Submitted by दत्तात्रय साळुंके on 29 July, 2026 - 09:45
ऊन पावसात | चालली ही वारी
पायाला भिंगरी | पथावरी ||१||
जेवता विठ्ठल | विठ्ठल चालता
बैसता, उठता | हाची नेम ||२||
देहभान सारे | विरोनिया गेले
चित्त स्थिरावले | पांडुरंगी ||३||
उशीर अंमळ | झाला संतजना
विठ्ठला सोसेना | विट पायी ||४||
सोडूनी राऊळा | वाटेवर आला
संतांचा जाहला | जगजेठी ||५||
संताचे सांगाती | पांडुरंग दंग
गातसे अभंग | आपुलाची ||६||
येताची पंढरी | सावरला हरी
उभा विटेवरी | गाभा-यात| |७||
दिंड्या पतांकांचे | दळ हे साजिरे
वसिले भिवरे | वैकुंठची ||८||
भेटता सगुण | वारकरी तल्लीन
फळा आले पुण्य | जन्मांतरी ||९||
पाय परतोनी | न फिरे माघारी
सोडूनी पंढरी | जावयासी ||१०||
देतो उपदेश | पांडुरंग नीका
कर्मयोग ऐका | गितेतला ||११||
सुधीर होऊनी | रणांगणा ध्यावे
आयुष्य वेचावे | पुरुषार्थी ||१२||
© दत्तात्रय साळुंके
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फार फार सुंदर.
फार फार सुंदर.
धन्यवाद सामो...
धन्यवाद सामो...
सुधीर होऊनी | रणांगणा ध्यावे
सुधीर होऊनी | रणांगणा ध्यावे
आयुष्य वेचावे | पुरुषार्थी ||१२|| >>>>> नेमके...
खूपच सुंदर.....
___/\___
भक्तीमय , सुंदर कविता..!
भक्तीमय , सुंदर कविता..!
आज आठवलं संत तुकोबांचा नितांत
आज आठवलं संत तुकोबांचा नितांत सुंदर अभंग याच्या उलट अर्थानं लिहिलेला.
https://www.aathavanitli-gani.com/Song/Jato_Maghari_Pandhari_Natha
शशांकजी रूपालीताई खूप धन्यवाद
शशांकजी
रूपालीताई
खूप धन्यवाद
छान आहे. आवडली.
छान आहे. आवडली.
मीस्वच्छंदी खूप धन्यवाद
मीस्वच्छंदी
खूप धन्यवाद