जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…
सुरेश भटांनी या ओळी लिहिल्या.
पण सध्याचे आपले राज्यकर्ते आणि त्यां च्या पाठिराख्यांकडे वर्तमानाबद्दल बोलण्यासारखं कधी काही नसतं. ते कायम इतिहासात गढलेले असतात. बाबर- अकबर ते औरंगजेब , अफझलखान ते टिपू आणि नेहरू ते इंदिरा यांच्या मढ्यांशी भांडत असतात.
मढ्यांशी भांडतो आम्ही हे शब्द फार आवडले आणि सुरेश भटांच्या गझलेच्या जमिनीतच ही गझल किंवा हजल ऑर्डर देऊन लिहून घेतली आहे.
स्वतःची लाल करताना दुजा भंडावतो आम्ही
कधीपासून पुरलेल्या मढ्यांशी भांडतो आम्ही
फुकाचे नाव ठेवावे कसे अपुल्याच नेत्याला
पुराणातील शत्रूंना नव्याने मारतो आम्ही
करांचे वाढते ओझे कुणा जाऊन सांगावे
जिझीया आठवत औरंगजेबा नाडतो आम्ही
करावा माज कैसा वित्त नाही ना कनक बाती हाती
टिप्याची बाबराची ठासूनि माजावतो आम्ही
जरी काहीच नुरले आव तरीही देशप्रेमाचा
व्हिजा घेऊन पळण्याचेच मांडे रांधतो आम्ही
ऐकत नाही!
ऐकत नाही!
छान आहे गझल.
अवांतर:
'दुज्या' भंडावतो आम्ही - असं हवं आहे का?
बाती म्हणजे काय?
आव 'तरिही' असं हवं, आणि 'ठासुनी'.
गजल चांगली जमली आहे.
गजल चांगली जमली आहे.
राष्ट्रीय एकात्मतेचं भाषण ऐकलं नाही वाटतं.
उत्तम, कल्पक प्रयोग आवडला.
उत्तम, कल्पक प्रयोग आवडला. (असे अधिकाधिक लिहिले जायला हवे आहे)
(ठासुनी)
(तरिही)
दुजा बाबत स्वाती आंबोळे यांच्याशी सहमत
चुका ठेवल्या की त्या दाखवायला
चुका ठेवल्या की त्या दाखवायला तरी लोक प्रतिसाद देतात. मग उपचारापुरतं चांगली आहे असं लिहितात. म्हणून मुद्दाम चुका ठेवल्यात.
हे जे तीन प्रतिसाद आलेत, ते
हे जे तीन प्रतिसाद आलेत, ते देणार्यांपैकी उपचारापुरतं चांगलं म्हणणारं कोण आहे?
नेमक्या कोणत्या प्रतिसादानंतर
नेमक्या कोणत्या प्रतिसादानंतर तसं लिहिलंय?

चुका दाखवायच्या असल्या की चांगलं लिहिलंय असं म्हणून सुरुवात करायची हा खेळ मीही खेळायचो कोणे एके काळी.
नाही, हा तो खेळ नाही.
नाही, हा तो खेळ नाही.
मुळात लेखन विशेष आवडलं नाही तर चुकाही दाखवाचे कष्ट घ्यावेसे वाटत नाहीत.
प्रतिसाद देऊन चूक केली असे
प्रतिसाद देऊन चूक केली असे वाटत आहे.
असो, जी काय माझी प्रतिमा तुमच्या मनात आहे ती कधीतरी अधिक बरी व्हावी ही इच्छा!
वित्त/कनक "बाती" नाही म्हणजे
वित्त/कनक "बाती" नाही म्हणजे काय? पैसा, सोने वगैरे माज करायला काहीही नसणे म्हणून इतिहासात शिरणे हा अर्थ समजला, पण "बाती" समजले नाही.
गजल चांगली आहे. त्यातले शास्त्र मला माहीत नाही पण एक वाचक म्हणून चांगली वाटली.
भरत - आधी प्रथम गजलेची (किंवा लेखाची) दखल घेणे, ओव्हरऑल ते कसे आहे हे सांगणे, आणि मग नंतर जे खटकले ते दाखवणे हा कॉमन पॅटर्न आहे. त्यात नेहमी काही खोचक उद्देश असतो असे नाही. प्रतिक्रियांमधे फक्त चुका दाखवायच्या आहेत असा उद्देश नसतो तेव्हा साधारण अशाच पॅटर्न मधे लिहीले जाते. मी ही तसेच करतो.
बाय द वे, आपापल्या जातीतील जुन्या नेत्यांचे लायनायझेशन, सतत होणारे "अपमान फिशिंग" हा ही जे गजलेत सांगितले आहे त्याचाच प्रकार आहे. फेबुवर एक पेजवर जुन्या हिंदी पिक्चर्स मधे सतत होणारे सनातन धर्माचे अपमान लिहीत असतात कोणीतरी. बरेचसे ओढूनताणून असते.
बाती ऐवजी हाती असावे
बाती ऐवजी हाती असावे
हाती आहे. बदललं.
हाती आहे. बदललं.
आवडली
आवडली
हे हे हे,
हे हे हे,
आवडली.
आता अशीच परवाच्या पंचसूत्री (की सप्त?? की दश??) वर पण येऊन जाऊ दे
लायनाझेशन आणि अपमान फिशिंग
लायनाझेशन आणि अपमान फिशिंग दोन्ही एकत्र वापरल्याने समजलं नाही काय म्हणायचंय ते.
लायनायझेशन म्हणजे खुशामत करणे या अर्थाने घेतलंय का?
घाईघाईत लिहून गेलो.
घाईघाईत लिहून गेलो. इतिहासातील काही व्यक्ती दुर्लक्षित आहेत किंवा लोक समजतात त्यापेक्षा ते जास्त प्रभावी होते, त्यांना अनेक कौशल्ये अवगत होती, आगामी आव्हानांची त्यांना आधीच कल्पना होती अशा पद्धतीच्या अनेक रंगवलेल्या पोस्टी आजकाल फिरत असतात. इतिहासात खलनायक समजल्या गेलेल्या किंवा किमान काही वाईट सवयी असलेल्या व्यक्ती असतील तर त्याही तशा नव्हत्या असेही ठसवण्याचा पॅटर्न वाढला आहे. त्यांच्याबद्दल एकही वैगुण्य किंवा टीकात्मक रोख मान्य न करणे ई. लायनायझेशन म्हणालो ते साधारण हे. व्यक्तीच्या प्रचलित इमेजपेक्षा कितीतरी मोठी, चांगली इमेज तयार करणे. काही अपवाद वगळले, तर "आपल्या जातीचा महापुरूष" हा कॉमन फॅक्टर असतो.
अपमान फिशिंग - सतत आपल्या फेवरिट नेत्याचा कोणीतरी अपमान करत आहे हे शोधत फिरल्यासारखे कशातही अपमान शोधणे. ज्या गोष्टी २०-३० वर्षांपूर्वी सहज केल्या जात होत्या त्या अपमानाच्याच उद्देशाने केल्या जात आहेत असा हट्ट. एखाद्या व्यक्तीचा मान ठेवण्याची आपली जी कल्पना आहे तीच इतरांनी मानावी आणि अनुसरावी, तसे न केल्यास ते अपमान करत आहेत असे समजणे - किंवा जाणीवपूर्वक पसरवणे, पन्नास वर्षांपूर्वीचे उल्लेख आता अचानक अपमानास्पद वाटणे, "आपल्या" महापुरूषाबद्दल जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे असा प्रवाद निर्माण करणे - असले प्रकार.
लायनायझेशन म्हटल्यावर मला
लायनायझेशन म्हटल्यावर मला 'धुरंधर'चीच आठवण झाली. म्हणजे, रणवीरची आयाळ वाढत जाते त्यावरून हो!
उदात्तीकरण हा रूळलेला शब्द
उदात्तीकरण हा रूळलेला शब्द आहे. वापरा हा प्रेमाचा आग्रह आहे.
त्या पुढे जाऊन बोलीभाषेतले किंवा सोपे शब्द शोधून वापरूयात. कधी कधी माझ्या कडून अट्टाहासाने बळेच सोपे शब्द बनवले जातात ते सोडून.
खुशामत करणे हा चुकीचा शब्द आहे आताच्या संदर्भात. बोलीभाषेत उदात्तीकरण ही कल्पना नाही बहुतेक.
अपमान फिशिंग ला शब्द शोधणे
अपमान फिशिंग ला शब्द शोधणे आले. पण मग हा धागा कोणता आहे हे पुन्हा वर जाऊन पाहिले. आता गप्प बसतो. नंतर अपमान फिशिंग वर दहा भागांची मालिका सीझन पहिला लिहावी असे वाटते य.
उदात्तीकरण बरोबर. शब्द लक्षात
उदात्तीकरण बरोबर. शब्द लक्षात ठेवेन. धन्यवाद. बोलीभाषेतले/सोपे शब्द वापरण्याशीही सहमत.
मला अपमान फिशिंग सुद्धा धाग्याशी अवांतर वाटले नाही म्हणून उल्लेख केला. नाहीतर मी ही अवांतर टाळतोच. धाग्यात जे म्हंटले आहे की सध्याच्या (स्वतःच्या किंवा सरकारच्या, नेत्यांच्या) कामगिरी व कर्तृत्वापेक्षा इतिहासातील लोकांबद्दल बोलत राहणे - त्याच्याशी संबंधित वाटले.
जिझीया आठवत औरंगजेबा नाडतो
जिझीया आठवत औरंगजेबा नाडतो आम्ही
,औरंगजेबाला नाडणं कसं?
फार तर औरंगजेबा पुन्हा गाडतो आम्ही म्हणा
जमलीय गझल.
जमलीय गझल.
औरंगजेबा नाडतो हे मलाही कळलं नाही.
मला कळ लेय. आउरंगजेबाचे वाईट
मला कळ लेय. आउरंगजेबाचे वाईट गुण परत परत ठसवत, आठवत, निंदा करत आपण औरंगजेबाला नाडतो.
आमच्यावरचे करांचे ओझे वाढले
आमच्यावरचे करांचे ओझे वाढले तर त्याबद्दल बोलण्यापेक्षा औरंगजेबाने नव्हता का जिझिया लावला असं म्हणून त्याला कचाट्यात आणतो. शिवाय आमचे विरोधक म्हणजे औरंग्याच्या अवलादी.
नाडतो म्हणजे वेठीस धरतो
नाडतो म्हणजे वेठीस धरतो
ज्यानं कृरपणं तहहयात स्वराज्य वेठीस धरलं...त्याला मेल्यावर गाडायचा त्या ऐवजी आम्ही त्याला नाडतो म्हणणं हा कुठला इतिहास आम्ही पुढच्या पिढीला ठेवणार.
AI कदाचित हे जतन करेल आणि उद्या नव लेखकही हीच रि ओढतील. आम्हाला नेहमीच आक्रमक कसे सहहृदयी होते हे दाखवण्याचा प्रयत्न झालाय. आमचा इतिहास चुकांनी भरलाय.
आमचं अजून एक वैगुण्य आम्ही इतिहास विसरतो.
कुणाची बखर खरी?
कुठून कुठे जाताय?
कुठून कुठे जाताय?
पाठ्यपुस्तकात धडे आणि
पाठ्यपुस्तकात धडे आणि कवितांखाली प्रश्न असतात. तसा या गझलेतून कवी काय सांगू पाहतो? तर वर्तमानातल्या समस्यांवर उपाय शोधता येत नाहीत म्हणून तुम्ही इतिहास उगाळता , ते सोडा.
>>> वर्तमानातल्या समस्यांवर
>>> वर्तमानातल्या समस्यांवर उपाय शोधता येत नाहीत म्हणून तुम्ही इतिहास उगाळता , ते सोडा.
रदीफ ढळढळीत 'आम्ही' असताना अर्थ 'तुम्ही इतिहास उगाळता' असा असल्याचं सांगणं मला तरी पटत नाही बॉ!
छान! आवडली.
छान! आवडली.
चुका काढण्याइतकी कळत असती तर काढल्या असत्या चुका!
अच्छा कळला अर्थ भरत. मला
अच्छा कळला अर्थ भरत. मला नाडणे या शब्दाचा फक्त नागवणे हा अर्थ माहित होता, कचाट्यात आणणे हा नाही.