पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढत्या जागतिक इंधन संकट, परकीय चलनसाठ्यावरील ताण आणि महागाईच्या पार्श्वभूमीवर देशवासीयांना महत्त्वाची आवाहने केली आहेत. या आवाहनांचा उद्देश भारताची आर्थिक स्थिरता टिकवणे आणि इंधनावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे.
मोदींनी भारतियांना केलेली प्रमुख आवाहने -
१) इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.
२) सोन्याची खरेदी टाळा: देशाच्या परकीय चलनसाठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.
३) स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे.
४) वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: इंधन बचतीसाठी कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.
५) अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: खाण्याचे तेल (Cooking Oil) वापरण्यात काटकसर करावी.
६) नैसर्गिक शेती: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.
७) परदेश प्रवास: वर्षभरासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळा.
मध्यपूर्वेतील (Middle East) युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ आणि रुपयाच्या मूल्यात होणारी घसरण यामुळे मोदींनी हे 'काटकसरीचे' आवाहन केले आहे _/\_

^^^^^^^^^
हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे आहे?
पाळले जाईल का?
यात काय समस्या येतील?
तुम्ही यात सहकार्य कराल का?
एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का?
हे सरकारचे अपयश आहे का?
भविष्यात परिस्थिती अजून अवघड होऊ शकते का?
आज जे आवाहन केले आहे ते उद्या नियमाने किंवा सक्तीने पाळावे लागेल अशी शक्यता आहे का?
जसे कोरोना काळात झाले तसे सक्तीचे वर्क फ्रॉम होम ऑनलाइन स्कूलिंग अशी वेळ येईल का?
..
इत्यादी चर्चेसाठी हा धागा आहे.
##########
प्रतिसादात लोकांनी आग्रह केल्यामुळे धागालेखक म्हणून माझी भूमिका स्पष्ट करतो.
हे सरकारचे अपयश आहे किंवा नाही यात न पडता आधी देशावर संकट आले आहे तर आपल्याला काय योगदान देता येईल याचा विचार डोक्यात पहिला आला.
१) बातमी कानावर येताच मी आज सुट्टी टाकली. पण गेलोच असतो ऑफिसला तरी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरले असते. माझ्याकडे गाडी नाही. मला चालवताच येत नाही.
२) सोन्याची खरेदी उभ्या आयुष्यात एकदाही केली नाही.
३) परदेश असो किंवा देश विदेश कुठल्याच प्रवासाची मुळातच आवड नाही.
४) मी शेतकरी नसल्याने शेतीचा मुद्दा माझ्यासाठी बाद.
५) WFH करायचे आदेश निघाले तर सर्वात जास्त आनंद मला होईल. बेडरूम मध्ये लोळत काम करायचे दिवस मिस करतोय.
मुलांच्या शाळा मात्र चालू राहाव्यात असे वाटते. मुलांचे कसले नुकसान नको. ते देशाचे भविष्य आहेत. तसेही आमची मुले तरी फक्त रॉड क्रॉस करून शाळेत जातात. इंधनाचा वापर शून्य असतो.
६) कुठल्याही भौतिक सुखाच्या वस्तूंची मला फार आवड नाही. त्यामुळे इम्पोर्टेड वस्तू फार विकत घेऊ नका हे पाळणे मला अवघड नाही.
७) खाद्यतेलाचा वापर कमी करणे मात्र तेवढे अवघड आहे. कारण माझ्या आवडीचे तेलकट चमचमीत पदार्थ मी रोज खातो.
धन्यवाद,
ऋन्मेष
मध्यपूर्वेतलं कोणतं युद्ध?
मध्यपूर्वेतलं कोणतं युद्ध? कधी सुरू झालं?
सोन्याचे दर कमी करा.
सोन्याचे दर कमी करा.
इंधनाचा वापर कमी करा: अजिबात
इंधनाचा वापर कमी करा: अजिबात इंधन वापरत नाही. बसने जातो येतो. चालत पण जातो. म्हणून अजून तरूण आहे.
२) सोन्याची खरेदी टाळा: किती तरी वर्ष सोनं खरेदी केलेलं नाही.
३) स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे. - पहिल्यापासून इंडीयन वस्तूच घेत आलो. स्वस्त पडतात.
४) वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: कुठेही कामाला जात नाही.
५) अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: दिवसातून एकदा जेवतो. तेलकट, तूपकट खात नाही.
६) नैसर्गिक शेती: रासायनिक खतं वापरत नाही. शेती करत नाही.
थोडक्यात मला फॉलो करा असंच आवाहन आहे.
इंग्रजी पोस्टरमध्ये ७ अपील्स
इंग्रजी पोस्टरमध्ये ७ अपील्स म्हटलंय. मराठीत सहाच दिसताहेत.
पहिल्या अपील मधे दोन अपील
पब्लीक ट्रान्स्पोर्टचं अपील क्र एक मधे दिसतंय.
मोदीजींनी हे आवाहन कुठे कधी
मोदीजींनी हे आवाहन कुठे कधी कसं केलं? रात्री ८ वाजता अॅड्रेस टु द नेशन राष्ट्र के नाम संबोधन असं इतक्यात झाल्याचं कळलं नाही.
भरत,
भरत,
परदेश प्रवास आणि cooking oil हे मुद्दे मराठीत एकत्र केले गेले आहेत.. त्यामुळे मराठीत ६ आणि इंग्रजीत ७ झाले आहेत.
तरी थांबा
मी थोड्या वेळात वेगळे करतो
म्हणजे वाचकांची गल्लत होणार नाही.
Done
Done
बदल केला, भरत!
बाकी मोदीजींनी हे आवाहन कुठे कधी कसं केलं? हा प्रश्न तुमचा खट्याळ वाटला. मोदींनी काही आवाहन केले आणि तुम्हाला ते माहित नाही यावर विश्वास नाही. असो, मी धागा राजकारणात नाही तर चालू घडामोडीत काढला आहे.
त्यामुळे हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे, पाळले जाईल, यात काय समस्या येतील, तुम्ही यात सहकार्य कराल का, एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का इत्यादी चर्चेसाठी हा धागा आहे.
धन्यवाद ऋन्मेऽऽष सर.
धन्यवाद ऋन्मेऽऽष सर.
माझी इंग्लिश खूप कच्ची आहे. तरीपण इंग्रजी घोषणा व तिचा मराठीतला अर्थ वाचताना गोंधळ होतोय.
1. prioritize work from home इंधनाचा वापर कमी करा: पेट्रोल-डिझेलचा वापर गरजेनुसारच करावा. खाजगी गाड्यांऐवजी मेट्रो, सार्वजनिक वाहतूक, कारपूलिंग आणि इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढवावा.
2 avoid buying gold for one year सोन्याची खरेदी टाळा: देशाच्या परकीय चलनसाठ्यावरचा ताण कमी करण्यासाठी पुढील एक वर्ष सोने खरेदी करणे टाळावे.
3 Reduce petrol and diesel consumption. Use Metro / public transport स्वदेशीचा अवलंब (Vocal for Local): परदेशी उत्पादनांऐवजी भारतात बनवलेल्या (Made in India) वस्तूंना प्राधान्य द्यावे.
4 Cut down the use of cooking oil वर्क फ्रॉम होम (WFH) पुन्हा सुरू करा: इंधन बचतीसाठी कंपन्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा.
5 Reduce dependance on chemical fertilizer and move towards natural farming अन्नधान्य व खाद्यान्न काटकसर: खाण्याचे तेल (Cooking Oil) वापरण्यात काटकसर करावी.
6 Use fewer foreign branded products and adopt swadeshi नैसर्गिक शेती: रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक शेतीकडे वळावे.
7 Avoid foreign travel for one year परदेश प्रवास: वर्षभरासाठी अनावश्यक परदेश प्रवास टाळा.
युद्ध कधी सुरू झाले सर?
युद्ध कधी सुरू झाले सर?
मी गाडी घेऊन सोने खरेदीला
मी गाडी घेऊन सोने खरेदीला निघालेच होते. येता येता वडापाव खाण्याचा विचार होता. सोन्याचे दागिने घालून परदेशातील लग्न अटेंड करायचं होतं.... सगळा बेत रहित करून उपाशी घरी बसून राहिले गुमान.
फक्त बातमी इकडे डकवली आहे.
फक्त बातमी इकडे डकवली आहे. त्यावर काय चर्चा अपेक्षित आहे? लेखकाचे स्वतःचे मत काय आहे हे समजले तर विचाराना चालना मिळेल.
भरत,
भरत,
इंग्रजी १ ते ७ आकडे
आणि मराठी १ ते ७ आकडे यांचा सिक्वेन्स वेगळा आहे हे समजून सुद्धा उगाच क्रमाने जोड्या लावून विनोद निर्मिती करायचा प्रयत्न का करत आहात? कश्यासाठी एवढा आटापिटा?
हा मोदींवरचा राग आहे की माझ्यावरचा
<<< फक्त बातमी इकडे डकवली आहे
<<< फक्त बातमी इकडे डकवली आहे. त्यावर काय चर्चा अपेक्षित आहे?
>>>
ओके
हे लेखात घेतो..... घेतले
<<< लेखकाचे स्वतःचे मत काय आहे हे समजले तर विचाराना चालना मिळेल. >>>
हे प्रतिसादात देतो.
^^^^^^^^
^^^^^^^^
हे आवाहन किती गांभीर्याने पाळायचे आहे? >> हे समजले नाही. काय म्हणायचं आहे?
पाळले जाईल का? ^>> पास.
यात काय समस्या येतील? >> पास
तुम्ही यात सहकार्य कराल का?>> हो.
एकूणच याला प्रतिसाद मिळून देशासमोरची समस्या सुटेल का?>> समस्या काय आहे?
हे सरकारचे अपयश आहे का?>> कसं काय? समजलं नाही.
भविष्यात परिस्थिती अजून अवघड होऊ शकते का?>> पास.
तुमच्या विनंतीला मान देऊन
तुमच्या विनंतीला मान देऊन माझी भूमिका मूळ लेखात दिली.
तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुम्ही तुमच्या मनाने आणखी मुद्दे सुद्धा जोडू शकता. भारतीय जनतेशी संबंधित एवढ्या मोठ्या बातमीवर मी म्हणतो तशीच आणि तेवढ्याच मुद्द्यावर चर्चा व्हावी असा माझा हट्ट नाही.
विनंती नाही शंका होती. सक्ती
विनंती नाही शंका होती. सक्ती नव्हती. मान देऊन लेखात समावेश केल्याने उपकृत केले असे वाटते का?
तुमचा लेख. तुमचे नियम. कुणी कसे प्रतिसाद द्यायचे हे हेडर मधेच टाका.
भरत किंवा अन्य कुणी या विषयावर धागा काढला तर तिकडे लिहीन. तुमच्या धाग्यावर माझी ब्याद नको.
वेरी गुड, धन्यवाद
ओके. वेरी गुड, धन्यवाद. मलाही एकांगी राजकीय चष्म्यातून केलेली चर्चा वेगळ्या धाग्यावर झालेलीच आवडेल
अपना अपना देख लो.
अपना अपना देख लो.
मै तो चला भाई घुमनेको.
काडी लावून नामानिराळे राहणे
काडी लावून नामानिराळे राहणे आणि नंतर प्रतिसादात एकांगी आहे असे सांगणे हा अंदाज आल्यानेच लिहावेसे वाटले नाही. या खेळात प्रतिसाद देणाऱ्या मानवाचे माकडाकडून माकड होते.
या खेळाला हार्दिक शुभेच्छा.
आज जे आवाहन केले आहे ते उद्या
आज जे आवाहन केले आहे ते उद्या नियमाने किंवा सक्तीने पाळावे लागेल अशी शक्यता आहे.
जसे कोरोना काळात झाले तसे सक्तीचे वर्क फ्रॉम होम ऑनलाइन स्कूलिंग अशी वेळ येण्याची शक्यता आहे.
सर्वात आधी मोदीजी शुड डू
सर्वात आधी मोदीजी शुड डू wfh.
सर चिडले.
सर चिडले.
सर, कोणतं युद्ध ? कधी सुरू झालं? ते तरी सांगा.
पंतप्रधान श्री नरेंद्र
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींना भारतीयांचे आवाहन!
असा धागा काढा.
खूप छान लेख
खूप छान लेख
सर, एखाद्या गोष्टीबद्दल धागा
सर, एखाद्या गोष्टीबद्दल धागा काढला तर तो संपूर्ण माहिती देणारा असावा , नाही का? हा धागा आजच्या घडामोडींचा दस्तैवज आहे. उद्याचे इतिहासकार त्यावर विसंबून इतिहास लिहिणार आहेत.
उद्या तुमचीच मुले इतिहासाचा अभ्यास करताना आपल्या बाबांचा धागा म्हणून अभिमानाने वाचतील.
तुम्हांला ही बातमी कळताच मायबोलीकरांना ती सांगावी म्हणून तुम्ही ऑफिसला गेला नाहीत का सर?
तुम्ही ऑफिसात जाता तेव्हा अगदी मनमोकळी उत्तरं देता. संबंध नसलेली आणि कुणी न विचारलेली माहितीही तुम्ही सांगता. ऑफिसला गेला नाहीत तर विषयाशी संबंधित माहिती सुद्धा धड सांगत नाही आहात. उद्या तुम्ही ऑफिसला जाल का सर? मग ऑफिसातून उत्तरे द्या.
सर, प्लीज सांगा ना. मोदींनी हे आवाहन कधी, कुठे , कसे केले?
आणि कोणत्या युद्धामुळे ही परिस्थिती उद्भवली? हे युद्ध कधी सुरू झाले?
इंग्रजीतल्या आणि मराठीतल्या मुद्द्यांचा क्रम वेगळा आहे म्हणताय तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतल्यात का सर? मोदीजींच्या नावावर कोणी काही भलते सलते खपवले तर कसे कळणार?
<हे सरकारचे अपयश आहे का?> सर, हा राजकीय मुद्दा नाही का? आदर्श नागरिकाचे काम सरकारने दिलेले आदेश डोळे मिटून पाळणे. त्यासाठी धागा चालू घडामोडीत काढायचा. जे देशद्रोही असतात , ते असे प्रश्न विचारतात आणि राजकारण विभागात धागा काढतात. बरोबर आहे का सर?
नॉन बायोलॉजिकल महामानव
नॉन बायोलॉजिकल महामानव मोदीजींनी तुमच्या सारख्या क्षुल्लक प्रजेला एक व्रत दिलयं आणि तुम्ही त्यावर योग्य अयोग्य चर्चा करताय? त्यांच्या ताकदीवर शंका घेताय?
' काँग्रेसवाले तुमचे
' काँग्रेसवाले तुमचे मंगळसूत्र जप्त करून मुस्लिमांना देतील' ते 'सोने खरेदी करू नका' चा प्रवास रंजक आहे.
मेक्स सेन्स!
मेक्स सेन्स!
कुकिंग ऑईल का कमी करा ते एक समजलं नाही. ते बहुत करुन 'ऑईल आणि गॅस कमी करा' असं सरकारीबाबूंनी ऐकलं आणि गॅस म्हणजे गॅसोलिन म्हणजे पेट्रोल डिझेल मग प्रवास कमी करा, घरुन काम करा हे आलं. मग ऑईलचं काय करावं हा प्रश्न पडल्याने स्वयंपाकातील तेल कमी करा हे आलेलं आहे की काय शंका आली.
अर्थात आपण कॅनोला ऑईल स्वयंपाकात किती वापरतो आणि त्याची आयात रोडावल्याने एकुण खाद्यतेलावर ताण येऊन केलेला उपाय असेल तर ती एक शक्यता आहे.
सरकारी गाईडलाईन्स म्हणून त्यात मला काही वावगं वाटलं नाही. ते हौशी लोक फार मनावर घेऊन पाळतील ते ही ठीकच. जोकचा पूर येण्याची मात्र भिती वाटते, पण करू सहन. ते कोणावर लादू नका आणि ज्याला करायचं त्याला काटेकोर करुदे, बाकी कुणाला जमेल तसं करायचं ते करु दे, कुणाला फार जज करू नका की झालं .पण ते ही होणारच अर्थात. आता कॅनडाहुन कोणी अमेरिकेला लीझर टॅव्हलसाठी गेला तर माझ्याही नजरेत तो काही काळ तरी उतरतोच की.
मी गेलो तरी माझ्या मनात गिल्ट घेऊनच जातो.
पण जातो कधीमधी. आमच्याइथे सरकारने काही सांगितलेले नाही जनतेने केलेले आहे. पण तरी!
जरा चघळायला एक इषय झालं!
एक गंमतः वरच्या पोस्टर मध्ये प्रत्येक बुलेट मध्ये काही गोष्टी ग्रेडआऊट आणि काही हायलाईट आहेत. त्यात कुकिंग गॅस मध्ये काय ग्रे आऊट करायचं ते न समजल्याने 'दी' हा शब्द ग्रेआऊट केला आहे.
बाकी मोदींना गांधी चांगले समजले असं वाटतं. गांधीजींनी चरखा, सूत कताई, परदेशी मालाची होळी अशा सामान्यांना सहभाग वाटेल अशा गोष्टी करायला दिल्या. चरखा चालवून स्वराज्य अर्थात आलं नाही, पण मी काहीतरी करतोय, हा माझा लढा आहे, त्यातून काय त्रास होईल तो ही माझा चॉईसचा असेल हे आपोआप रुजलं. तसं आता जर किंमतींचा भडका उडाला, किंवा तो उडण्याची ही नांदीच आहे म्हणू, तर हा माझ्या देशासाठी माझा लढा असेल असं वाटेल आणि लोक सरकारला हवं त्या परिप्रेक्षातून प्रतिसाद देतील.
या सर्व आवाहनांच्या मागचा
या सर्व आवाहनांच्या मागचा कार्यकारण भाव समजून घ्या.
इराणच्या युद्धामुळे जगभर कच्च्या तेलाचा अभाव निर्माण झाला आहे यामुळे या तेलाचे भाव बेसुमार वाढलेले आहेत. भारताला तेल खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डॉलर हे परकीय चलन वापरावे लागते. या भारताच्या परकीय चलनाचा साठा आता कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याची काही कारणे
१) भारताची आय टी क्षेत्रातील निर्यात सध्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आय टी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे आलेली मंदी.
२) आखाती प्रदेशातुन येणारे परकीय चलन कमी झाले आहे.
३) अमेरिकेने टेरिफ लावल्यामुळे गेल्या वर्षभरात अमेरिकेला होणारी निर्यात कमी झाली आहे.
४) अमेरिका सोडून इतर देशांना भारताने निर्यात वाढवली असली तरी ते देश सुद्धा या युद्धाने पोळले गेले असल्याने त्यांनी आपली आयात कमी केली आहे यामुळे एकंदर भारताच्या परकीय चलनाचा स्रोत आटतो आहे.
५) दुष्काळात तेरावा महिना म्हणून या वर्षी एल निनो सक्रिय झाला आहे यामुळे शेतीला धोका निर्माण झाला आहे
६) शेतीसाठी प्रामुख्याने आपण युरिया हे खत वापरतो त्याचे उत्पादन करण्यासाठी नैसर्गिक वायू हे कच्चा माल म्हणून वापरला जातो. हा नैसर्गिक वायू सुद्धा आखाती देशा तून आयात केला जातो तोच आप्ल्याकडे येणे बंद झाले आहे.
७) भारत चीनकडून युरिया आयात करतो. India imports significant quantities of urea from China, with imports between April 2025 and February 2026 reaching a three-year high of 21.24 lakh tonnes. This marks a major increase from the 0.99 lakh tonnes imported in the previous fiscal year (2024-25), with China serving as a critical, albeit volatile, supplier of nitrogen-based fertilizer to meet India's high domestic demand
चीनने स्वतःच्या शेतकऱ्यांसाठी युरिया ठेवल्यामुळे युरिया ची निर्यात बंद झाली आहे.
शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतासाठी परकीय चलन लागणारच आहे जे अत्यावश्यक आहे
८) खाद्य तेलाच्या आयातीसाठी मोठ्याप्रमाणावर परकीय चलन लागतं
India is the world's largest importer of edible oils, relying on imports for over 55% of its annual demand, which hit 16 million tonnes annually at a cost of roughly \(\$18.3\) billion. Imports consist largely of palm oil, soy oil, and sunflower oil, mainly sourced from Indonesia, Malaysia, Argentina, Brazil, Russia, and Ukraine,
९)भारतीय लोकांचा सोन्याचा हव्यास आपल्याला माहिती आहेच
As of May 13, 2026, India has increased the total import duty on gold to 15% (10% Basic Customs Duty + 5% Agriculture Infrastructure and Development Cess) to curb surging imports, protect foreign exchange reserves, and support the weakening rupee. This follows a record high of $71.98 billion in gold imports during FY26 (2025-26), driven by high prices rather than volume
९) इराणचे युद्ध लवकर संपेल अशी अशा ठेवून सरकारने पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढवले नव्हते पण युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.
तेंव्हा येत्या काळात आपली परकीय चलनाची परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी काही बाबतीत काटकसर करण्याचा सल्ला दिला तर त्यात काही वावगे आहे असे वाटत नाही.
ज्यांना टीका करायची आहे ते मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर चार्टर्ड विमानाने का जात आहेत अशा तर्हेचे प्रश्न सार्वजनिक जालावर विचारते झाले आहेत.
As of March 2026, domestic scheduled airlines in India operated approximately 98,992 flights, averaging over 3,100–3,200 departures per day. This represents a significant volume of air traffic, with major hubs like Delhi, Mumbai, and Bengaluru managing the bulk of the operations.
३१०० उड्डाणे दिवसाची होत असतील तर त्यातील एका उड्डाणाने किती फरक पडेल. पंतप्रधानांचा दौरा हा किमान तीन महिने अगोदर ठरलेला असतो,
नॉर्वे हा देश कतार आणि रशियानंतर नैसर्गिक वायूचा सर्वात मोठे भांडार असेलला आहे. शिवाय तेथुन येणारे तेल/ नैसर्गिक वायू हे होर्मूझच्या आखाताशी संबंधित नाही तेथे जाऊन जर आपल्याला हा नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल मिळवता आले तर त्याचा आपल्या तेल संकटात नक्कीच दिलासा मिळू शकेल.
Norway is the world's third-largest exporter of natural gas (behind Russia and Qatar) and a critical supplier to Europe, providing over 30% of EU gas imports as of late 2025.
Norway is Europe’s largest oil and gas producer (excluding Russia). The country holds roughly 6.9 billion barrels of proven reserves, largely located offshore in the North Sea
बाकी ज्यांना शिमगा करायचा आहे ते करणारच.
त्यांना एवढंच विचारायचं हे सोडून तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे का?
चालायचंच
Pages