पाणी वाचवा - स्नान न करता शरीर व आत्मा शुद्ध ठेवा.

Submitted by Madan Hunkare on 8 September, 2026 - 08:54

भारतात १५० कोटी नागरिक लोक स्नान करून अब्जावधी लिटर पाणी दूषित करून वाया घालवत आहेत.
पाण्याने स्नान न करताही शरीर शुद्ध राहते आणि दुर्गंधी येत नाही. प्राचीन काळी ऋषी मुनी वायूस्नान करत असत.
ही कला शिकून घेतली तर जलप्रदूषण होणार नाही, पाण्याची नासाडी टळेल.

799264758_2049861588987910_3539995058456388261_n.jpghttps://www.facebook.com/healthdiari/posts/pfbid02uTsz1NFaih7ySzQYvHS3fJ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरीराचा दुर्गंध तर deodorant मारून सुद्धा नाहीसा होतो.
पण आंघोळ न केल्यास घामाने शरीराची भोकं बुजतील त्याचे काय. ती मोकळी करायचा उपाय हवा. अन्यथा कोणाला हवे असते रोज सकाळी हे कटकटीचे काम..

असो,
मी आठवड्यातून एकदा डोक्यावरून आंघोळ करतो. यानेही बरेच पाणी, वेळ, पैसा वाचतो. बहुतांश महिला असे करतात. माझे केस वाढलेले तेव्हापासून मी हे सुरू केले. नाईलाजच होता. पण आता केस कापले तरी हेच कायम ठेवले आहे.

मला गबाळं राहणं आवडतं.
शर्ट इन करण्यापेक्षा मोकळा सोडणे आवडतं. शक्यतो टीशर्ट्च बरा वाटतो. बटणं पण लावावी लागत नाहीत.
दाढी केली नाही तर आजारी असल्यासारखं वाटतं म्हणून करतो. पण कुठे जायचं नसेल तर त्या दिवशी नाहीच करत. केस कापायचा आळस आहे, पण ते डोळ्याला आणि मानेला टोचतात. मग त्यांची कत्तल करावी लागते.
अंघोळीशिवाय जमत नाही. नाहीतर आळसावल्यासारखं वाटतं .वीज नसेल तर थंड पाण्याने का होईना करतोच. फक्त तयार होणं हा फंडा नाही झेपत.
ज्यांना तयार होण्यात वेळ लागतो त्यांना पाहून आपण किती सुखी असं वाटतं.

मला तर दाढी केली की कुठे जावेसे वाटत नाही. गुळगुळीत गाल घेऊन घराबाहेर पडायचे म्हटले की लाजल्यासारखे होते. दाढी हा पुरुषांचा दागिना आहे. निसर्गाने पुरुषांनाच जे दिले आहे त्याचा सन्मान ठेवायलाच हवा. म्हणून क्लीन शेव कधीच करत नाही. मशीन फिरवतो. आणि त्यानंतर दीड दोन महिने करत नाही. दाढी वाढतानाच्या वेगवेगळ्या स्टेजचे आनंद उचलतो.

अरे हो, दाढी करण्यात सुद्धा लोकं बरेच पाणी वाया घालवतात ते सुद्धा मी वाचवतो.

मुलींसारखे केस वाढवून फिरायची लाज वाटते.
आता तर शक्यच नाही.

बाकी शेर नहाता नही वगैरे सुप्रसिद्ध वचनं अजून ऐकू आली नाहीत.

>>>>
मुलींसारखे केस वाढवून फिरायची लाज वाटते.
>>>>
जर निसर्ग नियमानुसारच पुरुषांचे केस सुद्धा लांब वाढत असतील तर त्यावर मुलींसारखा असा शिक्का मारायची काय गरज Happy

शीख धर्मात तर पुरुषांनी लांब केस ठेवणे हा एक अत्यंत महत्त्वाचा धार्मिक नियम आणि श्रद्धेचा भाग आहे.

मुलींचे कपडे आणि मुलांचे असा भेद सुद्धा करायची काय गरज? लांब केस वाढवून कपडेही भेदाभेद न करता वापरावेत. खरं तर कपडे अनैसर्गिक आहेत. आपल्याला नेमके काय हवं आहे याबद्दल क्लिअरिटी हवी. नैसर्गिक कि अनैसर्गिक?

शीख धर्मात पाच प्रकारच्या वस्तू वापरणे कंपल्सरी आहे. धार्मिक श्रद्धा हे त्या त्या कॉण्टेक्स्टमधेच वापरावे. त्याचा संदर्भ द्यायचा तर योद्धा व्हावे लागेल.

मुलींचे कपडे आणि मुलांचे असा भेद सुद्धा करायची काय गरज?
>>>>

हो बिलकुल गरज नाहीये.
दोघांच्या शरीर रचनेनुसार जे सोयीचे आहे ते घालावे.
आमच्या घरी माझ्यात आणि बायकोमध्ये, तसेच माझ्यात आणि मुलीमध्ये बरेच कपडे कॉमन आहेत.

म्हणजे मुलींचे कपडे तुम्ही नेसत नाही का? शरीर रचनेला सूट होतील असे मिळतील.
नैसर्गिक अवस्थेत फिरणे याबद्दल विचार करा.

शीख धर्मात पुरुष सुद्धा केस वाढवतात, आणि निसर्ग सुद्धा पुरुषांचे केस लांब वाढवतो, तर लांब केसांवर मुलींसारखे असा शिक्का मारायची गरज नाही एवढेच सांगायला ते उदाहरण होते.
त्या पलीकडे शीख धर्मात पाच प्रकारच्या वस्तू वापरणे कंपल्सरी आहे याचा इथे काय संबंध.

<<<
म्हणजे मुलींचे कपडे तुम्ही नेसत नाही का? शरीर रचनेला सूट होतील असे मिळतील.
>>>>

अहो वर म्हटले आहे की बरेचदा घालतो. मी, माझी लेक आणि माझी बायको यांच्यात बरेच कपडे कॉमन आहेत.

नैर्सगिक चा पुरस्कार केल्यानंतर कपडे अनैसर्गिक आहेत हे का फाट्यावर मारले?

अहो वर म्हटले आहे की बरेचदा घालतो. मी, माझी लेक आणि माझी बायको यांच्यात बरेच कपडे कॉमन आहेत.>>> तेच विचारले कि बायका पुरूषांचे कपडे नेसतात. म्हणून कॉमन आहेत कि बायकांचे असे शिक्के मारलेले कपडे भेदाभेद न करता तुम्ही नेसता?
हे केसांवरून भेदाभेद का, नैसर्गिक च्या हवाल्याने विचारले आहे.
( तुमच्याशी वाद म्हणजे वेळेचा अपव्यय. पण आज आहे)

<< धर्माचा काय संबंध? >>
धर्माचा संबंध नाहीच. मुद्दा लक्षात घ्या. जर जगातील कित्येक पुरुष लांब केस ठेवत असतील तर त्यावर मुलींसारखा असा शिक्का का??
उदाहरण म्हणून बॉलीवूड स्टार हृतिक रोशन पासून जॉन अब्राहम, संजय दत्त ते खुद्द किंग ऑफ बॉलीवूड शाहरुख खान घेऊ शकता. (आठवा चित्रपट अशोका).
शीख धर्माचे उदाहरण दिले कारण अशी सुटी सुटी नावे न घेता त्यांचे उदाहरण दिल्यास लांब केस असलेल्या पुरुषांचा मोठा समूह एकत्रितपणे डोळ्यासमोर येईल.
आपले पूर्वज सुद्धा एकेकाळी केसांच्या लांब जटा ठेवून असायचेच. मग अचानक लांब केस म्हणजे बायकांसारखे हे कुठून आले? आपणच ठरवले आहे. म्हणून आपणच विचार बदलायचे आहेत.

<<<<< नैर्सगिकचा पुरस्कार केल्यानंतर कपडे अनैसर्गिक आहेत हे का फाट्यावर मारले?
>>>>

फाट्यावर कुठे मारले. इथेही मुद्दा समजून घेतला तर तुम्ही माझ्याच मुद्द्याला समर्थन देत आहात. निसर्गाने जन्माला घालताना स्त्री - पुरुष यांना ठराविक पोशाखात पाठवून भेद केला नाही. म्हणजेच निसर्ग याबाबत न्यूट्रल आहे. पुढे दोघांनी आपली सोय बघून स्वतः स्वतःचे कपडे निवडले आहेत. ज्यात शरीराची रचना तसेच कामाचे स्वरूप अशा अनेक गोष्टी आल्या. यातील स्त्री-पुरुष शरीराची रचना आजही भिन्नच असल्याने त्यानुसार सोयीचे असलेले कपडे वेगळेच राहतील. पण जे तसे नाही ते एकमेकांचे घालू शकतोच की.

<<<< बायका पुरूषांचे कपडे नेसतात. म्हणून कॉमन आहेत कि बायकांचे असे शिक्के मारलेले कपडे भेदाभेद न करता तुम्ही नेसता?
>>>>

मुद्दा लक्षात आला - बायकांनी पुरुषाचे म्हणवले जाणारे कपडे म्हणजे जीन्स शर्ट वगैरे घालणे कॉमन आहे पण पुरुष बायकांचे घालतील का, किंवा मी घालतो का असेच विचारायचे आहे ना?
तर हो, घालतो. बायको किंवा मुलीने त्यांच्यासाठी घेतलेले टी-शर्ट, ट्रॅक पँट सर्रास घालतो. गॉगल तर मी बायकोचाच वापरतो. तिचा जुना झाला की ती नवा घेते आणि जुना मला देते. छत्री सुद्धा रंगीबेरंगी जी लेडीज समजली जाते ती वापरतो. गुलाबी रंगाच्या कपड्यात चेहरा उजळ दिसत असल्याने आवडीने घालतो. (फोटोत मात्र त्या रिफ्लेक्षणने उलटे होते, म्हणून फोटो काढायच्या वेळी ते टाळतो), मागे केस वाढवले होते तेव्हा सर्व प्रकारचे हेअर बँड बायको आणि लेकीचेच ढापून घालायचो Happy

<< तुमच्याशी वाद म्हणजे वेळेचा अपव्यय. पण आज आहे >>

मी तुमच्याशी चर्चा तुम्हाला हरवायला किंवा जिंकायला घालत नाहीये. पण एखादा विचार मला चुकीचा वाटला की त्यात सुधारणा करायला आवडते. वाचणारे वेळ काढून वाचत असतात हे माहीत आहे म्हणून मी सुद्धा वेळ काढून लिहितो Happy

आणि हे तर खास पुरुषांच्या भल्यासाठी आहे. अमुकतमुक बायकांचे असे म्हणून आपण आयुष्यातील किती तरी आनंदाना मुकत आहोत!

तुमच्याशी सुद्धा वाद न घालता हितचिंतक म्हणूनच सांगत आहे की लांब केस आवडतच/शोभतच नसतील तर काही हरकत नाही. पण बायकांसारखे असा चुकीचा विचार करून त्यावर फुल्ली मारू नका इतकेच Happy

ता.क. - या विषयावर गणपती नंतर सवडीने स्वतंत्र धागा काढतो.

वादविवादासाठी आपण (पक्षी तुम्ही, आपण सर्वोच्च आदराने) नैसर्गिकतेचा पुरस्कार केला.

एव्हढ्या मोठ्या प्रतिसादात दोन गोष्टींना बगल दिली, जे होणार हे माहिती होतं. वेळेचा अपव्यय हा मुद्दा सिद्धच झाला.

टी शर्ट, जीन्स हे पुरूषी कपडे स्त्रियांनी आत्मसात केले. जर स्त्री पुरूष असा भेदभाव केशरचनेत करायचा नाही तर मग कपड्यात का हा मुद्दा पुन्हा मांडणार नाही.
तुम्हाला भेद मान्य नाही. तर साडी नेसून किंवा परकर झंपर मधे एखादा फोटो सहज अपलोड कराल.
जर नैसर्गिक हा मुदा असेल तर धर्माने काय सांगितले हा मुद्दाच उरत नाही. धर्माने सांगितले म्हणून कुणी करत असेल तो मुद्दा इथे लागू होत नाही. तुम्ही तर्कशास्त्र मांडण्यापेक्षा झोलशास्त्र मांडता. बगल देणं ही तुमची खासियत आहे आणि टाळ्या वाजवणार्‍यांची कमी नाही. आताही कोण येईल हे मी वहीत लिहून ठेवलं आहे.

नैसर्गिक गोष्टींना प्राधान्य देता, मानवनिर्मित भेद मान्य नाहीत, बंधनं मान्य नाहीत. त्यामुळे नैसर्गिक अवस्थेत वावरणे हे तुमच्यासाठी योग्य आहे.
बाकी बगल द्यायची तुमची उर्मी तुम्हाला मुबारक.

फक्त
१. तुम्ही साडी किंवा तत्सम बायकी समजल्या गेलेल्या ( जे पुरूष नेसत नाहीत) अशा कपड्यातले फोटो अपलोड करणार का? नसेल तर का नाही एव्हढं सांगा. यावरून तुम्ही परंपरागत स्त्रैण पोषाखांना निषिद्ध समजत नाहीत हे सिद्ध होईल. स्त्रियांनी जसे पुरूषी पेहराव आपलेसे केले तसेच तुम्हीही कराल. म्हणजे पुरूषांनी लांब केस ठेवणे हे स्त्रैण समजू नयी या युक्तीवादाला आधी केले सारखी धार येईल.

२. नैसर्गिक अवस्थेचा आग्रह मी धरत नाही. तुमचा आग्रह असल्याने तुमच्यावर नीरक्षीरविवेक सोडतो. सदसदविवेकबुद्धीने निर्णय घ्याल ही अपेक्षा.

अंघोळ करावीशी वाटली की उन्हामध्ये जोरात धावतो.
घामाने अंग भिजलं की साबण लावतो आणि परत जोरात धावतो.

साडी कंफर्टेबल नाही तर कश्याला घालू?
आमच्याकडे बायका सुद्धा ती घालत नाही.
आणि ब्लाऊज कसा घालणार, म्हणून शरीराची रचना हा मुद्दा मांडला.

यावरून आठवले, मी दहावीत असताना एका नवरात्रीत साडी घातली होती. ब्लाऊज फिट बसायला पिशवीत चिंध्या भराव्या लागल्या होत्या. जेव्हा कपडे काढले तेव्हा छाती ही घामाघूम झाली होती. तेव्हापासून कानाला खडा, यात कम्फर्ट नाही तर आयुष्यात पुन्हा घालायचे नाही. तेव्हाचे फोटो मात्र नाहीत.

लाख बात की एक बात
अमुकतमुक गोष्ट अमुक तमुक लिंगाच्या व्यक्तीनेच करावी यावर आपण बोलत आहोत एवढे समजले की चर्चा योग्य दिशेने जाईल. अन्यथा मग त्यांच्यासारखे हे सुद्धा करा आणि ते सुद्धा करा असे युक्तीवाद अजून आठवडाभर करत बसाल Happy

कंफर्टचा प्रश्नच नाही.
आपल्याला भेदभाव मान्य नाही. घराच्या भिंतीवर कोरून ठेवा.

शरीराची रचना हा मुद्दा असता तर स्त्रियांनी पुरूषी कपडे का नेसले असते? पळवाट नको.
मस्तपैकी मेक अप करून साडी नेसून फोटो टाका. सगळ्यांची तोंडं बंद करून टाका.

पुन्हा पोस्ट बदलली. शीख धर्माचा मुद्दा का घेतला होता?

तुम्हाला दक्षिणेतल्या देवळाचं उदाहरण दिलं तर मग एव्हढे पुरूष साडी नेसतात म्हणून नेसाल का?
कि आसामतल्या लोरा राखचं दिलं तर नेसाल?

अमुकतमुक गोष्ट अमुक तमुक लिंगाच्या व्यक्तीनेच करावी यावर आपण बोलत आहोत एवढे समजले की >>> आत्ता तुम्हाला समजलं. साडी का नेसायचीय ते. देर आये दुरूस्त आये.

शीख धर्मात पुरुष केस वाढवतात हे उदाहरण का दिले याचे उत्तर दिले होते की.. समजले नसेल तर पुढे जाऊया Happy

आणि दक्षिणेतल्या देवळाचं उदाहरण देत तुम्ही साडी नेसणारे पुरुष दाखवले हे तर फारच छान.
भले मग ठराविक श्रद्धेने किंवा प्रथा म्हणून का करत असेना पण एखादी गोष्ट अमुक तमुक लिंगाचीच असा शिक्का मारून दूर करण्यापेक्षा हे छान आहे.

चला उद्या तुमच्यासाठी तुम्हाला हवा तसा माझा एक चिकना फोटो टाकतो.
विसरलो तर आठवण करा..
तूर्तास शुभ रात्री

एकतर आधी स्वतःच मला म्हणत होता फोटो टाक, फोटो टाक..

आता तयार झालो तर हौस फेडून घ्या म्हणत जणू काही माझ्यावर उपकार करत संधी देत आहात असा आव..

म्हणजे नंतर म्हणायचे बघा हा कसा स्वतःचे फोटो टाकतो..

किती ते चार तोंडाने बोलायचे..

राहू द्या मग आता Happy

मी काहीही म्हणेन, आपण आपल्या तत्त्वांवर ठाम असायला हवं.
थोडक्यात लिंगभेद पाळताच. माहीत होतं ते. Happy
फक्त वदवून घ्यायचं होतं.

मी फोटो मला वाटेल तेव्हा दाखवणारच
फक्त इथे ती तुमचीच मागणी आहे, माझी स्वतःची हौस नाही हे वदवून घ्यायचे होते Happy

बघा म्हटलं ना हौस आहे. Happy
नाहीतर नैसर्गिक गोष्टींना तुम्ही जे महत्व देताय ते पाहता तुम्ही स्वतःच काय केलं असतं ते सांगायला नको.

कपडे घालणं ही अनैसर्गिक गोष्ट आहे तुमच्या लॉजिकप्रमाणे.

तुमच्या फोटोच्या हौशीबद्दल आपण बोलतच नाही.

लिंगभेद / नैसर्गिक गोष्टींचा आग्रह ही तुमची मतं सिद्ध करून माझी बोलती बंद करणार होता त्याबद्दल बोलत होतो. मग तुम्ही माबोकरांच्या घरोघर फिरलात तरी माझी ना नाही.

जर तुम्ही म्हणालात कि नैसर्गिक अवस्थेत फिरणे किंवा स्त्रैण ठरवलेले कपडे घालणे शक्य नाही तर तुम्हाला सिद्ध करायची गरजच नाही.
फक्त पराभूत झाला हा शिक्का बसेल. बघा काय करायचं ते. स्वतः निर्णय घ्या. Happy

Pages