रंगीत पेन्सिल्स - Interwoven

Submitted by वर्षा on 18 July, 2026 - 18:31

पानगळीनंतर निष्पर्ण झाडांचं आंतरीक सौंदर्य दिसू लागतं. खोडं, त्याच्या विविध जाडी, उंची, सालांचे पोत, रंग, काय आणि किती बघाल. पावसात बाहेर पडलं तर काही खोडं, फांद्या तासल्यागत गुळगुळीत आणि म्हणून सुरेख चकाकी मिरवतात. तर काही अशक्य खडबडीत. भरपूर फोटो घेऊन ठेवलेत ह्या गोष्टींचे. स्केचिंगसाठीचा हा सबजेक्ट बराच काळ डोक्यात होता. त्यातल्या एकाच्या फांद्या खूप फाटे फुटलेल्या पण तरीही एकत्रित गुंतलेल्या.

Interwoven

Polychromos Artists' Color Pencils.
Strathmore 300 series artist paper.

अलिकडील चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - फ्लेमिंगो आणि ब्ल्यू आयरीस
रंगीत पेन्सिल्स - Killdeer
रंगीत पेन्सिल्स - Wings of Sapphire (Blue bellied Roller)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख!
या वसंतात बोडक्या झाडांना पानं येऊ लागल्यावर 'हे सुरेख निष्पर्ण वृक्ष जाऊन आता सगळे हिरवेगार होणार! सृष्टीचे हे करडे ('ग्रे') वैभव परत यायला अजुन दोन-तीन महिने (आता दोनच Wink ) तरी वाट बघावीच लागेल' हा विचार आलेला आणि तुझ्या लेखात तेच दिसलं. Happy

थँक्स अमित Happy हो ना! माझ्या मनात विचार आलेला की किती वेगात हे अर्ध वर्ष गेलं पण.
सामो, धन्यवाद, बॅकग्राउंड म्हणजे कोरा कागदच आहे हाहा.