Submitted by द्वैत on 12 June, 2026 - 07:27
अशाच एका संध्याकाळी
मावळतीचे सोनेरी ऊन
निपचित पडल्या वाटेवरती
किरणे काही गेले पेरुन
पुढे उगवली त्या वाटेवर
काही सुगंधी काही रंगीत
रानफुले जी पिऊन वारा
डुलु लागली अपुल्या धुंदीत
पंख मखमली इवले इवले
हलवीत आले फुलपाखरू
पाहून त्याला बागडताना
वाटेचे मन लागले भरू
पुन्हा एकदा संध्याकाळी
मावळतीचे सोनेरी ऊन
चैतन्याने सळसळणाऱ्या
त्या वाटेला गेले स्पर्शून
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>> किरणे काही गेले पेरुन वा!
>>> किरणे काही गेले पेरुन
वा!
कविता आवडली. नादमयता भावली.
कविता आवडली. नादमयता भावली.
किरणे >> तो एक किरण , ते अनेक किरण होतात (कोटी कोटी किरण तुझे…. सूर्यकिरण सोनेरी हे वगैरे). किरणे हे मुळात हिंदी किरनें आहे कारण हिंदीत किरन स्त्रीलिंगी आहे.
धन्यवाद हरचंद जी, बदल केला
धन्यवाद हरचंद जी, बदल केला आहे.
अरे! कशाला बदललं ते? मीटर
अरे! कशाला बदललं ते? मीटर गडबडलं ना!
हर्पाचं ऐकू नका.
शांताबाईंनीसुद्धा लिहिलंय :
कोमल हळवी उदास झाली मावळतीची किरणे
क्या बात है !!
क्या बात है !!
>>>>>>किरणे काही गेले पेरुन
>>>>>>किरणे काही गेले पेरुन
स्मजली.
सुंदर कविता .
सुंदर कविता .
ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे हा सूर्य सोडवित होता
शांताबाई ग्रेस वगैरे आल्यावर
शांताबाई ग्रेस वगैरे आल्यावर माझी बोलतीच बंद झाली
दसा छान ओळी आठवल्या तुम्हाला.
दसा छान ओळी आठवल्या तुम्हाला.
हपा वाईट वाटून घेऊ नका. तुमचे
हपा वाईट वाटून घेऊ नका. तुमचे बारकावे खरंच छान असतात.
आम्हीही चुकतो.
सामो या कवितेची पारायणे झालीत.
सुंदर कविता..!
सुंदर कविता..!
दसा. छे छे! वाईट नाही वाटले.
दसा. छे छे! वाईट नाही वाटले. माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक असूनही मला ते आठवलं नाही.