
सिॲटलमध्ये होणाऱ्या BMM 2026 स्नेहसंमेलनाची तयारी आता जोरात सुरू आहे!
श्रीमती शिल्पा कर्वे यांनी तयार केलेल्या अधिवेशनाच्या बोधचिन्हात भारताबाहेर राहूनही मराठी संस्कृती जपणाऱ्या आपल्या मराठमोळ्या अस्मितेला “म” या मूळाक्षराच्या प्रतीकातून सुंदर अभिव्यक्ती देण्यात आली आहे.
“म” — मराठीतला, मातीतला, माणसातला, मनामनांतला, मायबोलीतला, मौजेतला, मनोरंजनातला, मेजवानीतला आणि मैत्रीतला!
मोडी लिपीतून सुरू होऊन आज देवनागरीत फुललेली आपली अभिजात मायबोली या “म” च्या आकारातून साकारली आहे. याबरोबरच आकाशात मुक्तपणे फडकणारा भगवा झेंडा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचे आकृतिबंध आपल्या थोर परंपरेची जाणीव करून देतात.
आमची कर्मभूमी असलेल्या सिॲटल शहराचे प्रतीक म्हणून स्पेस नीडलची रेखाकृतीही या बोधचिन्हात समाविष्ट करण्यात आली आहे.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन म्हणजे उत्तर अमेरिकेतील मराठी जनांचा आपल्या संस्कृतीचा उत्सव! या स्नेहसंमेलनाला अनेक जण वर्षानुवर्षे सातत्याने उपस्थित राहतात. येथे जुन्या नात्यांना उजाळा मिळतो आणि नवीन नातीही जोडली जातात. मातृभूमीशी असलेले नाते अधिक दृढ होते.
हीच मध्यवर्ती संकल्पना व्यक्त करणारे आमचे घोषवाक्य आहे —
“जपूया संस्कृती, विणूया नाती”
पैशाने सगळं विकत घेता येत नाही, हे जरी खरं असलं तरी स्नेहसंमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी आर्थिक पाठबळ अत्यावश्यक आहे. त्यामुळे आमच्या Fundraising समितीचे काम जोरात सुरू आहे. संभाव्य देणगीदार आणि प्रायोजकांसाठी आकर्षक पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत.
पॅकेजेसची अधिक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे:
bmmseattle2026.org/individual-donor-sponsorship-tiers/
इच्छुक देणगीदारांनी कृपया संपर्क साधावा: donations@bmmseattle2026.org
अधिवेशनाची तिकीट विक्रीही जोरात सुरू आहे. यंदा तुम्ही तुम्हांला हवा तसा जेवणाचा प्लॅन घेऊ शकता.
तिकीट खरेदीसाठी ही लिंक बघा: https://bmmseattle2026.org/register?referrer=programs1
आम्ही अधिवेशनाची अधिक माहिती इथे देत राहूच!
आपल्या सूचना, अभिप्राय आणि प्रश्नांसाठी संपर्क साधा: info@bmmseattle2026.org
अधिवेशनाची माहिती (एका दृष्टिक्षेपात):
दिनांक: ६–९ ऑगस्ट २०२६, स्थळ: सिॲटल, वॉशिंग्टन (अमेरिका)
संकेतस्थळ: www.bmmseattle2026.org
ईमेल: info@bmmseattle2026.org
सोशल मीडिया: फेसबुक (@bmm2026seattle) आणि इंस्टाग्राम (@bmm2026seattl_)
The registration page is
The registration page is currently undergoing maintenance and will be available shortly. We apologize for any inconvenience this may cause.
हा मेसेज येत आहे
आता वेबसाईट परत नीट चालू
आता वेबसाईट परत नीट चालू झाली आहे. registration page आता खुले आहे.
अधिवेशनाला शुभेच्छा.
अधिवेशनाला शुभेच्छा.