Submitted by तुष्कीनागपुरी on 2 September, 2026 - 14:49
रेशमाची वळणांची
केसांतली लय धुंद
छंदोबद्ध तुझे डोळे
तुझा तिळ मुक्तछंद
.
तुझी जिवणी गज़ल
ओठ तुझे उला सानी
तुझ्या अर्थात उत्कट
कडेलोट खुळ्यावानी
.
तुझी पैंजण पाऊले
जग होई काव्यमय
बोटांनी केलेली सही
हातावर उरे सय
.
तुष्की नागपुरी
नागपूर, ममगळवार, १ सप्टेंबर २०२६, २२:००
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा