ताम्हनकर यांचा 'दाजी' - कुठे मिळू शकेल?

Submitted by चीकू on 16 August, 2026 - 17:35

ना. धो. ताम्हनकर हे मुख्यतः गोट्या, चिंगी, खडकावरला अंकुर यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी निर्माण केलेली अजून एक व्यक्तिरेखा म्हणजे 'दाजी'. दाजी ही एक आपल्या चिंटूसारखी cartoon strip होती आणि यातील चित्रे हरिचंद्र लचके यांनी काढली आहेत. लचके यांच्या 'हसा व लठ्ठ व्हा' या पुस्तकात दाजी च्या काही strips चा समावेश आहे. मला या strips खूप आवडल्या आणि मी मूळ दाजीचे पुस्तक शोधत आहे ज्यात सर्व strips
समाविष्ट असतील. असे कुठे पुस्तक आहे का? मूळ दाजीच्या strips कुठल्या मासिकातून वा वर्तमानपत्रातून प्रकाशित झाल्या होत्या का?
कोणास माहीत असेल किंवा कोणाजवळ असेल तर कृपया कळवाल का? धन्यवाद!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चीकु "दाजी" हे कॉमिक्स नाही, ना धो ताम्हणकरांची कादंबरी आहे. मांडणी अगदी ग'गोट्या' सारखी असलेली. म्हणजे गोट्या चा हिरो जसा गोट्या आणि त्याची गोष्ट सांगणारे दादा आपल्याशी बोलतात. अगदी तसेच इथे हिरो दाजी आणि त्याची गोष्ट आपल्याला सांगणारे त्याचे वयाने ज्येष्ठ असे मित्र आपल्याला दाजीच्या आठवणी सांगतात. दाजी हिरो असल्याने सद्गुणी पण स्वभावाने अतिशय विक्षिप्त आहे. त्याच्या विक्षिप्त पणातुन ताम्हणकरांचा सेन्स ऑफ ह्युमर प्रकट होतो. १९३५ च्या सुमारास मराठी मध्यमवर्गीय जीवन कसे होते हे कळणे हा बोनस. एकुण मस्ट रीड कॅटेगरीतले पुस्तक आहे हे.

ओरीजनल आवृत्ती किर्लोस्कर प्रकाशनाची आहे आणि माझ्या कडे असलेली तिसरी आवृत्ती देशमुख आणि कंपनी ने प्रकाशित केली आहे. ह्या दोन ठिकाणी चवकशी केल्यास डिटेल्स मिळु शकतील.

मला वाटले कोडे आहे.
पण माहिती मिळाली, मला नव्हते माहित दाजीबद्दल.

मूळ दाजी किर्लोस्कर मासिकात प्रकाशित झाला होता. आता किर्लोस्कर प्रकाशन अस्तित्वात नाही. पीडीएफ पूर्वी कुठेतरी उपलब्ध होती, आता नाही.
मात्र पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षी दाजी एका संग्रहाचा भाग म्हणून पुन्हा उपलब्ध होईल. ते काम सुरू आहे.
तुम्ही कोणत्या शहरात राहता हे क्ळवलं, तर त्या शरातल्या महत्त्वाच्या सार्वजनिक ग्रंथालयात हा संग्रह उपलब्ध होईल, याची मी काळजी घेईन.

मी लचके यांच्या कॉमिक स्ट्रिप बघितल्या आणि मला वाटले की ते कॉमिक्स असेल. ती कादंबरी आहे हे माहीत नव्हते. बहुतेक लचके यांनीच मूळ पुस्तकातील चित्रे काढली असावीत.
चिनूक्स - पुण्यात कुठे उपलब्ध होईल ते कळवा.
पर्णीका - देशमुख आणि कंपनीत चौकशी करून बघीन.
धन्यवाद!

चीकू,
पुण्यात साधारण दोनेक वर्षांत महत्त्वाच्या सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये हे संग्रह उपलब्ध होतील.

धन्यवाद चिनूक्स! हा कोणता संग्रह आहे, नाव काय आहे? दाजी बरोबरच बाकीही ताम्हनकरांचे साहित्य त्यात असेल का? तसेच विक्रीसाठीही उपलब्ध असेल ना?