विश्वरचना

Submitted by अविनाश जोशी on 14 May, 2026 - 07:18

विश्वरचना
भाग - 1
पुलम सचिंत मुद्रेने अवकाशात विहारत होता. त्याने अंबरला बोलावून घेतले आणि त्याला म्हणाला,
अरे हे पृथ्वीवर काय चालले आहे ? एक तर आपल्याला सर्व जगाची व्यवस्था लावायला पाहिजे किंवा संपूर्ण मानवजात नष्ट करायला पाहिजे.
अंबर म्हणाला, प्रभो आपण स्वतः करिता इतरांना त्रास देणाऱ्या मानवांना प्रथम वठणीवर आणले पाहिजे. त्यात प्रामुख्याने अमेरिकेने गोंधळ घातला आहे. जगभर सुव्यवस्था करायची असेल तर प्रथम आपल्याला सर्व राष्ट्रांची अण्वस्त्र नष्ट करायला पाहिजे. आणि आपल्याला स्वतःचे व्यवस्थापन काही काळ तरी राबवावे लागेल. ठीक आहे आपले निलाच्छादन पृथ्वीवर सर्वत्र पसरवून सर्व प्रकारची अण्वस्त्र आणि अणुभट्या निष्कामी कर. आपल्याला जर व्यवस्थापन करायचे असेल तर सर्व ठिकाणी त्यांच्या भाषेत चित्र संदेश जाईल अशी व्यवस्था करण्याकरिता नवीन व्यवस्था कर. त्याप्रमाणे अंबर कामाला लागला आणि काही पळातच त्याची व्यवस्था झाली. सर्व जगभर सर्व चित्र वाणीवरचे कार्यक्रम बंद करून तिथे फक्त पृथ्वीचा तरंगता गोल दिसू लागला. थोड्याच वेळात त्यांना त्यांच्या भाषेतले श्रवणास येऊ लागले.
मानवजातीकरिता संदेश 'तुमच्यातील काही देश स्वतःच्या पायावरच धोंडे पाडून घेत आहेत. अशाने सर्व मानवजात नष्ट होईल आणि हे आम्हाला चालणार नाही. आत्ता या क्षणापासून सर्व देशांची सर्व अण्वस्त्र कुचकामी झाली आहेत आणि ज्याकाही अणुभट्ट्या असतील त्याही बंद पडलेल्या आहेत. कुठल्याही परिस्थिती ज्यांना अणुभट्ट्या सुरु करायच्या असतील त्यांना त्याकरिता फी द्यावी लागेल. सर्वच अण्वस्त्र कुचकामी ठरल्यामुळे आता कुणाकडे किती अण्वस्त्र आहेत या आकड्याना काहीही किंमत राहिलेली नाही. आमचे असे मत झालेले आहे की प्राथमिकता अमेरिका आणि त्यांच्यामुळे इस्रायल ही दोषी राष्ट्र आहेत. त्यांच्या सर्व प्रदेशावर पिवळे आच्छादन घालण्यात आलेले असून आता ही राष्ट्रे कुठल्याही तर्हेची विमाने आणि क्षेपणास्त्रे झाडू शकणार नाही.
जगातील सर्व देशांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्टीय विमान उड्डाणे सात दिवसांकरिता स्थगित करावी. कुठलेही प्रवासी अथवा लष्करी विमान उडाल्यास ते ताबडतोब नष्ट करण्यात येईल आणि त्याची संपूर्णतः जबाबदारी त्या राष्ट्रावरच राहील. या संदेशामुळे जगभर खळबळ माजली. सर्व अणुभट्या बंद पडल्यामुळे विजेचा प्रचंड तुटवडा भासू लागला. बर कोणाविरुद्ध काय करायचे हे कोणीही सांगू शकत नव्हता. त्यानंतर अंबर म्हणाला हे प्रभो, आता आपल्याला अमेरिकेचा तेलामुळे, युद्धसाहित्यामुळे आणि फुगवलेल्या संपत्तीमुळे असणारा वर चष्मा मोडून काढायला पाहिजे. त्याकरिता आपल्याला नवीन प्रमाणित चलन तयार करावे लागेल की जे आभासी असेल पण ते कुणीही छापू शकणार नाही आणि जगातले सर्व व्यवहार त्या त्या देशाच्या चलनात किंवा या नवीन आभासी चलनात होतील. त्यानंतर आपल्याला तेल आणि सोने यांच्या प्रमाणित किंमती नवीन चलनात जाहीर कराव्या लागतील. सध्या आपण या नवीन चलनाला WOCU (वल्ड करन्सी ) असे नामाभिधान देऊ. या घोषणेनेनंतर जगभर खळबळ माजणार आहे परंतु अमेरिकेचा वरचष्मा कमी होण्यास मदत होईल. एका तासाभरातच तसे निवेदन जगभर प्रसारित झाले. आणि कोठेही गोंधळ होऊ नये म्हणून वॊकु आणि प्रत्येक चलनाचे गुंणोत्तरही जाहीर करण्यात आहे. याचा जास्त आनंद चीनला झाला. थोड्याच वेळात पुढील निवेदन आले. अमेरिकेने जगभरचे आपले लष्करी तळ तातडीने हलवावे. सर्वंठिकाणची अमेरिकेची युद्ध व्यवस्था संपुष्टात आणावी. चोवीस तासात असे न घडल्यास ते सर्व लष्करी तळ नष्ट करण्यात येतील. आंतरराष्ट्रीय नाणे निधी वल्ड बँक यांची आणि अशाच सर्व जागतिक संस्थांची अमेरिकेतील कार्यालये बंद करून ती स्कॉटलंड मध्ये हलवण्यात येतील. यात असलेले सर्व डॉलरची खाती वॊकु मध्ये परावर्तित केली जातील. हे निवेदन संपल्यावर तर जगातल्या सर्व राष्ट्रीय बँका पेचात सापडल्या. सर्वानी तातडीने आपले US डॉलर रिजर्व वॊकु मध्ये बदलायला सुरवात केली. परिणामी सुरवातीस एक वॊकु = एक डॉलर असणारे गुणोत्तर चार तासात एक वॊकु = पाच डॉलरवर गेले. सर्वाना आता आयात निर्यात स्वतःच्याच चलनात करायची होती. यामुळे असणारा चलन आणि फेर बदलाचा खर्च मोडीत निघाला. बारा तासांनी नविन निवेदन जाहीर झाले. अमेरिका युरोपियन युनियन, चीन, रशिया आणि इतर सर्व देशांच्या सीमा बंद करण्यात येत आहेत. सर्व राष्ट्रांनी आपले दळण वळण चोवीस तासाकरिता तरी बंद ठेवावे. या घोषणांमुळे चीनला अतिशय आनंद झाला. त्यांची बऱ्याच वर्षांपासून मागणी होती कि डॉलर हा आलेला फुगवटा आहे आणि ते खरेही होते. अस्तित्वात असलेल्या चलनानुसार आज अमेरिकन चलन फुगवटा तीनशे पटीने वाढला होता आणि त्याची कुठल्याही प्रकारे पस्तीस वर्ष तपासणी झाली नव्हती.
अट्ठेचाळीस तासातच जगभर परिणाम दिसू लागले. अमेरिकेतील महागाई प्रचंड वाढली. चार डॉलरला एक ग्यालन असलेले इंधन पंचवीस डॉलरलाल एका ग्यालनला झाले. सर्वच गोष्टींच्या अतोनात किंमत वरती झाल्या त्यामानाने आशिया देशात रशिया, ची आणि ऑस्ट्रेलियात फार मोठे फरक झाले नाहीत. युरोपियन देशात तर महागाई कमी होण्याची चिन्हे दिसू लागली. श्रीलंके सारखी छोटी राष्ट्रे दुसऱ्या एखाद्या मोठ्या राष्ट्राच्या छायेत वावरता येत आहे का हे बघायला लागली. पुढच्या दिवशी घोषणा झाली की ज्यांना अणुभट्ट्या चालू करायच्या असतील त्यांनी शंभर किलोवाटच्या अणुभट्ट्या करिता वार्षिक एक मिलियन वॊकु एवढी फी भरावी. पैसे मिळाल्यावर तीस सेकंदात अणुभट्टी सुरु करता येईल. ज्या राष्ट्रांना ही फी शक्य नसेल त्यांना इतर राष्ट्रांनी मदत करावी. अमेरिकेच्या जगातील लष्करी तळांपैकी बरेसे तळ पूर्णतः नष्ट करण्यात आले. कुणाचीही जीवित हानी न होऊ देता अमेरिकेचे सर्व सैनिक वॊशिंग्टन मध्ये पोहचवण्यात आले. मध्य आशियातील सतरा तसेच फिलिपाईन, तैवान अशा राष्ट्रातील मोठे तळ पूर्णपणे नाश करण्यात आले. हे कसे होत आहे हे कोणालाच कळत नव्हते. प्रत्येकजण देव, अल्ला, जीजस ख्राईस्ट अशा वेगवेगळ्या देवांना पूजत होता. आठ दिवसातच अमेरिकेचे स्वतःचे तेल साठे सोडून बाकी सर्व तेल साठे आंतरराष्ट्रीय समुदायाकडे सोपविण्यात आले. तीन आठवड्यातच पूर्वीपेक्षा तेलाच्या किमती चाळीस टक्क्यांनी कमी झाल्या.

भाग - 2
स्कॉटलंड मध्ये एडिंबरोच्या बाहेरील चार बाय चार किलोमीटरचा परिसर आंतरराष्ट्रीय नाणे निधी करिता वापरला गेला. या परिसरात एक पन्नास माजली इमारत ही आंतरराष्ट्रीय व्यवहाराकरिता राखीव ठेवली गेली. ही आंतरराष्ट्रीय नाणे निधीची मुख्य इमारत होती. त्याशिवाय आजूबाजूला असलेल्या अनेक चाळीस माजली इमारती दोन हजारपेक्षा जास्त बँकांची ट्रेडिंग ऑफिसेस होती. नवीन नियमांप्रमाणे फॉरेक्स ट्रेडिंग फक्त राष्ट्रीय चलन वॊकु मध्येच करता येत होती. बाकी राष्ट्रांकडे असलेला चलन साठा ही बदलण्यास मुभा होती. जगभरातील आयात निर्यात व्यवसाय आता त्या देशाच्या चलनात होऊ लागला होता. उदारणार्थ ; भारत जर सौदी अरेबियाला दहा टन बासमती तांदूळ पाठवत असेल तर भारत त्याचे बील नऊ लाख रुपये असे करेल. सौदी अरेबियातील गिऱ्हाईक स्वतःच्या चलनाचा विनिमय दरा प्रमाणे पैसे द्यायचा. तर भारतीय दराप्रमाणे बिलाची किंमत नऊ हजार वॊकु असे. सौदी गिऱ्हाईक नऊ हजार वॊकु बँकेला देऊन, वॊकु त्यांच्या चलनात भरेल आणि बाहेरच्या गिऱ्हाईकाला अशा व्यवहारात अडीच ते तीन टक्के फायदा होत.
लवकरच वेग वेगळी व्यवस्थापन केंद्रे स्थापन करण्याची घोषणा झाली. हे केंद्रे ऑस्ट्रेलिया, मलेशिया, जपान, चीन, रशिया, भारत यूएई, सौदी अरेबिया, साऊथ आफ्रिका, जर्मनी, फ्रांस, ब्राझील, ब्रिटन आणि अमेरिका अशा चौदा ठिकाणी होणार होती. या चौदा केंद्रातून त्यांच्या आजूबाजूचा प्रदेश किंवा राष्ट्रे नियंत्रणात राहणार होती. प्रत्येक राष्ट्राचा उत्कर्ष करण्याचा कार्यक्रम त्या त्या क्षेत्रातील केंद्राने करायचा होता. या शिवाय ब्रिटन मधील वॊकु केंद्र आणि भारतातील मुख्य केंद्र अशी पूर्ण सोळा केंद्र कार्यरत राहणार होती. या प्रत्येक केंद्र सुमारे सोळा स्केवर किलोमीटर एवढे राहणार होते. सर्व केंद्रात चाळीस मजली इमारती आणि पाच लाखापर्यंत नागरिक वस्ती आणि त्यांची कार्यालये राहणार होती. त्याचप्रमाणे शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधाही असणार होत्या. दोन राष्ट्रातील भांडणे सोडवण्याकरिता प्रमुख केंद्र कार्यरत राहणार होते. तर स्थानिक केंद्रांचे काम त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असणार होते आणि ही केंद्रे स्थानिक राजकारणात अजिबात ढवळाढवळ करणार नव्हती. प्रत्येक केंद्र अर्धगोल आकाराचे असून ते ऊर्जेच्या बाबतीती स्वयंपूर्ण होते. तसेच तोपर्यंत पृथ्वीवर अस्तित्वात असणाऱ्या संगणक तंत्राच्या शंभर पटीने जास्त वेगवान संगणक आणि संगणक प्रणाली वापरण्यात येत होत्या.
केंद्राचे पहिले काम म्हणजे आंतरराष्ट्रीय वादविवाद सोडवणे असे होते. चीन मधील अतिशय जुने असलेले वाद विवाद सोडवण्याच्या निर्णयात तैवान आणि मकाऊ बेटे चीनचा राष्ट्रीय भाग म्हणून घोषित करण्यात आले. त्याच प्रमाणे ब्रेसनेव च्या काळात असणारे सोव्हिएत संघ राज्याचे सर्व विभाग चीनला तिबेट वरचे स्वामित्व सोडायला लागले आणि आकसायी चीनचा भाग भारताला परत करावा लागला.
पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भागही भारताला दिला गेला. पाकिस्तान, अफगाणिस्थान, अमेरिका आणि इस्रायल ही राष्ट्रे प्रामुख्याने दहशतवादी ठरवण्यात येऊन त्यांच्या सर्व सिमांचा कडेकोट बंदोबस्थ करण्यात आला.
बाकी कुठल्याही राष्ट्रांना कुठल्याही बाबतीत त्रास होऊ नये अशी पुलमची इच्छा होती. त्याच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे निवडलेल्या पंधरा राष्ट्रातील नागरिकांचे परीक्षण करून त्याच्यात जे नागरिक राष्ट्रवादी आहेत, मानवतावादी आहेत आणि त्यांची कार्यक्षमता आणि बुध्यांक एका ठराविक गरजेपेक्षा जास्त आहे त्या सर्वांना म्हणजे सुमारे सर्व जगातील सहा कोटी लोकांना आयुर्मानात दहा वर्ष वाढवण्यात आली. त्यानंतर सर्वेशच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगभर नवीन अपत्यांचे जन्मप्रमाणात हजारात एकावर आणले. त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला अतिशय कमी बुध्यांक असलेले आणि ज्यांचे आयुष्य वाढवून अथवा स्थिर राहून सुद्धा मानवजातीला फारसे उपकार होणार नाहीत असे वीस ते पंचवीस टक्के लोकांचे आयुष्य काही विषाणूच्या मदतीने संपुष्टात आणले गेले. यानंतर सर्व जगात मिळून फक्त साडेपाचशे कोटी जनसंख्या राहिली होती आणि त्यात फक्त पन्नास लाखांची भर पडून दोन ते पाच कोटी जनसंख्या कमी होण्याचे व्यवस्थापन केले गेले.
नवीन होणारे प्रजनन उत्तम आरोग्य आणि बुध्यांक असेल तर कमी होणारी जनसंख्या कमी आरोग्याची आणि कमी बुध्यांक असलेली अशी ठरवण्यात आली. अर्थात हे सर्व होत असताना मानव जातीतील कुणालाही जगाची लोकसंख्या कमी का होत आहेत, काही लोक नेहमीपेक्षा जास्त का जगणार आहेत आणि काही कमी का जगत आहेत हे समजत नव्हते. हे सर्व नियमन करताना पूनम हा सर्वेशशी आणि सर्वेश त्याच्या उच्च लोकांच्या संपर्कात होते.

भाग - 3
शी जिनपिंग, पुतीन, नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर शंभर जगाला बनवू शकणाऱ्या शंभर लोकांची एक बैठक बोलवली गेली. बोलावलेलं प्रत्येक जण स्वतःच्या घरात बसलेला होता. या सर्वाना उद्देशून पुलम याने असे संगितले की काही दुष्ट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी काही पावले उचलत आहोत. आम्हला तुम्ही अल्ला, देव, जीजस ख्राईस्ट काहीही म्हणा शेवटी आम्ही सगळे एकच आहोत आणि एका चागंल्या ग्रहाचे संपूर्ण वाटोळे करण्यात आम्हाला बरे वाटणार नाही. हवे असेल तर आम्ही काही क्षणात सर्व मानवजात नष्ट करू शकतो. परंतु तसे न करता आम्हाला सर्व सृष्टीच सुजलाम सुफलाम करायची आहे आणि त्याकरिता तुम्ही तुमच्या ताब्यातील प्रदेश आणि अधिकार यांचे जबाबदारीने पालन करा. तुमच्या मदतीला आम्ही ठीक ठिकाणी कार्यालय उघडून तेथे काही सहायक ठेवत आहोत. कोणत्याही अडचणीच्या वेळेला अथवा सल्ला मसलतीसाठी तुम्ही त्या कार्यालयाला मदत मागू शकता. या चौदा कार्यालयातून आमचे लाखाहून अधिक प्रतिनिधी जबाबदार असतील. आम्ही बऱ्याच मितीत व्यवस्थापन करू शकतॊ. तुम्हाला माहिती असलेल्या त्रिमिती प्रमाणे आम्हाला सत्तावीस मिती माहित आहेत. त्याचा एक परिणाम म्हणून आम्ही तुमच्या पैकी काही लोकांचे आयुष्य वाढवले आहे तर जवळ जवळ दोनशे कोटी लोकांचे आयुष्य कमी केले आहे. ही आपली बैठक संपल्यावर तुम्हला त्याचे अनुभव लगेचच बघावयास मिळतील. आपल्या या बैठकीसाठी कुठलेही कालाचे बंधन नाही. बैठक संपताच तुमच्या कालमापाप्रमाणे फक्त एक मिनिट संपलेले असेल.
पुलम पण एक स्वतंत्र बैठक घेत होता. बैठकीला सर्वेश, विकर्मा असे बरेच जण हजर होते. त्यात मानवांच्या मुख्य अडचणींविषयी मुद्दे ठरवण्यात आले.
1. जन्म मृत्यू
2. ऊर्जा निर्मिती आणि ऊर्जा संचय
3. अन्न उत्पादन आणि अन्नाची गुणवत्ता
या शिवाय प्रत्येक भागात किंवा देशात असलेले स्थानिक समस्या. त्यानंतर तासाभरातच अमेरिकेतील सर्व टी व्ही वरचे सर्व चॅनेल बंद होऊन तेथे एक आवाज येऊ लागला. नागरिक हो, तुमच्या राष्ट्राने आणि पुढाऱ्याने अक्षम्य अपराध केले आहेत त्यात शस्त्र अस्त्रांचा सामान्य जनतेवर परीक्षण करणे, काहीही कारण नसताना युद्ध लादणे, आणि स्वतःची अर्थव्यवस्था बळकट करण्याकरिता दुसऱ्यांची संस्कृती नष्ट करणे असे अक्षम्य अपराध आहेत. तुम्ही निवडलेल्या अध्यक्षाने तुमचीच लष्करी ताकद आणि लष्करी उत्पादने वापरून ही दुष्कृत्ये केली आहेत. ही करताना तुमच्या शस्त्र अस्त्रासाठी अधिक बाजारपेठ मिळावी असे स्वच्छ उद्दिष्ट आहे या शिवाय तुम्ही जगभर स्थापन केलेले बावीस लष्करी तळ आम्ही पूर्णतः नष्ट केले आहेत. तुमच्या राष्ट्रातले सर्व अण्वस्त्र आम्ही नष्ट केली आहेत आणि तुमच्या अणुभट्ट्या चालवण्यासाठी सुद्धा तुम्हला वार्षिक फी भरावी लागणार आहे आणि पुढील पाच वर्षातच या सर्व अणुभट्टी बंद करून तुम्हाला नैसर्गिक शक्तीवर जावे लागणार आहे. तुमच्या सेनेनी आणि अध्यक्षांनी केलेली इतर राष्ट्रांवरची मालकी आम्ही या क्षणापासून संपुष्टात आणत आहोत. आज मितीला आम्ही तुमच्या देशाच्या सर्व सरहद्दी पूर्णतः बंद केल्या आहेत. कोणत्याही प्रकारची शक्ती किंवा पदार्थ ही सरहद्द आम्ही परवानगी दिल्याशिवाय ओलांडू शकणार नाही.. त्यामुळे अर्थातच तुम्ही आयात निर्यात बंद पडेल.
अशा तर्हेचे भाषण इस्रायल नागरिकांना सुद्धा हिब्रू भाषेत ऐकवले गेले. पाकिस्तान आणि अफगाणिस्थान मध्ये त्यांच्या दहशदवादाचे हे परिणाम आहेत असे स्पष्टरित्या सांगितले गेले. भाषण संपताच अमेरिकेत निदर्शने होऊ लागली. पोलिसच नव्हे तर नॅशनल गार्ड्सना पण या दंगली आटोक्यात ठेवता येईनात. तीच स्थिती इस्रायल मध्ये ही झाली. पाकिस्तानात त्यांच्या अतिरेक्यांनी त्यांच्या संरक्षण व्यवस्थेवर आघात सुरु केले. थोडक्यात अमेरिका, इस्रायल, अफगाणिस्थान आणि पाकिस्तान या देशात जनतेचे आंदोलन फार मोठया प्रमाणावर सुरु झाले. इराण आणि पश्चिम आशियातील नुकसानीचा अंदाज घेऊन अमेरिकेने या सर्व देशाना मिळून त्यांच्याकडील सुवर्ण साठ्यातील तीन हजार टन सुवर्ण साठे पुर्ननिर्माण करीता द्यावा असा निर्णय झाला तसेच सर्व सैन्य आणि सर्व सैन्याशी निगडित उत्पादकांनी आणि संस्थांनी हे पुनर्निर्माणाचे कार्य स्वतः जातीने पश्चिम आशियात पूर्ण करावे असेही निवेदन करण्यात आले याशिवाय अमेरिकेला दंड म्हणून अमेरिकेचे अलास्का हे राज्य रशियाला सध्याच्या बाजार भावात विकावे असे ठरले.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users