Submitted by @अज्ञात म्हणे on 15 September, 2026 - 12:28
रुपडे कसे साजरे या गिरिजात्मजाचे,
कटी पितांबर ,वसन भरजरी या गिरिजात्मजाचे।
अनेक छटा आहेत तशा याच्या रूपाच्या,
आवडे बाल स्वरूप मला गिरिजात्मजाचे।
रांगतो जेव्हा हा पारणं फेडतो भूमीचे,
कसे गाल गुबगुबीत या गिरिजात्मजाचे।
बाळ कसा खेळे तान्हा उभे ब्रम्हांड पाही,
आकाशातील चंद्र-तारे, खेळ गिरिजात्मजाचे।
कसे शोभते मुकुट कोवळ्या माथी,
कसे निरागस भाव ,या गिरिजात्मजाचे।
केले मोदक गोड, गूळ खोबऱ्याचे,
घेण्यास चालले कष्ट गिरिजात्मजाचे।
गौरी संगे कैलासनाथ पाही शिशु कौतुक,
नर्तन, गायन ,वादन मोहक या गिरिजात्मजाचे।
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा