अचानक जमून आलेले पुणे गटग

Submitted by हेमंतकुमार on 7 June, 2026 - 01:45

फेब्रुवारीतील पुणे गटगच्या धाग्यावर दोनच दिवसांपूर्वी ऋतुराजने आठवण काढली होती की पुढचे गटग कधी?
योग कसा असतो बघा . . .
आज सकाळी अचानक ध्यानीमनी नसताना ३ मायबोलीकर आणि ३ मायबोली वाचक यांचे सुरेख गटग पुण्यातील बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर जमून आले. . .
WhatsApp Image 2026-06-07 at 10.50.08 AM.jpeg

फोटोतील मायबोलीकर अनुक्रमे हेमंतकुमार, मोहना आणि DJ........
आणि
आपल्या वाचकांसह :

GTG Bib ALL.jpeg

वरील फोटोत अनुक्रमे शशिकांत, हेमंतकुमार, मोहना,पर्णिका, सुषमा आणि DJ........

बाकी वृत्तांत वगैरे जरा वेळाने….

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे व्वा..भारीच की.
मी फक्त कुमार सरांना ओळखले.
बाकी हे तडकाफडकी/ अचानक/ तात्काळ गटग फक्त पुण्यातच होतात बहुतेक.
वृत्तांत/ वृत्तान्त लिहा लवकर
आता लवकरच एक मुंबई गटग व्हायला हवे Happy

* आयडी. . . >>>>
लिहितो हो जरा वेळाने . . . .
पण कोणी सर्वांना ओळखते आहे का ते तर पाहू :

"आपण यांना पाहिलेत का ?" Happy

* सकाळीच गटग करण्याचं कारण तापमान वाढते नंतर.
>>>> अगदी अगदी ! हे भारी बोललात
तसाही मान्सून इकडे यायला वेळ लावतोच आहे.

सस्पेन्स आवरा.
दारावरच्या पाटीवरचं नाव एस एस लागवणकर दिसतंय.

अरे वा!
मोहना म्हणजे मोहना जोगळेकर?
त्यांचं छापून आलेलं लेखन वाचलं आहे आणि आवडलं आहे.
डीजेंच्या सदस्यनामातली टिंब मोजून दिलीत का?

अरे वा , छान गटग ! मी फक्त कुमार सरांना ओळखले. मोहना जोगळेकर म्हणजे दिवाळी अंकात लेख असतात त्याच ना?
वृतांताच्या प्रतिक्षेत...

मोहना आणि DJ........
काही लिहितील या अपेक्षेत . . . Happy

मस्त!
आता वृत्तांत येऊ द्या.+१

अरे वाह मस्तच की.. वृत्तांताच्या प्रतीक्षेत...
बाकी बहुतेकांचा नो मेक अप लूक बघून अचानक ठरलेले गटग असावे समजत आहेच Happy
पण ते ऋतुराज नसलेले गटग अधिकृत धरले जाते का?

* पण ते ऋतुराज नसलेले गटग अधिकृत धरले जाते का?
>>>> आम्ही त्याची तातडीने ऑनलाईन परवानगी घेतली होती Happy

क्य बात है! लिहा भिडूंनो लवकर.

डीजेजि >> दीपांजली तर नाही?

एडिटः ओ सॉरी, फोटोवरून ती वाटत नाहीय..

एडिट२: कुमार सोडुन कुणाचीच ओळख लागत नाहीय ब्वा. चुभुदेघे.

वृत्तान्त
मित्रहो,
नियोजित गटगची गंमत अन् जल्लोष काही वेगळाच असतो. तो आपण गेल्या दोन-तीन वर्षात भारतात व परदेशात देखील चांगलाच अनुभवतो आहोत. परंतु कुठलीही कल्पना नसताना अचानक एका मायबोली वाचकाचा आज फोन येतो काय आणि गटग जुळून येते हा योगायोग सुंदरच म्हणायचा !

तर त्याचे असे झाले . . .
रविवार म्हणून निवांत बसलो होतो. अद्याप सकाळचे आवरूनही झाले नव्हते आणि अचानक आपले वाचक शशिकांत यांचा फोन खणखणला,
“अरे, काय करतोयस . . . उठला आहेस का अजून लोळतो आहेस लेका ?. . . बघ चांगली संधी आहे गटगची. अंघोळ वगैरे राहू दे, ये लगेचच”
मग काय, पडत्या फळाची आज्ञा आणि वेगाने पळालो तिकडे.
आणि पाहतो तर काय . . . शशिकांतच्या घरी दोन अनोळखी मायबोलीकर धमाल गप्पा करण्यात रंगून गेलेले होते. मग मीही त्यांना सामील झालो. दोघांची प्रथमच भेट आणि नव्याने ओळख. . . अगदी आनंददायी.

शशिकांत-सुषमा या आपल्या वाचकांनी आमचा सुरेख पाहुणचार केला.
मोहना व DJ........ (नावापुढची सध्याची टिंबे मोजावीत Happy अलीकडे लिहीत नसल्याने त्यांचा इथे वावर नसतो. या निमित्ताने काही वर्षांपूर्वीच्या माबो आठवणींना सुरेख उजाळा मिळाला.
“मायबोली’चे मराठी भाषेसाठी योगदान, वगैरे.. “

आता मोहना यांची कन्या पर्णिका पण सारसावून गप्पात सामील झाली.
“मराठी बोलूयात, मराठी वाचूयात, भारतातले व अमेरिकेतले मराठी. . . .” असा नेहमीचा काथ्याकूट अगदी जोषपूर्ण !
त्यातली ही एक झलक:
“ Problem साठी मराठीत अनेक योग्य शब्द असताना मराठी लोक बोलताना हा ‘प्रॉब्लेम’ का करून ठेवतात? नक्की काय ‘प्रॉब्लेम’ असतो त्यांचा??” Happy Happy

अशी ही रविवार सकाळ. . .
नेहमीच्या व्यापतापांचा विसर पाडणारी . . .
नव्या ओळखी करून देणारी आणि. . .
प्रसन्न व ऊर्जादायी . . .
मस्त मस्त गेली !
आणि
सर्वात महत्त्वाचे :
हा सुरेख योग जुळवून आणल्याबद्दल तसेच प्रेमळ आदरातिथ्याबद्दल शशिकांत-सुषमा या वाचक दांपत्याचे आभार !
* * *

Pages