पुरावा - "संशयातीत .." म्हणजे कसा ? आणि "सबळ " म्हणजे काय ?..

Submitted by विजनवासि on 2 July, 2026 - 05:48

ज्याना ह्या लेखाचे पूर्वरंग जाणून घ्यायचे त्यांनी माझेच - एका कड्याच्या टोकावर उभा समाज...सिया आणि केतनच्या निमित्ताने! आणि घात .. अपघात की आत्मघात . हे दोन धागे आणि त्या खालची चर्चा याचा संदर्भ घ्यावा . .

या चर्चेत दोन शब्द वारंवार येतही राहिले आणि लक्ष वेधुन घेत राहिले —"संशयातीत" आणि "सबळ पुरावा." गंमत म्हणजे, कोणत्याही केस चा हाच कळीचा मुद्दा किंवा " पोपटाचा डोळा " असूनही याच दोन्ही शब्दांबद्दल लोकांमध्येही पुष्कळ गैरसमज आढळतात.म्हणून - याच दोन शब्दांचे माझे आकलन - नुकत्याच घडलेल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर मांडायचा प्रयत्न करत आहे ..
पहिला शब्द म्हणजे "संशयातीत. म्ह्न्जे "वाजवी संशय उरणार नाही इतपत सिद्ध झालेला. अनेकांना वाटतं की संशयातीत पुरावा असावा म्हणजे आरोपीविरुदोशिशि,तो दोषी आहे या बद्दलचा प्रत्येक, अगदी अशक्यप्राय किंवा काल्पनिक प्रश्नसुद्धा- उत्तरला गेला पाहिजे. पण कायदा तसं म्हणत नाही.कायदा दोषी नसण्याची "प्रत्येक शक्यता" संपवायला सांगत नाही; तो "वाजवी शक्यता" संपवायला सांगतो… beyond reasonable doubt - and not beyond all conceivable doubt .... एखाद्या घटने बाबत - एखादा माणूस दोषी नाही असे -कुणीतरी अतिशय कल्पनेला पूर्ण वाव देत -पण तरीही शक्य वाटेल असे स्पष्टीकरण देऊ शकतोय-- केवळ म्हणूनच केस सिद्ध झाली नाही आणि पुरावा अपुरा पडला - असे होत नाही . न्यायालय स्वतःला हा प्रश्न विचारतं—"या सगळ्या पुराव्यांकडे एकत्र पाहिल्यावर आरोपी निर्दोष असण्याची काही वाजवी शक्यता उरते का?" जर त्याचं उत्तर "नाही" असं असेल, तर तो पुरावा संशयातीत मानला जाऊ शकतो.मग कितीही कल्पना रम्य शक्यता अजून उरलेल्या असल्या तरीही..
आता , यातून पुढचा प्रश्न लगेच तयार होतो .. तो म्हणजे " वाजवी " म्हणजे काय ? आणि ते कोण ठरवते? एखाद्या आरोपीला वाचवण्यासाठी कितीही काल्पनिक शक्यता मांडता येतात. "कदाचित तो घसरला असेल", "कदाचित तिसरीच एखादी व्यक्ती तिथे आली असेल", "कदाचित असं झालं असेल.. कदाचित तसे झाले असेल .. आणि आरोपीने हे केलेलेच नसेल ! ." अशा शक्यतांना अंतच नसतो. पण न्यायालय अशा केवळ कल्पनांवर निर्णय देत नाही.वाजवीपणा हा प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीवर ठरत नाही; तो न्यायालयाच्या विवेकबुद्धीवर ठरतो. .. ही एक प्रकारे न्यायालयावर समाजाने दाखवलेली लीप ऑफ फेथ च आहे असे म्हणता येईल. न्यायालयाच्या विवेकबुद्धीला पटेल ते -"वाजवी" ! (म्हणूनच न्यायालयात निकाल मिळतो; न्याय मिळेलच असे नाही, असे म्हटले जाते.)किंवा न्यायालयात जे मिळतं त्याला न्याय म्हणायचं असतं. अश्या उपरोधिक म्हणी प्रचलित होतात आणि अगदी सहज रोजच्या वापरात त्या चलनी नाण्यांसारख्या लोकप्रिय होतात ) .. पण थोडा ss .. अगदी थोडासा जरी खोल विचार केला तरी ही लीप ऑफ फेथ एव्हढी ही काही सहजासहजी केलेली नसते हे ही लक्षात येते .. शतकानुशतके घडवलेले न्यायिक निकष . असंख्य न्यायनिर्णय, न्यायालयीन तर्क, आणि वरच्या न्यायालयांकडून होणारे पुनर्विलोकन (appellate review) यांतून या संकल्पनेला आकार दिलेला असतो.. एखाद्या खटल्यात खालच्या न्यायालयाच्या न्यायाधीशाला जे "वाजवी" वाटेल, ते अंतिम मानले जात नाही. हे याच साठी .. अपील असते .. त्याची कसोटी उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय वेळोवेळी लावत असते . अशा सततच्या न्यायप्रक्रियेतूनच "वाजवीपणा" म्हणजे नेमके काय, याचे न्यायशास्त्रीय मापदंड विकसित होत गेले आहेत. त्यामुळे "वाजवी संशय" हा एखाद्या व्यक्तीच्या मनात आलेला कोणताही संशय नसून, न्यायालयीन परंपरा, तर्कशास्त्र आणि पुरावे यांच्या कसोटीवर टिकणारा संशय असतो.("A court is not the owner of truth; it is society's most reliable institutional mechanism for searching for truth."). तर महाराज .. माझे म्हणणे असे की "संशयातीत" हा पुराव्याचा प्रकार नाही; तो न्यायालयाला पटलेल्या खात्रीचा स्तर आहे. आणि त्या खात्रीपर्यंत न्यायालय पोहोचतं ते सबळ आणि विश्वासार्ह पुराव्यांच्या आधारे.( म्हणजे साधन आणि उद्दिष्ट असा संबंध - सबळ हे साधन .. संशयातीत हे डेस्तिनेशन )
.. आता एथे येतो दुसरा शब्द - "सबळ पुरावा"!.. अनेक जणांना वाटते की प्रत्यक्ष पुरावा म्हणजेच सबळ पुरावा आणि परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे काहीतरी असे ज्याला मुळातच कमकुवत पणाचे अंग आहे .. प्रत्यक्ष पुरावा नसताना - नुसत्या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारावर हा खात्रीचा स्तर गाठला जाऊ शकणारच नाही त्यामुळे नुसत्या परिस्थितीजन्य पुराव्यावर खुनासारख्या गुन्ह्यात शिक्षा संभवंतच नाही .. गुन्हेगार सुटणारच !!! .. तर हा गैरसमज आहे .. असे नसते . भारतीय न्यायालये केवळ प्रत्यक्ष साक्षीपुराव्या च्या आधारेच दोष सिद्ध झाल्याचे धरतात , असा समज चुकीचा आहे. प्रत्यक्षात, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारेही भारतीय न्यायालयांनी असंख्य खुनाच्या खटल्यांमध्ये दोषसिद्धी केलेली आहे.याबाबतचा सर्वाधिक महत्त्वाचा आणि वारंवार उद्धृत केला जाणारा खटला म्हणजे Sharad Birdhichand Sarda v. State of Maharashtra. आपल्या महाराष्ट्रातलीच .. मला वाटते नगर जिलहयातली केस आहे ही..गुन्हा पुण्यातच घडलेला आहे - साल असावे १९८४ .. प्रकरणात शरद बिर्डीचंद सारडा यांच्यावर त्यांच्या पत्नी मंजु यांच्या वर विषप्रयोग करून खून केल्याचा आरोप होता.मंजुळा , आपल्या पुण्यातील घरात , स्वतच्या बेडरूम मध्ये , स्वतच्या बेडवर विषप्रयोगाने मृत्यू पावलेल्या सापडल्या होत्या , पुनः प्रश्न तोच होता .. घात -अपघात की आत्मघात ??? प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर उभा होता—पती-पत्नीतील संबंध, विष मिळवण्याच्या परिस्थिती , मृत्यूच्या आधी-नंतरचे दोघांचे वर्तन, आणि इतर जोडणारे पुरावे.
या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितले की, परिस्थितीजन्य पुराव्यावर दोष सिद्ध करायचा असेल तर पुराव्यांची साखळी पुढील निकष पूर्ण करणारी असली पाहिजे— या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने परिस्थितीजन्य पुराव्यावर दोषसिद्धी करण्यासाठी आवश्यक असलेलली सुप्रसिद्ध " सुवर्णतत्त्वे" मांडली. आजही भारतातील जवळपास प्रत्येक परिस्थितीजन्य पुराव्याच्या खटल्यात या निर्णयाचा संदर्भ दिला जातो. ती तत्वे अशी :
१. गुन्ह्यातली प्रत्येक परिस्थिती ठोस आणि पूर्णपणे सिद्ध झालेली असावी. २. त्या सर्व परिस्थितींचा एकत्र एकच तर्कसंगत निष्कर्ष निघाला पाहिजे—तो म्हणजे आरोपीचा दोष असणे .३. आरोपी निर्दोष असण्याची कोणतीही वाजवी शक्यता त्या पुराव्यांमुळे उरता कामा नये. आणि ४ . सर्व परिस्थिती मिळून अशी अखंड साखळी तयार झाली पाहिजे की, त्यातून आरोपिच दोषी आहे या पलीकडे दुसरा कोणताही तर्कसंगत निष्कर्ष निघू शकणार नाही
आता आपण कोणत्याही केस मध्ये गोळा झालेला पुरावा या निकषांवर उभा करून पाहू शकतो .. जर हे निकष पूर्ण करणार तो असेल तर तो प्रत्यक्ष पुरावा नसला तरी .. दोष सिद्ध करायला सबळ आणि विश्वासार्ह पुरावा असेल ..
( गंमत म्हणजे -ज्या खटल्यात हे निकष निश्चित केले त्या च खटल्यात, आरोपीची , पुरावा साखळी पूर्ण जुळून येत नसल्या बद्दल दोषातून मुक्तता करण्यात आली होती .. मी चुकत नसेन तर ही केस राम जेठमलानी यांच्या शिरपेचातला तुरा मानली जाते ) गंमतीने मी त्याला क्लासिक केस ऑफ ओपेरेशन इज सक्सेसफूल , बट द पेशंट इज डेड -म्हणते !
मला म्हणायचे ते असे की----- म्हणूनच पुरावा "प्रत्यक्ष" आहे की "परिस्थितीजन्य", हा प्रश्न दुय्यम ठरतो. खरा प्रश्न असा असतो—तो पुरावा विश्वासार्ह आहे का? तो इतर पुराव्यांशी जुळतो का? आणि त्या सगळ्या पुराव्यांमधून एकच वाजवी निष्कर्ष निघतो का? थोडा आपण केत आगरवाल केस चा कथाभाग बघितलं तर ----समजा या प्रकरणात हेतू सिद्ध होतो आहे का , आरोपींचे परस्पर संबंध सिद्ध होतात का , मोबाईलमधील संवाद सिद्ध होतात का , घटनास्थळी उपस्थिती सिद्ध होते का , घटनानंतरचे संशयास्पद वर्तन सिद्ध होते का आणि वैज्ञानिक पुराव्यांमुळे अपघाताची शक्यता अत्यंत क्षीण तर घातपाता ची शक्यता अतिशय प्रबळ वाटू शकते का ? . यापैकी एकाही गोष्टीवर स्वतंत्रपणे शिक्षा होणार नाही. हे मान्य .. कारण यात कुठेही प्रत्यक्ष साक्षी पुरावा नाही .. पण या सगळ्या परिस्थिति जन्य गोष्टी एकमेकांना जोडल्या गेल्या आणि त्यातून एक अखंड साखळी तयार झाली, तर तो पुरावा संशयातीत ठरू शकतो का ? .. तर याचे उत्तर होय असे माझ्यामते आहे .
१ "यात सर्वात महत्त्वाचा मुद्दा त्याला आरोपीने ढकलले आहे हे जोवर संशयातीतरित्या सिद्ध होत नाही तोवर आरोपीला शिक्षा होणार नाही हे नक्की.२ तो घसरून पडलेला नाही तर त्याला आरोपीने ढकलले आहे असे फिर्यादी पक्षाला सबळ पुराव्याने सिद्ध करणे आवश्यक आहे आणि हेच फार कठीण आहे".ह्या दोन विधानांचे माझे आकलन हे असे आहे .. आणि माझ्यामते या केस मध्ये दोन्ही विधाने पूर्ण पणे कोर्टात परिस्थिति जन्य पुराव्यावर नीट मार्गी लावता येणार आहेत .. ! वाटते आहे तितकी दोष सिद्धी आत्यंतिक अवघड नाहीये !

Group content visibility: 
Use group defaults

मला कायदा कळत नाही, पण संशयातीत ज्या अर्थाने वापरतात ह्या बातम्यांमध्ये तो चुकीचा वाटतो.

संशयातीत म्हणजे संशयाच्या अतीत, म्हणजे ज्या बाबतीत अजिबात संशय घेण्यास वाव नाही असा.

वादातीत हा शब्द पण असाच चुकीचा वापरला जातो. त्याचा खरा अर्थ ज्याबाबत काही वाद नाही असा आहे. पण अनेकदा तो चुकीने वादग्रस्त ह्या अर्थाने वापरला जातो.

सध्या सिस्टिम नावाचा सिनेमा प्राईम वर आहे. न्यायव्यवस्थेतील पुरावा या व जस्टिस यावर हा सिनेमा फोकस आहे. उत्तम सिनेमा आहे

जर खालील दोन बाबी सिद्ध करता आल्या -
१) "त्या ठिकाणाहून एखादी व्यक्ती पाय घसरून पडण्याची शक्यता कमी आहे." (दिवसाचा प्रकाश, पाऊस नसणे, बळी हा तरुण व धडधाकट असणे, काही दिवसांपूर्वीच पडता-पडता वाचलेला असणे. त्या ठिकाणाहून पडल्याची इतर उदाहरणे नसावीत. इत्यादी.)
२) "आरोपींनी बळीला तेथे ढकलून ठार मारण्याच्या उद्देशाने नेले होते."

तर, वरील दोन्ही गोष्टी एकत्र घडण्याची शक्यता खूपच कमी आहे, हे अर्ग्युमेण्ट टिकू शकेल काय?

माझ्यामते या केस मध्ये दोन्ही विधाने पूर्ण पणे कोर्टात परिस्थिति जन्य पुराव्यावर नीट मार्गी लावता येणार आहेत.

हे कसं सिद्ध करता येईल याबद्दल काही माहिती मिळाली तर बरं होईल.

फोनमधले संभाषणही पुरावा धरत नाहीत.
ढकलून दिले सिद्ध करणे अशक्य वाटते.
"याचा काटा काढला तर आपण लग्न करू शकू" हा प्लान ठरला होता दोघांत हे सिद्ध करणारे काही धागेदोरे मिळवणे शक्य आहे.

माझ्यामते या केस मध्ये दोन्ही विधाने पूर्ण पणे कोर्टात परिस्थिति जन्य पुराव्यावर नीट मार्गी लावता येणार आहेत.
मी प्रयत्न करते .. पुढे जाण्यापूर्वी दोन गोष्टी स्पष्ट करून ठेवत आहे ..
पहिली गोष्ट, मी आता जे काही सांगणार आहे ते पूर्णपणे सार्वजनिक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितींवर आधारित आहे. पोलिसांकडे प्रत्यक्षात किती आणि कोणते पुरावे आहेत, हे आपल्याला माहीत असू शकत नाही. कारण तपास यंत्रणा न्यायालयात पुरावे सादर होईपर्यंत त्यांचा संपूर्ण तपशील कधीही जाहीर करत नाही.
दुसरी गोष्ट, हा खटला सध्या न्यायप्रविष्ट (sub judice) आहे. त्यामुळे अशा प्रकरणावर इतक्या खोलवर भाष्य करणे कितपत योग्य आहे, याबद्दल मलाही काही प्रमाणात संकोच /शंका आहे. म्हणून पुढील विवेचनाकडे अंतिम निष्कर्ष म्हणून नव्हे, तर सार्वजनिकरीत्या उपलब्ध माहितीच्या आधारे केलेला एक अभ्यास म्हणूनच पाहावे.
(Motive)तपासात आतापर्यंत समोर आलेला दावा :सियाचे चेतनशी प्रेमसंबंध होते.तिचे केतनशी लग्न ठरले होते.कुटुंब किंवा समाजात संघर्ष निर्माण न करता हे लग्न मोडावे, अशी तिची इच्छा होती, असा पोलिसांचा दावा आहे.पण या दाव्याची पुष्टी तिच्या काही डिजिटल रेकॉर्डस मधून होणार आहे .. जे आहेत हे माहीत आहे पण नक्की तपशील अज्ञात ... केतनला यापूर्वीही संपवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न झाल्याचा तपासात उल्लेख आहे. सेम पुष्टी . मी जर हा तपशील स्पष्ट असेल तर या या पुराव्याची ताकद : ★★★★☆ मानेन .. लक्षात घ्यायचे ते हे की हेतू (मोटिव्ह ) कधीच खून सिद्ध करत नाही. पण इतर पुरावे आरोपींकडे बोट दाखवू लागले की मोटिव्ह त्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा ठरतो.
नियोजन सूचित करणारा संवाद (प्री -mediation): दोघांमध्ये दोन हजारांहून अधिक फोन कॉल्स झाले.जवळपास २३८ तासांचे संभाषण झाले.व्हॉट्सअॅप चॅट्स डिलीट करण्यात आल्या.रिसायकल बिनही रिकामी करण्यात आली.मोबाईलमधील डिलीट झालेला डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.या पुराव्याची ताकद :सध्या : ★★★☆☆पण तपशील मिळाले की पुढे : ★★★★★ जाऊ शकते .. यात त्यांचा घटनेच्या आदल्याच दिवशी -थर्ड वेव्ह् कॅफे मधला विडिओ पण आहे. जवळ जवळ एक तास .. बॉडी लॅंगवेज पहावी ..नुसते भेटल्याने आणि फक्त वारंवार बोलणे म्हणजे कट रचला, असे होत नाही. हे बरोबर ..पण जर डिलीट केलेल्या संदेशांतून प्रत्यक्ष नियोजन सिद्ध झाले, तर हा पुरावा अत्यंत प्रभावी ठरू शकतो.
को ordinated हालचाली :सीसीटीव्ही फुटेज,कॅफेमधील भेट, लोहगड प्रवासाची संपूर्ण वेळापत्रकानुसार पडताळणी,टोल नाके आणि पायथ्याशी तिकीट काऊनटर वरचे सीसीटीव्ही फुटेज , ते मिळू नये म्हणून लपवण्याचा / टाळल्याचा प्रयत्न . आधी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्याचा- दोन तीनदा लोहगड रेकी केल्याचा साक्षीदारांकडून मिळणार तपशील -कथित 'रिहर्सल'
या पुराव्याची ताकद मी मानेन पुनः ★★★★☆जर सीसीटीव्ही, मोबाईल लोकेशन, जीपीएस आणि साक्षीदारांचे जबाब एकमेकांशी जुळले, तर ....
घटनास्थळी उपस्थिती: दोघेही जण घटनास्थळी घटनेच्या वेळी तिथे उपस्थित होते हे स्वतः त्यांच्या कथनातूनही समोर येते.फुटेज दिसते .. लास्ट सीन टुगेदर थियरी म्हणते की मृत व्यक्ती जिवंत अवस्थेत शेवटची ज्या व्यक्ती किंवा व्यक्तींसोबत दिसली होती, आणि त्यानंतर अल्पावधीतच तिचा मृत्यू झाला, तर त्या व्यक्तींनी काय घडलं याचं समाधानकारक स्पष्टीकरण देणं अपेक्षित असतं.हा अंतिम पुरावा नाही; तो पुराव्यांच्या साखळीतील एक महत्त्वाचा दुवा आहे.
घटनेनंतरचे वर्तन: पडण्यापूर्वी केतनचा मोबाईल सियाकडे होता, असा दावा आहे.त्यातील माहिती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का, याचा तपास - मला माहीत नाही काय निघाले?.सुरुवातीला ही घटना अपघात असल्याचे सांगण्यात आले.नंतर त्या कथनातील विसंगती आधी नातेवाईक आणि मग पोलिसांच्या निदर्शनास आल्याचा दावा आहे.त्याचे रेकॉर्डस आणि न्यायालयात साक्षी .. दिशाभूल करण्याचे प्रयत्न .. खोटी माहिती देणे .. दोन आरोपिनी एकमेकावर केलेले आरोप आणि त्यातून अनावधानाने आम्ही दोघेही तिथे होतो याची दिली गेलेली कबुली या पुराव्याची ताकद : ★★★
वैज्ञानिक पुनर्रचना: सध्या हा सगळ्यात कमकुवत पुरावा दिसतो आहे .. कारण काय ,कसे आणि किती पॉइंटेड ली केले गेले याचा तपशील उपलब्ध नाही .. समजा तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन खालील गोष्टी मोजल्या आहेत
कड्याचा उतार,शरीर जिथे सापडले ते अंतर,शरीराने घेतलेला trajectoryगुरुत्वाकर्षणानुसार अपेक्षित मार्ग,सुरुवातीचा वेग (initial velocity),शरीराचे rotation,प्रथम कुठे आदळले जखमांचा क्रम.. आणि आणि त्यातून असे निष्पन्न झाले—की -
जर व्यक्ती फक्त घसरली असती, तर तिचे शरीर येथे पडले नसते. इतक्या अंतरावर पोहोचण्यासाठी अतिरिक्त आडवा वेग (horizontal velocity) आवश्यक होता. तर हे खूप क्रिटीकल महत्वाचे विधान असेल .. त्या च्या जोडीनेच समजा -पोस्ट मोरटेंम रिपोर्ट पाहून असे निरीक्षण आले .. की
The injuries are inconsistent with an accidental fall.
The injury pattern is highly suggestive of forceful projection.
The observed injuries cannot be satisfactorily explained by a simple slip and fall.म्हणजे हात ,कोपर ,
गुडघे यांवर खरचटणे (abrasions) दिसते,शरीर अनेक ठिकाणी आदळत खाली जाते. असे होण्या ऐवजी जर मुख्य प्रहार थेट डोक्यावर किंवा पाठीवर झाला असेल तर ते "अपघाताशी सुसंगत नाही" असे म्हणता येते .. कपडे फाटण्याची दिशा,माती,वनस्पतींचे तंतू,
दगडांचे घर्षण,यांवरूनही पडण्याची दिशा आणि पद्धत समजण्यास मदत होते.पण एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावि लागते फॉरेन्सिक तज्ज्ञ असं कधीच म्हणत नाहीत—""या जखमांवरून दिसते आहे नक्की की ढकललं."! ते जास्तीत जास्त असं म्हणतात—"या जखमा साध्या घसरणीशी सुसंगत नाहीत."किंवा"घटनेचे दिलेले स्पष्टीकरण या जखमांशी जुळत नाही."फॉरेन्सिक बायोमेकॅनिक्स आणि सीन रीकन्स्ट्रक्शन यांच्या संयुक्त विश्लेषणातून, आणि बाकीच्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळीतील महत्वाच्या कड्यांतून आता आपण jigsaw लावायचा आहे ..
पुराव्यांची साखळी साधारण अशी दिसू शकते—
हेतू ---सततचा गुप्त संवाद, प्री मिडियशन --नियोजन- घटनास्थळाची पूर्वपाहणी- कथित रिहर्सल- मुव्हमेंट समन्वय- घटनास्थळी दोघांची उपस्थिती-ठरलेला इशारा किंवा कृती- कड्यावरून पडून मृत्यू-वैज्ञानिक पुनर्रचनेतून अपघाताची शक्यता अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास येणे- डिजिटल पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न- घटनेनंतर दिशाभूल करणारे स्पष्टीकरण.
माझ्या आकलना नुसार , ही साखळी अशी मांडायचा प्रयत्न केला जाईल .. तपशील उपलब्ध नसल्याने , आताच त्याच्या यश आपयशबद्दल काही सांगणे धाऱ्ष्ट्यच ठरेल हे नक्कीच .. पण .. बेस्ट पॉसिबल प्रॉसिक्यूशन स्ट्रतेजि अशी काहीशी असेल .. एव्हढेच म्हणते .