80's लुक ट्रेंड - बदाम बदाम बदाम

Submitted by ऋन्मेऽऽष on 11 September, 2026 - 04:24

80's Look हा ट्रेंड गेल्या दोन-तीन दिवसांत सोशल मीडियावर इतका वायरल झालाय की वाटतंय आपण पुन्हा 80's मध्येच पोहोचलो की काय Happy

गंमत म्हणजे या ट्रेंडमध्ये Gen Z आणि Gen Alpha पेक्षा आपली Millennials आणि Gen X पब्लिक जास्त उत्साहाने उतरली आहेत. अर्थातच, ज्यांनी तो काळ पाहिलाय, त्यांनाच त्याची खरी मजा Happy

तेव्हाच्या आठवणी, त्या केसांच्या स्टाईल, ती मिशी… ते गॉगल… ते कपडे… आणि काही राहून गेलेल्या इच्छा!
तेव्हा जे शक्य नव्हतं, ते आता AI महाराजांच्या कृपेने अगदी सहज शक्य झालंय

हा एक 80's Look चा सॅम्पल फोटो.. बदाम बदाम बदाम

IMG-20260911-WA0008.jpg

तर मी सुद्धा कालच या ट्रेंडमध्ये उडी मारली आहे.
तुम्हीही या ट्रेंडमध्ये उडी मारली असेल तर तुमचे फोटोही इथे येऊ द्या.
आणि अजून मारलेली नसेल तर मारा च्यायला..

जर हे करायचे कसे अजून माहीत नसेल तर इथेच विचारा.
तरी थोडक्यात सांगायचे झाल्यास चॅट जीपीटी वर करायचे आणि कसे करायचे हे देखील त्यालाच विचारायचे. आळस असल्यास काही प्रॉम्प्ट मी पुरवतो. पूर्ण अभ्यास करूनच धागा काढत आहे Happy

तर मित्रानो आणि मैत्रिणींनो,
आमंत्रणाची वाट बघू नका,
धागा विरंगुळा विभागात आहे, तर थोडा करून घ्या
80's मध्ये परत जाण्यासाठी तिकीट लागत नाही…
फक्त एक फोटो पुरतो ❤️

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी हनुवटीच बदलली, तिला बदकाच्या चोचीसारखं बनवलं.
माझ्यासोबत जी स्त्री आहे ती पूर्णपणे अनोळखी आहे. भांडणं होतील. घातक ट्रेण्ड आहे.

बोकलत, मी जेमिनि ए आय वरती केले. अपलोड अ फोटो व सांगा - मेक इट इन्डिअन ८०ज लुक.
----------
सियोना यांनी काहीतरी जबरदस्त प्रॉम्प्ट दिलाय.
---------
>>>>>>माझी हनुवटीच बदलली, तिला बदकाच्या चोचीसारखं बनवलं.
ए आय ला फोटोतला एसेन्स कॅपचर करता येत नाही. सपक बनवतोय. अद्याप तरी.

छान photos.
सामो, तू तू वाटतच नाहीस. पण फोटो छान.

सर्वांच्या क्रिएटिव्हिटीला सलाम.
सियोना दहा पैकी दहा. एक्स्ट्रा क्रिएटिव्हिटीसाठी.
सोन्याच्या भावाचा संदर्भ जबरी आहे.
आम्हाला पण शिकवा हे कसं करतात.

>>>>>>सामो, तू तू वाटतच नाहीस. पण फोटो छान.
धन्यवाद शर्मिला. स्वस्तुतीचा आरोप स्वीकारुन म्हणते ए आय ला गोडवा कॅप्चर करता येतच नाही.

माझा हेडर पोस्ट मधील फोटोचा ओरिजनल फोटो हा होता.
आणि त्या सोबत खालील prompt दिला होता.
माझे केस, चष्मा आय मीन गोगल आणि बरेचसे फीचर्स जवळजवळ मॅच झाले..

IMG_20260911_154803.jpg

Using my uploaded photo, preserve my identity and facial appearance. Dress me as a fashionable young man walking through Mumbai in 1986. Voluminous side-parted hair, moustache, colorful patterned shirt with rolled sleeves, high-waisted pleated trousers, leather belt, classic sunglasses and wristwatch. Vintage Fiat/Premier Padmini cars, old Mumbai buildings, street vendors and signage in the background. Genuine 1980s India, candid street photography, 35mm analog film, faded Kodachrome colors, grain, direct sunlight and authentic period details.

@सियोना… त्या फोटो मधील तुम्हीच आहात का? भारी आहे फोटो.. प्रॉम्प्ट नंतर पुन्हा फोटो एडिट करून ते मीम बनवले का..

@निल्सन… पहिला फोटो झकास.. जय वीरू सोबत फुल बसंती फोटो आला आहे Wink
आणि दुसऱ्यात बॅक टू जे आपल्या नशिबात आहे ते Proud

मस्त आहेत फोटो सर्वांचे..!

whats app वर बऱ्याच जणांचे status बघितले ह्या नवीन ट्रेंडचे आणि त्यावरचे मीम्स पण पाहिले..