Submitted by Madan Hunkare on 19 April, 2026 - 10:26
मी एखाद्याचं खूप कौतुक करतो. म्हणजे मला राहवत नाही म्हणून आपोआप होतं.
या सवयीमुळे कुणी म्हणत कि, "काय बायकांसारखं कौतुक करतोस?"
बायका कौतुक करतात हे खरं आहे. पण हा बायकी गुण कसा काय हा प्रश्न पडायचा. सगळ्या बायका कौतुक करतात असं काही नाही.
त्या वेळी असं सोशल नेटवर्किंग मीडिया नव्हता. नाहीतर त्या वेळी विचारले असते. जन्मत घेतलं असतं.
पुरूष कौतुक करत नाहीत किंवा हातचं राखून कौतुक करतात.
बायका मात्र उघड कौतुक करतात असं खरंच आहे का?
तुमचं मत सांगा बरं का.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्त्रिया काय आणि पुरुष काय
स्त्रिया काय आणि पुरुष काय आपण भारतीय लोक कौतुकाच्या बाबतीत कृपणच आहेत. हाँ, कौतुक “स्वत:च” असेल तर मात्र भरभरून. 😜
मला खोटे कौतुक करता येत नाही, म्हणून खरेच कौतुक करतो. पण सरसकट “तू नेहेमी छानच दिसते” किंवा “तू हुशारच आहेस” असे generalised न करता “ ह्या निळ्या ड्रेस मधे सुंदर दिसते आहेस” किंवा “ आजचे presentation झकास झाले, तुझी मेहनत आणि हुशारी दिसून येते आहे, great work!” असे specific कौतुक करतो.
होय स्त्रिया कौतुक करतात.
होय स्त्रिया कौतुक करतात. इट्स अ वे ऑफ कनेक्टिंग.
कनेक्शन एस्टॅब्लिश करण्याकरता, कौतुक हे साधन, (कळत-नकळत) वापरले जाते.
प्रेम दाखविण्याकरताही. उदा - आपल्या मैत्रिणीच्या सेल्फीला, स्त्रिया अगदी आवर्जुन आणि भरभरुन कौतुकाचे प्रतिसाद देतातच.
स्त्रिया पटकन कौतुक करतात.
स्त्रिया पटकन कौतुक करतात.
मला वाटतं पुरुषांमध्ये इगो असतो तो मोकळं कौतुक करण्याच्या आड येतो.
women compliment each other
women compliment each other but don't mean it.
आमच्या मैत्रिणीचा ५७ वा वाढदिवस झाला त्यावर एका मैत्रिणीने लिहिले कि "you dont look a day older than 18 years" तिला इतर मैत्रिणींनी अनुमोदन दिले.
men abuse each other but don't mean it either.
सुबोध खरे, एकदम छान प्रतिसाद
सुबोध खरे, एकदम छान प्रतिसाद!

बायका कौतुक करतात, काँप्लिमेंट देतात पण मनापासून देतातच असे नाही. आपल्या मुलांचे मात्र भरभरुन कौतुक करतात.
पुरुष कमी कौतुक करतात, विशेषतः बायकोचे तर अजिबातच करत नाहीत!
पुरुष स्त्री असा फरक नसावा,
पुरुष स्त्री असा फरक नसावा, स्वभावा नुसार होतं ते. पण बायकांकडून पटकन कौतुक केल्या जातं असं अनुभवलय!
एखाद्या बाप्प्याला एखादी ला म्हणायचं असलं वा काय छान दिसतीयेस (कलीग समजा) तर तो असा लगेच म्हणु शकणार नाही.. अर्थाचा वेगळा अर्थ काढला तर!?
१ ओळखीचा पुरुष अगदी नुसते पोहे केले तरी वा वा क्काय चव आहे, खूप छान, असं म्हणुन खूप स्तुती करतो. मग मी लग्गेच कधीही कौतुक न करणार्या नवर्याकडे तुच्छते ने बघते.
>>>>>मग मी लग्गेच कधीही कौतुक
>>>>>मग मी लग्गेच कधीही कौतुक न करणार्या नवर्याकडे तुच्छते ने बघते.
नाही ना सुधारत पण नवरे.
'नवरे सगळे गाढव' नावाचा सिनेमा आहे ना
>>>>>पण मनापासून देतातच असे
>>>>>पण मनापासून देतातच असे नाही.
काहीजणी देत नसतील पण सहसा मनापासूनच देतात असा अनुभव आहे. मी तरी खोटी कॉम्प्लिमेन्ट अजिबात देत नाही मलाच ती भाटगिरी वाटते आणि डिसऑनेस्टी.
एकदाच खोटी कॉम्प्लिमेन्ट दिल्याचे आठवते. एक अॅग्रेसिव्ह आणि पॉलिटीक्स वाली कलिग होती. ती एकदा विटका ड्रेस घालून आलेली होती. मी म्हटलेले "अगं काय सुंदर ड्रेस आहे. छानच दिसतोय" ती म्हणाली "खूप जुना आहे" मी म्हटलं "अजिबात वाटत नाही."
बायका जास्त कौतुक करतात आणि
बायका जास्त कौतुक करतात आणि पुरुष कमी असे जनरलैजेशन करायला हरकत नाही.
पण मग त्याचवेळी बायका टोमणे मारण्यात देखील पटाईत असतात हे सुद्धा कबूल करायला हवे
आणि मत्सर हा स्त्रियांचा दागिना आहे हे सुद्धा मान्य करायला हरकत नाही ज्यावर त्या कौतुकाचा मुलामा चढवतात
त्यामुळे बायका करतात त्यातील बरेच कौतुक खोटे असते किंवा मी तुला लाईक करते आणि तू मला लाईक कर या हेतूने केलेले असते.
पुरुषांमध्ये अशी देवाण-घेवाण चालत नाही.
भिन्न लिंगी व्यक्तीचे कौतुक करायचे झाल्यास ते करताना वेगळा अर्थ काढला जाणार नाही याची काळजी स्त्री पुरुष दोघांना घ्यावी लागते.
तरी पुरुषांना जास्त घ्यावी लागते त्यामुळे ते या भानगडीत फार पडत नाहीत. स्ट्रेट फॉरवर्ड राहणे पसंत करतात.
मला पर्सनली कोणी कौतुक केले की संकोचून ओशाळून जायला होते. थप्पड से डर नही लगता साहबजी प्यार से लगता है असे होते.
त्या ऐवजी स्वतःच स्वतःचे कौतुक करायला फार आवडते.
पुरुष आपल्या आवडत्या खेळाडूचे कौतुक करताना मात्र सुसाट सुटलेले असतात.
उदाहरणार्थ – रोहीत शर्मा!
त्या तुलनेत बायकाना खेळाडूंचे कौतुक एवढे नसते.
त्या आवडत्या कलाकाराचे कौतुक फार करतात.. त्यांच्या दिसण्याची सुद्धा फार क्रेझ असते.
पण पुरुष सुद्धा या बाबतीत मागे नसतात. खेळाडूच नाही तर ते आवडत्या कलाकाराचे सुद्धा इतके कौतुक करतात की जग विरोधात उभे राहिले तरी पर्वा करत नाहीत.
उदाहरणार्थ - ... नाव सांगायची गरज आहे का
येस ऋन्मेष ! शाहरुख इज लव्ह !
येस ऋन्मेष !
शाहरुख इज लव्ह !
कौतुक करायचं असेल तर
कौतुक करायचं असेल तर
जपून करावे लागते हल्ली
...
गर्ल गँग कौतुकात आघाडीवर असते हे खरंय
आणि एखाद्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवण्यात सुद्धा!!
..
प्रामाणिक कौतुक मनातून येतं
चांगल्या कामाला दाद दयायलाच हवी
प्रोत्साहन दिले पाहिजे
कौतुक करण्यात मी।फार कंजूष
कौतुक करण्यात मी।फार कंजूष आहेस असे माझ्या मित्रांचे म्हणणे आहे.
तर आधीच पुरुष कमी कौतुक करतात आणि ते मला त्यातला कंजूष म्हणतात म्हणजे विचार करा.
जिथे कौतुक अपेक्षित आहे तिथे अध्याहृत समजून घ्यावे.
>>> कौतुक करण्यात मी।फार
>>> कौतुक करण्यात मी।फार कंजूष आहेस असे माझ्या मित्रांचे म्हणणे आहे.
तसं ते कौतुकाने म्हणत असतील का?
तुम्ही म्हणजे हिंदी
तुम्ही म्हणजे हिंदी चित्रपटातले ते बाबूजी आहात जे शेवटी क्लायमॅक्सलाच कौतुक करतात.
जिथे कौतुक अपेक्षित आहे तिथे
जिथे कौतुक अपेक्षित आहे तिथे अध्याहृत समजून घ्यावे.>>>>> नाही बिलकुल नाही. ह्या वाक्याचा घोर निषेध हजार वेळा निषेध..
मानव


बॉस ला म्हणाल का असे? जिथे अप्रीशियेशन हवे तिथे देऊ नकोस, पण तुला जाण आहे असे समजून जाईन मी
जोरात पोहोचल्या का भावना जरा?
एक्झॅटली माय पॉईंट, आशु !मी
एक्झॅटली माय पॉईंट, आशु !
मी खातो आहे म्हणजे चांगलेच झाले आहे हे ही असेच आणखी एक चीड आणणारे वाक्य!
आता खडूसपणा आला आहे. आधी
आता खडूसपणा आला आहे. आधी नव्हता.
पण भरभरून कौतुक केले आहे असे आठवत नाही.
अपवाद - कलागुण, जबरदस्त कामगिरी, वैयक्तिक अचिव्हमेंट, पुरस्कार.
पण ओळख ना पाळख कुणा स्री ला दिसण्यावरून कौतुक जमत नाही. अपवाद अभिनेत्री, सेलिब्रिटी ज्यांना सवय असते.
पण ओळखीच्या स्त्रियांना पण कॉम्लिमेंट देत नाही.
बायकोला न देण्याचे कारण चिडवून देणे एवढेच असते.
स्वतःच्या मुलीचे लहान मुलींचे कौतुक करताना मात्र कसलाच इगो, किंतु परंतु आड येत नाही. त्या किती खूष होतात ते बघणे मौज असते.
मुलग्यांना कौतुकाचं सोयरसुतक नसतं. त्यांना सायकल, बॅट, बॉल घेऊन देणे यातच इंटरेस्ट असतो.
<<तसं ते कौतुकाने म्हणत असतील
<<तसं ते कौतुकाने म्हणत असतील का?>>
<< ते बाबूजी आहात जे शेवटी क्लायमॅक्सलाच कौतुक करतात.>>
हो तसंच काहीसं. चक्क याने कौतुक केलं म्हणजे स्वतःची पाठ थोपटुन घ्यायला हरकत नाही म्हणतात.
<<जोरात पोहोचल्या का भावना जरा?>> हो पोचल्या
<<मी खातो आहे म्हणजे चांगलेच झाले आहे हे ही असेच आणखी एक चीड आणणारे वाक्य!>> खाण्याच्या कौतुकाबाबतीत आमच्याकडे वेगळं आहे. आमच्या पिढीत - म्हणजे बायको बहीणी वगैरे- छान झालं / आवडलं / मस्त झालं एवढं चालुन जातं.
आई, मावश्या व काकवां मध्ये चार लेव्हल्स चालतात.
लेव्हल १ : खरंच छान झालं? अगदी मनापासुन? नक्कन? छान झालं की मस्त? एकदम छान की फक्त छान? हा उहापोह काही वेळा चालतो.
लेव्हल २: मागे केलं होतं त्यापेक्षाही छान झालं का? हॉटेल पेक्षाही छान झालं का? प्रसिद्ध हलवाई, तमुक ठिकाणी खाल्लं होतं वगैरे पेक्षा छान झालं होतं का?
लेव्हल ३: जी व्यक्ती आणि तिचे रेरिप्रेझेंटीटीव्ह तेव्हा तिथे उपस्थित नाहीत (मावशी, ककुन, विहीण, शेजारीण इ.) ती करते तिच्यापेक्षा चांगले झाले का?
लेव्हल ४: तरी मी मागे केलं तेवढं आज जमलं नाही. तरी आज अमुक पाहिजे होतं ते टाकलंच नाही. तरी आज जरा घाईतच करावं लागलं. इ.
हे प्रत्येक व्यक्तीकडुन स्वतंत्र रित्या अथवा दोन तीन व्यक्तींच्या समुहात प्रत्येक व्यक्तीच्या चेहर्यावरील भाव पाहुन कन्फर्म केले जाते.
यात मला एवढं लक्षात रहात नाही हे माहितच आहे ना, कालचं आज आठवत नाही, छान झालं सांगीतलं की, बाकी खवैये लोक बरोबर फीडबॅक देतील वगैरे करुन लेव्हल-१ वरुनच कल्टी मारतो मी.
मी विषेश पदार्थ कमीच करतो, जेव्हा करतो तेव्हा स्वतःला अंदाज येतोच. इतरांकडुन ठिक, नाही जमलं, छान झालं एवढा फीडबॅक पुरेसा असतो.
पुरुष बायकांपेक्षा कमी कौतुक
पुरुष बायकांपेक्षा कमी कौतुक करतात. ( खोटं खोटं नव्हे) याचं कारण एकंदर पुरुषांचं एकंदर शब्दिकीकरण (verbalization) स्त्रियांपेक्षा कमी असतं. त्यात कौतुक कमी करणे हा हेतू नसतो.
दोन स्त्रिया भेटल्या कि एकमेकींना नखशिखांत पाहून घेतात अगदी कानातल्या कर्णफुलांपासून पासून ते पायाच्या बोटात घातलेल्या जोडव्यांपर्यंत पाहून घेतात आणि जर ओळखीची असेल तर स्तुतीचा धबधबा चालू होतो. आणि ती स्त्री पुढे गेली कि हि आपल्या नवऱ्याला तिच्या मध्ये काय कमी आहे ते अगदी सविस्तरपणे सांगतात. साडीचा पदर कसा मॅचिंग नाही किंवा लिपस्टिक किती जास्त लावलेली आहे. आणि यातील ९९ % गोष्टी नवऱ्याने पाहिलेल्याच नसतात.
एखाद्या स्त्रीमध्ये काय चांगलं आहे तेवढंच पुरुष सांगू शकतातत तर तिच्यात काय कमी आहे याचे सविस्तर वर्णन बायका फार छान करतात.
पुरुष स्त्रीचा प्रथम चेहरा पाहतो मग "फिगर" पाहतो त्यापलीकडे पुरुष फारसे जातच नाहीत.
दोन मित्र भेटले कि चेहरा पाहून आनंदित होतात आणि अगदी जास्तच नटला असेल तर त्याच्या नटण्याच्या कारणांची चौकशी होते ( उदा. लग्नाला चाललाय का?) अन्यथा इतर गप्पा चालू होतात.
मी आणि माझी पत्नी संध्याकाळी/ रात्री संभाजी पार्क मध्ये फिरायला जातो तेंव्हा हमखास कुणी ना कुणी पेशंट आम्हाला ओलांडून जातात. तेंव्हा बायका मला "डॉक्टर" म्हणून हसून ओळख दाखवतात आणि माझ्या पत्नीकडे वरपासून खालपर्यंत बघून घेतात आणि मग माझी पत्नी मला शोभून दिसते (किंवा मी तिला शोभून दिसतो कि नाही) याची हळूच आपल्या नवऱ्याबरोबर (किंवा मैत्रिणीबरोबर) चर्चा करतात.
एकंदर बायकाच बायकांकडे संकोच न बाळगता फार जास्त निरखून पाहतात. पुरुष ती बाई "काय म्हणेल" या भीतीमुळे इतके जास्त निरखून पाहात नाहीत मग ती अतिशय सुंदर असेल तरीही (यात शेजारी पत्नी असेल तर जास्तच काळजी घ्यावी लागते).
आणि एखाद्याने चुकून अशा सुंदर स्त्रीचे थोडेसे जरी कौतुक केले तरी पुढची काही वर्षे त्याची कठीण जातात.
जेव्हा मला वाटतं तेव्हा मी
जेव्हा मला वाटतं तेव्हा मी दुसऱ्याचं (स्त्रिया, पुरुष, लहान, मोठे सगळेच) मनमोकळ कौतुक करते.
हे कौतुक फक्त दिसणं/कपडे ह्यापर्यंतच मर्यादित नसतं तर त्यात कला.. गुण... चांगली कामं... असं बरंच काही किंवा ह्या पैकी काहीही असू शकतं.
इतरांच चांगलं बघत राहिलो की मला वाटतं नकळत आपणही बदलत जातो...
women compliment each other
women compliment each other but don't mean it.
men abuse each other but don't mean it either.
सुबोध जी, अगदी खरे लिहिलेत
जे काही कमी/ जास्त कौतुक कराल
जे काही कमी/ जास्त कौतुक कराल त्यात सातत्य ठेवा. माझ्या डोक्यातला एआय प्रत्येकाच्या कौतुक कोशंटचा डेटा ठेवत असतो. अॅनमली दिसली की गडबडायला होते. 'मोजुनमापून कौतुक' कॉलम मधील व्यक्तीने वारेमाप स्तुती केली की ती गोष्ट सुपरसेभीउपर असेल असा कयास बांधला जातो. हे डेटासेट गडबडू देऊ नका, किंवा बदल करायचे असतील तर सावकाश करा. लो पास फिल्टर अल्गोरिदमला आहे. पण सडन चेंजेस झालेल्या व्यक्तीवर काट मारली जाते.
बाकी कौतुक करताना व्यक्तीच्या चेहर्यावरचे भाव, हालचाल, विशेषणे इ. ही फिल्टर होतात. सेल्फ अवेअर आणि हार्ड सेल्फ क्रिटिक असल्याने फालतू कौतुकाला हसुन आधीच केराची टोपली मिळते किंवा अती झालं तर खवचट विनोदी प्रतिसादाचा बुडबुडा वर वर येत एकदाचा फुटतो. बायका पुरुष असा काही भेद असेल वाटत नाही. व्यक्तीपरत्वे असतोच.
नौदलात असं म्हटलं जातं. IF
नौदलात असं म्हटलं जातं. IF YOU WANT TO DESTROY A PERSON PRAISE HIM NO END.
इंटरनेटवर म्हणतात की तुमची
इंटरनेटवर म्हणतात की तुमची पोस्ट कुणी वाचू नये वाटत असेल तर ऑल कॅप्स मध्ये लिहा.
स्वतःचं कौतुक करणाऱ्या किंवा
स्वतःचं कौतुक करणाऱ्या किंवा जगाच्या केंद्रस्थानी आपण आहोत असं समजणाऱ्या व्यक्ती भेटल्यावर वेळ चांगला जातो. दुर्मिळ प्रजाती आहे.
चाळिशीपर्यंत लागलेला हा गुण पंचेचाळिशीनंतरही गेला नाही तर एक तर या सर्वोच्च पदास पोहोचतात अन्यथा....
Submitted by सुबोध खरे on 21
Submitted by सुबोध खरे on 21 April, 2026 >>
डॉक्टर साहेब, अचूक निरीक्षण आणि मस्त प्रतिसाद. अगदी माझ्या मनातलच लिहिलंय असं वाटलं.
कौतुक करायचे तेव्हा मी ते शक्यतो लेखी कौतुक करतो. विशेषत: bottom of the barrel employee चे. मला घराचे रिफायनांस करायचे होते तेव्हा जवळच्या बँकेतील एकीने खास वीकेंडला पण मला इमेल पाठवून माझे काम केले होते, तेव्हा बँकेच्या सीईओला पत्र पाठवून तिचे कौतुक केले होते आणि त्यावर त्याचे उत्तर पण आले.
२-३ महिन्यांपूर्वी ICICI बँकेत एकीने खूप छान सर्विस दिली तेव्हा मी तिच्या बॉसचा इमेल पत्ता मागितला तर ती (नेहा सिंग नाव होते तिचे) खूप घाबरली की तिची काही चूक झाली का? तेव्हा मी तिच्यासमोरच मॅनेजरला इमेल पाठवली. अप्रेजलमध्ये फायदा होईल मला असे म्हणाली आणि वर शिवाय मलाच म्हणाली की असे आधी कुणीच केले नाहीये. खरं तर तिच्यापेक्षा मलाच जास्त आनंद झाला ते ऐकून.
मला कॉम्प्लिमेंट्स म्हणजे
मला कॉम्प्लिमेंट्स म्हणजे फॉर्मलिटी वाटते आणि कौतुक म्हणजे कुणाचे
गुण, कौशल्य, कामगिरी बद्दल वगैरे खरेखुरे कौतुक वाटुन केलेले कौतुक.
कपडे छान आहेत, रंग छान आहेत, पोहे छान झालेत वगैरे कॉम्लीमेंट्स.
पुरणपोळी, croissant (असंच रँडम उदाहरण घेतलंय) वगैरे विशेष कौशल्य लागत असल्याने ते कौतुकात मोडते. तसेच संकल्प पूर्ण करणे हे पण कौतुकात.
उबो +१ ऍक्सिस बँकेत लोन क्लोजर वेळी मला फार तत्परतेने सेवा मिळाली लॉडाऊन वेळी, आणि एका हॉस्पिटलमध्ये एक वयस्क डॉक आणि नर्स. फिडबॅक फॉर्म मागवून त्यांच्या नावासकट कौतुक केले डॉकचा ऑनलाईन रिव्ह्यूपण.
वडील कमी बोलायचे त्यामुळे
वडील कमी बोलायचे त्यामुळे असेल माझ्यात तो गुण आला. (कमी बोलण्याचा आणि कौतुक कमी करण्याचा.)
जी मुलं आईच्या सान्निध्यात जास्त असतात त्यांच्यात हा गुण येतो. त्यांच्या मुलांच्यातही येतो.
एकलकोंडे, एकटे मूल कुणाच्या जवळ राहते त्यावर त्याच्यात हा गुण येत असावा. जी मुलं लहानपणी मुलांच्यात जास्त खेळतात त्यांच्यात हा गुण येऊ शकतो. येतोच असे नाही. हॉस्टेलवर राहिलेल्या मुलांमधे मात्र अनेक गुणांचा विकास होतो, त्यात स्वार्थासाठी कौतुक करणे हा पण एक.
सायलेन्सर सारख्या लोकांनी केलेलं कौतुक नकोच. अशा व्यक्तीच्या हाताखालीही नको आणि संपर्कातही नको. त्यांचं कौतुक सोडाच, त्यांच्याकडून कोणताही लाभ नको. ते नुकसान करू शकत असतील तर करोत, पण अशांना आरसा दाखवणे केव्हांही चांगले. बॉस का असेना.
मी कोणाचं ही कौतुक करण्यात
मी कोणाचं ही कौतुक करण्यात हात आखडता घेत नाही. समोरच्या व्यक्तीने केलेल्या खायच्या पदार्थाचं तर आवर्जून करतेच करते. ती दाद त्याने त्या साठी घेतलेल्या कष्टांना ही असते.
म मो +1.
म मो +1.
कारण जे आयते खातात त्यांना कळत नाही की निदान कौतुक करावे - रोजचा अनुभव.
Pages