नमस्कार मायबोलीकर मंडळी!
गालिबचा एक प्रसिद्ध शेर आहे -
हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले
इथे अरमान निकलना म्हणजे इच्छा पूर्ण होणे. आपल्या असंख्य इच्छा , स्वप्ने असतात. त्यातल्या सगळ्याच पूर्ण होतात असे नाही. काही पूर्ण करायची संधी मिळत नाही, कधी अडचणी येतात किंवा "पुढे कधीतरी," म्हणत करायचे राहूनच जाते.
अशाच अपुर्या राहिलेल्या इच्छांबद्दल , प्रत्यक्षात न आलेल्या स्वप्नांबद्दल लिहिण्याचा हा उपक्रम.
नियम
१. प्रवेशिका पाठवण्याकरिता मायबोली गणेशोत्सव २०२६ या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल. हा ग्रुप सदस्यनोंदणीकरता सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी खुला होईल.
२. या ग्रुपचे सदस्यत्व घेतल्यावर लेखनाचा धागा हा पर्याय निवडून लेखन करा.
३. प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - गेले करायचे राहुन- (तुमचे मायबोली सदस्यनाम)
४. शब्दखुणांमध्ये मायबोली गणेशोत्सव २०२६ असे लिहा.
५. प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६, अमेरिकेतील पॅसिफिक टाइम झोननुसार रात्री १२ वाजेपर्यंत आहे.
६. हा लेखन उपक्रम आहे, स्पर्धा नाही.
७. लेखन कुठेही पूर्वप्रकाशित नसावे.
गणपती बाप्पा मोरया!
शब्दमर्यादा आहे का ?
शब्दमर्यादा आहे का ?
(लिहिले तर साधारण हजार पानी ग्रंथ होईल म्हणून विचारले 😜)
माबोकरांचे मनोगत वाचण्यास उत्सुक.
अनिंद्य, माझ्या मनात अगदी
अनिंद्य, माझ्या मनात अगदी हेच्च आलं.
रस्तेमार्गे जगभ्रमण ही इच्छा
शुभेच्छा सर्वांना
या वेळी उपक्रमात बापट मराठी
या वेळी उपक्रमात बापट मराठी सक्तीची करावी ही संयोजकांना विनंती.
किंवा बापटमराठीत कुठल्याही विषयावर सलग दहा मिनिटे बोला असा एखादा उपक्रम असावा.
एखाद दुसरी गोष्ट आहे पण अति
एखाद दुसरी गोष्ट आहे पण अति वैयक्तिक असल्याने लिहीणार नाही. बर्याच गोष्टी करायला खरे तर कोणीच अडवलेले नसते. आपणच आळसामुळे, कामाच्या व्यग्रतेमुळे टाळत असतो.
उपक्रमाचा मसुदा छान आहे.
उपक्रमाचा मसुदा छान आहे. शब्दबंबाळ केलेला नाही उगाच. एक शेर = २५ साधी वाक्य.
वाचायला मजा येईल.
वाचायला मजा येईल.
ना जाने कितनी उडाने बाकी है
ना जाने कितनी उडाने बाकी है
इस परिंदे मे अभी जान बाकी है
मी जेव्हा म्हातारा होईन तेव्हा याबद्दल लिहीन
अपूर्ण बऱ्याच गोष्टी आहेत आणि सगळ्या अवाक्यात आहेत.
अरे लिहिताय ना? नाहीतर, गेले
अरे लिहिताय ना? नाहीतर, गेले लिहायचे राहून असे व्हायचे.
हाहाहा
हाहाहा
अनिंद्य+१ ग्रंथ होईल. पण
अनिंद्य+१ ग्रंथ होईल. पण अजूनही "गेले करायचे राहून" म्हणवत नाही, "अजून करायचेय पाहून" म्हणेण. पुढे मागे होईलही.
तसं तर तसं. पण लिहा. म्हणजे
तसं तर तसं. पण लिहा. म्हणजे का राहिलं, करण्यासाठी काय करायचं याचा ठोस विचार करता येईल!
बरं!
बरं!
वेळ संपली का लिहायची?
वेळ संपली का लिहायची?
स्पर्धांसाठी वेळ अजून साडे
स्पर्धांसाठी वेळ अजून साडे तीन तास आहे
मला सर्वाधिक आवडलेला उपक्रम
मला सर्वाधिक आवडलेला उपक्रम आणि म्हणुनच ही यादी - सर्व नोड क्रमांकांच्या चढत्या क्रमात
गेले करायचे राहुन-Abuva
ममो तुमचा नोड क्रमांक = 88888
आय कुडन्ट हेल्प बट नोटिस.
गेले करायचे राहून.. एकदा तरी वारी अनुभवावी.. मनीमोहोर
शशक स्पर्धा - ऋन्मेऽऽष - गेले करायचे राहून..
गेले करायचे राहून - आशिका
गेले करायचे राहून- कविन
लेखन उपक्रम- गेले करायचे राहुन- अतरंगी
लेखन उपक्रम- गेले करायचे राहुन - किल्ली
उपक्रम - गेले करायचे राहुन - रीया
गेले क/तरायचे राहून - स्वाती_आंबोळे
गेले करायचे राहून - राज अज्ञानी
गेले करायचे राहून - सामो
गेले करायचे राहून - अमितव
गेले करायचे राहुन - अंजली_१२
लेखन उपक्रम - गेले करायचे राहून - मीस्वच्छंदी
गेले करायचे राहून
गेले करायचे राहून - माझेमन
गेले करायचे राहून - भरत.
गेले करायचे राहून - अस्मिता.
गेले करायचे राहून - सावित्रीच्या लेकी
गेले करायचे राहुन - प्रज्ञा९
गेले करायचे राहून - सोनू.
सामो मी हि सुद्धा यादी बनवली
सामो मी हि सुद्धा यादी बनवली होती आत्ताच. पाहतो तर तुम्ही आधीच बनवलीय. वाह
)
मला स्वतःलाच हे सारे लेख वाचायचे असल्याने दोन्ही याद्या बनवल्या.
(हो मी सुद्धा 88888 नोटीस केलं होतं
हा लेख ऍडा त्या यादीत:
mrsbarve: https://www.maayboli.com/node/88958
सामो, मनापासून आभार.
सामो, मनापासून आभार.
मायबोलीवर सर्वोत्तम वाचक म्हणून कुणी कौल मागितला तर तुमचे नाव वर असेल.
होय तुमच्यापासून प्रेरणा घेउन
होय तुमच्यापासून प्रेरणा घेउन, मी धडाधड बनवुन टाकली.
राज हाहाहा धन्यवाद. आणि
राज
हाहाहा धन्यवाद. आणि चिकीत्सक आणि सर्वंकष विचार करुन लिहीणारे म्हणुन तुम्ही सर्वात वर असाल.
हा उपक्रम वाचल्यापासून (गेले
हा उपक्रम वाचल्यापासून (गेले करायचे राहून) सतत टिव्हीवर पाकृ लागल्यावर मुलाला धपाटा मारून "ए लिहून घे रे सांगते ते" म्हंणून लिहून घेतलेल्या पाकृच्या वहीतल्या पाकृ काही वर्षांनी (ती वही सापडल्यानंतर) वाचताना मनात येणार्या भावना आहेत असे वाटत होते.
>>>हा लेख ऍडा त्या यादीत:
>>>हा लेख ऍडा त्या यादीत:
केला केला.
ममो तुमचा नोड क्रमांक = 88888
ममो तुमचा नोड क्रमांक = 88888 Happy आय कुडन्ट हेल्प बट नोटिस. आणि हो मी सुद्धा 88888 नोटीस केलं होतं Happy>> व्वा तुमच्या दोघांच्या बरं लक्षात आलं. कमाल आहे. मी स्वतः अपलोड करून माझ्या ध्यानात नव्हतं आलं . मी तो प्रकाशित करू का नको ह्याबाबत फार द्विधा होते पण शेवट धीर गोळा करून केला प्रकाशित. असो.
धन्यवाद सामो
धन्यवाद सामो
>>>> पण शेवट धीर गोळा करून
>>>> पण शेवट धीर गोळा करून केला प्रकाशित. असो.
का बरं किती छान लेख आहे.
मॅगी यु आर वेलकम.
एरव्ही न लिहीणारे किती जण
एरव्ही न लिहीणारे किती जण लिहीते होताहेत.
बरंच राहिलंय वाचायचं. जेव्हढे वाचून झाले होते त्यावर आज प्रतिसाद दिले.
आपलीच अवस्था "गेले वाचायचे राहून" अशी होतेय.