नमस्कार मायबोलीकर मंडळी!
ही घोषणा आहे यंदाच्या गणेशोत्सवातल्या दुसर्या पाककृती स्पर्धेची - दिसतं तसं नसतं.
एखादा पदार्थ पाहिल्यावर किंवा त्याचं नाव ऐकल्यावर त्यात काय घटक असतील , तो चवीला कसा असेल याबाबतचे काही ठोकताळे आपल्या मनात तयार होतात. पण आपण याच समीकरणांना या स्पर्धेच्या निमित्ताने छेद द्यायचा आहे.
म्हणजे नावावरून व रूपावरून जो पदार्थ गोड असावा अशी अपेक्षा असेल तो तिखट किंवा कडू निघावा; आंबट वाटेल असा पदार्थ गोड निघावा, असं काहीसं.
नियम
१. प्रवेशिका पाठवण्यासाठी मायबोली गणेशोत्सव २०२६ या ग्रुपचे सदस्यत्व घेणे आवश्यक आहे. हा ग्रूप सदस्यनोंदणीकरता १४ सप्टेंबर रोजी खुला करण्यात येईल.
२. या ग्रुपचे सदस्यत्व घेतल्यावर पाककृती हा पर्याय निवडून तुमची पाककृती लिहा.
३. प्रवेशिकेचे शीर्षक पुढीलप्रमाणे द्यावे - पाककृती स्पर्धा २ - (तुमचे मायबोली सदस्यनाम)
४ पाककृतीसाठी लागणारे साहित्य, त्याचे प्रमाण आणि पाककृतीतील पायर्या स्पष्ट लिहाव्यात.
५ पाककृतीसोबत साहित्याचा आणि तयार पदार्थाचा अशी दोन छायाचित्रे द्यावीत. मधल्या पायर्यांचेही फोटो देता आले तर उत्तम.
६. प्रवेशिकेला "मायबोली गणेशोत्सव २०२६" अशी शब्दखूण द्यावी.
७. प्रवेशिका देण्याची अंतिम मुदत शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६, अमेरिकेतील पॅसिफिक टाइम झोननुसार रात्री १२ वाजेपर्यंत आहे.
८. स्पर्धेचा निकाल मतदानाने ठरवण्यात येईल.
९. लेखन कुठेही पूर्वप्रकाशित नसावे.
१०. एक सदस्य कितीही प्रवेशिका देऊ शकतो.
गणपती बाप्पा मोरया!
ही सुद्धा कल्पक स्पर्धा,
ही सुद्धा कल्पक स्पर्धा, cooking something with an interesting twist 👍
आता कोण काय घेऊन येते याची उत्सुकता.
कल्पक.
कल्पक.