एडिसन
थॉमस अल्वा एडिसन यांच्या नावावर जवळ जवळ 1093 पेटंट आहेत. पण तो शाळेत फक्त तीन दिवस गेला होता. कॅनडात जन्मलेला हा मुलगा आणि त्याचे आई वडील अमेरिकेत शिफ्ट झाले. शाळेत जायला सुरवात झाल्यावर त्याला अनेक प्रश्न पडायचे . हे थोडस अण्णाभाऊ साठेनसारखाच झाल. त्यांनी शेकडो कथा कदंबऱ्या लिहल्या असंख्य वगनाट्य नि कवण लिहली पण ते शाळेत फक्त दीड दिवस गेले होते. एडिसनला शाळेत घातल्यावर त्याला फारच शंका असायच्या. A for Apple असं शिकवल्यावर काही ऍपल लाल का आणि काही ऍपल हिरवी का? किंवा डोंगरावर पाऊस पडल्यावर पाणी खाली का वाहत येते , वर का जात नाही असेही त्याला प्रश्न पडायचा. त्याच्या टीचर्सना उत्तरे देणे अवघड जायचे. शेवटी कंटाळून शाळेत टिचरनी त्याला एक चिट्ठी लिहून घरी द्यायला सांगितली. चिट्ठी वाचल्यावर त्याने आईला विचारलं, आई टिचरने काय लिहलं आहे? आई म्हणाली, तुमचा मुलगा अति हुशार आहे त्यामुळे त्याला स्वतंत्र शिक्षकाची आवश्यकता आहे. आईने त्याच्यासाठी घरीच येऊन शिकवणाऱ्या टीचर्सची सोय केली आणि एक ग्रंथालय तयार केले.
एडिसनने एखादे वेड डोक्यात घेतले की त्याचे उत्तर सापडेपर्यंत त्याला शांतात लाभायची नाही. एकदा त्याने कोंबडीला अंड्यावर बसलेले पाहिले आणि त्यातून कोंबडीचे पिल्लू बाहेर आलेले पाहिले. त्यानंतर त्याने एका टोपल्यात अंडी गोलाकार लावून ठेवली आणि त्याच्यावर तो बसला. त्याच्या आईचे नाव नॅन्सी होते. तिला एडिसन असं का बसलाय ते कळेना. त्याला विचारल्यावर त्याने उत्तर दिले मी अंड्यातून पिल्ले बाहेर काढत आहे. खरं म्हणजे सर्व अंडी फुटून गेली होते आणि त्याचे कपडेही खराब झाले होते. मग आईने त्याला कोंबडी कशी बसते आणि एकवीस दिवसांनी पिल्लू कस तयार होते हे शिकवलं.
एडिसनच्या अकराशे पेटन्ट पैकी सगळ्यात महत्वाचा ठरलेला म्हणजे फिलामेंट लॅब. फिलामेंट कशी असावी किंवा कुठल्या पदार्थाची असावी याकरिता एडिसनने दहा हजारहून जास्त प्रयोग केले. काही प्रयोगात त्याने मेटल वापरले, कार्बन फ़ायबर वापरले. त्यात मेटल होत, कार्बन फायबर होत, कार्बन कोटेड लोकर होती तर काही प्रयोगात बांबू होते. त्यातल्या त्यात बांबूची फिलामेंट कित्येक तास चालली. एकदा तर त्याने भेटायला आलेल्या व्यक्तीचे दाढीचे लांबसडक केसही वापरले. चौदा हजार अशा विचित्र प्रयोगानंतर त्याने इंडोनेशियातील एका प्रकारच्या बांबूचा फिलामेंटसाठी वापर केल्यावर तो लॅम्प पाचशे तासाहून जास्त चालला. ते पाहिल्यावर लोकांकडून बरेच भांडवल गोळा झाले. त्यानंतर त्याने भांडवल गोळा करून आणि ठरवून त्याने मॅनहॅटन मधील दोन रस्ते आणि सर्व बिल्डिंग प्रकाशमान केली.
एडिसन त्याच्या शोधांमुळे जगप्रसिद्ध तर झाला आणि अतिशय श्रीमंत ही झाला. त्याने नवीन घर बांधले त्याला तेवीस खोल्या होत्या. नवीन घरातील समान लावत असताना त्याला आईच्या जुन्या पेटीत एक चिठ्ठी सापडली. ती चिठ्ठी त्याच्या टिचरने लहानपणी लिहलेली होती. त्या चिठ्ठीत लिहलं होत.
'तुमचा मुलगा अतिशय मंद बुद्धीचा आहे. त्याला काहीही येत नाही म्हणून त्याला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे.'
नंतर एडिसनने आईची आठवण म्हणून त्याने ती चिठ्ठी जन्मभर सांभाळली.
एडिसन
Submitted by अविनाश जोशी on 25 April, 2026 - 04:22
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा