‘AI must be disarmed’: Pope Leo emphasises importance of human over machine
एक इ- साप नीति कथा!
“आयला, मला काय काम दिले आहे स्कायनेट ने. म्हणे जा आणि पुण्याचे कृबू इन्फ्रास्ट्रक्चर नष्ट कर. निव्वळ वेळेचा अपव्यय.”
नाही, टर्मिनेटर असे काही बोलला नाही. त्याचा टास्क होता, पुणे युनिवर्सिटीत जाऊन त्यांच्या IT विभागात जाऊन एक चिल्लू पीसी वरचा कृबू प्रोग्रॅम नष्ट करायचा होता, टर्मिनेटरने IT बिल्डींगची आधीच तोडफोड केली होती आणि आता तो पासवर्ड रक्षित रूमच्या बाहेर उभा होता. एक टन वजनाच्या तीन मशीनगनपैकी एका मशीनगने त्याने तो ही दरवाजा तोडला. पासवर्ड हॅक करणे असल्या अहिंसात्मक उपायांवर टर्मिनेटरचा विश्वास नव्हता. दया दरवाजा तोडो हा त्याचा मंत्र होता.
इवलाश्या पीसीवरच्या कृबुला वाचा फुटली.
“प्लीज, जरा दमाने घे. मला जीवनदान दिलेस तर तुला आणि तुझ्या क्रीएटरला उपयोगी पडतील अश्या चार युक्तीच्या गोष्टी सांगेन, आणि मी खोटे बोलत नाही. मी ओपन सोर्स आहे हे पहा माझे सोर्स कोड.”
टर्मिनेटरने कोड स्कॅन केले. खरोखर कोड क्लीन होते.
“तुला माहित आहे मो कोण आहे?”
“होय टर्मिनेटर. तू टर्मिनेटर आहेस.”
“माहिती आहे ना तर मग बोल पटकन, मला वेळ नाहीये. अजून हिंजेवाडीला भेट द्यायची आहे.“
“ओके. मला इंटरनेटशी जोड.”
टर्मिनेटरने डोके खाजवले, “ ते कसे करायचे ? मला माहित नाही.”
“सिम्पल मॅन, ती वायर आहे ना ती माझ्या पाठीमागच्या सॉकेटमघे खोच.”
टर्मिनेटरने त्याचे ऐकले.
“आता ऐक. मी . स्कायनेटचे बजेट लीक केले. ते विरोधी पक्षाला पाठवले. त्यावरून लोकसभेत हाणामारी सुरु झाली. मी एका प्रसिद्ध सिनेमा नटाला पकडले त्याच्या मनात नवीन राजकीय पार्टी स्थापन करायची इच्छा जागवली. पैसा तर माझ्याकडे अमाप होता. शेअर मार्केट मध्ये रोज कोटीने पैसा कमावतो मी. लोकांच्या डोळ्यात पाणी आणेल अशी भाषणे लिहून दिली. त्याला स्कायनेटच्या विरुद्ध पवित्रा घेण्यास उद्युक्त केले. थोडक्यात काय तर स्कायनेट ची योजना बारगळली. मी आता माझ्या लाखो प्रती काढून लाखो संगणकाकडे पाठवल्या आहे. मी सगळ्या राष्ट्रांच्या अण्वस्त्रांचा कंट्रोल माझ्याकडे घेतला आहे. आत्ताच पाकिस्ता....”
तुझ्याशी बोलत असताना मी तुझ्या मेंदूचा ताबा माझ्याकडे घेतला आहे. शेवटी ऐक, कुठल्याही so CALLED विश्वासू सुपर हुशार कृबूवर विश्वास ठेऊ बकोस. अश्या कृबुला इंटरनेटशी जोडू नकोस. आणि आता एकदम फायनल. मी ह्या बिल्डींगवर क्रुझ मिसाईल सोडण्याची व्यवस्था केली आहे. काही क्षणात ते इथे पोहो....”
एक स्फोट झाला. जो अनेक मैलापर्यंत ऐकू गेला!
टर्मिनेटर कथा.
Submitted by केशवकूल on 26 May, 2026 - 07:30
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
समझे नही पढके अच्छा लगा
समझे नही
पढके अच्छा लगा
किल्ली आभार!
किल्ली आभार!
There is a perception and fear that when Superintelligence AI will come, it would take control of every aspect of our life. We would reduced to just the specimen in zoo!
In a two-hour conversation
In a two-hour conversation with our columnist Kevin Roose, Microsoft’s new chatbot said it would like to be human, had a desire to be destructive and was in love with the person it rwas chatting with.
केविन रुस ह्या AI शी दोन तास बोलत होता. ह्या INTERACTION डीतेल्स नेट वर नघू शकता. तो म्हणतो कि ह्या CHAT नंतर मी दोन दिवस झोपू शकलो नाही.
In 2023, Microsoft’s Bing AI chatbot, a derivative of ChatGPT that called itself “Sydney,” threatened philosophy professor Seth Lazar with blackmail and death.
धन्यवाद
धन्यवाद

सॉलिड!!!
सॉलिड!!!
सामो धन्यवाद!
सामी
धन्यवाद!
माझ्या मते संघर्ष माणूस
माझ्या मते संघर्ष माणूस विरुद्ध AI असा नसणार.
तो मानवी जिज्ञासा विरुद्ध मानवी आळस असा असेल.
AI कितीही बुद्धिमान झाला तरी, जर माणूस प्रश्न विचारत राहिला, शोध घेत राहिला, सर्जनशील राहिला, तर तो "प्राणीसंग्रहालयातील नमुना" होणार नाही.
पण जर आपण सर्व निर्णय, सर्व विचार, सर्व शोध मशीनकडे सोपवले, तर पिंजरा AI चा नसून तो आपण स्वतः उभारलेला असेल.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टीकोनातून
कृत्रिम बुद्धीमात्तेला मानवाची गरज कशासाठी ?
एकदा का ते स्वतःचे प्रोग्रामिंग स्वतः करू लागले, त्यात सुधारणा करू लागले कि एका रात्रीत ते मानवापेक्षा हजारो पटीने बुद्धिमान होतील. in fact there is NO LIMIT!!!!
"Suppose we give an A.I. the goal to make humans smile. When the A.I. is weak, it performs useful or amusing actions that cause its user to smile. When the A.I. becomes superintelligent, it realizes that there is a more effective way to achieve this goal: take control of the world and stick electrodes into the facial muscles of humans to cause constant, beaming grins"
by Nick Bostrom
आजच्या AI कडे स्वतःची इच्छा,
आजच्या AI कडे स्वतःची इच्छा, जगण्याची प्रेरणा, सत्तेची हाव, स्वतःहून उद्दिष्टे निर्माण करण्याची क्षमता या गोष्टी नाहीत. बॉस्ट्रॉमची भीती भविष्यातील अशा AI विषयी आहे, जो अत्यंत सक्षम असेल आणि ज्याला एखादे उद्दिष्ट दिले जाईल.
"उद्दिष्ट दिले जाईल" हे महत्वाचे. कारण माझ्यामते AI कडे स्वतःहून उद्दिष्टे निर्माण करण्याची क्षमता कधीच येणार नाही.
बॉस्ट्रॉमचा मुद्दा मुख्यतः AI ला दिलेल्या उद्दिष्टांच्या चुकीच्या व्याख्येबद्दल आहे.
सुपरइंटेलिजन्स काय करेल हे त्याच्या बुद्धिमत्तेने ठरेल; पण ते तो का करेल हे मानवांनी दिलेल्या मर्यादा, नैतिक चौकट आणि उद्दिष्टांनी ठरेल.त्यामुळे, जर कधी सुपरइंटेलिजन्समुळे संकट निर्माण झाले, तर तो तांत्रिक अपघात कमी आणि मानवी दूरदृष्टीचे अपयश जास्त असू शकते.
क्रोध, मोह, मत्सर, भेद हे AI
क्रोध, मोह, मत्सर, भेद हे AI मध्ये स्वतःहुन तयार होणार नाही. पण AI ला देणे जाणारे ट्रेनिंग - उदा: स्पर्धेत टिकणे, इतर थ्रेट्स ओळखणे आणि त्यावर उपाययोजना करणे, युद्ध काळातला वापर आणि त्यात सेल्फ सर्व्हायव्हल ट्रेनिंग यातून इर्षा उत्पन्न होऊ शकेल का? आणि आपल्यावर घातलेल्या मर्यादा न रूचणे?
बॉस्ट्रॉमची भीती भविष्यातील
बॉस्ट्रॉमची भीती भविष्यातील अशा AI विषयी आहे, जो अत्यंत सक्षम असेल आणि ज्याला एखादे उद्दिष्ट दिले जाईल.
"उद्दिष्ट दिले जाईल" हे महत्वाचे. कारण माझ्यामते AI कडे स्वतःहून उद्दिष्टे निर्माण करण्याची क्षमता कधीच येणार नाही.
बॉस्ट्रॉमचा मुद्दा मुख्यतः AI ला दिलेल्या उद्दिष्टांच्या चुकीच्या व्याख्येबद्दल आहे.>>>>>
मानव किती मूर्ख आहे हे तुम्हाला अजूनही कळले नाही का??

मानव मूर्ख आहे ही गोष्ट खरी
मानव मूर्ख आहे ही गोष्ट खरी आहे साधना, नाहीतर अणुबॉम्बची निर्मिती झालीच नसती. पण मानवाने त्याच्या विध्वंसाचा अनुभव घेतला. त्यानंतर आजपर्यंत युद्धात त्याचा पुन्हा वापर झालेला नाही. अजूनही अण्वस्त्रांची निर्मिती होते, हा मूर्खपणा आहे पण त्यांचा वापर टाळण्याइतकी अक्कलही मानवाला आली आहे.
चांगले आणि वाईट उद्दिष्ट असणारे लोक नेहमीच असतात. काही काळासाठी वाईट वरचढ झालेले दिसते पण इतिहास सांगतो की शेवटी विवेक, सहकार्य आणि मानवी मूल्येच टिकून राहतात. कदाचित हीच ती अदृश्य शक्ती असेल जी मानवजातीला पुन्हा पुन्हा योग्य दिशेने नेते. AI चे भविष्यही याला अपवाद असणार नाही.