Submitted by कविन on 17 September, 2026 - 05:58
कुठेतरी बॅकग्राऊंडला रेडीओ सुरु आहे. “जीवलगा कधी रे येशील तू…”
गेला महिनाभर ती डोळ्यात प्राण आणून त्याची वाट बघतेय पण तो मात्र….
तिच्या घरातल्यांनी तर आता आशाच सोडलेय. रोज तिचे मन गुंतवायचा प्रयत्न करतायत. त्यांचे यत्न तिला कळतायत, पण तिच्या मनाला त्याचीच ओढ लागलेय हे त्यांना कसे समजावे?
आता पुढचं गाणं लागलय “साजण दारी उभा..”
“विरह नको, ये की रे” हे म्हणताना काळीज वेदनेने पिळवटते तिचे.
ती जिंकतेच शेवटी, त्याला यावच लागतं.
“किती वाट बघायला लावलीस?” ती त्याला घट्ट मिठीत घेत म्हणते
बॅकग्राऊंडला कोणीतरी कोणाला तरी सॉरी म्हणतय. कोणीतरी हुंदका देतय.
ती मात्र सगळ्या ऐहिकाच्या पल्याड, त्याच्या मिठीत विरघळून गेलेय.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खास कवीन टच....
खास कवीन टच....
' कविन टच' खरोखर
' कविन टच' खरोखर
वाह भारी
वाह भारी
'क्षेमा लागी जीव उतावीळ माझा'
'क्षेमा लागी जीव उतावीळ माझा' गाणं लागलं होतं आत्ता.
छान.
छान.
छान.
पण ( हे देवकी पंडितच्या आवाजात वाचा). यात अलंकार कोणता? रूपक?
मग तो आणि ती कोण? हा प्रश्न कोडं सोडवण्यात कुशल असलेल्या वाचकांसाठी.
धन्यवाद हो भरत, रुपक
धन्यवाद
हो भरत, रुपक
छान.
छान.
तो म्हणजे ऑलरेडी निवर्तलेला
आवडली.
मना, वृथा का भिशी मरणा ? दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना पसरोनी बाहु कवळण्या उरी
चंदन काठ के बनल खटोलना
चंदन काठ के बनल खटोलना
तां पर दुलहिन सूतल हो!
छान.
>>>>>चंदन काठ के बनल खटोलना
>>>>>चंदन काठ के बनल खटोलना
तां पर दुलहिन सूतल हो!
सुंदर!!
----------------------------------------
अर्थ लागल्यावरती 'कविन टच' कळला. माझे मत या शशकलाच.
-----------------------------------------------------
>>>>>>तिच्या घरातल्यांनी तर आता आशाच सोडलेय. रोज तिचे मन गुंतवायचा प्रयत्न करतायत. त्यांचे यत्न तिला कळतायत, पण तिच्या मनाला त्याचीच ओढ लागलेय हे त्यांना कसे समजावे?
मी एका 'सायकिक' स्त्रीचा इन्टर्व्ह्यु पाहीलेला. तिचे म्हणणे असे होते की जी व्यक्ती पार जाण्याच्या तयारीला लागलेली आहे अश्या व्यक्तीला सतत भेटायला येउ नये, तिला या भौतिक प्रतलावर ओढत राहू नये. कारण ती हळूहळू तिकडे जात असते आणि मग अशी ओढाताण तिला सहन होत नसते पण सांगता येत नसते.
क्षेमा लागी जीव उतावीळ माझा
क्षेमा लागी जीव उतावीळ माझा
मना, वृथा का भिशी मरणा ? दार सुखाचे ते हरि-करुणा !
आई पाही वाट रे मना पसरोनी बाहु कवळण्या उरी
चंदन काठ के बनल खटोलना
तां पर दुलहिन सूतल हो!>>
अरे क्लास !!
अरे क्लास !!
दोन सेकंद उशीरा कळली त्यामुळे जास्त आवडली
भारी!
भारी!
कविन टच खरोखर +१ आवडली.
कविन टच खरोखर +१ आवडली.
खरंच खूप भारी आहे! दोनदा
खरंच खूप भारी आहे! दोनदा वाचल्यानंतर कळली.
खूप छान!
खूप छान!
प्रथम कळली नाही. सामोच्या प्रतिसादावरून नीटच कळली.
त्यातली आर्तता स्पर्शून गेली.
देवकी मलाही प्रतिसाद एडीट
देवकी मलाही प्रतिसाद एडीट करावा लागला. खूप उशीरा कळली.
चंदन काठ के बनल खटोलना.....
चंदन काठ के बनल खटोलना..... बनल म्हणजे काय?
इस पद में शरीर को चंदन की
इस पद में शरीर को चंदन की लकड़ी से बने खटोले (पलंग) के समान और जीव/आत्मा को उस पर लेटी हुई दुल्हन बताया गया है।
खासच!
खासच!
ओह मृत्यू! जमलीये एकदम.
ओह मृत्यू! जमलीये एकदम.
धन्यवाद सामो. अंदाजाने अर्थ
धन्यवाद सामो. अंदाजाने अर्थ समजला होता.
आज सजन मोहे अंग लगा लो जनम
आज सजन मोहे अंग लगा लो जनम सफल हो जाए
हृदय की पीड़ा देह की अगनी सब शीतल हो जाए
खूप छान.
खूप छान.
कविन टच खरोखर +१ आवडली.
कविन टच खरोखर +१ आवडली.
छान लिहिलंय.. कळायला वेळ
छान लिहिलंय.. कळायला वेळ लागला... मस्त
शशांक छान आहे.पण मनात आतमध्ये
शशांक छान आहे.पण मनात आतमध्ये कुठेतरी तुटलं. खूप वाईट वाटलं.
आधी कळलीच नव्हती.
आधी कळलीच नव्हती.
प्रतिसादातून उलगडा झाला.
आणि मग वेगळ्याच पातळीवर क्लिक झाली.
भारीय.
भारीच कविन.
भारीच कविन.
पण मला प्रतिसाद वाचून अर्थ लागला... आधी कळलीच नाही.
साजण दारी उभा.... वेगळीच
साजण दारी उभा.... वेगळीच तरीही too good
Pages