आहे काय सांगू 
मस्त दिसतंय प्लॅटर. तिखट
मस्त दिसतंय प्लॅटर. तिखट पॅनकेक करून बघणार.
ते डायनींग टेबलवर गर्दी आमच्याकडेही असतें. मलापन मग फोटोसाठी एकतर जागा करावी लागते किंवा घरभर पसारा नसलेला कोपरा,जागा,टेबल शोधावा लागतो.
भारी कल्पना आहे अल्पना
भारी कल्पना आहे अल्पना
उपवासाची कंडीशन पाळली नसती तर अजून प्रयोग जमले असते. पण ते पाळून सुद्धा भारी जमवलीत.
>>> लाडू कपात आहे
>>> लाडू कपात आहे

मस्त! सकस न्याहरी आवडली.
मस्त! सकस न्याहरी आवडली.
मस्त उपासाची वेगळी न्याहारी
मस्त उपासाची वेगळी न्याहारी आवडली .
वा!! झकास झालाय उपवास प्लॅटर
वा!! झकास झालाय उपवास प्लॅटर.आणि प्रेझेंटेशन पण सुंदर.
मस्त आहे. स्मुदीची आयडीया
मस्त आहे. स्मुदीची आयडीया आवडली.
सहीच सर्व. छान आयडियाज.
सहीच सर्व. छान आयडियाज.
छान कल्पक
छान कल्पक
हे फारच कल्पक आणि पौष्टिक
हे फारच कल्पक आणि पौष्टिक वाटले. करून बघणार !
मस्त क्रिएटिव ब्रेफा आयडिया!
मस्त क्रिएटिव ब्रेफा आयडिया!
मस्त क्रिएटिव ब्रेफा आयडिया!
मस्त क्रिएटिव ब्रेफा आयडिया!
क्रिएटिव, करण्याजोगं आणि
क्रिएटिव, करण्याजोगं आणि पौष्टीक
मस्तच अल्पना. कल्पक पौष्टिक
मस्तच अल्पना. कल्पक पौष्टिक आणि अगदी मास्टरशेफ प्लेटिंग!
वाह! पौष्टिकही आहे हे
वाह!
पौष्टिकही आहे हे
Pages