Submitted by अनन्त्_यात्री on 20 June, 2026 - 04:00
यक्ष विरहार्त झाले
मेघ संपावर गेले
"संप बेमुदत त्यांचा"
El Niño ने म्हटले
"ज्यांचा टँकरचा धंदा
त्यांचे भाग्य उजळले
दुवा देतील ते मला"
El Niño ने म्हटले
पाणी नभीचे आटले
पाणी डोळ्यात दाटले
"पाणी तोंडचे पळेल"
El Niño ने म्हटले
"पावसाळी कवितांचे
बाण तुझ्या भात्यातले
यंदा गंजणार नक्की"
El Niño ने म्हटले
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कविता छान, समयोचित..!
कविता छान, समयोचित..!
यावर्षी टेन्शन वाढवलयं पावसाने.. २००९ ला सुद्धा पाऊस जून शेवटाला पडला होता.. पण यावर्षी काही लक्षणं दिसत नाहीत पावसाची.. लोकसत्तामध्ये लेख होता El Niño वर दोन - तीन दिवसांपूर्वी..!
छान कविता
छान कविता

मी विचार करतोय प्रशांतमहासागर मुळात प्रशांत आहे. पण रागावला तर किती ताप तो सा-या जगाला.
बर्फ का डोक्यावर ठेवत नाहीत त्याच्या तो रागावल्यावर.
जगाचा बॉस ट्रंप काही करू शकेल का मस्कला सांगून?
त्याला म्हणावं चंद्रावर वस्ती करायच्या आत याचा सोक्षमोक्ष लाव.
कविता छान, समयोचित..!+१
कविता छान, समयोचित..!+१
काल मी समुद्रात आमच्या
काल मी समुद्रात आमच्या फ्रीजमधला बर्फ टाकला. आज थोडे ढग आलेत.
Good job done बोकलत.
Good job done बोकलत.
एक काळा कागद घ्या. रोज समुद्रात किती बर्फ टाकलात व त्यामुळे किती ढग आले याचे कोष्टक बनवून काळया शाईने त्या काळया कागदावर पुढील अमावास्येपर्यंत रोज लिहा. अमावस्येला रात्री बारा वाजता त्या कागदाची होडी बनवून त्यात बसून काळया समुद्राच्या मध्यभागी जा. तिथेच होडीत पुढील सूचना मिळेपर्यंत बसून रहा. असे केल्याने तुमच्या राहत्या गुहेवर नक्की पाऊस पडेल.
वाढवूनदेखील समुद्राचं तापमान
वाढवूनदेखील समुद्राचं तापमान एल निनो येथे रडला होता
कारण फ्रीजमधला बर्फ टाकून बोकलत त्याला नडला होता.
आला ना पाऊस. फक्त भाव असायला
आला ना पाऊस. फक्त भाव असायला हवा बाकी सगळं आपोआप होतं.
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच
कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
सदरहू (कवितेचे)पीक आम्ही आसवांवर काढले आहे
>>>कालचा पाऊस आमच्या गावात
>>>कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही

सदरहू (कवितेचे)पीक आम्ही आसवांवर काढले आहे>