Submitted by Meghvalli on 21 August, 2026 - 12:06

शर एक आला नी श्रावणाचा प्राण घेऊनी गेला,
इतिहास पुढेच घडला, दशरथाचा राम घेऊनी गेला।
शापाने केली दोघांची ताटातूट, रामास वनवास ठोठावून गेला,
पुत्रवियोग न साहवे दशरथाला, प्राण त्याचा देह सोडून गेला।
किती कठोर होती नियती, श्रावण बाळाची,
तितकीच कठोर होती नियती दशरथाची।
एक पिता रडला वनी, आपल्या पुत्राच्या शोधात,
एक पिता रडला राज्यी, आपल्या पुत्राच्या वियोगात।
एक क्षणाचा अपराध, आयुष्याची शिक्षा देऊन गेला,
शर एक, दोन पिढ्यांचा अंत करवून गेला।
इतिहास साक्षी, नियतीस जे घडवायचे तेच घडले,
त्या एका शब्दभेदी शराने, पुढले रामायण घडले।
शुक्रवार, २१/८/२६ , ०८:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा