आपण आपल्या बायकोला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. तिच्यावर आपण प्रेम करतो. तिला फिरायला नेणे, हॉटेलिंग, सिनेमा, नाटक हे तर असतंच. पण तिच्या मनी ध्यानी नसताना अचानक तिला आवडते त्या रंगाची साडी घेऊन देणे, तिच्यासोबत शॉपिंगला जाणे ही कामं आपण मनापासून करत असतो.
कारण आपली बायको ही लाडाची असते. ती जगात एकमेव असते. ती नाही तर आपण नाही. आईच्या कुशीतून लहानाचं मोठं होऊन बाहेर पडल्यावर बायकोनंच आपल्याला मोठ्याचं लहान केलेलं असतं. आईने आपल्याला पायावर पालथं पाडून ढुंगणावर चापट्या मारून न्हाऊ घातलेलं असतं, तर बायकोनं दिवाळीला उटणं लावून खरारा करून अंघोळ घातलेली असते. आपण त्याची परतफेड करत नाही तरी ती राग मनात धरत नाही. उलट आपल्याला चांगलं चुंगल फराळाचं करून घालते. त्याचं कौतुक केलं कि तिला अस्मान ठेंगणं होतं. काही जास्त अपेक्षा नसतात बिचारीच्या.
तरी पण त्या प्रेमापोटीच आपल्याला तिच्याशी खोटं बोलावं लागतं.
अशी वेळ तुमच्यावर कधी आली का? तो काय प्रसंग होता? आणि तुम्ही काय खोटं बोललात?
त्याची रूखरूख लागली असेल आणि बायकोला सांगता येत नाही असे झाले असेल तर इथे मनमोकळेपणाने व्यक्त व्हा आणि हलके व्हा.
इथे सांगितलेले प्रसंग वाचून ट्राय करू नये. हे फक्त बायकोवर प्रेम करणार्यांसाठीच आहे. बायको तुम्हाला किती ओळखते यावरून थापा किती मारायच्या हे ठरते. कुणाला जर अशा प्रसंगी काय थाप मारायची हे सुचत नसेल तर इथेच विचारा. जाणकार सल्ला देऊ शकतील.
संसाराची सुरुवातीची काही
संसाराची सुरुवातीची काही वर्षे बायकोचा विश्वास संपादन करण्यात खर्ची घाला. पुढे काम सोपे होऊन जाते
खूप छान सांगितलं ऋन्मेष. हा
खूप छान सांगितलं ऋन्मेष. हा उत्तम विचार आहे.
पण हाच काळ धोक्याचा असतो. बायकोसमोर एकदम गुडी गुडी राहिलात तर बायको याच काळात तुम्हाला पुरतं ओळखते. नंतर थापा मारताना ती खोटं पकडू शकते. नवरे भले आपण खोटं बोलून फसवलं म्हणून पाठ थोपटून घेत असतील, पण बायका कधी मनाचा थांगपत्ता लागू देत नाहीत. त्या कधीच खोटं पकडलं तर जाहीर करत नाहीत. त्या अजून खोटं बोलू देतात. गुन्हे करू देतात. मग पोलिसांप्रमाणे एक दिवस पुराव्यासहीत पकडतात. त्या दिवशी नवर्यापुढे काहीच पर्याय राहिलेले नसतात. म्हणून सुरूवातीपासूनच बायकोचा विश्वास संपादन करतानाही काही काही गोष्टी लपवलेल्या बर्या असतात.
एखाद्या बाईने रस्त्यात स्माईल दिलं तर बायकोला ते सांगू नये. न सांगितल्याने काही बिघडत नाही. पण जर ही गोष्ट बायकोपासून लपवली तर पाप होईल अशा भावनेनं घेरलं असेल आणि टोचणी लागली असेल तर प्रसंग जसाच्या तसा सांगू नये. तिला सांगताना थोडा सात्विक संताप करा "आज कालच्या बायांना काहीही घरबंध राहिलेला नाही" एव्हढचं बोला. तिने विचारलं तरच पुढे बोला
ती विचारतेच " का हो? काय झालं"
मग तो प्रसंग सांगा आणि अस्सा संताप झाला हे सांगायला विसरू नका. संताप झाला हे खोटं असू शकतं याची जाणिव असूनही तिला त्यावर विश्वास ठेवावासा वाटतो. कारण अशा बायका असतात आणि त्या डोरे डालू शकतात या भीतीने बायको संशय घेते या तर्काला पुष्टी मिळाल्याचा आनंद जास्त असतो. उगीच नाही संशय घेत हा आनंद असतो. तो तुम्ही देता.
या घटनेत तुम्ही काही लपवलंही नाही आणि प्रत्येक गोष्ट रिपोर्ट करता हा विश्वासही संपादन केला असे एका दगडात दोन पक्षी मारले जातात.
आता तुमच्यासाठी प्रश्न -----> "तुम्हाला जुनी मैत्रीण भेटली तर कसं सांगाल?"
"तुम्हाला जुनी मैत्रीण भेटली
"तुम्हाला जुनी मैत्रीण भेटली तर कसं सांगाल?" >>>> बायकोसमोरच स्वतःशीच त्राग्याने मोठ्याने पुटपुटावे, "काय ते कपडे, काय ते रंगवलेल थोबाड!" मग बायको विचारेलच. तेव्हा थोडा त्रासिक चेहरा करून सांगावे कि जुनी मैत्रीण भेटली होती. त्या भेटीने आपल्याला आनंद झाला आहे असे बायकोला वाटू नये याची काळजी घ्यावी.
मी तर जुन्या नव्या सगळ्या
मी तर जुन्या नव्या सगळ्या मैत्रीणी बायकोला सांगतो, दाखवतो, हाक मारून भेट घडवून देतो. मग बायकोच त्यांना औपचारिकता म्हणून का होईना घरी यायचे आमंत्रण देते. मग मी तिला नेमके बायको घरी नसतानाच यायला सांगतो. मग मी ते सुद्धा बायकोला फोन करून सांगतो की अरे आज तू नाहीस तर ती नेमकी घरी आली आहे. बायको तेव्हा अशी अडकलेली असते की इच्छा असूनही लगेच घरी येऊ शकत नाही आणि तुझ्या मैत्रिणीला हाकलून लाव असेही सांगू शकत नाही. मग मैत्रिणीसोबत एकांतात छान गप्पा मारतो.
त्या भेटीने आपल्याला आनंद
त्या भेटीने आपल्याला आनंद झाला आहे असे बायकोला वाटू नये याची काळजी घ्यावी - - - >>एकदम सही. लाख बातों कि एक बात. हाच सुखी वैवाहिक जीवनाचा महामंत्र आहे.
ऋन्मेष बाळ काळजी वाटते. हा हाय रिस्क हाय गेन गेम आहे. कधीही बाजार कोसळू शकतो. बायको जर खरंच अशीच असेल तर तू फार फार नशीबवान आहेस मुला. नक्की सात जन्म मातापित्यांची सेवा केली असेल म्हणून आज अशी समंजस बायको मिळाली आहे.
पण जुनेजाणते म्हणतात कि समंजस बायको आणि निष्ठावान नवरा या अफवा आहेत. अपवाद आहेतच.
म्हणून मी सुरुवातीची काही
म्हणून मी सुरुवातीची काही वर्षे विश्वास कमवायला खर्ची घातली आहेत. अन्यथा बायकोचे सुद्धा मायबोली अकाउंट आहे. ती येऊन हे वाचेल या भीतीने इथे लिहायचा आनंद सुद्धा गमावला असता. असे आयुष्यभर काळजी घेत जगण्यात मजा नाही जी सुरुवातीला काळजी घेऊन नंतर रिस्क घेण्यात आहे.
बायकोच्या दृष्टीने विचार करता तिलाही तेच हवे असते. असे आयुष्यभर नवऱ्यावर संशय घेऊन जगण्याचा मनस्ताप तिलाही नको असतो. तिलाही आतून हवे असते की विश्वास टाकावा असा नवरा मिळाला की मी माझे आयुष्य निवांत जगायला मोकळे. म्हणून सुरुवातीच्या काळातच ती हे चाचपत असते की नवरा तसाच विश्वास टाकायच्या लायकीचा आहे की नाही. आपण सुद्धा तीच वेळ साधावी आणि विश्वास कमवावा.
असे आयुष्यभर नवऱ्यावर संशय
असे आयुष्यभर नवऱ्यावर संशय घेऊन जगण्याचा मनस्ताप तिलाही नको असतो. तिलाही आतून हवे असते की विश्वास टाकावा असा नवरा मिळाला की मी माझे आयुष्य निवांत जगायला मोकळे. >> हे खरं असेल तर खरंच नशीब काढलंय वाघानं असं म्हणावं लागेल.
बायका संशय घेणं कधीच सोडत नाहीत. तो त्यांचा हक्क आहे. काही दाखवतात काही दाखवत नाहीत, पण संशय असतोच.
मायबोली मेंबरच्या फॅमिलीचं अकाउंट इथंच आहे हे थोडं अस्वस्थ करणारं आहे. कारण नवरे मंडळी काही तरी प्लॅन करताहेत किंवा एकमेकांना हुषार बनवत आहेत या गुप्त गोष्टीची खबर एकीला जरी लागली तरी ती बाकिच्या बायकांना सावध करणार. आणि मग ती गोष्ट षटकर्णी होणार.
>>>>>>बायका संशय घेणं कधीच
>>>>>>बायका संशय घेणं कधीच सोडत नाहीत. तो त्यांचा हक्क आहे. काही दाखवतात काही दाखवत नाहीत, पण संशय असतोच.
लहानपणीची असल्याने अधिकच. पण त्यांनी शेअर केलेल्या स्मृती मी घेउ शकत नाही. मग चरफडून उपयोग काय? 
मला तर याची एक मैत्रिण अज्जिबात आवडत नाही
>>>>>बायकोसमोरच स्वतःशीच त्राग्याने मोठ्याने पुटपुटावे, "काय ते कपडे, काय ते रंगवलेल थोबाड!"
फार हसले.
बायकोशी बेमालूमपणे खोटं कसं
बायकोशी बेमालूमपणे खोटं कसं बोलावं याच्या आयडियाज मिळवण्यासाठी तर हा धागा काढलेला नाहीत ना?
<<<< हे खरं असेल तर खरंच नशीब
<<<< हे खरं असेल तर खरंच नशीब काढलंय वाघानं असं म्हणावं लागेल.
>>>>
मला नाही वाटत. म्हणजे मला हा माझ्या टॅलेंटचा अपमान वाटतो. बायकोचा माझ्यावर असलेला विश्वास मी मेहनतीने आणि बुद्धीचातुर्याने कमावला आहे. अन्यथा माझी बायको काही परग्रहावरून आलेली नाही.
उलट माझे लग्न ऑनलाईन फ्रेंडशिपमधून जुळलेले आहे. लग्नानंतरदेखील माझा सोशल मिडियावरचा वावर कायमच प्रचंड राहिला. जसे याचे आपल्याशी जुळले तसे हा अजून कोणाशी तरी जुळवेल ही भिती/शंका तिला सुरुवातीच्या दिवसात कायम असायची. ती नष्ट करून ती जागा मी विश्वासाने भरली आहे.
मला हा माझ्या टॅलेंटचा अपमान
मला हा माझ्या टॅलेंटचा अपमान वाटतो. >> अरेरे. एव्हढं वय झालं, त्या अनुभवाचा फायदा सर्व नवविवाहितांना व्हावा हाच उद्देश होता. असं असेल तर जाऊ द्या. आपण टाईम प्लीज घेऊन ही रेसिपी बघू.
https://www.youtube.com/shorts/ENGFkJfUydY
ही कशी बोलतेय याचा विचार करतोय. दात आणि ओठाच्या टोकाला जीभ लावतेय का?
देव आनंदने या गाण्यात खोटं
देव आनंदने या गाण्यात खोटं कसं बोलावं हे शिकवलं आहे. आम्ही देव साहेबांकडूनच शिकलो. त्या वेळी क्लासेस बिसेस काही नव्हतं.
देव साहेब म्हणजे खरोखर देव होते.
https://youtu.be/XgW3oNqNKes?t=79
बघा तो खोटं बोलतोय हे तिलाही समजतंय, पण त्याच्या चेहर्यावरचे खट्याळ पण भोळे भाव बघून तिला विश्वास ठेवावासा वाटतोय. हेच शिका मुलांनो. जुने पिक्चर्स बघा. जीवन सुखी होईल.
विक्की
अहो, आजपासून माझ्याकडे जरा जपूनच खोटं बोला; कामवाल्या नविन मावशी रोज येतात ना, त्यांचे पती तुमच्याच ऑफिसमध्ये ' शिपाई ' आहेत !!!!
(No subject)
भाऊ

पण घाबरायचे कारण नाही. ते सुद्धा पुरुषच आहेत. दोघे पुरुष मंडळी आपसात डील करतील.. एकमेकांच्या बायकांना काही सांगायचे नाही
भाऊ यांचे व्यंगचित्र छान आहे.
भाऊ यांचे व्यंगचित्र छान आहे. आवडले.
मी लग्न ठरवल्यापासून बायको
मी लग्न ठरवल्यापासून बायको पासून काहीच लपवलेलं नाही माझा मोबाईल सार्वजनिक जालापासून सर्व गोष्टी उघड आहेत.आमची सर्व बँकेतील खाती सुद्धा दोघांच्या नावावर आहेत.
लग्न ठरल्यापासून माझा पगार किती आहे हे तिला माहिती असल्यामुळे मी उगाच लग्नापूर्वी तिला "खूष" करण्या साठी महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या नाहीत.
आमचे आणि मुलांचे वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस मी कधीही विसरत नाही. तेंव्हा परवडतील अशा उत्तम भेटी मी जरूर देतो. सुदैवाने माझ्या आयुष्यात माझ्या गरजेपेक्षा मला जास्त पैसा नेहमीच मिळत गेला. अर्थात बायकोच्या गरजेपेक्षा तो जास्त नव्हता पण नौदलात किती पगार असेल हे माहिति होते त्यामुळे तिने माझ्याशी लग्न करायचा विचार केला तेंव्हा तिला ते माहिती होतेच
माझ्या शाळेतील मैत्रिणी पासून सर्व मुली तिला माहिती आहेत. अर्थात माझी कोणतीही मैत्रीण "जवळची" नव्हती. त्यामुळे लपवण्यासारखे काहीच नव्हते.
उलट माझी बायको तिच्या मेडिकल कॉलेजची ब्युटी क्वीन होती त्यामुळे तिच्या वर बरेच लोक फिदा होते. त्यातील काहींनी तिला प्रपोज सुद्धा केले होते. हे सर्व लोक आमच्या घरी किंवा कोणत्या गेट टू गेदर ला भेटतात. काही जण माझ्या अनुपस्थितीत सुद्धा घरी आलेले होते यामुळे मला काहीही फरक पडत नाही.
तिला तेंव्हा आवडलेला एक मुलगा सुद्धा माझ्या अनुपस्थितीत घरी येऊन गेला होता. एकदा बोलताना मी तिला स्वच्छपणे सांगितले कि हा एकेकाळी तुला आवडत असे हे मला माहिती आहे आणि तरी मला काहीही फरक पडला नाही. यामुले बायकोच्या नजरेत मी फार उच्च स्थानावर जाऊन बसलो आहे.
एकदा असा विश्वास संपादन केलात कि कधीही खोटे बोलण्याची आवश्यकता वाटत नाही.
तिचे मित्र मैत्रिणी माझ्यापेक्षा जास्त आहेत आणि ती त्यांच्याबरोबर पार्टीला जात असते अगदी मैत्रिणींबरोबर चार दिवस गोव्याला सुद्धा जाते याबद्दल मला काहीही वाटत नाही.
मी दारू पीत नसल्यामुळे कोणत्याही पार्टीमध्ये जाण्याबद्दल तिच्याकडूनही कधी आडकाठी होत नाही.
यामुळे बायकोशी खोटे बोलण्याची गरज मला कधीही वाटली नाही.
कुणी माझ्या बायकोला भेटलात तर या सर्व गोष्टींची खात्री करून घेऊ शकता
सुबोध खरे यांची पोस्ट
सुबोध खरे यांची पोस्ट मनापासून आवडली.
खरे सर छानच की!
खरे सर छानच की!
सुबोध खरे, छान पोस्ट
सुबोध खरे, छान पोस्ट
पण,
<<<< एकदा असा विश्वास संपादन केलात कि कधीही खोटे बोलण्याची आवश्यकता वाटत नाही
>>>>>>>
एखादी खास मैत्रीण किंवा एक्स गर्लफ्रेंड आपल्याला एकांतात भेटली पण आपल्यात खरेच तसले काही नसले तर बायकोने त्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्यावर संशय घेऊ नये असा तिचा विश्वास कमवावा या अनुषंगाने तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.
पण जर एखाद्याचे खरेच अफेअर असेल आणि ते चालू सुद्धा ठेवायचे असेल तर ते बायकोला कसे सांगणार? ती सोडून जाईल ना? खोटे बोलून लपवावे तर लागणार ना?
किंवा एखादी व्यक्ती दारू पिते. बायको काही कारणांनी याबाबत आग्रही आहे की दारू पिणारा नवरा नकोच. नाहीतर मी सोडून जाईन आणि नवऱ्याला देखील दारू सोडायची नाहीये. तर खोटे बोलावे लागणारच ना?
किंवा नवरा दारू पिणाराच नसला तर बायकोला टेन्शन नसते. पण मजबूत पिणारा असेल आणि एखाद्या पार्टीला जाणार असेल तर बायको कुठली पार्टी आणि कोणाबरोबर जात आहात ही चौकशी काळजीपोटी करणारच ना.. तेव्हाही तिने अडवू नये म्हणून खोटे बोलावे लागणारच ना.
विश्वास कमावला तरी ज्या गोष्टी केलेल्या तिला चालणार नाहीत त्या लपवायला खोटे बोलावे लागतेच.
अगदीच काही नाही तर बायकोपासून लपवून काहीतरी करण्यात जे थ्रिल असते ते अनुभवायला तरी बायकोशी खोटे बोलता यायलाच हवे
धागा अजून म्हणावा तसा पेटलाच
धागा अजून म्हणावा तसा पेटलाच नाहीये
गहू
*....बायकोशी खोटे बोलता यायलाच हवे * +१ व तेंही बायकोच्याच प्रेमापोटी !! -
नवऱ्याचं खोटं बोलणं पकडल्याच्या इतक्या मस्त गोष्टी सतत चालतात महिला मंडळात ! नाही तर तुम्ही, नुसते बावळट सत्यवचनी !!
हा हा भाऊ
हा हा भाऊ
आमच्याकडे मी दरवर्षी फक्त एका शाळेच्या पिकनिकला जातो. तेव्हा सगळ्यांच्याच याच गप्पा असतात की बायकोची परवानगी मिळवायला आधी तिला कसे खुश केले..
आमच्याघरी मात्र बायकोच उत्साहात असते की जातोय बाबा माझा नवरा कुठेतरी.. नाहीतर त्या आधी उलटे हेच ऐकून घ्यावे लागायचे की अरे जा बाबा कुठेतरी
*..जा बाबा कुठेतरी* - थोडंफार
*..जा बाबा कुठेतरी* - थोडं फार तरी स्वातंत्र्य हवं असेल, तर स्वतः चं ' उपद्रव मूल्य ' ( nuisance value) नवरे मंडळींनी सतत जपलंच पाहिजे !!!
जर एखाद्याचे खरेच अफेअर असेल
जर एखाद्याचे खरेच अफेअर असेल आणि ते चालू सुद्धा ठेवायचे असेल तर ते बायकोला कसे सांगणार.
माणूस दुटप्पी असेल तर असं करावंच लागेल.
अग्निसाक्षी ठेवून जिला सात जन्म साथ देईन अशा बायकोचा विश्वासघात करायचा असेल तर गोष्टच वेगळी आहे.
उद्या एखाद्याच्या बायकोने लफडं केलं तर माणसं वेडीपिशी होतात किंवा टोकाच्या गोष्टी करून बसतात.
बायको पण म्हणाली मला पण दारू पिऊन झिंगायचं आहे किंवा माझ्या आवडत्या मित्रांना घरी बोलावून पार्टी द्यायची आहे तर झेपेल का?
मर्द माणसाने हे करावं बायकांनी करू नये असला दांभिकपणा काय कामाचा?
स्वतः चं ' उपद्रव मूल्य ' (
स्वतः चं ' उपद्रव मूल्य ' ( nuisance value) नवरे मंडळींनी सतत जपलंच पाहिजे
नवरा बायकोत समंजसपणा असेल तर असं उपद्रव मूल्य असण्याची गरजच पडत नाही.
आमच्याकडे मी दरवर्षी फक्त एका
आमच्याकडे मी दरवर्षी फक्त एका शाळेच्या पिकनिकला जातो. तेव्हा सगळ्यांच्याच याच गप्पा असतात की बायकोची परवानगी मिळवायला आधी तिला कसे खुश केले..
आम्ही दरवर्षी आपापल्या शाळेच्या कॉलेजच्या पिकनिकला जातोच त्यासाठी परवानगी घेण्याची गरजच पडत नाही.
आमच्या मेडिकल कॉलेजचे गेट टूगेदर असते त्यात बायको/ नवर्यासकट असते. तेथे माझी बायको येतेच.
पण बायकोच्या मेडिकल कॉलेजचे गेट टूगेदर असते त्यात बायको/ नवरा अंतर्भूत नसतो तेथे मी जात नाही. उदा दोन वर्षांपूर्वी गेट टूगेदर गोव्याला तीन दिवस होते तिथे ती एकटी गेली होती.
माणसं विश्वास ठेवत नाहीत.
ज्याला लफडं करायचं आहे त्याला/ तिला ओव्हरनाईट बाहेर जायची गरज नाही.
सर्व पोस्ट्स नवरे मंडळींकडूनच
सर्व पोस्ट्स नवरे मंडळींकडूनच दिसत आहेत.. चालु द्या, तुम्हाला काय वाटतय? नवरे खोटं बोलतात ते बायकांना कळत नाही?
आम्ही तुमच्याहून १० पट चतुर असतोय..
<<< मर्द माणसाने हे करावं
<<< मर्द माणसाने हे करावं बायकांनी करू नये असला दांभिकपणा काय कामाचा?
>>>
कोण म्हणाले की बायकांनी हे करू नये?
धागा बायकांशी खोटे कसे बोलावे हा आहे म्हणून तशी चर्चा सुरू आहे.
नवऱ्याशी खोटे कसे बोलावे असता तर अशीच चर्चा बायकांच्या बाजूने झाली असती.
लग्न झाले असो किंवा नसो, माय लाईफ माय चॉईस नेहमीच हवे.
लग्नाचे बंधन कधीच वाटायला नको.
तसेच कुठल्याही एका जोडीदाराने मी तुझ्याशी प्रामाणिक आहे तर तू सुद्धा माझ्याशी प्रामाणिक राहायलाच हवे. आपण सात फेरे घेतले आहेत. जन्मभर साथ द्यायची शपथ घेतली आहे वगैरे अपेक्षा ठेवायला नकोत.
जे तत्व आपण पाळतो ते जोडीदारावर लादले गेले नाही पाहिजे.
<<< आम्ही तुमच्याहून १० पट
<<< आम्ही तुमच्याहून १० पट चतुर असतोय..
>>>
हो, कल्पना आहे.
म्हणूनच तर अशा धाग्याची जास्त गरज आहे
खरे साहेबांची पहिली पोस्ट
खरे साहेबांची पहिली पोस्ट आवडली होती. नंतरच्या पोस्टी धाग्याचा हेतू पाहता अस्थानी वाटतात. तात्विक गप्पा आपल्या जागी, गंमत आपल्या जागी. हास्य जत्रेत पृथ्वीक प्रतापचं कॅरेक्टर वाटतं.
Pages