दूधवा ,किशनपूर पिलिभित जंगल डायरीज भाग 2

Submitted by णेम्सेक on 8 June, 2026 - 02:42

687818730_26519966100965639_121760915914484485_n.jpgकच्ची -पक्की सडक -पप्पू कि सोनपापडी आणि बदनाम सामोसा !!!
तराई चे खरे राजे आहेत- हत्ती !.. दुधवा मध्ये हे खूप दिसतात .. एकेका कळपात २७-28 मेम्बर इतके मोट्ठे गट.. आम्ही हि हा थरार जवळून अनुभवला ..एका तरुण हत्तीने तर खोटा खोटा हल्ला ... mock चार्ज पण केलान ...उंच गवतात लपलेल्या बिजली नावाच्या वाघिणीने -नावाला जागत- असाच विद्युतवेगाने रोरावत जीप वर mock केलान ... हृदय उंच उडून घशात येऊन बसते ...(when heart comes to your throat!) म्हणजे काय हे समजले ........
दुधवा जंगलाचे दोन्ही झोन्स - किशनपूर आणि कटियागंज - मनसोक्त हिंडून झाल्यावर आता निघालो पिलीभीत ला ... आपल्याला जंगलाचे कोअर आणि बफर असे दोन भाग माहित असतात ..पण पिलीभीत हा तिसरा प्रकार होता .. त्याला म्हणतात ‘कौरीडॉर’ ! नैनिताल कडे जाणारे जंगल आणि दिमा साईड ने नेपाळ मध्ये जाणारे जंगल याला दुधवा शी जोडणारी मार्गिका ... जंगल अगदीच लीमिटेड वाटते . एक कच्ची सडक आणि एक पक्की सडक अशी शारदा नदीच्या दोन तीरांवर परिक्रमा केली कि संपले !... पण घनदाट आणि गूढ मात्र अगदी अस्सल आहे .. आणि रस्त्यावर चालून दर्शन देण्यासाठी वाघांना अतिशय सोयीचे मार्ग असल्यामुळे सायटिंग साठी फेमस..
आमचे इतके वेळ तटवून धरलेले दुर्दैव आम्ही पिलीभीत ला पोहोचताच भांगडा करू लागले. येणार येणार म्हणून गाजणारा वादळी वारा आणि पाऊस आता उम्बरठ्यात येऊन ठेपला. रात्री इतका बेक्कार बरसला कि सकाळची सफारी रद्द ! दुपारची साशंक !! आता कसले सायटिंग होतेय ... जंगलात आत जायला मिळाले तरी खूप आहे इतकी वेळ ... पण...... 'कोणती पुण्ये अशी येती फळाला'..माहिती नाही - पुढच्या सफारी पण झाल्यात आणि उत्तम सायटिंगपण !!
सगळ्यात थरारक होती ‘नयना “ नावाची तेज तर्रार वाघबाला ... अशी दिमाखात समोरून आली कि “ती पाहताच बाला - कलिजा खलास झाला “ - कसली आहे - माज म्हणजे नुसता खालिस माssज.. हयगय नाही ...नुसत्या फोटोने तिचा डौल समजला नसता , म्हणून सरळ क्लीप च घेतली ...पिलीभीत जंगलात ला मेन man (dominant male) म्हणजे एस 3 नर वाघ ! तो पण समोरच्या तीरावर नदीत बूड बुडलेला असा दिसला ... कितीतरी वेळ फुटेज खावून एकदम भसकन उठून समोरच्या किनाऱ्यावर दाट झाडीत गायबच झाला !
या दोघांसाठी पेशन्स ची साधना करताना जाणकार जंगल गोअर मित्रांनी टिप दिली कि आत जंगलाच्या - शारदा बराज नावाच्या बंधार्याजवळ - एक छोटी टपरी वजा दुकान आहे .. लांबून तर झोपडीच दिसते - एकदम पडकी मोडकी अशी .. पण तिथे पप्पू कि सोनपापडी नावाची मिठाई इतकी सुंदर बनते कि सगळे लोकल्स दहा दहा किलो सुद्धा नेतात... आम्ही कधीही मिठाई न खाल्ल्या बुभूक्षित वेगाने पोहोचले .. ओहहोहो sss काय सांगावे महाराजा .. काय मिठाई आहे .. आपण इथे खातो ती सोनपापडी निव्वळ फरेब आहे - अशी रवाळ, तूपसंपृक्त पण ओशट नाही ... गोड बेतास बात पण खमंग --तिथे खाल्ली - बरोबर आणली ... पण अजून मन भरतच नाही. ( .. आता संपलीये !! ..just saying) तिथेच पत्ता मिळाला पिलीभीत गावातल्या 'बदनाम' सामोसे वाल्याचा ... दुकानाचे नावच ‘बदनाम “ !! त्याला हि निघता निघता पावन केला !!!
अशी ही .. कितीही केले तरी न भागणारी आरण्यकाची तहान.. पिलीभीत च्या जंगलात कितीतरी जंगल वाटांचे वारकरी भेटले. खूप गप्पा ..अनुभव वाटून झाले .. काही लोकं तसेच पुढे कोर्बेट ला चालले होते .. काही दुधवा ला .. प्रत्येकाने आठ आठ दहा दहा सफारिज प्लान केलेल्या होत्या ... चला .. आपण एकटेच काही येडे नाही .. आपुलिया जातीचे कित्तीतरी लोकं कित्तीतरी अजून पुढचे येडे आहेत हा हार्ट वार्मिंग विचार करत शारदा नदीत एक नाणे वाहिले .. लखनौ ला गोमती नदीतही वाहिले होते च .. दोघीही म्हणाल्या ... पुनरागमनायच !!! खरच .. शप्पथ !!!!687192289_26519947704300812_17094251232475721_n.jpg687784317_26519963930965856_1118303793318718097_n.jpg687818730_26519966100965639_121760915914484485_n.jpg687892079_26519871994308383_130505258319291065_n.jpg687954825_26519867794308803_1819567824927235712_n.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भारी अनुभव.

पिलीभीतला लौज नावाची दूधी (लौकी)ची बर्फी पण प्रसिद्ध आहे. सायकल रिक्षावाल्याने लॉज आणि लौजमध्ये गोंधळ करून मिठाईच्या दुकानासमोर नेले होते.