Submitted by अनन्त्_यात्री on 4 August, 2026 - 07:03
मावळतीवर / केशर सांडते
तेव्हा झंकारते / आत काही
आत खोलवर / झंकारते तेव्हा
कोंडला पारवा / फडफडे
पारवा तोडतो / स्थळ-काळ पाश
घेतो अवकाश / पंखांखाली
पंखांवर त्याच्या / झुले मुक्तछंद
अनाहत नाद / रोमरोमी
कल्लोळ उठती / रोमरोमी कैसे
केशर हे पिसे / लावतसे
झेपावे पारवा / मावळतीपार
सांडले केशर / काळवंडे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान कविता..!
छान कविता..!
कविता आवडली.
कविता आवडली.