मुक्तछंदातील कवितेची गझल करते

Submitted by बेफ़िकीर on 11 June, 2026 - 04:13

मुक्तछंदातील कवितेची गझल करते
एक वाऱ्याची झुळुक मोठा बदल करते

ग्रंथ, बाडे वाचणाऱ्यांना कुणी सांगा
एक साधी ओळसुद्धा मन तरल करते

मंदसे हासून झोपी जायची पूर्वी
आज ती खिडकी मला का बेदखल करते!

मी तिच्या सहलीत कायम अडथळा ठरतो
रुक्ष माझ्या जीवनाची जी सहल करते

वाकडे आहे नभाचे काय डोळ्यांशी
भूमिकांची नेहमी अदलाबदल करते

कोण जाणे स्कीम प्रत्येकास का रुचते
गुंतवा दुःखे नि जीवन ती डबल करते

जेवढी करशील चिंता तेवढी वाढे
'बेफिकिर' असणेच हे जगणे सफल करते
=====

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान.
>>>>वाकडे आहे नभाचे काय डोळ्यांशी
भूमिकांची नेहमी अदलाबदल करते

आवडले.

सकाळीच वाचली आणि आवडली.
सहज सुंदर शेर आहेत.

पहिला प्रतिसाद देण्याची संधी गेली.

मुक्तछंदातील कवितेची गझल करते
एक वाऱ्याची झुळुक मोठा बदल करते >> पहिल्या ओळीत काहीच अंदाज आला नाही, पुढच्या ओळीने जो ट्वीस्ट दिलाय त्याला तोड नाही. कुठेच फॅब्रिकेटेड वाटला नाही.

ग्रंथ, बाडे वाचणाऱ्यांना कुणी सांगा
एक साधी ओळसुद्धा मन तरल करते >>> यात विरोधाभास आहे. पण एकूण आशय पुस्तकं वाचणार्‍यांवर असलेला राग आहे असा का वाटतोय?
असायला पाहीजेच. नुसतेच वाचतात. अंमलात कधी आणणा?? Happy

वाकडे आहे नभाचे काय डोळ्यांशी
भूमिकांची नेहमी अदलाबदल करते >> या शेरातही लज्जत आहे.

सगळेच कोट करत नाही. पण मृदू मुलायम शब्दांशी कवीचे वाकडे आहे का असे वाटते. तांबट आळीत बसून काम करता करता काही शेर लिहीलेत असे वाटले. (खोट काढली पाहीजे म्हणून)

कोण जाणे स्कीम प्रत्येकास का रुचते
गुंतवा दुःखे नि जीवन ती डबल करते >> छान.
मला वृत्तातील काही फार कळत नाही, पण ही वाचताना जरा अडखळत होतो.

नवीन प्रतिसाद लिहा