भाग - 5
सर्व महत्वाच्या राष्ट्रांच्या प्रमुखांची आणि त्यांच्या सोबतच्या अशा इतर पन्नास राष्ट्रांची एक बैठक चीन मध्ये शांघाय इथे भरली होती. गेल्या वर्षभरात पृथ्वीवर असंख्य बदल झाले होते. कुठल्यातरी शक्तीने पृथ्वीवरचे जीवनच ढवळून टाकले होते. ही शक्ती दैवी होती, का अतिमानवी होती, हे सर्व नियंत्रण दुसऱ्या बुद्धी असलेल्या प्राण्याकडून चालले होते हे सांगणे खरोखरच अवघड होते. एक निश्चित होते की कुठल्याही देशात सामान्य जनतेचे काहीही नुकसान झालेले नव्हते. पंधरा देशात त्यांनी आपली कार्यालये स्थापन केली होती. आणि आता काही वर्षातच मानवजातीचे असंख्य प्रगती होण्याची चिन्हे दिसू लागली होती.
काही नवे जरी त्यांच्यापर्यंत पोहचले होते तरी ते कोण आहेत आणि ते पृथ्वीवर हा उद्योग का करत आहेत हे कळायला मार्ग नव्हता. शेवटी बैठकीत त्यांना परम असे नामविधान देण्यात गेले. दुसरी एक अडचण होती म्हणजे त्यांच्याकडून येणारी माहिती किंवा आदेश जगजाहीर असायचे परंतु त्यांच्या पर्यंत कुठलेही संभाषण अथवा संपर्क साधता येत नव्हता. त्यांच्याशी संपर्क साधायचा झाल्यास त्यांच्या कार्यालयातील संगणकापुढे म्हणणे मांडावे लागे. त्यानंतर कधीतरी त्यांचे उत्तर प्रसारित होई. सर्व प्रमुखांना दिलेल्या सूचनेप्रमाणे सर्वानी सर्व तर्हेची उत्पादने करण्यापेक्षा काही राष्ट्रांना ती विभागून दिली जावीत असे त्यांना सांगितले गेले होते. असे केल्यामुळे भविष्यातील उत्पादने वर्तमान काळात वापरण्याची सोय होणार होती. स्वयंपाकाकरिता एक, दोन, तीन आणि चार हॉटप्लेट असलेल्या उत्पादनाचे आराखडे देण्यात आले होते. चारपैकी एक हॉटप्लेट इन्डक्श कूकिंगकरिता असणार होती. या सर्व उपकरणांना 1MW चे दोन ऊर्जा संचय जोडण्यात येणार होते.
एक ऊर्जा संचय संपल्यावर दुसरा ऊर्जा संचय आपोआप सुरु होणार होता व तो निदान तीन तास चालणार होता. तेवढ्या वेळात संपलेला ऊर्जासंचय बदलणे आवश्यक होते. सर्वच उपकरणाच्या बाबत अशी दुहेरी ऊर्जा संचयाची सोय केली जाणार होती. स्वयंपाकाची वीस कोटीहून जास्त साधनांची निर्मिती चार पाच वर्षात करायची होती. या उत्पादनात तीन हॉटप्लेट्स, त्याचे टेम्परेचर कंट्रोलर आणि एक इन्डक्श हिटरची यंत्रणा असा समावेश होता. अशा सर्वांचे निर्मिती करण्याची जबाबदारी चीनवर सोपवण्यात आली. रिप्लेस झालेल्या सर्व शेगड्या स्क्रॅप म्हणून चीनला मिळणार होत्या. त्याचप्रमाणे दहा कोटीहून जास्त गिझरची ऑर्डरही चीनला देण्यात आली. हे मास प्रोडक्शनचे काम चीनने करावे अशी अपेक्षा ठेवण्यात आली. भारताने अगोदरच चीनला बर्फात टिकू शकणाऱ्या एक लाख घराची ऑर्डर दिली होती. इतर उपकरणात टू व्हीलरची जबाबदारी भारत आणि युरोपियन समुदायावर सोपविण्यात आली. फोर व्हीलर पॅसेंजर वेहिकलची निर्मिती कोरिया, जपान, रशिया आणि युरोपियन
समुदायावर टाकण्यात आली. दहा टना पर्यंत ट्रकची निर्मिती रशिया आणि अमेरिकेवर टाकण्यात आली. अवजड वाहने तसेच स्लीपर कोचेस आणि अवजड पॅसेंजर वेहिकल यांची निर्मिती स्वीडन, ब्रिटन आणि जपानवर सोपवण्यात आली. या शिखरसम्मेलनातून एकमेकांविषयीची राष्ट्रांची जवळीक वाढली. शत्रुभावना कमी होऊन मैत्र भावना वाढीस लागली. याच्या पुढचा प्रश्न होता तो म्हणजे ऊर्जेची आणि ऊर्जा संचयाची निर्मिती. सगळ्यात सौर उर्जेला महत्वाचे स्थान दिले गेले. सध्याची सेमीकंडकरहून जास्त गुणवत्ता असलेले खास मटेरियलची निर्मितीचे शास्त्र पृथ्वीवर आणले गेले. या तंत्रज्ञानात पॅनेल्स असा प्रकार नसून जास्तीत जास्त आकारमानाचे कापडासारखे तलम पदार्थ वापरण्यात येत होते. पूर्वीच्या दहा स्क्वेअर मीटर पॅनल मधून वर्षाला अंदाजे 1700 KWH ऊर्जा मिळत असे. नवीन पदार्थांमुळे दहा स्क्वेअर मीटर मधून 15300 केव्हा इतकी ऊर्जा मिळणार होती. थोडक्यात ऊर्जा निर्माण यंत्रांचा खर्च 25000/KW पासून 3000 /KW इतका कमी होणार होता.
ऊर्जा संचयाचे दोन भाग होते त्याचा गाभा हा फक्त निवडक देशातच करण्यात येणार होता. तर ऊर्जा संचयाची निर्मिती चीन, कोरिया, ब्राझील, साऊथ आफ्रिका आणि हेवी ड्युटी म्हणजे 1GWH आणि मोठ्या ऊर्जा संचाची निर्मिती सौदीअरेबिया, ओमान, टर्की, यूएई अशा देशातून होणार होती. ऊर्जेची निर्मिती अर्थातच मोठाले वाळवंट असणाऱ्या प्रदेशात सहजरित्या होणार होती. त्यामुळे त्यात सर्व आखाती देश, आफ्रिकेतील, ऑस्ट्रेलिया, अमेरिका मधील वाळवंट यामध्ये होणार होता. एका अनुमानाप्रमाणें या प्रदेशांतून जगाला आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या वापरासाठी जरूर असलेल्या ऊर्जेच्या आठ ते दहा पट उत्पादन होणार होते. याचा परिणाम आर्थतच ऊर्जेच्या किमतीवर होऊन किंमती कमी होणार होत्या. सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष कोणतेही पदार्थ वापरले जात नसल्यामुळे उत्पादनात कोणताही खंड अपेक्षित नव्हता. हे सुरु झाल्यावर हळू हळू अणु भट्ट्यासहित सर्व उष्णता केंद्रे बंद होणे जरुरुचे होते. असे झाल्यास द्रवरूपी आणि घनरूपी कोळसा असे बरेच इंधन वाचले असते. मोठे जलविद्युत प्रकल्प चालूच राहणार असून छोट्या जल विद्युत प्रकल्पना चालना मिळणार होती. अशारीतीने सर्व विश्वात ऊर्जेची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात झाली असती. यापूर्वी ज्या राष्ट्रांना ऊर्जा परवडत नव्हती असे अनेक देश आफ्रिकेत, साऊथ अमेरिकेत आणि आशियात होते. त्यांची उन्नती कशी करायची आणि त्यांना स्वतःचे उत्पन्न कसे मिळवायचे यावरही परिषदेत खल झाला. या परिषदेचे सर्व टाचणे परमच्या चीन मधील कार्यालयाला देण्यात आले. अट्ठेचाळीस तासातच त्यातील सर्व उत्पादक राष्ट्रांना त्यांच्या भावी उत्पन्नाचे अंदाज, उत्पादकाची नावे आणि ठिकाणे आणि त्यांना लागणार वित्त पुरवठा यांची अधिकृत माहिती एक आठवड्यात जवळच्या परम कार्यालयाला देण्याविषयी सांगितले गेले. अमेरिका, इज्रायल, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांच्या सीमा बंदच केल्या होत्या.
भाग - 6
परमच्या पुढील बैठकीत पुलम, सर्वेश, विकर्म, सुदैव आणि अरुंधती हे सर्व ग्रहावरून सामील झालेले विचारवंत आणि उच्च दर्जाचे अधिकारी होते. चर्चेचा मुद्दा होता अतिरेकी संघटना आणि त्यांना थाबवण्याविषयी उपाय. सुदैव म्हणाला सर्व परिस्थिती लक्षात घेता मुस्लिम धर्माची लोकं जास्त दहशत पसरवतात. आपल्याला कुठल्याही धर्माबद्दल राग किंवा द्वेष नाही पण या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे. एकंदरीत पाहता सर्वधर्मात मुस्लिम धर्म जास्त हेकेखोर आणि दुसऱ्या धर्माला त्रास देणारा आहे. पाकिस्तानची निर्मितीच धर्मभेदातून झाली आहे आणि नंतरच्या काळात त्याच्या राज्यकर्त्यांनी हिंदू विरोधी अतिरेक्यांना भांडवल, शस्त्र अस्त्र आणि सर्वोतोपरी साहाय्य केले आहे. अमेरिका इराण विरूद्धं कितीही दावे करत असली तरी त्यांनी कोणत्याच शेजाऱ्यावर दशहत निर्माण केली नाही.
दहशदवाद थांबायला आपल्याला त्यांचे अनुयायी आणि त्यांचा वित्त पुरवठा थांबवायला लागेल. त्याकरिता आपल्याला भारतीय उपखंड आणि इतर काही मुस्लिम देशांवर नजर ठेऊन त्यांना समज द्यावी लागेल.
दुसरा दहशदवादाचा प्रकार म्हणजे नशा आणणाऱ्या पिकांचे संवर्धन. अशा पदार्थांची निर्मिती नैसर्गिकरित्या अथवा कृत्रिमरित्या तयार केलेल्या अशा पदार्थांची निर्मिती आणि त्याची वाटप व्यवस्था असे या अमली पदार्थांच्या दहशवादाचे स्वरूप आहे. त्याच्या व्यापारात होणाऱ्या अफाट फायद्यामुळे गुन्हेगारांचे विश्व हातपाय पसरत चालले आहेत. याला धर्माचे कोणतेही अधिष्ठान नाही. परंतु याचे स्वरूप धर्मवादापेक्षाही सर्वदूर आणि जीवघेणे आहे.
सर्वजण गप्प झाले आणि अंतर्मुख होऊन विचार करू लागले. विकर्म म्हणाला, आपण या सर्व पदार्थानी येणारी नशा थांबवू शकतो. असे केल्यामुळे हळू हळू या पदार्थांची मागणी कमी होईल किंवा नष्टच होईल. या परिस्थितीत त्याच्यावर मिळणार पैसा हा पण संपुष्टात येईल. या पदार्थातील घटक द्रव्याचा अतिशय विपरीत परिणाम होऊन मृत्यू ओढवेल असेच करू शकतो. पुलम म्हणाला, आपण जरी या पदार्थातील नशा काढून टाकली तरी सुद्धा मानव नवीन प्रयोग करून परत काहीतरी पदार्थाचे संशोधन निश्चितच करेल. त्यापेक्षा सहजच एका डोसनंतर तासाभरात जर मृत्यू आला तर भीती पसरून अशा प्रकारे ड्रग्स चा वापर संपुष्टात येईल. त्यामुळे नको असलेली लोकसंख्या सुद्धा कमी होण्यास मदत होईल. एक गोष्ट खरी आहे की माणूस प्रयोग करून दुसऱ्या नशिल्या पदार्थांचा शोध लावण्याची पराकाष्टा करेल. आपण हे होईपर्यंत बरेसे शास्त्रज्ञ आणि नशेला चटावलेले जीवात्मे नष्टच होतील. पुलम पुढे म्हणाला, हा उपाय तात्पुरता आहे आणि आपल्याला यावर काहीतरी कायम स्वरूपी उपाय शोधायला पाहिजे. एका आठवड्यातच कल्पना अस्तित्वात आली आणि जगभरातील असंख्य ग्राहक पटा पट मारू लागले. पाच सहा महिन्यातच कोकेन, हेरॉईन, अशा औषधाचा पुरवठा आणि स्वाभाविकता उत्पादन अतिशय कमी झाले. जगभरात नाट्य, सिने क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी, प्रसिद्ध नेते, काही यशस्वी खेळाडू असे जगभर उंदरासारखे मरून पडू लागले. त्यातून परम ने जगभर जाहीर केले की एक अति भयानक विषाणू या प्रकारच्या पदार्थातून संक्रमण होऊ लागले आहे. अजून तरी त्याच्यावर कुठलेही वॅक्सीन अथवा औषधउपचार अस्तित्वात नाहीत. लागण झाल्यावर दोन तीन तासातच विषाणूच्या भयानक स्वरूपामुळे हा विषाणू अशा औषधाच्या सेवना बरोबरच शरीरात प्रवेश करतो आणि हा रोग शंभर टक्के प्राणघातक आहे. रोगाचे संक्रमण फक्त नार्कोटिक पदार्थच होऊ शकते. जगभर असंख्य मान्यवर सर्व ठिकाणी हातात खाली मान घालून कोलमडताना दिसले.