मीनाक्षी

Submitted by अविनाश जोशी on 5 May, 2026 - 03:25

मीनाक्षी
सतरा वर्षाची सुरेख मुलगी, कमनीय बांधा, भरतनाट्यात प्रवीण आणि नुकतीच मिस इंडिया झालेली. अशा मुलीला साहजिकच चित्रपटाच्या आणि मॉडेलिंगच्या ऑफर्स येऊ लागतात. पण त्या मुलीने या क्षेत्राचा कधी विचारच केला नव्हता. तिला तिचे नृत्यचं जास्त प्रिय होते. अशातच तिला मनोज कुमारच्या चित्रपटाची ऑफर आली. कथा चांगली होती आणि भूमिका मनोजकुमार बरोबर होती. तिने दिल्लीला जाऊन आई-वडिलांचा सल्ला घेतला. मुलीचे नाव होते शशिकला. आईची चित्रपट सृष्टीबद्दल फारशी अनुकूलता नव्हती. परंतु वडिलांनी तिला प्रोत्साहन दिले आणि शशिकलाचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. तिचा पहिला चित्रपट फारसा चालला नाही आणि नंतर काही चित्रपटही यथा तथाच होते. तिच्या अभिनयाचा कस लागला तो पी एल संतोषी यांच्या दामिनी चित्रपटात. चित्रपटात तिची आणि सानी देओल ची अभिनय सक्षम भूमिका होत्या. ऋषीकपूरही चित्रपटात होता. परंतु त्याची भूमिका दुय्यम होती. चित्रपटात तिचे नावही बदलेले गेले आणि ती शशिकलाची मीनाक्षी शेषाद्री झाली. मीनाक्षी , पी एल संतोषी च्या प्रेमात पडली आणि सुखी जीवनाची स्वप्ने पाहू लागली. तीन वर्षानंतर तिचा भ्रम निरास झाला, जेव्हा तिला कळले की पी एल संतोषीचे केव्हाच लग्न झालेले आहे आणि त्यांना बायको मुलं आहेत.
त्यानंतर तिला दुसरा धक्का बसायचा होता तो कुमार शानू या गायकाचा. कुमार शानू बराबर ती सहजीवनाची अशा करू लागली. दोघांच्या लग्नाच्या आणा-भाका ही झाल्या. अशातच एका फिल्मी पार्टीत तिला एक स्त्री भेटली आणि तिने ती कुमार सानू ची बायको असल्याचे सांगितले. हा धक्का मात्र तिला मानवणारा नव्हता आणि ती चित्रपटसृष्टीतून निवृत्त होऊन लग्न करून अमेरिकेला गेली. तिथे आज टेक्सस मध्ये नवऱ्याबरोबर आणि मुलां बरोबर आनंदात आहे आणि भरतनाट्यम, कुचीपुडीचे वर्ग चालवत आहे.
अतिशय सुंदर अशा दामिनी, शेहनशाह आणि इतर कित्येक प्रसिद्ध चित्रपटात तिने भूमिका केलेल्या असूनही तिच्या कारकिर्दीत तिला कोणतेही पारितोषिक मिळाले नाही हे तिचे दुर्दैव.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुभाष घई , जॅकी श्रॉफ , मीनाक्षी शेषाद्री, लक्ष्मी प्यारे, अनुराधा , मनहर उदास, तू मेरा जानू है
हे मेमरीतून कसं काय डिलीट झालं?

दामिनीमध्ये ती मोठे मोठे डोळे करून सगळ्यांना घाबरवते.

सुभाष घईला आपल्या नायिकांची नाव म या अक्षरावरून हवी असत. त्याने शशिकलाचे मीनाक्षी केले की आधीच झाले होते?

पेंटरबाबू मध्ये मनोजकुमारचा मुलगा की भाऊ हिरो होता.

खूप विचार करून निवडक चित्रपटात भूमिका करण्याचा तिचा शिरस्ता असावा .
तसेच कुठल्याही पद्धतीने स्त्री पणाला बाधा येईल अशा तर्हेची कुठलीही वेशभूषा किंवा वर्तन भूमिकेच्या माध्यमातूनही तिने कधी केले नाही ही तिची विषेश ओळख!

पी एल संतोषी>> ऑ? ते तिच्या आजोबांच्या वयाचे असतील. राजकुमार संतोषी हा त्यांचा मुलगा, जो दामिनीचा दिग्दर्शक होता. राजकुमार संतोषी मिनाक्षीला लग्नासाठी मागे लागला होता आणि ती नकार देऊन लग्न करून अमेरिकेला गेली हे सगळीकडे वाचलेलं आहे. भ्रम निरास वगैरे काही नाही!