कल क्या होगा किसने जाना

Submitted by अविनाश जोशी on 28 April, 2026 - 07:07

कल क्या होगा किसने जाना
गेल्या आठवड्यात बीजिंग मध्ये एकवीस किलो मीटरची मॅरेथॉन पळण्यात आली. ही स्पर्धा लायटनिंग नावाच्या खेळाडूने पन्नास मिनिटात जिंकली. पुढच्या स्पर्धकाला एक तास अठरा मिनिटे लागली. एक लक्षात ठेवले पाहिजे कि जिंकलेला स्पर्धक हा रोबो होता. थोडक्यात आता रोबो बुद्धीच्या दृष्टीनेच नव्हे तर शारीरिक तंदरुस्तीने माणसावर मात करू लागले आहे.
एआय मुळे रोबो माणसापेक्षा निश्चितच बुद्धिमान होतो आणि आता नवीन तंत्रन्यानामुळे त्याची शारीरिक क्षमताही अफाट वाढत आहे. एवढंच नव्हे तर आता त्याच्या वेगवेगळ्या सेन्सरी आणि मोटर नर्व्हज असे पृथकरण करता येऊन एआय वर आधारित त्याचे मन त्याचे अवयव शासित करू शकता. कल्की हा विष्णू पुराणातील दहावा अवतार, हात पायांच्या काड्या आणि अतिशय मोठे डोके असा दाखवला आहे. रोबोटला अजून टेलीकायन्सीस, टेलीपायरॅटिस किंवा अश्या दुर्गम विद्या अवगत नाहीत पण कदाचित तो स्वतःच संशोधन करून अशा विद्या अवगत करू शकेल. आणि असाच एखादा कल्की पृथ्वीवरची सर्व जीवसृष्टी नाहीशी करून एखाद्या नवीन जीवसृष्टीला उत्त्पन्न करू शकेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users