आज वसुधा ताई च्या आनंदाला अगदी उधाण आले होते कारणच तसे होते, आज अस्मिता आणि महेश चा साखरपुंडा झाला. किती दिवासां पासून त्या या दिवसाची आतुरतेने वाट बघत होत्या.
अस्मिता कंच हिरव्या रंगाची पैठणी नेसलेली आणि महेश ने पण त्याला साजेसा असा शेरवानी घातला होता. दोघेही जणू लक्ष्मी नारायणचा जोडा असे दिसत होते.
साखरपुडा तर शेखर ने एवढा दणक्यात केला की मूला कडचे सगळेच खूपच खुश झाले, खरे तर त्यांची काहीही अट नव्हतीच पण अस्मितच्या बाबाला तिचे कुठलेच कार्य साधेपणाने करायचेच नव्हते. वसुधा ताई हा सोहळा बघून हरखून गेल्या. महेश ची आई कौतुकाने नव्या जोडप्याकडे बघत होत्या, आपल्या लाडक्या लेकाच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद बघून त्याही मनातून खुश झाल्या होत्या.
अस्मिता वसुधा ताईंची नात आई शिवाय वाढलेली पोर, दिसायला नाकी डोळी सुरेख, डोळे तर इतके बोलके, की आत्ता बोलू लागतील. फक्त दिसायलाच सुंदर नाही तर अस्मिता ने नावाप्रमाणे तिने उंच भरारी घेत मोठ्या कंपनीत चांगली नोकरी देखील मिळवली होती.
महेश आणि अस्मिता दोघेही एकाच कंपनीत एका प्रोजेक्ट वर काम करत होते. सोबत काम करतानाच महेश वर तिच्या मधल्या बुद्धीमत्तेची छाप पडली. अस्मिता मात्र काम करत असताना फक्त कामाबद्दल च बोलत असे, पण तिचे बोलणे, वागणे आणि एखादी गोष्ट समजून घेणे आणि समोरच्या ला समजावून सांगणे हे ती जितक्या कौशल्याने करत असे, की समोरचा तीला सहजच वश झाला नाही तरच नवल. मोठ्या संस्थेतून इंजिनियर झालेला आणि अस्मिताचा प्रोजेक्ट मॅनेजर असलेला महेश उगाच नाही तिच्या प्रेमात पडला. महेश ने जेव्हा तीला लग्नाबद्दल विचारले तेव्हा खरे तर अस्मिता ने त्याला सरळच सांगीतले माझ्या बाबाला जर तू आवडला तरच् मी लग्नाला होकार देणार. मग काय महेश त्याच्या आईला घेऊन सरळ घरीच आला, जुजबी बोलणे झाल्यावर सहजच अस्मिता च्या आईचा विषय निघाला. आणि
वसुधा ताईंच्या डोळ्यासमोर तो प्रसंग आजही जसाच्या तसा उभा राहीला
महेश च्या आई ला सुमन ताई ना वसुधा ताई अस्मिता बद्दल सांगू लागल्या,
“अस्मिता पाच वर्षांची होती, जेव्हा तीची आई तीला सोडून गेली. खरे तर काहीही घडले नव्हते, तरिही अस्मिता च्या आईला विशाखा ला मात्र या घरात राहायला नको होते, त्यासाठी अनेक दिवस ती शेखर ला काही बाही बोलत होती, पण त्यानेही तीला ठाम सांगीतले तुला इथेच या घरात मी, आई आणि अस्मिता सोबत राहावे लागेल.
शेवटी एक दिवस विशाखा हे घर सोडून कायमची निघून गेली. परत कधीही न येण्या साठी. शेखर ने खूप वाट बघितली, अनेक वेळेला, फोन केले, तीला तिच्या ऑफिस मधे ही जाऊन भेटून आला, अस्मिता ची शपध घातली तरिही ती बधली नाही. आणि अस्मिता ची पूर्ण जवाबदारी माझ्यावर येऊन पडली, त्यामुळे मी जणू परत एकदा आई झाले. अस्मिता जसजशी मोठी होत होती, तशी अधिक अधिक शहाणी समंजस होत गेली. कधीतरी आई ची आठवण काढत असे पण क्वचितच.
सगळ्यांच्या आई शाळेत येतात, पण अस्मिता ने कधी आई आली नाही म्हणून तक्रार केली नाही. माझ्याशी फार काही बोलत नसे पण, शाळेत पेरेनट्स मिटिंगला ‘आजी तू ये ना ग आज,’ म्हणून मागे लागत असे.
काही झाले तरी अभ्यासाचा तिने कधीही कंटाळा केला नाही, वर्गात कायम पहिल्या पाच नंबरात असे. तिच्या बाबाने मला त्रास नको म्हणून स्वैपाकी, नोकर माणसे ठेवलेली आहेत. त्यामुळे कधी मूड झालाच तर, किंवा वेळ असेल तर अस्मिता काही ना काही बनवीत असते, आणि आम्हाला खाऊ घालत असते.”
महेश ची आई शांतपणे वसुधा ताईंचे बोलणे ऐकत होत्या. आई विना वाढलेली पोर कशी असेल म्हणून त्या जरा साशंक होत्या. पण आजी च्या तोंडून त्यांनी आपल्या होणाऱ्या सुनेचे कौतुक ऐकले आणि त्या मनोमन सुखावल्या.
तरिही अस्मिताची आई भरल्या घरातून का निघून गेली असेल याचे त्यांना आश्चर्य वाटत होते. पण त्यांनी वसुधा ताई ना तसे काही विचारले नाही. महेश आणि अस्मिताने सुखाने नांदावे एवढीच त्यांची अपेक्षा होती.
शोधून ही मिळाली नसती अशी लाखात एक सून त्यांना मिळाली होती.
०१.०७.२०२६
लग्न होऊन अस्मिता, कारखानीसांची सून झाली, घरात महेश आणि त्याचे आई बाबा, घर कसले तो तर होता, दोन मजली टुमदार बंगलाच, जणू एक लहान वाडा च. मागे पुढे मोठे अंगण मोठ मोठ्या खिडक्या, दारे आणि प्रशस्त खोल्या, महेश चे वडील जिल्हा न्यायालयात जज होते, त्यामुळे घरात नोकर चाकर, मोठ्या तीन गाड्या आणि प्रत्येक गाडीला एक वेगळा ड्रायवर, सुमन ताईंना त्यांच्या श्रीमंतीचा खूपच अभिमान होता.
सुरुवातीचे सगळे दिवस अगदी सुखाचे जात होते. अस्मिता हळूहळू त्या घरात रुळत होती, पण सुमन ताई तीला काही ना काही कारणावरून टोकात असत, सतत काहीतरी बोलून तीच्या आनंदी उत्साही अशा मूड वर विरजण घालत असत, सारखे तिच्या माहेर ची त्या प्रत्येक गोष्टी मधे तुलना करत.
एक दिवस न राहवून अस्मिता ने बाणेदार पणे महेश ला सुमन ताईं समोर सांगीतले, महेश मी तुझ्याशी लग्न केले आहे, ते तुझे घर आणि श्रीमंती बघून नाही. माझे माहेर भलेही तुझ्या सारखे श्रीमंत नसेल, पण आम्ही माणसांना किंमत देतो पैशाला नाही. मी तर तुझ्यामधील गुणांना बघून तुला लग्नाला होकार दिला. तुझी श्रीमंती बघून नाही.,
लॅप टॉप वर काम करीत असलेल्या महेश ला थोडा वेळ काय झाले ते कळले च नाही, महेश काही बोलणार त्या आधीच अस्मिता बॅग उचलून दारबाहेर गेली सुद्धा,
“ अस्मिता अगं, थांब काय झाले तुंला अचानक,?, असे म्हणत महेश तिच्या मागोमाग निघाला, तर, सुमन ताईंनी त्याला अडवले नाही, पण एव्हाना ती गेट च्या बाहेर पोहोचली देखील होती,
त्या संपूर्ण दिवसभर अस्मिता महेश शी मोजकंच बोलली, कामाच्या व्यापामुळे त्यांना सोबत लंच करायला पण नाही जमले,
संध्याकाळी, घरी जायचे वेळी महेश अस्मिता ला म्हणाला, आज बाई साहेबांचा मूड ठीक दिसत नाहीये, चल आपण आज मस्त लॉन्ग ड्राइव ला जाऊया, “ काही नकोय, मला माझ्या घराची आठवण येते आहे, मला काही दिवस बाबांकडे जायचे आहे आजी ला पण बरे नाही आहे,”
अस्मिताचा राग कमी करण्यासाठी महेश म्हणाला, “ ठीक आहे आपन बाबांना भेटायला जाऊया, चल, मी आईला कळवतो, आज आपण डिनर आजी आणि बाबांसोबत करू, मग तर झाले”, तरिही अस्मिता काही बोलण्याच्या मूड मधे नव्हतीच, महेश ने अस्मितच्या बाबांना फोन केला, “ हॅलो बाबा, मी आणि अस्मिता तुम्हाला डिनर ला घेऊन जायला येतो आहे, तयार राहा.” महेश ने फोन करून त्याच्या आईलाही सांगीतले की दोघे जेउंनच घरी येणार आहेत.
सुमन ताईंना सकळचा प्रसंग आठवला, खरे तर त्या तिच्या बोलण्याने दिवसभर अस्वस्थ च होत्या, त्यामुळे मुले संध्याकाळी घरी आली की अस्मिता शी सविस्तर बोलूया असे त्यांनी ठरवले होते, पण आता मात्र त्यांना उगाचच सकाळच्या अस्मिताच्या बोलण्याचे दडपण आले, हॉल मधे त्या रोज संध्याकाळी फिरून आल्या की वाचन करीत असत पण आज त्यांचे कुठेच लक्ष लागत नव्हते. सारखे त्यांना तिचे बोलणे आठवून वाईट वाटत होते, विचार करत करत त्यांना त्यांचे बालपण आठवले,
महेश च्या आई सुमन ताईंच्या डोळ्यासमोर छोटी सुमन उभी राहिली, सुमन अगदी पाच वर्षाची असताना बाळंतपणात च बाळाला आणि लहानग्या सुमन ला मागे ठेऊन तीची आई देवाघरी गेली, तेव्हा घरात आजी आजोबा, आत्या अशी सगळी मंडळी होती, लहान असलेल्या बाळाला तर काहीच कळत च नव्हते, पण लहानगी सुमन घरभर सतत आई ला शोधत असे. नाही म्हणायला आजी अन आत्या घरात होत्या सुमन ला कधी आई ची आठवण आली की आजी जवळ घेऊन बसंत असे. आणि आत्या तर जणू तान्ह्या शाम ची आई झाली होती.
विचार करत करत तिथेच त्यांचा डोळा लागला,
“ आईsss,” अस्मिता हसतच आत आली, तिच्या आवाजने त्यांना जागे केले, आणि त्या बघतच राहिल्या, सकाळी रागावून गेलेली हीच ती अस्मिता आहे ना?
अस्मिता सुमन ताईंना बघून म्हणाली, “हे काय आई, तुम्ही अजून झोपायला नाही गेलात, आणि आज बाबा पण नाही आलेत का?”
सुमन ताईंना आपली चूक लक्षात आली, खरेच त्यांना शोधून ही मिळाली नसती अशी लाखात एक सून मिळाली होती.
अस्मिता
Submitted by शिवानी बलकुंदी on 3 August, 2026 - 01:24
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बरी आहे कथा. एकमेकांच्या चूका
बरी आहे कथा. एकमेकांच्या चूका पदरात घालणे महत्वाचे असते. पण अस्मिताने एकदा स्पष्टपणे सुमनताईंना बजवायला पाहीजे होते की हे अनाठायी आरोप तिला सहन होत नाहीत आणि तिच्या वैवाहीक जीवनासही त्यामुळे नख लागतय ते.
मनःपूर्वक धन्यवाद @सामो
मनःपूर्वक धन्यवाद @सामो