चेहरा कोणाचा?

Submitted by Kalpesh Gaikwad on 13 June, 2026 - 11:18

बघा तो भंगलेला चेहरा कोणाचा?
अजब नशिला तो नखरा कोणाचा?

नुसत्याच भिंती अन् गंज चढलेल्या
जखमा खिळलेल्या आरसा कोणाचा ?

विचारते माझी कविता मला.....
मघाचा तो अरे ! अंतरा कोणाचा ?

प्रेतावरी टाकली निःश्वास फुले
त्यातला जिवंत मोगरा कोणाचा ?

पुसतात सारे‌ ते दार‌ कोणते .....
ठेचाळतो प्रत्येक तो‌ उंबरा कोणाचा ?

फुलले कसे अरे‌ ते! रान‌ केवड्याचे
मध्ये वाढलेला धोतरा कोणाचा?

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users