नमस्कार! BMM सिअॅटल मध्ये विविध कार्यक्रम, स्पर्धा , उपक्रम यांची नेहेमीप्रमाणे रेलचेल आहेच.
विविध स्पर्धांची माहिती इथे मिळेलः https://bmmseattle2026.org/competitions
पण यंदा एका आगळ्या-वेगळ्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची माहिती देते.
BMM Seattle २०२६ अधिवेशनामध्ये मध्ये आखिल उत्तर अमेरिकेतील मराठी कलाकारांसाठी घेऊन येत आहोत एक अनोखी स्पर्धा आणि आगळीवेगळी संधी!
“कलास्पंदन कला दालन” आयोजित - “रंग महाराष्ट्राचे!”
ही आहे एक ज्युरीड (juried) चित्रकला स्पर्धा. आणि याकरीता ज्युरी म्हणून लाभलेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दोन दिग्गज कलाकार.
कलेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृती, कलात्मक वैभव आणि परंपरेच्या वारशांचा सोहळा साजरा करण्याची ही संधी आहे. तुमच्यातला कलाकाराकरीता ही सुसंधी आहे. ओळखी-पाळखीत, मित्रमंडळींमध्ये कोणी कलाकार असतील तर त्यांना ही माहिती पाठवा. भाग घेण्यास प्रोत्साहित करा.
तुम्ही कार्यक्रमाला येऊ शकत नसाल तरी तुमची एंट्री पाठवू शकता. केवळ एकच अट - तुम्ही तुमच्या लोकल महाराष्ट्र मंडळाचे सभासद असणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेच्या नियमावलीसाठी भेट द्या: https://bmmseattle2026.org/kalaspandan-artgallery
काहीही प्रश्न असल्यास आम्हाला थेट ईमेलद्वारे संपर्क करू शकता: kalaspandan@bmmseattle2026.org