
जाणते- अजाणते पणी आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण डझनावारी ब्रँडस् वापरत असतो. सकाळी झोपेतून उठल्यावर “कोलगेट” ची टूथपेस्ट- टूथब्रश वापरून दात घासतो. “अमूल/ गोकुळ / वारणा” ब्रँडचं दूध येतं, त्यात “ब्रुकबॉण्डची” चहा पावडर किंवा “ब्रू/ नेस्केफे” ची कॉफ़ी पावडर टाकून चहा-कॉफी. नाश्त्याला पोहे, अंडी. पराठे, ब्रेड, सिरियल्स, त्यासाठी लागणारे तेल, तूप, मसाले, बटर, प्रोटीन पावडरी, बाटलीबंद ज्यूस …. ब्रिटानिया, केलॉग्स, आयटीसी, आशिर्वाद, हिन्दुस्तान यूनिलीवर, डाबर… अनेकानेक ब्रँडस् पुढ्यात येतात. अगदी मीठसुद्धा “टाटा नमक - देश का नमक” !

नानाविध ब्रँडसच्या सोबतीने सुरु झालेला हा प्रवास दिवस संपेपर्यंत चालूच राहतो. मिक्सर ग्राइंडर, ओवन, फ्रिज, टीव्ही, फोन, कार- दुचाकी- सायकली, घड्याळ, कपडे, पादत्राणे…. झोमेटो- स्विगी, BHIM - Gpay, Flipcart, Amezon, Big Basket, Dmart एक ना दोन. शहरी भागात राहणारी मध्यमवर्गीय भारतीय व्यक्ती एका दिवसात किमान ५० ब्रँडसच्या वस्तू वापरते असे तज्ञ सांगतात.
आजमतीला भारतात ३२ लाखांपेक्षा जास्त नाममुद्रांसकटचे ब्रँडस् सरकारदरबारी नोंदवलेले आहेत. त्यात शंभर वर्षांपेक्षाही जुने क्लासिक ब्रँडस् जसे आहेत तसे नवीन, अल्पावधीत लोकप्रिय झालेले जेन झी ब्रँडस् सुद्धा आहेत. त्यात दररोज नवी भर पडत आहे. Vocal for Local या नाऱ्यामुळे unorganised sector मधले अनेक छोटे व्यवसाय स्वत:च्या विशिष्ट ओळखीबद्दल, ट्रेडमार्क / नाममुद्रा आणि त्यांच्या उत्पादनांची नक्कल करणाऱ्या प्रतिस्पर्धींबद्दल जागरूक झाले आहेत, होत आहेत.

भारतीय बाजारात ग्राहकांसाठी सध्या spoilt for choice अशी परिस्थिती आहे. साधे चिप्स घ्यायचे असतील तर कोपऱ्यावरच्या वाण्याकडे १०-२० प्रकार दारातच मांडून ठेवलेले दिसतील, मिठाईच्या दुकानात ४० प्रकारच्या मिठाया आणि टीव्हीच्या शोरूम मधे भिंतभर चकाकत्या टीव्ही स्क्रीनस्.

बाजारात असंख्य उत्पादने सतत डोळ्यावर आदळत असतात. आता तर बाजारात जायचीही गरज नाही, बाज़ारच आपल्या टीवी-फोन स्क्रीनवर अवतरलाय. ब्रँडस् ची कधीही न संपणारी जत्रा.
या प्रचंड पसाऱ्यातून आपल्या वापरासाठी उत्पादने- सेवा आपण कशी निवडतो ?
रोजच्या वापरातल्या काही वस्तू आपण वर्षानुवर्षे एका विशिष्ट ब्रँडच्याच वापरतो. व्यक्तिगत पसंती, दर्जा, किंमत, सवय, वापरातून मिळणारा आनंद अशा अनेक घटकांचे मिश्रण या निवडी मागे असते. अगदी अट्टल मद्यपीसुद्धा त्याच्या नेहेमीच्या ब्रँडची दारू नसेल तर खट्टू होतो.

असेच काहीसे लहानपणी वापरलेल्या उत्पादनांबद्दल. आनंदमयी स्मृती आणि पुन:प्रत्ययाचे सुख यामुळे आपण त्या निर्जीव वस्तूंशी जोडले गेलेले असतो. दिवाळीच्या वाइब्ज देणारा मोती साबण असो की शाळेतल्या दिवसांची आठवण करून देणारी पार्लेची षट्कोणी सिक्सर्स बिस्किटे आणि रावळगावच्या पानपसंद कँडीज्. सुखस्मृतीतले ब्रँडस्.

बाजारात येणारी नवनवीन उत्पादने “एकदा वापरून तर पाहू” असा विचार करणारे लोक कमी नाहीत. आपणही असे करतो, नाविन्याची आवड कुणाला नसते ?
वस्तूची किंमत आणि आपले बजेट यावरही आपली निवड ठरते. आपल्या भारतीय मनाला “value for money” चे ज्ञान जणू जन्मत:च असते. म्हणून बहुतेक लोक हा मुद्दा सर्वप्रथम लक्षात घेतात. स्वस्त असेल तर त्याला पसंती मिळते, पण सरसकट नाही. काही दिवसातच निकामी होणारी उत्पादने आपण पुन्हापुन्हा त्याच ब्रँडची घेत नाही.
गुणवत्ता / चव / वापरायला सोपे या निकषांवर टिकणारे ब्रँडस - यांची उत्पादने पुन:पुन्हा खपतात. त्यासाठी premium देण्याची, अधिक किंमत मोजण्याची आपली तयारी असते. नीट तपासून पारखून अशी खरेदी होते. याउलट आणिबाणीची परिस्थिती असल्यास, खूप घाई असल्यास ब्रँडकडे दुर्लक्ष करून पटकन खरेदी आटोपली जाते.
मित्र / परिवार / अन्य वापरकर्त्यांचे सल्ले आणि अनुभव हा तर आपल्या निवडीवर मोठा पगडा असलेला घटक. त्यात आता भर डिजिटल डिस्कवरीची. इन्स्टाग्राम, वेगवेगळ्या विक्रेत्यांच्या वेबसाईटस्, Influencers च्या सुचवण्यांची. त्यांनी सुचवलेली उत्पादने, सतत आपल्या स्क्रीन्सवर आदळणाऱ्या आकर्षक जाहिराती आपल्याला खूपदा भरीस पाडतात. हवे असलेले तर विकत घेतोच, फारशी गरज नसलेले, आधी कधीच न वापरलेले उत्पादन सुद्धा अलगद आपल्या खरेदीत सामिल होते. यात अन्य ग्राहकांनी उत्पादन/ सेवेला दिलेले मानांकन / रेटिंग आपण हमखास बघतो.
तर मंडळी, to cut the long story short, आपल्या आवडत्या ब्रँडस् बद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
• तुमचे आवडते ब्रँडस् कोणते ? तुम्हाला ते का आवडतात ? नावडते कोणते ?
• कोणतीही नवीन वस्तू (प्रॉडक्ट)/ सेवा (सर्विस) विकत घेतांना तुम्ही काय निकष लावता ? कसे ठरवता ?
• रोजच्या वापरातले आणि कधीतरीच लागणारे products; स्वस्त-महाग वस्तू यासाठी तुमची निवडप्रक्रिया- निकष सेम असतात की वेगवेगळे?
• डिजिटल डिस्कवरी/ जालावरून प्रथम माहिती घेऊन मग विकत घेतलेली उत्पादने आणि सेवा, त्यांचे प्रकार, त्याबद्दलचे बरेवाईट अनुभव सांगाल का ?
• आधी वापरलेले आणि अजून आठवणीत असलेले ब्रँडस्. ज्यांचा comeback व्हावा असे वाटते ते विस्मरणात गेलेले ब्रँडस् आणि आनुषंगिक आठवणी, अनुभव, माहिती.
• Aspirational, भविष्यात कधीतरी विकत घेऊ अशी आकांक्षा मनात असलेले ब्रँडस्.
• भारतात आता भरपूर विदेशी ब्रँडस् उपलब्ध आहेत. तस्मात् विदेशात रहाणाऱ्या माबोकरांनी तिथल्या आवडत्या-नावडत्या ब्रँडस बद्दल लिहिले तर त्याचेही स्वागत आहे.
• तुम्ही स्वत: एखाद्या ब्रँडनिर्मितीत सहभागी असल्यास त्याबद्दलचे अनुभव.
अशी सर्वसमावेशी चर्चा इथे करू या.
वि. सू :
१} हा कुठलाही (sponsored or otherwise) रीसर्च प्रोजेक्ट नाही, एक गंमत, माहितीची देवाणघेवाण आणि विरंगुळा म्हणून धागा काढला आहे.
२} आपले अनुभव आणि विचारप्रक्रिया जाणून घ्यायला, इथे होणाऱ्या अनुभवांच्या देवाणघेवाणीतून आणि आवडत्या ब्रँडस् बद्दलच्या चर्चेतून समृद्ध व्हायला उत्सुक आहे.
=========
(धाग्यातले सर्व फोटो माझे)
नक्कल करणाऱ्या
नक्कल करणाऱ्या प्रतिस्पर्धींबद्दल
खूप वर्षांमागे सुट्या पैशाची चणचण झाली होती.
तेंव्हा एका दुकानदाराने मला ३० पैसे सुटे द्यायच्या ऐवजी तीन कॅडबरी इक्लेअर्स दिली.
कॅडबरी इक्लेअर्स ची किंमत तेंव्हा ३५ पैसे होती( एक रुपयाला तीन).
मी आश्चर्यचकित होऊन पाहिले तर वरचे वेष्टन अगदी सारखे होते.
पण नीट पाहिल्यावर कॅडबरीज ऐवजी चौधरीज इक्लेअर्स होती. अर्थात आत मध्ये द्रवरूप चॉकलेट नव्हतेच.
त्याच काळात मगन लाल चिक्की सारखेच वेष्टन वापरून लोणावळ्याला गाडीत मदनलाल चिक्की सुद्धा मिळत असे आणि विक्रेते सुद्धा उच्चार तसाच करत असत. पुढे मगनलाल ने मदनलाल चा कारखाना विकत घेतला आणि हा अध्याय संपला.
छान विषय मांडलात . रोजच्या
छान विषय मांडलात . रोजच्या आयुष्यात असंख्य ब्रँड नजरेसमोर येतात . बऱ्याच वेळेला आपली गरज भागेल (म्हणजे सगळे टिक मार्क्स होतील ) शिवाय किंमत कमी असेल असे ब्रॅण्ड्स निवडले जातात .
• तुमचे आवडते ब्रँडस् कोणते ? तुम्हाला ते का आवडतात ? नावडते कोणते ? >>
रेंज अगदी व्हास्ट आहे . अमूल पासून नेटफ्लिक्स पर्यंत . आधी ज्या कंपनीत नोकरी करत होते (सिंटेल ) तो आवडता ब्रँड होता , नंतर टेक ओव्हर झाल्यावर चा ब्रँड अजिबात आवडत नाही . आधी आवडत होते ते ब्रँड आता आवडत नाहीत अशी पण अवस्था आहे . कपड्यांच्या बाबतीत मिंत्रा मुळे खूप नवीन ब्रँड समजले . कपड्याची आंबराई , संग्रिया हे ब्रँड आवडतात . चपलांची किंवा बुटाची ब्रॅण्डिंग आधी आदिदास नाईक पर्यंत मर्यादित होती , आता एसिक्स वापरल्यावर आदिदास नाईक अगदी बेसिक वाटायला लागले .
सौंदर्य प्रसाधनात मेबीलीन आणि लॅक्मे हे कायम आवडते होते आणि अजूनही आहेत . खाण्यासाठी अमूल मदर्स डेअरी आवडतात अजूनही . लोकल पण छान आहेत श्रीजी नॅचरल्स वगैरे .
अंतर्वस्त्रांसाठी मात्र लोकल वरून विदेशी वर शिफ्ट झाल्यावर विदेशी च जास्त आवडले . लोकल पण आहेतच तरीही विदेशींची बातच और आहे .
नवीन वस्तू विकत घेताना निकष सगळ्यात मोठा लावला जातो तो म्हणजे किंमत , मग कम्फर्ट ., त्यातून रिव्यू सुद्धा पहिले जातात कारण ऑनलाईन शॉपिंग वाढले आहे . त्याचे फायदे म्हणजे घर बसल्या हजार वस्तू बघता येतात . विकत घेता येतात नाही आवडल्या तर घरून घेऊन जातात आणि पूर्ण पैसे परत मिळतात . वेळेचा अपव्यय होत नाही . काही अनोळखी ब्रान्ड वापरून बघू म्हणून वापरले जातात आणि खरोखरी मनास उतरतात .
मधले प्रश्न गाळून पूर्वी उपलब्ध असलेला ब्रँड आता उपलब्ध व्हावा असं वाटतं तो म्हणजे मिराज नावाचा एक डियो होता तो आणि टाटा चे यु डी कोलन फार मिस करते . ते पुन्हा सुरु व्हावे असं मनापासून वाटते.
असाच मगनलाल / मदनलाल सारखा
असाच मगनलाल / मदनलाल सारखा किस्सा हल्दीराम / हेल्दीराम बद्दल ऐकला होता.
काही ब्रँड नॉस्टॅल्जिया असतात
काही ब्रँड नॉस्टॅल्जिया असतात ते बदलू नये असेच वाटते कायम उदाहरणार्थ, अमुलची ओरिजिनल मंथन मधील फूटेज असणारी मेरो गाम काठा पारे ॲड.
सांगायला संकोच वाटत नाही की अमूल डेअरीनेच काढलेल्या धारा तेलाची ऍड पाहून आजही डोळे ओलावतात "सब मुझे डाटते रहते है मै घर छोड़ के जा रहा हूं" "जाना तो है मगर बीस पच्चीस साल बाद"
बाकी आपला अतिशय प्रेमाने जपून ठेवलेला ब्रँड म्हणजे रॉयल एनफिल्ड , ३ पिढ्यांपासून loyal customers.
आजोबांकडे १९५० model बुलेट (युके मेक)
वडील १९९८ क्लासिक बुलेट ३५०
माझ्याकडे क्लासिक बुलेट २०१४ मॉडेल
आता पोरगा म्हणतोय रॉयल एनफिल्ड क्लासिक घ्यायची ! बघू किती टिकते लॉयल्टी!
एकंदरीत आवडते ब्रँड -
रॉयल एनफिल्ड
लिवाईस (Levis)
बर्बन बिस्किटे
ओल्ड माँक
म्हैसूर सँडल साबण
पिअर्स साबण
बालाजी वेफर्स
बिकाजी आलू भुजिया
नावडते - आजकाल स्टार्टअपच्या नावाने "थ्री फ्रेंड्स फ्रॉम आयआयटी कमिंग टुगेदर फॉर लव ऑफ डेनिम क्राफ्टिंग अर्बन क्लोथिंग" इत्यादी मखलाशी करून स्थापन केलेले डेनिम ब्रँड्स
तेल मिश्रित स्वीट डेझर्ट आईसक्रीम म्हणून चांबट कोन मधे विकणारे.
मुंबईत स्तोम माजवलेले ब्रँडेड हलवाई पक्षी प्रशांत कॉर्नर, झामा स्वीट इत्यादी. त्यापेक्षा सरस मिठाया मोहम्मद अली रोडवर सुलेमान उस्मान मिठाईवाला किंवा जमजम स्वीट्स मध्ये मिळेल.
आवडते - रेमंड. त्यामुळे जे
आवडते - रेमंड. त्यामुळे जे के सिंघानियांचं जे झालं त्याबद्दल वाईट वाटलं.
टायटन.
सध्या halden . याचे बेल्ट्स. एक स्वतःसाठी घेतला. तीन भेट दिले. यापुढेही पुरुषांना भेट द्यायला चांगला ऑप्शन आहे.
ब्रिटानियाची बिस्किटं.
खादीचे साबण व इतर उत्पादने. हिमालयाचीही.
चितळेंच्या बाकरवड्या आवडतात. त्यांच्या चकल्या आवडल्या नव्हत्या. यांची उत्पादने गोड्या तेलात तळलेली असतात - इतरांची पाम ऑइल मध्ये .
पारसी डेअरी फार्म. बाबांनी कधीतरी यांच्या तुपाचा डबा आणला होता. चर्चगेटला ऑफिस असताना मरिन लाइन्सच्या त्यांच्या दुकानात
ऑफिसच्या वेळात मैत्रिणीला हवी होती म्हणून सुतरफेणी आणायला तिच्या सोबत गेलो होतो.
आता यांचं दुकान बोरिवलीतच आलं आहे. तर सुतरफेणीही भेट द्यायला आवडते. काही मिठाया मात्र आवडल्या नाहीत. आणि ब्रँडची व्हॅल्यू वसूल करतात.
provilac काही वर्षे यांचं दूध घेतो आहे. आधी A2. आता homogenised cow milk. पनीर, खर्वस. त्यांचं high protein milk try करायचं आहे.
न आवडणारा - पतंजली. कधीही न वापरता. केवळ त्याच्या मालकामुळे आणि जाहिरातींमुळे. किराणा दुकानांत यांची उत्पादने वेगळी ठेवून त्याभोवती रोषणाई केलेली पाहिली आहे.
<थ्री फ्रेंड्स फ्रॉम आयआयटी
<थ्री फ्रेंड्स फ्रॉम आयआयटी कमिंग टुगेदर > हे वाचल्यावर मला अॅटमबर्ग आठवला. यांचे पंखे घेतलेत. मिक्सर घ्यायचा आहे.
Atomberg ठीकच आहे चांगली रेंज
Atomberg ठीकच आहे चांगली रेंज आहे पण परत नॉस्टॅल्जिया म्हणले की
रॅली फॅन्स
ओरिएंट (PSPO फेम)
नंतर नंतर हॅवेल्स हे ब्रँड आठवतात
अनिंद्य, खूप इंट्रेस्टिंग
अनिंद्य, खूप इंट्रेस्टिंग विषय आणि लेखन नेहमीप्रमाणे!!
रेडिट वर पूर्वी म्हणजे पँडेमिक आणि AI पूर्वी एक सब खूप भारी होता. bye it for life!
BIFL असे शॉर्ट फॉर्म. म्हणजे लोकांना फ़ास्ट कंज्युमेरिझमचा वैताग येत असे आणि ते मग BIFL गोष्टी शोधत.
त्यात उदा. आयर्न हार्ट च्या जास्त औन्सेसच्या जीन्स असतील (जो माझाही अतिशय आवडता ब्रांड आहे) वगैरे अशा ब्रँडचे शोध लागले. जर तिथल्या जुन्या पोस्टस उचकटल्या तर अक्षरश: काही ब्रँडचा खजाना लागतो. कपड्यांचे ब्रँड्स विशेषत: लाइफटाइम सर्विस देणारे ब्रॅंड म्हणा किंवा अत्यंत उच्च दर्जाच्या नानाविध गोष्टी करणाऱ्या काही जपानी कंपन्या अश्या अनेक गोष्टी.
नवीनच आवडलेला women trousers
नवीनच आवडलेला women trousers साठी ब्रँड गो कलर्स
वडीलाल / दिनशॉ आईस्क्रीम
वडीलाल / दिनशॉ आईस्क्रीम
केसरी पेपर
पॅराशूट तेल
लालचुटुक मारूती
डेक्कन क्वीन
लिमलेटच्या गोळ्या
माकड छाप दंतमंजन - नोगी
व्ही आय पी बनियन आणि अंडरवेअर
बॉंबे डाईंग बेडशीटसस
रेमण्ड
हेमा / जया/ माधुरी / रेखा इ. पासून ओन्ली विमल, गार्डन वरेली असे साडीचे एकूण एक ब्रॅण्डस. याशिवाय कलानिकेतन, कलाकृती, मूळचंध मिल्स असे दुकानांचे ब्रॅण्डस सुद्धा.
सदिच्छा + कामाक्षी चित्र
राजहंस प्रकाशन
चितळे
कॅम्लिन
बाटा
चंदू सराफ/ जैन(बारामती)
डोंगरे बालामृत
आठवडी बाजारात टाटाचे पायजमा / धोतर मिळायचे. विक्रेता छातीवर हात ठेवून टाटाचे आहे असं सांगायचा. त्यामुळे ते मजबूत आणि टिकाऊ आहे असा समज होता.
दौंड स्पेशल काळा साबण लोकप्रिय होता. तो अंगाला आणि कपड्यांना चालायचा. तो काथ्याला लावून अंग घासायची पद्धत होती. नाहीतर दगड. काथ्या आणि दगड असा स्टार्ट अप सुरू करायची सुवर्ण संधी आहे.
ज्वेलरी साठी नेहमीच पु.ना
ज्वेलरी साठी नेहमीच पु.ना.गाडगीळ.
पण हैदराबाद ला शिफ्ट झाल्यानंतर मुलीसाठी पहिले सोने Joyalukas मधून आले. तिची खरेदी तिथूनच होते.
आता tanishq सुद्धा आवडते आहे.जुने सोने देऊन नवे घेताना उत्तम अनुभव आला.
Biscuits - कॅफे निलोफर ,नंतर कराची बेकरी
चहा - कॅफे निलोफर
आईस क्रीम - क्रीम स्टोन, पोलर बेअर
जीन्स साठी levise
फॉर्मल कपडे Rare rabbit , Rareism
घड्याळ - Titan , Casio (ह्यांच्या vintage watches कलेक्शन मस्त आहे)
मराठी पदार्थ तयार पीठे - काटदरे
सौंदर्य प्रसाधनात -मेबीलीन,
त्वचा काळजी - सेरा वे , मिनिमलिस्ट , Beauty of Joseon, (सध्या कोरियन ब्रँड वापरून बघत आहे )
फोन - पिक्सेल (कॅनन चे कॅमेरे
फोन - पिक्सेल (कॅनन चे कॅमेरे विकून टाकले, इतका याचा कॅमेरा कॅपेबल आहे…पिक्सेल कॅन, विच इवन कॅनन कॅनॉट)
पुस्तक प्रकाशन - मौज
परफ्यूम - ललीक, मॅन्सेरा
दारवा - लगावुलीन, लेफ्रॉय, जिम बीम, ओल्ड मॉन्क आणि मिलर हाय लाइफ (यातल्या लगावुलीन आणि लेफ्रॉय आता परवडत नाहीत आणि मिलर आता भारतात मिळत नाही)
सिगारेट - हर्निक ब्रँडची ची फँटम सिगारेट…लहानपणी सुद्धा घरात सगळ्यांसमोर राजरोसपणे ओठात धरता येण्यासारखी.
बेकरी - वर्धा येथली शुद्ध तुपातली गोरस पाक बिस्कीटं…लाजवाब !!! आता मिळतात का कल्पना नाही.
फोन - पिक्सेल (कॅनन चे कॅमेरे
फोन - पिक्सेल (कॅनन चे कॅमेरे विकून टाकले, इतका याचा कॅमेरा कॅपेबल आहे…पिक्सेल कॅन, विच इवन कॅनन कॅनॉट)
१००% सहमत ! प्रसंगी आयफोनच्या थोबाडीत हाणेल तोच पिक्सेल ! तुमचा कोणता आहे?
झीरो एडिट, पॉईंट अँड शूट,
झीरो एडिट, पॉईंट अँड शूट, पिक्सेल ६ए (जुना) फोटो.
अरे वा ! सर्वांच्या पसंतीच्या
अरे वा ! सर्वांच्या पसंतीच्या आणि आवडीच्या ब्रँडस् बद्दल वाचायला छान वाटते आहे. 👍
@ जेम्स, फोटो फार सुंदर.
@ वर्धा स्पेशल गोरस पाक बिस्किटे-
हो, ही मिळतात अजून. उत्तम packaging सकट, साधारण ₹१००० प्रती किलो किंमत. Me not a fan पण यांचा एक खास fan club आहे महाराष्ट्रभर.
@ BIFL
@ BIFL
हे buy it for life असेल ना ? फार चांगली कंसेप्ट आहे. पसंद आ रई मेरे कू.
व्यक्तिगत वापरांच्या वस्तूंबद्दल आधी भरपूर ट्रायल- एरर करून झाल्यावर buy the best money can buy and expect it to last a lifetime अशा फिलॉसॉफीवर सध्या स्थिरावलो आहे.
फोन, घड्याळ, चष्मा, शूज, स्वेटर, प्रवासासाठीच्या आणि ऑफिस bags, मोजे, टोपी, बेल्ट, वॉलेट ह्या वस्तू स्वत:साठी विकत घेतांना खूपच आवडली तरच घ्यायची असे. त्याची life cycle cost लक्षात घेतो. म्हणजे थोडी महाग असली तरी चांगल्या दर्जाची वस्तू अनेक वर्ष बिनबोभाट, भरपूर वापरता येते. एकदम पैसा वसूल आणि “निचोड़ के” वापर
चांगले लेदर तर खरंच Lifetime possession ठरते.
गोरस भंडार, वर्धा वर नुकतीच
गोरस भंडार, वर्धा वर नुकतीच अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र सरकारची धाड पडली होती बुवा.
चांगले लेदर तर खरंच Lifetime possession ठरते.
धारावीला तोड नाही, तुफान काम, बेल्ट तर वाटेल तसे वाटेल तितके चालतात.
बुटांत आमचा ब्रँड - वूडलँड फक्त, एकदा नेपाळ मधून original woodlands आणले होते, २०१३ ते २०२६ वापरले, शेवटी महिनाभर आधी वैतागून ते आमच्या वाचमनला देऊन टाकले, घरचे (खासकरून सुविद्य सुबक ठेंगणी) हे फाटत नाहीत तोवर अजून घेऊन आलास तर माळ घालते गळ्यात म्हणायची. आता वॉचमन आणि तेरा वर्ष वापरतोय का काय असे वाटते आहे.
कपड्यात ब्रँड - शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली जवळ कॅनॉट प्लेस मधले खादी भंडार, गांधीजी लाजतील इतके पॉश अन् चक्क १५००/ मीटर इत्यादी प्रीमियम खादी/ रेडीमेड कपडे पण क्वालिटी बघून घ्यावी.
गॉगल - रे बॅन ओन्ली
घड्याळ - कॅसिओ, टाटा टायटन, कॉलेज काळी Maxima आवडते होते पण ती लाईन बंद झाली होती बहुतेक
पँट - Levi's, Flying Machine, आमच्या पसंतीने शिवून घेतलेल्या विमल कपड्याच्या pants
Shirt - पीटर इंग्लंड, Arrow, लुई फिलिप, Spykar Denim Shirts
Perfume - एम एम अत्तरवाला, मोहम्मद अली रोड, ह्यांच्याकडून एक जन्नत अल फिरदौस + एक व्हाईट उद mix अल्कोहोल बेस मधे घेणे स्प्रे बॉटल + क्रिंपिंग करून देतात, असला भारी experience आहे का ज्याचे नाव ते.
@ सेवा,
@ सेवा,
कॅफे निलोफर वगैरे वाचले आणि एकदम लक्षात आले की तुम्ही सध्या हैदराबादी आहात. जय हो.
@ राज अज्ञानी ,
तुम्ही लिहिलेले कॅम्लिनचे कंपास बॉक्स, कलर बॉक्स खूप जणांनी वापरले असतील इथे. आणि सोबत नवनीत च्या वह्या + गाइड.
तुमच्या लिमलेट गोळ्यांवरून आठवले ; छोट्या नाण्यासारख्या दिसणाऱ्या पेपरमिंट कँडीज् आणि एक गोल्डस्टार ब्रँन्डच्या रोज+पेपरमिंट कँन्डीज् आत्ता आता पर्यन्त मिळायच्या - खासकरून मुंबई उपनगरीय लोकलच्या स्थानकांवरच्या पानठेले+ चहा टपरी टाइप multipurpose दुकानात. बाहेर कुठे नाही दिसल्या कधी.
@ भरत,
हल्दीराम, पेप्सी फूडस, बालाजी, प्रिंगल्स सारखे सगळे प्रसिद्ध ब्रँडस् येथेच्छ पाम ऑइल वापरत असतांना चितळेंसारखे मोजके ब्रँडस् शेंगदाणा तेलात पदार्थ करतात, which is so good. फक्त त्यांच्या सॉल्टी पदार्थांमधे खूप साखर टाकलेली असते, so not a fan,. काही अपवाद - नुकतेच लॉंच केलेले शाही तेज मिक्स नावाचे माफक तिखट मसालेदार फरसाण, बाकरवडी आणि 0 नंबर शेव (फक्त मीठ, शून्य मसाले असलेली)
खादीच्या साबणांबद्दल आणि पारसी डेरीबद्दल दुसऱ्या धाग्यांवर लिहिलेच आहे.
… न आवडणारा - पतंजली…. डिट्टो. यांचा भरवसा वाटत नाही.
@ दक्षिणा
किंमत मग कम्फर्ट मग रेको हे तुमचे सूत्र परफेक्ट आहे. Reflection of an aware mind.
बाकी पादत्राणे आणि पर्स 👜 प्रत्येक स्त्रीला तिच्या मनाजोगती मिळाली(च) पाहिजेत असे माझे मत आहे. बजेट कमी-जास्त काही का असेना, every girl, lady deserves best in class footware 👡 and purse. शक्य तिथे परिचित मुली / स्त्री ला याबद्दल भरपूर प्रोत्साहन देतो. आणि यात कसली प्रचंड व्हरायटी असते महिलांसाठी !
आवडता ब्रँड - चितळे बाकरवडी !
आवडता ब्रँड - चितळे बाकरवडी !!
इथे आमचा दुकानदार म्हणत होता ती दुसरी बाकरवडी घ्या. पण चितळे नव्हती तर तिथून न घेता दुसऱ्या दुकानात गेलो आणि तिकडे मिळाली. तशी चव बाकी कुठे नाही.
वरती कोणीतरी Levi's jeans लिहिले आहे. त्या jeans खूप मस्त असतात. खूप दिवस टिकतात (अजूनही) आणि अगदी मस्त फिटिंग असते. बाकी jeans नाही आवडत इतक्या.
मी IPR Consultant आहे.
मी IPR Consultant आहे. ट्रेडमार्क्स, कॉपीराईट्स, पेटंट्स, डिझाइन्स, सॉफ्टवेअर्स रजिस्टर आणि प्रोटेक्ट करते.
गेली १६ वर्षे हेच करत असल्याने "तुम्ही स्वत: एखाद्या ब्रँडनिर्मितीत सहभागी असल्यास त्याबद्दलचे अनुभव." यात लिहिण्यासारखे बरेच काही आहे.
क्लाएंट्स् ची गोपनीयता भंग न करता शक्य होतील तितके रोचक किस्से नक्की शेअर करेन.
हा लेख म्हणजे आम्ही छोट्या छोट्या ब्रँडओनर्स ना जे ब्रँड गुडविल नावाची संकल्पना समजावण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी उत्तम नमुना आहे
@ पियू,
@ पियू,
थँक्यू.
… रोचक किस्से नक्की शेअर करेन..
अवश्य लिहा तुमचे अनुभव. From the Other side of the fence.
वाचनोत्सुक.
VIP अन्डरवेअर आणी त्यांचाच
VIP अन्डरवेअर आणी त्यांचाच बोनस बनियान !
@ किल्ली,
@ किल्ली,
गो कलर्स people must be doing something right, कारण एका रंगाच्या डझनावारी शेड्स त्यांच्याकडे असतात. (ऐकिव माहिती)
Discerning आणि रंगचौकस महिला वर्ग अगदी परफेक्ट matching च्या, फिटिंगच्या लेगिन्स / trousers वगैरे त्यांच्याकडून मिळवतो याची कमाल वाटते.
जेम्स वांड - मी दोन वापरतो.
जेम्स वांड - मी दोन वापरतो. पिक्सेल 4A आणि पिक्सेल 8Pro.
अनिंद्य - अरे वा. कधीतरी जाऊन आणली पाहिजेत. "Buy for life" फिलॉसॉफी अब्सोल्युटली करेक्ट आहे. पैसे मोजले की मिळणारी गुणवत्ता आणि युजर एक्सपीरिएन्स हे उत्तम मिळतात (काही अपवाद सोडून). अर्थात खर्च आणि लाभाचं मूल्यमापनही गरजेचं आहेच. उत्तमच पाहिजे म्हणून घेतलेला महागडा ड्रोन कपाटात तसाच आराम करत पडला आहे आणि सहा सात वर्षांपूर्वी घेतलेला पिक्सेल 4A माझ्या वापराला एव्हाना कंटाळला असेल. तद्वत ज्या गोष्टींचा आपला वापर भरपूर आहे त्या तरी (बजेट असलं तर) उत्तम ब्रँडच्याच असाव्यात.
@ Levi's
@ Levi's
बेहद्द पसंतीचा डेनिम ब्रँड. जेव्हां तुम्ही-आम्ही डेनिम न म्हणता “जीन्सची प्यांट” म्हणत असू तेव्हांपासूनचा आवडता. वजन आणि पोटाचा घेर आटोक्यात ठेवला तर वर्षानुवर्षे वापरा, fades beautifully, never goes out of style. Always feels like second skin.
इतर सर्व प्रतिस्पर्धी ब्रँडस् नी आधीच Lycra भेसळ सुरु केली होती तरी Levi's मात्र ओरिजिनल डेनिम कापडच वापरण्याच्या आग्रहावर टिकून होता. तसे केल्याने एक विशिष्ट फॉल आणि फ़ील येतो असे त्यांच्या डिझायनिंग टीम चे (आणि माझेही) मत. मार्केट डिमांड - पियर प्रेशर म्हणा की अन्य काही कारणे आता Levi's too comes with Lycra blend in various percentages … the last citadel to fall.
हल्ली कुठलाही ब्रॅण्ड वगैरे
हल्ली कुठलाही ब्रॅण्ड वगैरे अशी क्रेझ नाही राहिली. लहान असताना आणि टीन एज मधे ब्रॅण्डची ओळख नव्हती. पण लेबल्स लक्षात राहिले. कॉलेज पासून पुढे काही वर्षे जाहिरातीला भुलून ब्रॅण्डस फॉलो केले.
नॉस्टेल्जिक आहे ते.
आता ब्रॅण्ड लॉयल्टी हा शब्दप्रयोग खटकतो. ग्राहक राजा असतो. तो कशाला लॉयल पाहिजे? अलिकडे रिपीट कस्टमर हा शब्द वापरतात. तो बरोबर वाटतो.
Amazon च्या जमान्यात ब्रॅण्ड व्हॅल्यू टिकवून ठेवणे अवघड असावे असे वाटते. पूर्वी डिस्ट्रीब्यूटर, होलसेलर, रीटेलर आणि मार्केटिंग ही चेन ज्यांना मॅनेज करणे शक्य होते ते ब्रॅण्ड आघाडीवर असत. आता कुणीही आपले उत्पादन आपल्यापर्यंत पोहोचवू शकतो. फरक पडलाय. आता जास्त चॉईस आहे.
थम्प्स अप, लिम्का, गोल्ड
थम्प्स अप, लिम्का, गोल्ड स्पॉट, माझा, पॉपिन्स ही पार्ले कंपनीची उत्पादने . पहिल्या चारचा पार्ले कंपनीशी संबंध माहीत नव्हता.
आमच्या भागातल्या लोकांत कोणे एके काळी खास पाहुण्यांसाठी कोल्ड ड्रिंक आणायचे. क्वचित लग्नातही कोल्ड ड्रिंक असे.
नेहमीप्रमाणेच छान मांडणी
नेहमीप्रमाणेच छान मांडणी असलेला लेख!
कुठल्याही ब्रँडचा हट्ट कधी ठेवला नाही. काहींचा अनुभव चांगला असतो आणि आपल्या बजेटमध्ये असतात म्हणून शॉर्टलिस्टेड असतात पण एकात अडकून पडत नाही. खाणे पिणे कपडे जुते सौंदर्यप्रसाधने मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू कुठल्याच बाबतीत आजवर कधीच एकाच ब्रँडमध्ये अडकल्याचे आठवत नाही. छोट्या-मोठ्या वस्तू ब्रँड न बघता आपल्या आवडीने घेतो. आणि मोठ्या वस्तूबाबत मायबोलीवर सल्ला विचारायला धागा काढतो. फ्रीज, टीव्ही, मोबाईल, हंडकरचीफ, वाक्यूम क्लिनर, एसी या गोष्टी मायबोलीकरांच्या सल्ल्यानेच घेतल्या आहेत
रसना
रसना
एक पॅकेट मे बन जाएं 36 गिलास
स्पेसिफिक ब्रँड हवाच इतका फॅन
स्पेसिफिक ब्रँड हवाच इतका फॅन नाहीच.
युटिलिटी, किमंत, कॉम्पिटेतर काय देतोय वै तुलना करून घेत असतो.
हल्ली (अंगाला लावायचे) साबण( ह्यालाच वासाचा साबण असेही म्हणले जायचे।लहानपणी ) मात्र खादी natural चा,
पेस्ट कोलगेट टोटल advanced, जॉकी हे 3 ब्रँड फिक्स झालेत.
न ठरवता देखील ,TV, फ्रीज, washing मशीन LG चे झाले, वेगवेगळ्या वेळी घेउन देखील.
Pages