कृष्णा इफेक्ट
जुलै 1964 मरिनड्राइव्ह. हॉटेल नटराज, रूम नंबर 307. आत एक मध्यमवयीन स्त्री कृष्णा कपूर आणि तीन लहान मुलं रणधीर, ऋषी आणि रितू. ती राज कपूरचे घर सोडून इथं आली होती. राज कपूर तेव्हा सुपरस्टार झालेला होता. आजच्या इतकी त्याकाळी मीडिया आक्रमक नव्हती. त्याकाळी वर्तमानपत्रे आजच्या इतकी आक्रम नव्हती. आणि टीव्ही चॅनेलचा उदय अजून व्हायचा होता. तरी सुद्धा बातमी हळू हळू पसरू लागली होती. राजकपूर आणि कृष्णा कपूर हे सर्व सिने जगतात आदर्श जोडपे मानले जायचे. राजकपूरचे कित्येक स्त्रियां बरोबरचे संबंध हे सर्वानाच माहिती होते. त्याच्या चित्रपटांच्या नायिकाच नव्हे तर इतरही बऱ्याच स्त्रियांशी तसेच सबंध होते.
नर्गिस राजकपूरच्या आयुष्यात अगोदरच आलेली होती आणि पद्मिनीशी त्याचे खेळ खेळून झाले होते. 1962 च्या सुमारास राजकपूरने संगमची निर्मिती सुरु केली होती. कोट्यवधी रुपये खर्च करून हे मोठे प्रोजेक्ट चालू होते. सहा ते आठ महिन्याचे आऊट डोअर शूटिंग युरोप मध्ये होते. या काळात वैजंतीमाला आणि राजकपूर यांचे सबंध फारच जवळकीचे झाले होते. सिने सृष्टीत त्या बाबतीत चर्चा सुरूच होती. वैजंतीमाला त्या काळातील सुंदर शरीरषौष्ठव लाभलेली नृत्यांगना होती. राजकपूरचे जबाबदार व्यक्तिमत्व, निळे डोळे, आणि भोळसर भाव यामुळे कुठलीही स्त्री त्याच्याकडे आकर्षित होत असे. युरोपला सहा महिने जाताना सुद्धा राजकपूरने पहिल्यांदाच कृष्णा कपूरकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. या सर्व अपमानाने कृष्णा कपूर चेंबूरचे आरके कॉटेज सोडून हॉटेल नटराजला राहायला गेली. हॉटेल नटराज मध्ये असलेल्या प्रेम चड्डा या मॅनेजरने रुम 307 कृष्णा कपूर आणि तीन मुले बुकिंग अनिश्चित काळापर्यंत एवढीच नोंद केली. तिथे गेल्यावर पहिल्या तीन चार दिवस स्टुडिओ मधून रोज पाचशे रुपयांचं पाकीट येत होत. चार दिवस पाकिटे न फोडता परत गेल्यावर पाकिटं येणे बंद झाले. कृष्णा कपूरने हॉटेलचा सर्व खर्च स्वतःच्या अंगावर घेऊन दागिने मोडून चालवला होता. राज कपूरचा अहंकार त्याला कृष्णा कपूरची माफी मागू देत नव्हता. त्या दिवसापासून वैजंतीमालाही अतिशय अलिप्तपणे राज बरोबर वागू लागली आणि संगमचे तिचे सर्व काम संपल्यावर ती राजकपूर बरोबर कुठलाही चित्रपट करणार नाही असे तिने सांगितले. दोन आठ्वड्यानंतरही कृष्णा कपूर नटराज मध्येच होती. तिचे आयुष्य ठरून गेले होते. सकाळी उठून ती मुलांचं सर्व आवरायची तर हॉटेलच्याच रेस्टोरंट मध्ये मुलांना खायला घालून, मुलांचे खाणे आवरून ते हॉटेलच्या लॉन्ज मध्ये बसत होती. दिवसाचे आणि रात्रीचे बरेच तास ती रूम च्या बाल्कनीत बसून समुद्राकडे पाहत बसे.
आरके स्टुडिओतही समेट घडवून आणण्याबद्दल प्रयत्न चालू झाले होते. दिलीपकुमार हा राजकपूरचा चांगला मित्र होता. दिलीपने राज कपूरला बरेच समजावले पण त्याची तयारी नव्हती. दोन तीन दिवसाने देव आनंद यानेही बरेच सांगून पहिले. नंतर शंकर जयकिशन या जोडीनेही राज कपूरला, कृष्णा कपूरची माफी मागून तिला परत आणायला सांगितले. शम्मी कपूर आणि शशीकपूरही कृष्णा कपूरच्या मागे लागले. महिन्याभराने एक दिवस पृथ्वीराज कपूरने त्याला बोलावून त्याची चांगलीच कान उघडणी केली.
राजकपूरला तो अपमान फारच असह्य झाला. पृथ्वीराज कपूरने त्याला सुनावले. चूक तुझी आहे . आजपर्यंत कपूर खानदानात असे कधी झाले नाही.
राजकपूरला कळत होते पण त्याचा अहंकार आड येत होता. राजचा खेळकरपणा कुठेच गेला होता. सेटवरची सर्व कामे असिस्टंटकडे सोपवून तो व्हॅन मध्ये रडत बसत असे. नटराज हॉटेलचा दरवान सांगतो, कित्येक वेळेला राजकपूरची काळी मर्सिडीज तिथे येत असे आणि राज कपूर गाडीला टेकून तिसऱ्या मजल्याकडे पाहत असे. संगम चे शूटिंग पूर्ण झाले होते आणि पोस्ट प्रॉडक्शनची कामे सुरु होती. त्यातल्या एक प्रसंगात राज क्षमा मागतो असाच शॉट होता. तो शॉट देताना राजकपूर इतका भाविक झाला होता की शॉट संपल्यावरही तो जमिनीवर पाय पसरून रडत बसला होता. स्टुडिओमधून कोणीही पुढे गेलं नाही.
ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर पृथ्वीराज कपूर स्वतः नटराज मध्ये गेले. तिला बघताच पृथ्वीराज तिच्या पायावर पडले आणि म्हणाले बेटी तेरे साथ नाइन्साफी हो गाई है. कृष्णाने त्याला सांगितले की "पिताजी, मुझे आपसे कोई शिकायत नहीं है। लेकिन जब तक राज खुद मेरे सामने घुटनों के बल बैठकर माफी नहीं मांगेगा, तब तक मैं वापस नहीं आऊंगी।" पृथ्वीराज कपूरने तिची पाठ थोपटून तिला धीर दिला.
मध्यन्तरीच्या काळात कृष्णाच्या आ- वडील आणि भावांनी तिला बरेच समजावले पण ती ठाम राहिली. वर्तमानपत्रात अफवा पसरतच होत्या. त्यात दोघेही घटस्फोट घेत आहेत अशी बातमी आली पण अर्थातच ती खोटी होती. या तिच्या ठामपणामुळे फिल्मी जगतातील असंख्य प्रथितयश नायिका तिच्या बाजूने उभ्या राहिल्या. यात नर्गिस, वहिदा रेहमान, मीना कुमारी, या सारख्या दिग्गज कलाकारांचाही समावेश होता. अखेर एक दिवस राजकपूर मनाचा निश्चय करून नटराजच्या तिसऱ्या मजल्यावर गेला. नेहमी सुटाबुटात असणारा राज त्या दिवशी साध्या झब्बा लेंग्यात पोहचला होता. दारावर टक टक करताच कृष्णाने दार उघडले. तिला पाहताच राजकपूर दारातच तिच्या पायावर पडला आणि तिचे पाय घट्ट धरून ठेवले. कॉरिडॉर मधून बरीच लोकं हा प्रसंग बघत होते. कृष्णाने त्याला उठवलं आणि म्हणाली, "आज तो मैं वापस आ रही हूँ, लेकिन अगर फिर कभी ऐसा हुआ, तो मैं दोबारा वापस नहीं आऊँगी।"
कृष्णा चेंबूरला परत गेली आणि ती राजच्या सर्व कार्यात उत्साहाने भाग घेऊ लागली. वैजंतीमाला मुंबई सोडून चेन्नईला गेली आणि डॉक्टर बाली यांच्याबरोबर तिने लग्न केले. या कथेच्या अँटी क्लायमॅक्स म्हणजे, 25-30 वर्षांनी वैजंतीमालाचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले त्यात तिने म्हंटले होते की, राज आणि तिची काहीही भानगड नव्हती. तो सगळा संगम चित्रपटासाठी केलेला स्टंट होता. हे वाचल्यावर ऋषी कपूर जाम भडकला आणि भर पत्रकार परिषदेत म्हणाला काय धांधात खोटारडी बाई आहे, तिच्यामुळे आम्ही तीन चार महिने हॉटेल मध्ये काढलेले आहेत.
कृष्णा इफेक्ट
Submitted by अविनाश जोशी on 22 April, 2026 - 06:53
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त लेख. तीन चार महिने
मस्त लेख. तीन चार महिने मुलांची शाळा बुडवली का? हॉटेलात राहून आणि तिथलं खाणं खाऊन ती पोरं ओव्हरवेट झाली का?
जबाबदार की रुबाबदार म्हणायचय?
जबाबदार की रुबाबदार म्हणायचय?
जबाबदार की रुबाबदार म्हणायचय?
जबाबदार की रुबाबदार म्हणायचय? >>> आप को क्या पसंद है
किस्सा रोचक आहे. फुल पेज थ्री मटेरियल.
फिल्मी आहे होय!!
फिल्मी आहे होय!!
मला वाटले माझ्याविषयी काही आहे का?
पृथ्वीराज कपुर, शशी कपुर,
पृथ्वीराज कपुर, शशी कपुर, वगैरे कुटुंबातील मंडळींचे समजु शकते पण देवानंद, दिलीप कुमार, नर्गिस, वहिदा रेहमान, शंकर जयकिशन ह्या मंडळींनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न का केला काही कळले नाही. त्याही काळात पर्सनल आणि प्रोफेशनल बाउंडरीज असणारच.
आवडला लेख.
आवडला लेख.