Submitted by स्वानंदी१ on 15 September, 2026 - 08:41
स्क्रीनच पहायची नाही
एकदा मी ठरवलं
नको मोबाईल नको टीव्ही
पुन्हा पुन्हा गिरवलं
काय सांगू राव, माझी काय झाली गत
चंदेरी स्क्रीन विना किती तगमग !
रील्स सरकवायला बोटं अशी आतुरली
तांदूळ घेतले निवडायला अन्
स्क्रोलींगची हौस भागवली!
तरीही घट्ट केले मन आणि
उघडलाच नाही मोबाईल फोन
आलेच तरी साताठ कॉल
क्यामेरीबात आणि हवेका लोन?
खोटेखोटे हसू आणि
नकली सगळ्या व्हाईब
नव्या व्हिडिओजना बळंच करा
लाईक, शेअर, सबस्क्राईब !
मनावर ताबा महत्वाचा
मात्र कळून चुकले आता
मोबाईलपेक्षा सरस आहे
अंतरातील अमल शुद्धता!
या शुचितेला स्मरून सांगते
आटोक्यात ठेवा स्क्रीन वापर
कारण, नेहमीच फोडता येत नसते
जेन झीच्या माथी खापर!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फार फार मस्त जमलिये. तांदूळ
फार फार मस्त जमलिये. तांदूळ काय, फ्री कॉल्स काय, जेन झी काय. एकदम क्वालिटी मनोरंजन
अलंकार-अ तिशयोक्ती व यमक वाटतोय.
मस्तच! एकदम आवडली
मस्तच!
एकदम आवडली
मस्त !
मस्त !
थँक्यू.
शत शब्द कविता म्हणा हवे तर!
मस्त, मस्त!
मस्त, मस्त!
मस्तच ,आवडली.
मस्तच ,आवडली.
मस्तच! खूप आवडली.
मस्तच! खूप आवडली.
मस्तच.
मस्तच.
शेवटी तांदूळ निवडायला काढून
शेवटी तांदूळ निवडायला काढून
स्क्रोलींगची हौस भागवली!>>> कहर आहे!
तुम्ही इतके दिवस कुठे होता?
तांदूळ छान आहे
तांदूळ

छान जमली आहे
मस्तच ...
मस्तच ...
भारी
भारी
मस्त
मस्त
रील्स सरकवायला बोटं अशी आतुरली
शेवटी तांदूळ निवडायला काढून
स्क्रोलींगची हौस भागवली!>>
तांदूळ निवडायला काढून
तांदूळ निवडायला काढून
स्क्रोलींगची हौस भागवली
हे भारी
😁
छान आहे स्क्रोलिंग तांदूळ
छान आहे
स्क्रोलिंग तांदूळ
भारी.
भारी.
छान जमलीये. विनोदातून प्रबोधन
छान जमलीये. विनोदातून प्रबोधन आहे.