लता दादा

Submitted by अविनाश जोशी on 21 April, 2026 - 07:48

लता दादा
पन्नास-साठच्या दशकात चित्रपट सृष्टीत पुरुषांचा दबदबा होता. लिखाणापासून ते दिग्दर्शनापर्यंत सगळीकडेच पुरुषांची सत्ता होती. अशा वेळी एका बाईने आपल्या गुणांच्या जोरावर दादागिरी करत होती. ती बाई होती लता मंगेशकर. निसर्गदत्त देणगीबरोबरच तिचे परिश्रम त्याला कारणीभूत होते. दिलीपकुमारने एकदा तिच्या उर्दूला 'दाल चावल की उर्दू' असे म्हंटल्यावर तिने उर्दू गुरु करून आपले उर्दू उच्चार परफेक्ट केले तर अशी ही लता मंगेशकर. फिल्म सृष्टीत अनेकांशी तिने पंगा घेतला. त्यावेळच्या सी रामचंद्र बरोबर सुद्धाही ती काम करत नसे. मधुमती फिल्म मध्ये लता मंगेशकरच एक गाणं कमी करण्याचा निर्णय घेतला होता. बिमल रॉय त्या काळचे आघाडीचे निर्माते दिग्दर्शक होते. लताला ते गाणं फार आवडलेले होत. त्यामुळे तिने बिमलदाना सांगितलं, ते गाणं काढल तर बिमलदा बरोबर लता मंगेशकर नाव परत लागणार नाही.
ओपी नय्यर बरोबरच तिचा वाद कित्येक वर्ष टिकला आणि ओपी नय्यरने पण तिच्याशिवाय गीता दत्त आणि अशा भोसले यांना वापरून अजरामर संगीत केले. महम्मद रफी किंवा आर डी बर्मन यांच्या बरोबरही तिने काहीवेळा फारकत घेतली आहे.
त्यावेळा चित्रपट सृष्टीतील राज कपूर हा मोगल होता. गाण्यांचं चित्रीकरण आणि गाणी याविषयी त्याच कौशल्य निर्विवाद होत. 'जिस देश मे गंगा बहती है' याची पटकथा वाचून झाल्यावर जयकिशनने हातातला दारूचा प्यायला फेकून दिला आणि म्हणाला ही तर डाकूंची गोष्ट आहे यात कसलं गाणं गाणार. राजकपूर म्हणाला तू गाण्याला संगीत दे, गाणी कशी येणार याचा विचार नको करू. आज आपण 'जिस देश में गंगा बहती है' या चित्रपटात दिलेल्या नऊ गाण्यांशिवाय त्या चित्रपटाचा विचारच करू शकत नाही. तर अशा या राजकपूरकरीता लता मंगेशकरला एक गाणे गायचे होते. ती एका अटीवर गायला तयार झाली की, ती गात असताना रेकॉर्डिंगला राज कपूर हजर असता काम नये. पण लता मंगेशकर स्टुडिओत आली तर राजकपूरही तिथे हजर होता. त्याला पाहिल्यावर लता म्हणाली, आता आला आहे तर येऊ दे पण त्याने एक शब्द सुद्धा बोलायचं नाही.
पण गप्प बसेल तो राजकपूर कसला. त्याचे लताला सूचना देणे चालूच राहिले.
इथे जरा पॉज घ्या.
इथे जरा आलाप वाढवा .
शेवटी लता इतकी चिढली की त्याला म्हणाली, तुला हवं असेल तर सगळं गाणं आलापातच गाते आणि गाणं अर्धवट सोडून निघून गेली. संगीतकार म्हणाला, आपण आता दुसरं कोणाकडूनतरी गाऊन घेऊ. पण राजकपूरलाही लताच हवी होती. शेवटी बरीच आर्जव केल्यावर दोन महिन्यानंतर लताने ते गाणं परत रेकॉर्ड केलं. राज कपूर स्टुडिओत होता पण एकदम गप्प बसून होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लता दीदी यांची काही गाणी अशी आहेत कि ती ऐकली कि माझी तुलना वायुदलातल्या लढाऊ विमानांशी होतेच.

एफ १६, एफ २२, एफ ३५, मिग २९, सुखोई ३० ही सर्व विमाने त्यांच्या इंजिनच्या क्षमतेमुळे जास्तीत जास्त ६० ००० फूट उंचीपर्यंत (service ceiling) जाऊ शकतात.

तर

मिग २५ हे विमान ( भारताकडेही पूर्वी होते आता सेवेतून निवृत्त केले आहे) याची service ceiling ८०,००० फूट आहे. या उंची पर्यंत जगातील इतर कोणतेच विमान पोचू शकत नाही. The reconnaissance variant (MiG-25RB) also operated in the 70,000+ ft range, enabling it to evade most surface-to-air missile systems of its era.

मिग २५ च्या रशियन वैमानिकाने तर एकदा हे विमान जवळ जवळ सव्वा लाख फुट उंचीवर नेण्याचा विक्रम केला आहे. हे म्हणजे क्षितिजाच्या टोकाशी नेण्याचा विक्रम आहे.

त्याप्रमाणे लता दीदी यांची अनेक गाणी अशी आहेत जी दुसरा कोणीही गायक किंवा गायिका त्या उंचीवर पोहोचूच शकत नाहीत.