देवीचंद्रगुप्तम्
शक राजाच्या प्रस्तावावर रामगुप्तने मागितलेली मुदत मध्यरात्री संपत होती. “युद्ध टाळून राज्य आणि जीव वाचवायचा असेल, तर तुझी पत्नी ध्रुवस्वामिनीला माझ्याकडे पाठव.”
रामगुप्तला तो स्वीकारण्यावाचून पर्याय नव्हता.
शकाच्या शिबिरात मशाली मंदावल्या होत्या. सुवर्णपालखी तंबूसमोर थांबली. ध्रुवस्वामिनी आत आली.
“अखेर गुप्तांनी गुडघे टेकले!” शक राजा छद्मीपणे हसून म्हणाला.
तिला स्पर्श करण्याच्या हेतूने तो पुढे सरसावला. क्षणात कट्यार चमकली.
"गुप्तकुलाच्या स्त्रीची लालसा ठेवण्याचा परिणाम भोग."
शकाने तलवारीकडे झेप घेतली; पण तोवर कट्यार त्याच्या छातीत रुतली होती. त्याच्यासमोर ध्रुवस्वामीनी ऐवजी चंद्रगुप्त स्त्रीवेषात उभा होता. शक कोसळला. चंद्रगुप्त अंधारात पसार झाला.
गुप्तकुलाचे राज्य आणि प्रतिष्ठा वाचली. आणि त्या दिवसानंतर इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली.
------
शब्दसंख्या -१००
रस - वीर
अलंकार - व्याजोक्ती
छान. आवडली. पण श्लेष लक्षात
छान. आवडली. पण श्लेष लक्षात नाही आला.
अरे व्वा!
अरे व्वा!
धन्यवाद झेलम, शर्मिला.
धन्यवाद झेलम, शर्मिला.
@झेलम चूक सुधारली.
छानच!
छानच!
रामगुप्त - चंद्रगुप्त झालयं शेवटी!
कि तेच बरोबर आहे!
धन्यवाद आबा.
धन्यवाद आबा.
रामगुप्त - चंद्रगुप्त झालयं शेवटी!>> नाही आबा कथाच तशी आहे.
रामगुप्त हा दुर्बल राजा शक राजाकडून पराभूत होतो आणि आपली राणी ध्रुवदेवी शत्रूला सुपूर्द करायला तयार होतो. धाकटा भाऊ चंद्रगुप्त (नंतरचा चंद्रगुप्त विक्रमादित्य) राणीचा वेष घेऊन शत्रू छावणीत जातो आणि शक राजाचा वध करतो. पुढे चंद्रगुप्त स्वतःच रामगुप्ताचा वध करून राणी ध्रुवदेवीशी विवाह करतो आणि सिंहासन बळकावतो.
ऐतिहासिक पार्श्वभूमीवरची शशक
ऐतिहासिक पार्श्वभूमीवरची शशक आवडली
हटके कथा..
हटके कथा..
याची मोठी कथा पण खूप भारी होईल.
ही कथा माहित न्हवती. शक कर्ता
ही कथा माहित न्हवती. शक कर्ता हाच तो शक का?
वर्तुळपूर्ण करुन आपण परत तेच करतो ह्याची ही छान कथा होईल +१
धन्यवाद नितनवे!
धन्यवाद नितनवे!
खूप छान.
खूप छान.
धन्यवाद जाई., धनवन्ती, अमितव,
धन्यवाद जाई., धनवन्ती, अमितव, सामो.
शक कर्ता हाच तो शक का?>>नाही. हा तो शक नव्हे. सातवाहन कुळातील शालिवाहन, म्हणजेच गौतमीपुत्र शातकर्णी, याने शक राजा नहपानाचा पराभव केला. या विजयाच्या स्मरणार्थ इ.स. ७८ मध्ये शालिवाहन शक सुरू झाल्याचे मानले जाते; याबाबत काही मतमतांतरेही आहेत.
देवीचंद्रगुप्तम् ही कथा त्यानंतर सुमारे ३५० वर्षांनी घडते.
छान
छान
छान.
छान.
छान आहे कथा.
छान आहे कथा.
>>>>>त्या दिवसानंतर इतिहासाला
>>>>>त्या दिवसानंतर इतिहासाला वेगळीच कलाटणी मिळाली.
हा काय संदर्भ आहे सांगणार का नितनवे? हे वाक्य अर्थगर्भ वाटते आहे.
मी तीच वाट बघतोय कोण कलाटणी
मी तीच वाट बघतोय कोण कलाटणी सांगेल
सोला कोणीतरी.. आमचे नाही इतके वाचन
>>>>आमचे नाही इतके वाचन
>>>>आमचे नाही इतके वाचन
हाहाहा डिट्टो
तशी कथा खूप मोठी आहे पण
तशी कथा खूप मोठी आहे पण थोडक्यात सांगतो.
त्या रात्री शक राजा रुद्रसिंहाच्या वधानंतर रामगुप्ताच्या मनात मत्सर व संशय उत्पन्न होतो तो चंद्रगुप्तावर विषप्रयोग करण्याचा कट करतो पण चंद्रगुप्ताच्या हातून त्याचा वध होतो. चंद्रगुप्त "विक्रमादित्य" म्हणून राज्याभिषेक होऊन ध्रुवदेवीशी विवाह करतो.
पुढे पश्चिम भारतातील शक क्षत्रपांचा पराभव करून त्यांची संपूर्ण सत्ता संपवतो. याच काळाला नंतर “गुप्त सुवर्णयुग” म्हणून संबोधले गेले; कला, साहित्य, विज्ञान आणि संस्कृतीची मोठी भरभराट झाली. महाकवी कालिदासही याच्याच दरबारी होता.
धन्यवाद नितनवे.
धन्यवाद नितनवे.
सुंदर कथा.
सुंदर कथा.
शशक च्या मानाने कैकपट अधिक माहिती मिळाली
धन्यवाद नितनवे
आवडली गोष्ट.
आवडली गोष्ट.
वाह! एक माहीत नसलेली ऐतिहासिक
वाह! एक माहीत नसलेली ऐतिहासिक कथा यामुळे कळली.