स्त्री जन्मा हि तुझी कहाणी-
१) माझ्याकडे बर्याच स्त्रिया येतात सोनोग्राफी साठी का तर पाळी नीट येत नाही म्हणून. म्हणजे केवळ "दोनच दिवस" अंगावर जातं
सोनोग्राफी केल्यावर मी त्यांना विचारतो तुम्हाला त्रास काय आहे? त्रास काही नाही पण "व्यवस्थित" ब्लीडींग होत नाही.
परत --त्याचा तुम्हाला काय त्रास होतो?
--त्रास काही नाही पण चार दिवस व्यवस्थित ब्लिडींग होत नाही.
मी त्यांना सांगतो हा प्रश्न का येतो? तर चार स्त्रिया एकत्र भेटल्या कि त्यातील एक सांगते "मला बाई कसं चार दिवस व्यवस्थित ब्लीडींग होतं".
मग जिला दोन दिवस होतं ती लटकली आणि जिला पाच दिवस होतं ती पण लटकली.
तुमचं सर्व अवयव व्यवस्थित आहेत. इतर बायका म्हणतात म्हणून तुम्ही डोकं पिकवून घेताय. एवढीच हौस असेल तर रक्तदान करा पुण्य तरी मिळेल. सॅनिटरी नॅपकिन वर खर्च कशाला करायला हवाय?
काही बायका विचारतात हे असं का?
मी त्याना सांगतो
सर्व बायकांना बारा महिने बत्तीस काळ वेळेवर पाळी आली तर स्त्रीरोगतज्ञांचं पोट कसं चालेल? तुमची गाडी बिघडलीच नाही तर मेकॅनिक चं पोट कसं चालेल
मुलुंड पूर्व मध्ये १५ स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत आणि मुलुंड पश्चिम मध्ये ४५ तरी असतील. पण मुलुंड मध्ये एकही "केवळ" पुरुष रोग तज्ज्ञ नाही असं का?
पुरुषांचं आयुष्य सरळ गुंतागुंत नसलेलं आहे. त्यांना पाळी येत नाही, त्यांची पाळी जात नाही, त्यांची पाळी वरखाली होत नाहीत, पुरुष गरोदर राहत नाहीत, त्यांची प्रसूती होत नाही.
स्त्रियांवर निसर्गाने अन्याय केला आहे हे सत्य आहे पण त्यात स्त्रियांनी आपलं आयुष्य अशा प्रश्नांनी अधिक गुंतागुंतीचं करून ठेवलेलं आहे.
२) माझ्या कडे येणाऱ्या जवळ जवळ शंभर टक्के गरोदर मुली भरपूर तणावाखाली असतात. पहिलटकरणी तर जास्तच.
पण आश्चर्य म्हणजे दुसऱ्या वेळेस गरोदर असणाऱ्या सुद्धा.
काही जणी मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या मुलात इतके अंतर असते कि पहिल्या गरोदरपणाचे त्यांना काहीच आठवत नाही.
आणि ज्यांच्यात इतके अंतर नसते , त्या यावेळेस मागच्या वेळेसारखे नाही म्हणून तणावाखाली असतात.
मी सोनोग्राफी करताना सर्वच स्त्रियांना आवर्जून सांगतो कि गरोदरपण हे आजारपण नाही. १०० वर्षांपूर्वी क्षकिरणतज्ज्ञ (रेडिओलॉजिस्ट) नव्हते कि स्त्रीरोगतज्ज्ञ (गायनॅकॉलॉजिस्ट) नव्हते. तुमच्या आज्या पणज्यानी यातील कोणतीही सुविधा उपलब्ध नसताना मुलांना जन्म देऊन वंश तुमच्या पर्यंत आला याचा अर्थच असा आहे कि सोनोग्राफी "अत्यावश्यक" नाही.
ते विमा उतरवण्यासारखे आहे. ९९ % हे मानसिक समाधान असते कि सर्व काही व्यवस्थित आहे आणि १ % केसेस मध्ये काही गुंतागुंत हिऱ्यांची शक्यता असेल तर त्याचा वेळेत इलाज करता यावा यासाठी सोनोग्राफी केली जाते. तेंव्हा खा प्या आणि एन्जॉय करा
असे सांगितले तरी एक दोन दिवस ठीक जातात आणि सर्व स्त्रिया परत कुठल्या तरी कारणाने तणाव घेतात.
मग कोणी तरी शेजारची बाई म्हणते कि "अगं सातवा लागला ना? तुझं पोट दिसत नाही. बघ बाई बाळाची वाढ ठीक आहे कि नाही?"
किंवा
अगं तू काही खातच नाहीस. बाळाचं पोषण कसं होणार? आता तुला दोन जीवांसाठी खायचं आहे.
मी मुलींना आवर्जून सांगतो कि अंबानींच्या घरी पाच किलोची मुलं जन्माला येत नाहीत आणि आदिवासींच्या कडे दीड किलोची मुलं जन्माला येत नाहीत.
तुमचा वजन ६० किलो आहे आणि नवव्या महिन्यात बाळाचं साधारण ३ किलो असतं म्हणजे तुमच्या ५ %
आता १०५ % साठी तुम्ही २०० % खाल्लं तर तुम्ही खुर्चीत मावणार नाही.
हे रोजचे संवाद असतात.
३ ) काही महिन्यांपूर्वी एक जोडपं आलं होतं होते. ती पाच महिने गरोदर होती. त्यातील नवरा मला विचारत होता कि डॉक्टर हि सारखं टेन्शन घेते, कितीही समजावलं तरी समजतच नाही हे असं का ?
मी त्याला सांगितलं साहेब तुम्ही प्रेमविवाह केलेला आहे, दोघं स्टेट बँकेत ऑफिसर आहात, तुमचा पगार सारख,, हुद्दा सारखा, समाजात मान सारखा आहे बरोबर? तो हो म्हणाला.
मी त्याला विचारलं साहेब तुमच्या वाढदिवसाला तुम्हाला गिफ्ट दिली नाही म्हणून तुम्ही रुसून बसाल का? तुमची बायको रुसून बसेल ना?
हे असं का? याचं उत्तर तुम्हाला मिळालं तर मला सुद्धा द्या.
आम्ही तिघेही हसू लागलो.
मी पुढे त्यांना म्हणालो कि साहेब तुम्ही दोन महिन्यांनी गोव्याला जायचं ठरवलं तर जायच्या आदल्या दिवशी तुम्ही दोन जीन्स च्या पॅण्ट्स आणि चार टी शर्ट घ्याल कि तुमचं पॅकिंग संपलं.
पण तुमची पत्नी दोन महिने विचार करून आपलं डोकं पिकवून घेईल. सकाळी कोणता ड्रेस घालायचा, त्यावर टॉप कोणता, मग बीचवर कोणता घालायचा? त्याला मॅचिंग कानातलं गळ्यातलं कोणता घालायचं.
संध्याकाळी डिनर साठी कोणता ड्रेस घालायचा त्यासाठी पायात चप्पल कोणती घालायचीय एक ना दोन.
त्यावर तो नवरा म्हणाल सर काय सांगताय? मागच्या जानेवारीत मध्ये आम्ही गोव्यालाच गेलो होतो तर तिने आधी महिना भर मला पण हा ड्रेस चांगला दिसेल का तो आणि याला कानातलं कोणतं घालू? सॅंडल चांगले कि चप्पल?
मग हे सॅंडल या ड्रेसवर जातील का असं सारखा विचारून मला अगदी काव आणला होता.
मी सांगितलं तुला हवा तो ड्रेस गळ्यातलं कानातलं घाल. या वर तिने माझ्याशी भांडण पण केलं होतं.
आम्ही तिघेही परत हसू लागलो. ( कारण हे बायकोला सुद्धा पटलं होतं)
स्त्रियांचा मेंदू एव्हढा
स्त्रियांचा मेंदू एव्हढा हायपर अॅक्टीव करून ठेवला आहे, हे समस्यांचं मूळ असावं.
एखादी गोष्ट घेतली नाही तरी दहा जणींना विचारतात, घेतली तरी विचारतात. चांगली सवय आहे, पण...
जजमेंटल वाटला मला लेख.दोघं
जजमेंटल वाटला मला लेख.
दोघं स्टेट बँकेत ऑफिसर आहात, तुमचा पगार सारख,, हुद्दा सारखा, समाजात मान सारखा आहे
समाजात असेलही. पण कुटुंबात, विशेषतः सासरी नसतो.
पण तेही असो.
आपल्या पोटात एक नवीन जीव आहे, तो पूर्णपणे आपल्यावर अवलंबून आहे, ही परिस्थिती overwhelming असते. उद्या पुरुषांनाही बाळ होण्याची सोय झाली ( काश!) तर पुरुषांनाही ते overwhelming च वाटेल.
अति टेन्शन घेणं वाईटच. पण काळजी वाटणं स्वाभाविक आहे.
मला लेखाचा हेतूच समजला नाही.
मला लेखाचा हेतूच समजला नाही.
जनरली बायका कशा अगदी 'ह्या!' (इथे वेंधळ्या, अती विचारी, अती चिकित्सक, अती व्यवस्थित, लॉजिकली विचार न करणार्या ..काय वाटेल ते घाला) असतात याची जंत्री करायची आहे का? का मॅन्स्पेल करायचं आहे?
मलाही लेखाचा हेतू कळला नाही,
मलाही लेखाचा हेतू कळला नाही, खरे तर बरेच काही कळले नाही.
उदा. स्त्रीया सोनोग्राफीसाठी येतात त्या स्वतःच्या मर्जीने येतात ? म्हणजे कुणा स्पेशालिस्टचे, निदान फॅमिली डॉकचे रेफरल नसते का? म्हणजे पाळीसंबंधी या स्त्रीयांचे जे काही समज गैरसमज आहेत त्याबद्दल त्यांचे डॉक काही उलगडून सांगत नाहीत ?
>>नवरा मला विचारत होता कि डॉक्टर हि सारखं टेन्शन घेते, कितीही समजावलं तरी समजतच नाही हे असं का>>
त्या स्त्रीला कसले टेन्शन आहे हे लिहिलेच नाही. लिहिले असते तर कळले असते की ताण उगाचच आहे की कसे ते.
गर्भवती स्त्रीला अनेक ताण असतात त्यात करीयर असेल तर अजूनच. त्यातून एखाद दुसरी असेल उठसूठ ताण घेणारी पण सहसा काय कुणाला हौस आलेली नसते उगाच ताण घ्यायची. बाळ तुमच्या पोटात, नाळ तुमच्याशी जोडलेली, मेंदूसह सर्व शरीर बदलत असते आणि त्यात काना मंडळी बाळ हेल्दी झाले पाहिजे हेच इतके वेळा ऐकवतात की .... सप्लायर क्वालिटीवाले परवडले!
हेतू म्हणजे अनुभव शेअर करायचा
हेतू म्हणजे अनुभव शेअर करायचा आहे बस्स!!
स्वाती २ सहस्र वेळा plus one
स्वाती २ सहस्र वेळा plus one
स्त्रियांचा एकंदर स्वभाव
स्त्रियांचा एकंदर स्वभाव काळजी घेण्याचा असतो.
पटत नसेल तर १० वि बारावीच्या परीक्षेच्या केंद्रात जाऊन पहा. बहुसंख्य मुलं मस्त मजेत फिरत असतात आणि बहुसंख्य मुली भरपूर टेन्शन घेऊन फिरत असतात. दहावी ला एक दोन टक्के कमी पडल्याने आयुष्यात किती क्रांती होईल. वाचक स्त्रियांनी आपले स्वतःचे दिवस आठवून पहा
पण स्त्रियांना अज्ञाताची भीती( fear of unknown) हि कायम सतावत असते.
आपल्या पोटात बाळ वाढते आहे. त्याची वाढ नीट होईल का? बाळाचे पोषण आपल्याला करता येईल का? आपल्यात काही तरी कमतरता नाही ना हा विचार स्त्रियांच्या डोक्यातून जातच नाही. मग प्रसूती नीट होईल कि सिझेरियन करायला लागेल? वाढ कमी झाली तर काय? एक ना दोन.
आणि त्यात आणखी तेल घालणाऱ्या आजूबाजूच्या बायकाच असतात. आपण काळजी दाखवतो आहोत हे दाखवण्याच्या नादात त्या मुलीच्या तणावात आपण भरच घालतो आहे हे त्यांच्या लक्षातच येत नाही. तू काही खातच नाहीस. बाळाचे पोषण कसे होणार? अगोदरच शंका असलेल्या मुलीचे काय होईल?
माझ्याकडे एका सोमवारी एक मुलगी अली होती. रडून डोळे सुजलेले. कारण काय तर तिचे वजन जास्त वाढल्यामुळे पोट जास्त दिसत होते. तिला एका दीड शहाण्या शेजारणीने शनिवारी सांगितले कि तुझे पोट जास्तच दिसतंय जरा तपासून घे. आमच्या एका नातेवाईक मुलीच्या बाळाच्या डोक्यात पाणी झाले होते त्यामुळे तिचे पोट असेच मोठे दिसत होते. आता हि गोष्ट सांगायची तर मुलीला का सांगावी? तिच्या आईला सांगितली असती तरी एक वेळ ठीक होते. कुठे काय बोलावे याचे तारतम्य नसलेल्या स्त्रियापैकी ती एक होती
ती बिचारी मुलगी दोन रात्री नीट झोपली नव्हती आणि पूर्ण वेळ मूल जर दिव्यांग निपजले तर काय हाच विचार कायम तिच्या डोक्यात होता.
अर्थात सोनोग्राफी करून मी तिला दाखवले बाळ पूर्ण निरोगीच आहे आणि त्याचे डोके आणि मेंदूचा विकास व्यवस्थित होतो आहे. हे बघेपर्यंत तिचा जीव थाऱ्यावर नव्हता.
समाजात असेलही. पण कुटुंबात,
समाजात असेलही. पण कुटुंबात, विशेषतः सासरी नसतो.
येथे मुद्दा समाजातील मनाचा नसून दोघांच्या समानतेचा आहे. दोघे जर समान पातळीवर असले तर स्त्रीचीच अपेक्षा का असावी?
अपेक्षा असण्याबद्दलहि प्रश्न नाही पण बऱ्याच स्त्रिया भेट न दिल्यास रुसून बसतात असे का?
दोघांनी एकमेकांना भेट वस्तू द्यावी हे बरोबर आहे पण पुरुष रुसून बसत नाही आणि स्त्री रुसून बसते यायचे कारण काय?
पूर्वी स्त्री हि मिळवती नव्हती जेंव्हा तिच्याकडे पैसे नसत तेंव्हाची गोष्ट वेगळी होती. आता मिळवत्या स्त्रिया स्वतःच्या कपड्या दागिन्यांवर सौंदर्य प्रसाधनांवर सहजच जास्त खर्च करताना दिसतात. तेंव्हा पुरुषाने आपले कौतुक करावे हि अपेक्षा असावी हेही ठीक आहे पण ते झाले नाही तर रुसून बसावे?
असो
कोण म्हणतं की सगळ्याच
कोण म्हणतं की सगळ्याच स्त्रिया भेटवस्तू दिली नाही तर रुसून बसतात?
काहीही!
स्त्रिया ही नवर्यांना समजून घेतातच की..
नसेल झाले आणणे, त्याला ऑलरेडी खूप कामाचा ताण आहे, त्याला समजत नाही मला काय आवडेल , आजच काय स्पेशल....नेहमी आपण घेतच तर असतो.......
अशी बरीच कारणं असतात जी बायका न सांगताही समजून घेतात.
सगळ्याच स्त्रिया भेटवस्तू
सगळ्याच स्त्रिया भेटवस्तू दिली नाही तर रुसून बसतात?
सगळ्याच स्त्रिया रुसतात असते माझे म्हणणे नाहीच
पण तुम्ही एक तरी पुरुष पहिला आहे का जो बायकोने गिफ्ट दिली नाही म्हणून रुसून बसलाय?
हा मूलभूत मनोवृत्तीचा फरक आहे जो दाखवायचा माझा प्रयत्न होता.
अर्थात मी त्यात कमी पडलो हे उघडच आहे. हि माझी लेखनाची मर्यादा आहे
. स्त्रीया सोनोग्राफीसाठी
. स्त्रीया सोनोग्राफीसाठी येतात त्या स्वतःच्या मर्जीने येतात ? म्हणजे कुणा स्पेशालिस्टचे, निदान फॅमिली डॉकचे रेफरल नसते का? म्हणजे पाळीसंबंधी या स्त्रीयांचे जे काही समज गैरसमज आहेत त्याबद्दल त्यांचे डॉक काही उलगडून सांगत नाहीत ?
सर्वच स्त्रिया फॅमिली डॉक्टरचे किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचे रेफरल घेऊनच येतात. आणि अर्थातच दोनच दिवस पाळी का येते याचे दिलेले विश्लेषण बऱ्याच स्त्रियांना पटत नाही म्हणून त्यांचे डॉक्टर सोनोग्राफी साठी पाठवतात.
काही वेळेस आपल्या कडून काही राहून गेलं असं होऊ नये किंवा धोका पत्करायला नको म्हणूनही स्त्रीरोग तज्ज्ञ सोनोग्राफी साठी पाठवतात.
चाळीशीच्या आसपास बहुसंख्य स्त्रियांच्या शरीरात आणि त्याला अनुषंगाने पाळीच्या चक्रात थोडे फार बदल होत असतात. त्यामुळे मनात शंकेची पाल चुकचुकत असते. आपलं सर्व व्यवस्थित आहे या समाधानाची किंमत कशी करणार?
कित्येकदा स्त्रियाच आपल्या डॉक्टरना सुचवतात कि एकदा सोनोग्राफी करून पाहू.
अपेक्षा असण्याबद्दलहि प्रश्न
अपेक्षा असण्याबद्दलहि प्रश्न नाही पण सरसकट सर्व स्त्रिया भेट न दिल्यास रुसून बसतात असे का?
असे तुम्हीच वरती लिहीले ना..म्हणून म्हटले.
आई वर लहान मुले रूसतात.
आई वर लहान मुले रूसतात.
पुरूषांपेक्षा स्त्री जर अधिकाराच्या पदावर असेल किंवा कर्ती असेल आणि हे सामान्य होईल तेव्हा चित्र बदलेल.
म्हणजे जेण्डर मुळे होत नसावे.
अपेक्षा असण्याबद्दलहि प्रश्न
अपेक्षा असण्याबद्दलहि प्रश्न नाही पण सरसकट सर्व स्त्रिया भेट न दिल्यास रुसून बसतात असे का
आपले बरोबर आहे.
माझ्या लेखनात चूक झाली
दुरुस्त करतो
पण तुम्ही एक तरी पुरुष पहिला
पण तुम्ही एक तरी पुरुष पहिला आहे का जो बायकोने गिफ्ट दिली नाही म्हणून रुसून बसलाय?>>>>>
बायको आणि बायकोच्या आईवडिलांनी गिफ्ट दिले नाही म्हणून भलतेच रूसलेले बरेच पाहिलेत..
रोजच्या पेपरमध्ये दिसतात.. कमवत वगैरे पण असतात बरं ते..
छान हलका फुलका लेख! फक्त
छान हलका फुलका लेख! फक्त स्त्रियांवर निसर्गाने अन्याय केला आहे हे सत्य आहे याच्याशी सहमत नाही. नर मादी ते स्त्री पुरुष हे डॉ मिलिंद वाटवे यांचे पुस्तक या बाबत फार उत्तम आहे.
बायको आणि बायकोच्या
बायको आणि बायकोच्या आईवडिलांनी गिफ्ट दिले नाही म्हणून भलतेच रूसलेले बरेच पाहिलेत..>> काहीतरी आठवलं!!!
अधिक महिना येतोय
अधिक महिना येतोय

तेव्हा जावई आणि त्यांचे थेट कुटुंबीय कसे रुसतात हे कळेलच
पॅसिडॉन
पॅसिडॉन
अधिक महिना येतोय
अधिक महिना येतोय
तेव्हा जावई आणि त्यांचे थेट कुटुंबीय कसे रुसतात हे कळेलच>> lol
लग्नात मनासारखा मानपान न मिळाल्यास रूसणारे नवरदेव, जावई, जिजाजी, फुफाजी.. गिफ्टसाठी रूसणार्या पुरूषांची मोठीच लिस्ट आहे.
पहिल्या अपत्याच्या वेळी
पहिल्या अपत्याच्या वेळी टेन्शन बायकांनाच नसते तर पुरुषांनाही असते. फार तर सोशल कंडिशनिंगमुळे दाखवायला संकोच करत असतील.
मी माझ्या मुलीच्या जन्माच्यावेळी लेख लिहिलेला. त्यामुळे तेव्हाच्या आठवणी नोंदवल्या गेल्या आहेत. डिलिव्हरीसाठी ऍडमिट होण्याआधी बायको पाणीपुरीचे डोहाळे पुरवत होती आणि हे आदल्या दिवशी चालते का याचे टेन्शन मलाच होते. ती ऍडमिट झाल्यावर मी हॉस्पिटल मध्ये पेशंटला भेटायला जातात तसा चिंतातूर चेहरा करून पोहोचलो तर ती छान हसताना खिदळताना दिसली.
पुरुष म्हणून गरोदरपणाचा अनुभव तर नाही पण नंतर लहान मूल कुशीत घेऊन झोपतानाचा अनुभव आहे. आपण झोपेत वळलो आणि मुलाच्या अंगावर आपले वजन पडले तर हे टेन्शन कायम डोक्यात असायचे. त्यामुळे तेच बाळ पोटात घेऊन वावरताना एखाद्या बाईला टेन्शन असणे स्वाभाविक असावे असे वाटते.
याउपर बाळ व्यवस्थित होईल की नाही याचे अतिरिक्त टेन्शन एखाद्या बाईला येत असेल तर घरचे काही अतिरिक्त टेन्शन देत नाहीत ना किंवा ते कसल्या विचारांचे आहेत हे सुद्धा बघायला हवे. कारण डॉक्टरकडे गेलेली बाई ते उघडपणे सांगणार नाही. नवरा सोबत असताना तर प्रश्नच नाही.
उद्या मुलांबाबत काही कमीजास्त झाल्यास तू गरोदरपणात अमुकतमुक केले नाहीस म्हणून असे झाले असा ठपका ठेवणारे असतील तर टेन्शन फ्री राहायची अपेक्षाच नको.
किंबहुना बायकांच्या बऱ्याच टेंशन मागे त्यांचे सासर आणि आपला समाज हे एक मोठे कारण असावे.
टेंशन घेणे (काळजी करणे) आणि काळजी घेणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. बायका किंवा पुरुष किंवा कोणतीही व्यक्ती काळजी घेत असेल तर त्यात काही वावगे नाही. किंबहुना बरेचदा चांगलेच असते.
@ गिफ्ट न दिल्यावर रुसने याचा अनुभव नाही. गेल्या कित्येक वर्षात मी बायकोला तिच्या वाढदिवसाला तसेच आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला काहीच गिफ्ट दिले नाही. आणि तरीही मी जिवंत आहे. रोजच्या रोज मायबोलीवर इथे तिथे प्रतिसाद टाकत सक्रिय आहे
हो आणि बहुतांश बायकांचे रुसणे
हो आणि बहुतांश बायकांचे रुसणे महाग gift साठी नसते
Efforts साठी असते, जे bare minimum असतात, अपेक्षित असतात....
आणि वरती उल्लेख केलेल्या पुरुषांचे रुसणे आर्थिक दृष्ट्या आणि भावनिक दृष्ट्या महाग असते. General observation आहे कुठेही जाऊन बघा