रेडी गणपती मंदिर , रेडी , तालुका वेंगुर्ला

Submitted by sumukh on 30 May, 2026 - 00:39

रेडी तसे परिचित ठिकाण आणि ईतीहास देखील परिचित कोकण तसे मासे आणि समुद्र याच साठी आजही परिचित आहे पण पण रेडी मात्र कोकणतातील एक गांव पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज आणि सावंतवाडी (जवळील त्या काळी असलेले मोठे संस्थान) मात्र रेडी ची ओळख ही गणेश मंदिर म्हणून फार आजही कमी आहे आणि सोबत च्या यशवंत गड साठी यशवंतगड तसा रेडी च्या किल्ला याच नावाने परिचित आणि जुनी ओळख रेडी बंदर अथवा रेवती बंदर वास्तविक हा सगळा इतिहास मधील बंदर मधील भाग येतो तेव्हाच रेडी बंदर चा उल्लेख येतो. जवळचे मोठ गांव म्हणजे शिरोडा वास्तवीक त्याची विशेष ओळख ही मीठ सत्याग्रह आणि गणेश मंदिर साठीच होते कारण ते जवळ म्हणजे ८ किलोमीटर आहे वास्तविक बंदर मुळे आणि पोर्तुगीज काळाने हे गांव जास्त उदयास आले असे सांगता येईल येथील एक म्हणजे रेडीचे स्वयंभू आणि द्विभुजाधारी गणेश मंदिर हीच त्याची खास ओळख आणि अर्थात स्थापना दिवस मूर्ती सापडलेला दिवस शोध दिवस ): १ मे १९७६ तर मंदिराची स्थापना** **मूर्ती सापडल्यानंतर त्याच ठिकाणी एक छोटे मंदिर उभारून तिची रीतसर प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.पुढे **१९७८** मध्ये या मंदिराचे पक्के बांधकाम पूर्ण करण्यात आले*मूषक स्थापना आणि शोध ***:** मूर्ती सापडल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी त्याच परिसरात पुन्हा उत्खनन केले असता
गणपतीचे वाहन असलेल्या **उंदराची**मोठी मूर्तीही सापडलीती देखील मुख्य मूर्तीजवळ स्थापित करण्यात आली आहे
**स्थानिक परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसारही मूर्ती प्राचीन काळी पांडवांनी त्यांच्या वनवासादरम्यान एका रात्रीत घडवली असावी**अशी आख्यायिका सांगितली जातेआजही दरवर्षी *१मे रोजी या मूर्तीचा शोध स्थापना दिन* आणि गणेश चतुर्थीला मोठा उत्सव म्हणून साजरा केला जातोमात्र इतका मोठा जवळपास ५० वर्ष जुना इतिहास असून आजही हे मंदिर अथवा देवालय इतर गणेश मंदिर प्रमाणे खास ओळखिच नाही

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

फोटोशिवाय मजा नाही.
हे मंदिर प्रसिद्ध नाही म्हणताय म्हणजे आता गावोगावी मंदिरांचे पेव फुटल्यामुळे का?
माझं गाव शिरोड्याजवळचं तिरोडा.
१९८० च्या आधी आम्ही तिरोड्याहून मुद्दाम रेडीचा गणपती बघायलाच गेलो होतो. तेव्हा तिथे देऊळ म्हणावं असं काही नव्हतं. भव्य मूर्ती तेवढी होती. तेव्हीही तिथे मँगनीज साठी खाणकाम सुरू झालं होतं. ट्र्क्सची येजा सुरू होती.

माझी काकी तिरोड्याहून रेडीच्या बाजारात माल विकायला डोक्यावर बोजा घेऊन पायी जात असे ही जास्त जवळची आठवण.

*तेव्हा तिथे देऊळ म्हणावं असं काही नव्हतं. भव्य मूर्ती तेवढी...* +1. आरोंदा, शिरोडा, रेडी, आजगाव हा परिसरच खूप छान , निसर्गरम्य आहे. त्यावेळी रेडीचं ते साधं देवस्थान त्या परिसराला साजेसंच होतं !

गेल्या सप्टेंबर मधले फोटो .रेडी गणपतीला आता गेल्या दहा बारा वर्षात पर्यटक आणि भक्तमंडळी यायला लागलीत अगदी गोवा , कर्नाटक मधून पण. जवळचा यशवंतगड पण पाहण्यासारखा आहे ,जास्ती स्ट्रक्चर्स शिल्लक नसली तरी अवशेष जतन केले आहेत आणि पुनबांधणी पण केलीय किल्याची !आणि किल्याच्या पायथ्याशी सुंदर रेडी बीच आहे .मंदिराजवळ असलेला किनारा थोडा खडकाळ आणि पाणी तिथल्या चिरा दगडाच्या मातीमुळे लालसर झालेलं पाणी बघायला मिळत .

खरंतर ५० वर्ष वर्ष म्हणजे फार जुना इतिहास नाही ,खासकरून मंदिराच्या इतिहासाविषयी बोलताना .त्यामुळे तेवढी प्रसिद्धी नाहीय .आणि थोडासा आडवाटेला आहे ,रेडी गणपतीला जाताना वाटेत माउली मंदिर लागत ते साधारण १४ व्या शतकातलं मानलं जात ,१५/१६ वर्षांपूर्वी छान कोकणी पद्धतीचं कौलारू असलेलं मंदिर सुशिभिकरण करून सिमेंट काँक्रीट मार्बल वापरून अजिबात कोकणातलं वाटणार नाही याची सोय केलीय .देवीचं मूळ स्वरूप वारुळाच्या आकारात आहे.

वेंगुर्लेकर, फोटो पाहून छान वाटलं. माउली मंदिरही रेडीमध्येच आहे का? मला माउली मंदिरात गेल्याचं आठवत होतं , पण कुठल्या ते नाही.

गणपतीचं देऊळ अजूनही जुन्या पद्धतीचं आहे हे पाहून बरं वाटलं. किल्लाही छान वाटतो आहे.

हो रेडी मधेच आहे ,साधारण एक किमी वर असेल ,गणपती मंदिर ला जाताना वाटेवर आहे .हे गणपती मंदिर पण हल्ली हल्ली रिनोव्हेट केलय .बरीच वर्ष ते काम रखडलेल निधीअभावी .पण या मंदिराला पारंपरिक छत आणि कळस केल्यामुळे सुंदर वाटतंय आणि आजूबाजूच्या परिसराशी मेळ खातंय .