
नमकीन पुरणपोळी
मायबोलीवरची पाक कृती स्पर्धा म्हणजे आमच्या सारख्या रिटायर झालेल्या लोकांसाठी पर्वणीच असते. प्रत्येक स्पर्धा म्हणजे बुद्धीला खाद्य, विचारांना चालना.
" दिसतं तसं नसतं " ही थीम ही ह्याला अपवाद नाही. स्पर्धा जाहीर झाल्यापासून काय करता येईल ह्या बाबत विचार सुरू झाले. चणा डाळी पासून तिखट आणि गोड दोन्ही प्रकारचे पदार्थ छान होतात त्यामुळे चणा डाळीपासूनच ट्विस्ट देऊन काहीतरी करायचं ठरवलं आणि शेवटी ही नमकीन पुरणपोळी करायचं निश्चित केलं.
नेहमीच्या गुळ घालून केलेल्या पुरणा ऐवजी मीठ मसाला घालून पुरण केले आणि त्याच्या नमकीन पुरणपोळ्या केल्या आहेत. तरी साहित्य आणि कृती खालीलप्रमाणे
साहित्य
स्टफिंग साठी अर्धी कप चणाडाळ,
हिरवी मिरची, जिरं, आलं, लसूण, कोथिंबीर ( आपल्या आवडीनुसार ) आणि दोन चमचे नारळाचा चव हे सगळ वाटून.
थोडी हळद, मीठ, आमचूर पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा तेल.
कव्हर साठी
पाऊण कप कणिक ( चाळून घेतलेली) मीठ, तेल. पोळ्या लाटण्यासाठी तांदूळाची पिठी किंवा कणीक
कृती
कणिक पाण्यात घट्ट भिजवून ती पातेल्यात पाणी घालून मुरवत ठेवावी.
चणाडाळ धुवून एखाद तास भिजत घाला. नंतर त्यात अर्धा चमचा हळद आणि थोड तेल घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घ्या. शिजल्यावर पाणी असेल तर चाळणीवर घालून ते निथळू द्यावे.
नंतर एका पातेल्यात चमचाभर तेल घालून त्यात डाळ घाला. वर लिहिलेलं वाटणं आणि कोरडे मसाले घालून चांगलं परतून घ्या. थोडं मिश्रण चाखून बघा आणि चव ऍडजस्ट करा. मिश्रण पातेल्यापासून सुटू लागलं की गॅस बंद करा आणि गरम असतानाच पुरणासारखं ते चाळणीतून गाळून घ्या .
भिजवलेली कणीक पाण्यातून काढून त्यात छोटा चमचा तेल आणि थोडं मीठ घालून मळून घ्या.
आता पुरण पोळी सारखा उंडा भरून पोळी लाटा आणि मध्यम गॅसवर नीट भाजून घ्या. नमकीन पुरणपोळ्या तयार आहेत. एवढ्या साहित्यात मध्यम आकाराच्या सहा पुरणपोळ्या तयार झाल्या.

तयार पोळी
अधिक टिपा
१) नारळ आणि तेल ह्यामुळे बायंडिंग छान आलं होतं सारणाला . अजिबात फुटत नव्हत्या लाटताना आणि सारण कोरडं कोरडं ही लागत नव्हत खाताना.
२) पोळ्या चवीला खूप छान लागत होत्या. अगदी हलक्या आणि तोंडात विरघळणाऱ्या अश्या झाल्या होत्या. करताना मला वाटलं नव्हतं एवढ्या छान होतील असं. असो.
३) गोड न खाणाऱ्यासाठी आणि हाय प्रोटीन डाएट घेणाऱ्यांसाठी साठी हा एक चांगला ऑप्शन आहे.
४) वाटण न घालता चवीप्रमाणे नुसते कोरडे मसाले घालून ही चांगल्या लागतील.
५) आवडत असेल तर तव्यावर तेल सोडावे भाजताना. मी खाली काढल्यावरच लावले आहे.
६) टोमॅटोची चटणी ही केली होती. टोमॅटो, कांदा लसूण, लाल मिरची, मीठ, जिरं , हे सगळं थोड्या तेलावर रोस्ट केलं आणि थंड झाल्यावर टोमॅटोची सालं काढून मिक्सर मध्ये जाडसर वाटलं. जोडीला दही आणि खाराची मिरची.
आहाहा ताट काय मस्त दिसतय.
आहाहा ताट काय मस्त दिसतय. मSSSSSमो!!! कुफेहेपा?
खास मनीमोहोर टच, सविस्तर पाकृ
खास मनीमोहोर टच, सविस्तर पाकृ, बारकावे सांगणाऱ्या टिप्स, सुबक मांडणी आणि फोटोवरून उचलून खावे असे पदार्थ !!!!

तुम्ही पाहुण्यांची विकेट काढणार या स्पेशल पोळीने
भन्नाट! फोटो ही मस्तच!
भन्नाट!
फोटो ही मस्तच!
सामो, धनवन्ती आणि अमितव
सामो, धनवन्ती आणि अमितव इतक्या सुंदर प्रतिसादासाठी धन्यवाद.
मस्त!
मस्त!
झकास ट्विस्ट
झकास ट्विस्ट 👌
Now Savoury, what was once sweet.
क्लास! काय प्रेझेंटेशन आहे..
क्लास! काय प्रेझेंटेशन आहे.. बघूनच पोटात भुकेने खड्डा पडला. यावर मुलेही तुटून पडतील.
पहिल्याच दिवशी पहिल्याच एन्ट्रीला बेंच मार्क आकाशाला भिडला.
सुंदर पदार्थ. सुंदर सादरीकरण.
सुंदर पदार्थ. सुंदर सादरीकरण.
ममो, तुम्ही निगुतीने केलेला कुठलाही पदार्थ अप्रतिमच असतो!
मी खूप दिवसांपासून नमकीन पुरणपोळीची कृती शोधत होते...मी स्वतः मूगडाळ भिजवून, वाटून त्याचे कचोरी सारखे सारण भरून पराठे करून पाहिले..पण ते कोरडे कोरडे लागते फार.
मस्त दिसते आहे दि.त.न.
मस्त दिसते आहे दि.त.न. प्रवेशिका.
माझी एक वहिनी 'पिठल्याच्या पोळ्या' करायची त्याची आठवण झाली.
मस्त पुपो!!!
मस्त पुपो!!!
वाह ! उत्तरप्रदेशात प्रयागराज
वाह ! उत्तरप्रदेशात प्रयागराज बेल्ट मध्ये अशा पोळ्या आंब्याच्या सीझन मधे करतात फक्त त्यात आले इत्यादी वाढीव मसाले नसतात. त्यांना दलभरी म्हणतात, दशहरी आंब्याचा रस किंवा मालदा आंब्याच्या रसासोबत ती खाल्ली जाते, रसात पण हलके मिठाची कणी आणि काळी मिरी पूड लावलेली असते, भारी लागतात चवीला.
ममो, मस्तच! सालाबादप्रमाणे
ममो, मस्तच! सालाबादप्रमाणे क्लास प्रेझेंटेशन
भारी !
भारी !
मस्त लागेल!! या नमकीन पोळी
मस्त लागेल!! या नमकीन पोळी/पराठ्याचा मऊसूतपणा फोटोत पण जाणवतोय.
मस्त पुरणपोळ्या.फोटो सुंदर .
मस्त पुरणपोळ्या.फोटो सुंदर .
गोड न खाणार्यासाठी मस्त ऑप्शन आहे
अफलातून दिसतायत नमकीन
अफलातून दिसतायत नमकीन पुरणपोळ्या. फोटोतही मऊ, लुसलुशीत झाल्या आहेत हे जाणवतंय.
लेखन, प्रेझेंटेशनही नेहमीप्रमाणे ममो स्टाईल खासच !
मस्त वाटत आहे. पराठ्याचा नवा
मस्त वाटत आहे.
पराठ्याचा नवा प्रकार.
सर्व नवीन प्रतिसाद
नवीन प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.
माझी एक वहिनी 'पिठल्याच्या पोळ्या' करायची त्याची आठवण झाली. >> मला पिठल्याच्या पोळ्या माहित नाहीत पण तयार झालेलं सारण बघून पिठल्याच्या ही होतील असं माझ्या मनात आलं होतं. कारण ते कोरड्या पिठल्यासारखचं दिसत होतं.
जेम्स वांड , नवीन माहिती.
मस्त दिसतंय ताट.
मस्त दिसतंय ताट.
पुरणपोळी तुमची सिग्नेचर डिश झालीय. किंवा तुमच्या सिग्नेचर डिशेसच्या यादीत पहिल्या नंबरवर असेल.
खूपच मस्त ममोताई! मऊसूत,
खूपच मस्त ममोताई! मऊसूत, लुसलुशीत दिसतायत नमकीन पुरणपोळ्या.
सध्या जरा प्रोटीन मनावर घेतलंय आणि इतका भारी ऑप्शन मिळालाय, जमणेबल आहे. आणि चटणीपणा जमेल. सवड होईल तेव्हा करूनच बघणार.
तुमच्या पाककृती नेहमीच आपल्या वाटतात, आणि करून बघायची इच्छा होतेच अगदी!
पहिल्याच दिवशी पहिल्याच एन्ट्रीला बेंच मार्क आकाशाला भिडला.>>> हे गेल्या वर्षी वरणभाताच्या वेळीपण झालं होतं! __/\__
<<< हे गेल्या वर्षी
<<< हे गेल्या वर्षी वरणभाताच्या वेळीपण झालं होतं! __/\__
>>>
येस, वरची पोस्ट लिहिताना मला सुद्धा ते आठवलेले
भरत प्रद्न्या आणि ऋन्मेऽऽष
भरत प्रद्न्या आणि ऋन्मेऽऽष इतक्या सुंदर प्रतिसादासाठी मन:पुर्वक धन्यवाद.
अरे भारी, छानच असेल चवीला.
अरे भारी, छानच असेल चवीला.
अशाच प्रकारच्या तिखट पोळ्यांना मॉरिशस, कॅरिबियन आयलंड मध्ये धाल-पुरी (dhal puri) म्हणतात. ब्रिटिशांनी भारतातून ऊस मळ्यावर कामासाठी यूपी, बिहार मधून मजूर (गिरमिटीया मजूर) फिजी, मॉरीशस, त्रिनिदाद, गुयाना, दक्षिण अफ्रीका इत्यादी ठिकाणी नेले. ह्या लोकांनी त्याकाळी उपलब्ध असलेल्या स्थानिक पर्यायामधून पराठा सदृश्य तयार केलेली ही रेसिपी आहे.
आता धाल-पुरी ही नॅशनल डिश आणि आवडते स्ट्रीट फूड आहे.
अफलातून दिसतय ताट
अफलातून दिसतय ताट
सुरेखच.तोंडीलावणी पण छान.
सुरेखच.तोंडीलावणी पण छान.
मी अगदी वर लिहिलंय तेच
मी अगदी वर लिहिलंय तेच लिहिणार होते. माझी शेजारिण गयानाची आहे. तिच्या आईने आम्हाला अशा तिखट पुपो खायला घातल्या होत्या. फार मस्त मऊ सूत आणि खमंग! ममो, तुमच्या पण भारी झाल्याच असणार! पूर्ण ताट भयंकर टेम्प्टिंग दिसत आहे.
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
असो.
ह्या तिखट पू पो उत्तरेत आणि काही प्रमाणात परदेशात ही करतात आणि त्या लोकप्रिय ही आहेत हे अजिबातच माहित नव्हतं. त्यामुळे
माझ्यामते हा अगदी नवीन पदार्थ होता.
पण ज्यांना आधीपासून माहित आहेत आणि ज्यांना माहित नाहीत अशा सर्वांनी करून बघा. छान लागतात आणि पुन्हा गुळ साखर नाही त्यामुळे खाताना गिल्ट ही नाही.
आमच्या युपीवाल्या ताईने तिखट
आमच्या युपीवाल्या ताईने तिखट पुरणपोळ्या करून आंब्याच्या रसाबरोबर खातात म्हणून सांगितलं होतं.ती म्हणाले मी करून आणते. तिला त्यावेळी नको म्हणाले होते. आता ममोंच्या कृतीने मीच करुन पहाते.
देवकी नक्की कर, छानच लागतात.
देवकी नक्की कर, छानच लागतात.
सुरेख. भन्नाट आयडिया.
सुरेख. भन्नाट आयडिया.
Pages