Submitted by बेफ़िकीर on 24 May, 2026 - 13:22
एक चिमणी अबोल झालेली... पाहताना .. घडून गेलेले
एक चिमणा उडून गेलेला... एक घरटे पडून गेलेले
आजही कालचाच आहे मी... हाच मोठा बदल म्हणावा का?
की बदललेत लोक आता ते... कालवर आवडून गेलेले
शांतता लाभते हवी तेव्हा... फक्त फोटो बघून बापाचा
आमची सावली अमर आहे... झाड असुदे झडून गेलेले
एक घर शिफ्ट होत असताना... एकजण लांबुनी बघत होता
कोरडे ठण्ण राहिले डोळे... आणि मन भडभडून गेलेले
वेगळी वाहवा मला मिळते... जी तुम्हाला दिसायची नाही
जाहले बादशाह गझलेचे, लोक माझ्याकडून गेलेले
=====
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाणावलेले डोळे... आणि मन भरून
पाणावलेले डोळे... आणि मन भरून आलेले
सगळेच अगम्य...आणि लोक पळून गेलेले
अप्रतिम... खूप आवडली
अप्रतिम... खूप आवडली