महापुरूष त्यांच्या जीवनीतून कमी, विचारातून जास्त उलगडतात.
ज्याच्या जगण्याने लाखो नाही करोडोंचे जिणं बदलतं त्याला महामानव म्हणायचं. स्थितीवादी असलेल्या समाजात बंड पुकारणे, आंदोलन करणे आणि त्यातून घाव घालून व्यवस्था बदलवणे हे साधारण काम नाही. हे हजारो वर्षातून एखादाच कुणी तरी करू शकतो. म्हणूनच महापुरूषांची बरोबरी कलाकार, उद्योजक, लेखक, कवी यांच्याशी होऊ शकत नाही. हे सगळे आपले जीवन समृद्ध करू शकतात पण महापुरूष?
काहींसाठी ते देवाच्याही पलिकडे असतात.
पण त्यांच्या नंतर त्यांच्या जीवनीतल्या त्याच त्या कथा सांगून त्याचं सपाटीकरण होत जातं. त्यांचा वापर राजकीय कारणांसाठीही होतो आणि तेढ निर्माण करण्यासाठी होतो. महामानवांना उत्सवी प्रतिमा म्हणून स्थापित केलं जातं. भारतासारख्या देशात कोणताही महामानव याला अपवाद नाही.
म्हणूनच आज बाबासाहेबांबद्दल कधीही जास्त न बोललं गेलेलं बोलावं असं वाटलं.
बाबासाहेबांचे दोन प्रकारचे मुख्य अनुयायी आहेत.
एक भावूक. त्यांना जयंतीचा उत्सव साजरा करण्यात जास्त रस असतो.
दुसरे सगळे फायदे उपटून त्यांचं नाव उघडपणे घेऊ न शकणारे. नाही तर मग मायबोली सारख्या संकेतस्थळांवर वर नक्कीच जास्त लेख दिसले असते. कुणीही मनाई केलेली नाही.
दुर्दैवाने या मुळे बाबासाहेबांचे अनेक पैलू अस्पर्शित राहतात. नमनाला घडाभर तेल घालून झाल्यानंतर आता मुख्य विषयाकडे येतो.
आज फक्त त्यांचे व्हॉईसरॉयच्या कौन्सिल मधे केलेल्या कामांबद्दल आणि इतर काही कन्स्ट्रक्टीव्ह कामांबद्दल थोडक्यात आढावा घेऊ.
त्यांच्याकडे जे खातं होतं त्यात चार विभाग होते. आजही महाराष्ट्र राज्य या सरकारमधे यामुळेच तीन विभाग एकत्र आहेत.
कामगार, कायदा आणि वीज. याबरोबरच इरीगेशन हा विभागही होता. काही जण याला चार स्वतंत्र खाती असे म्हणतात.
इरीगेशन :
इरीगेशन प्रकल्पांंमधे बाबासाहेबांसमोर सर्वात मोठे चॅलेंज होतं ते दामोदर नदीचं. दामोदर नदीचं पात्र दरवर्षी बदलून वहायचं. त्यामुळे कधी एका बाजूच्या गावांना पाणी नाही तर कधी दुसरीकडच्या गावांना पाणी नाही असं व्हायचं. तर पावसाळ्यात एकाच बाजूला पूर यायचा. यावर उपाय म्हणून बाबासाहेबांनी दामोदर व्हॅली प्रकल्पाची संकल्पना मांडली. त्यात धरण आणि कालवे काढले गेले. यामुळे पुढे पूर आणि दुष्काळ ही दोन्ही संकटं नष्ट होणार होती. याची मंजुरी बाबासाहेबांच्या कारकिर्दीतच झाली आणि कामाला सुरूवातही झाली.
यानंतरचं मुख्य आणि सुप्रसिद्ध काम म्हणजे भाक्रा नानगल.
बाबासाहेबांची भूमिका : बाबासाहेब व्हाइसरॉयच्या कौन्सिलमध्ये सिंचन व वीजनिर्मिती खात्याचे सदस्य असताना त्यांनी भाक्रा धरण प्रकल्पाला प्राधान्य देऊन त्यावर ठोस पावले उचलली. त्यांच्या कार्यकाळात १९४४ मध्ये अमेरिकेच्या ब्युरो ऑफ रिक्लेमेशन तज्ज्ञांना बोलावण्यात आले, ज्यांनी धरणाची जागा योग्य असल्याचे प्रमाणित केले. बाबासाहेबांनी दामोदर व्हॅली प्रकल्प, भाक्रा नानगल धरण, सोन नदी प्रकल्प आणि हिराकूड धरण यांची सुरुवात केली.
त्यांनी Central Water Commission आणि Central Technical Power Board यांचीही स्थापना केली. या संस्था आजही कार्यरत आहेत.
भाक्रा धरण कुणी बांधायचे यावर वाद होता. पंजाब जलसिंचन विभागाकडेतंत्रज्ञान नव्हते, वरिष्ठ इंजिनियर म्हणत होते हे काम एखाद्या परदेशी कंपनीला (अमेरिकन) द्यावे. पण ए एन. खोसला, सेंट्रल वॉटररवेज कमिशन चे अध्यक्ष, यांनी पंजाबच्या गव्हर्नरला पटवून दिले की हे धरण सरकारी पद्धतीने बांधावे. अमेरिकन तज्ज्ञ हार्वे स्लोकम यांचे तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे. या कामासाठी बाबासाहेबांनी खोसला यांचे मन वळवले होते. काही सोशल मीडीयातल्या पोस्टसमधे त्यांचे नाव टंडन असल्याचा दावा केला जातो. पण तसा पुरावा आढळत नाही. बाबासाहेबांनी अमेरिकन कंपन्यांना एव्हढ्या उंचीवर आणी एव्हढ्या विस्तीर्ण पात्रावर धरण बांधायचा अनुभव नसल्याचे सांगितले होते.
Harvey Slocum यांनीही आधी नकार दिला होता. कारण या धरणाची उंची खूपच जास्त असणार होती. ते म्हणाले की प्रकल्प खूप मोठा आणि गुंतागुंतीचा आहे, माणसे नाहीत, यंत्रे नाहीत, आणि सरकारी लालफितीशाही आहे. पण खोसला आणि एम आर चोप्रा (वरिष्ठ अभियंता) अमेरिकेत जाऊन त्यांना भेटले. Slocum यांनी अशा अटींवर करार मंजूर केला जो सरकार कधीच मान्य करणार नाही असे त्याच्या वकिलाला वाटले होते. पण बाबासाहेबांनी तो करारही मान्य केला. कसेही करून हे धरण अस्तित्वात येणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते.
स्लोकॉम दर वर्षी नऊ महिने भाक्रा प्रकल्पावर राहिले, दर आठवड्यात मंगळवारी प्रगतीचा आढावा घेत, आणि त्यांनी ३०० इंजिनियर व १०,००० कामगारांना एकत्र आणले.
भाक्रा आणि नानगल ही जोडधरणे असावीत ही मूळ संकल्पना बाबासाहेबांची. खूप उंचावर असल्याने जर भाक्रा धरणाला काही झाले तर हाहा:कार उडू नये यासाठी खाली नानगल धरण अशी संकल्पना होती. हे प्रत्यक्षात आणणे कठीण होते. ते साकारणार्या अभियंत्याचे कौतुक होत नाही. त्यांच्या बद्दल फारशी माहिती मिळत नाही. मात्र धरणाच्या मूळ संकल्पनेचे इंजिनियरिंग डिझाईन त्यांच्यामुळेच बनले असे म्हटले जाते.
हिराकुंड प्रकल्प - सोने नदी आणि दामोदर व्हॅली प्रकल्पाच्या बाजूलाच हा ही महत्वाकांक्षी प्रकल्प आखला गेला. या चारही धरणांमधे विद्युतनिर्मितीची योजनाही होती. यामुळेच ही खाती अनेक वर्षे एकत्र होती. या प्रकल्पामुळे पूर नियंत्रण साकार झाले.
( टंडन अशा नावाने पोस्टस फिरत असतात ते चोप्रा किंवा खोसला असण्याची शक्यता आहे. खोसला यांनी घेतलेले कष्ट बघता त्यांच्याबद्दलच ते असावे).
सोने नदी प्रकल्प - या नदीवरही अशाच प्रकारचा प्रकल्प आखला. खर्चाची मंजुरी दिली गेली.
हे प्रकल्प अर्थातच त्यांच्या कार्यकाळात पूर्णत्वास जाऊ शकले नाहीत. कारण १९४६ साली काऊन्सिल बरखास्त झाली.
श्रम खाते ( आज मंत्रालय आहे)
कामाचे तास आणि वेतनकामाचे तास १४ वरून ८ केले - नोव्हेंबर १९४२, ७वी Indian Labour Conference.
ओव्हरटाइमला दुप्पट वेतन
Dearness Allowance सुरू केला
Equal Pay for Equal Work - लिंगनिरपेक्ष समान वेतन, पहिल्यांदाच
कायदे
Factories Act मध्ये तीन वेळा सुधारणा (१९४४, १९४५, १९४६)
Industrial Employment (Standing Orders) Act
Industrial Disputes Act ची आखणी
Minimum Wages Act ची पायाभरणी
Indian Trade Unions Act मध्ये सुधारणा, Trade Unions ची सक्तीची मान्यता
महिला कामगार
Mines Maternity Benefit Act मध्ये दोनदा सुधारणा, प्रसूती रजा १६ आठवडे, पूर्ण वेतनासकट
भूमिगत कोळसा खाणींत महिलांवरील बंदी पुनर्स्थापित (फेब्रुवारी १९४६)
खाणींत क्रेचेस सक्तीचे (Mines Crèches Rules १९४६)
खाण कामगार
Coal Mines Labour Welfare Fund Ordinance (जानेवारी १९४४)
Coal, Iron, Manganese, Mica, Beedi कामगारांसाठी स्वतंत्र Welfare Funds
Coal Mines Pithead Bath Rules १९४६ - महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र स्नानगृहे, बांधकामासाठी सरकारी निधी)
सामाजिक सुरक्षा
कामगार राज्य विमा योजनेची (ESI) पायाभरणी, पूर्व आशियातील पहिली अशी योजना
कामगार भविष्य निर्वाह निधी ची संकल्पना
आधारकर समिती नेमून आरोग्य विम्याचा अहवाल (१९४३)
रजेचा लाभ.
बाळंतपणाची रजा.
वेतनश्रणींचा आढावा
औद्योगिक संबंध
त्रिसूत्री कार्यक्रम सुरू : कामगार, मालक, सरकार एकाच टेबलावर (ऑगस्ट १९४२)
भारतीय कामगार अधिवेशनचे पुनर्गठन
कामगार खाते Concurrent List मध्ये टाकले. Concurrent List म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्ही कायदे करू शकतात, मात्र विरोध आल्यास केंद्राचा कायदा वरचढ ठरतो. बाबासाहेबांपूर्वी "श्रम" हा विषय राज्यांच्या यादीत होता. म्हणजे प्रत्येक राज्य स्वतःच्या मर्जीने कामगार कायदे करायचे. यामुळे एका राज्यात कामगारांना ८ तास काम आणि शेजारच्या राज्यात १४ तास काम असे होऊ शकत होते. मालक अशा राज्यात कारखाना न्यायचे जिथे कमगार कायदे सैल आहेत. कामगाराला काहीही करता येत नसे.
बाबासाहेबांनी श्रमखाते Concurrent List मध्ये टाकले. याचा अर्थ केंद्र सरकार आता सगळ्या भारतासाठी एकसमान किमान मानके ठरवू शकते. ८ तासांचा दिवस, किमान वेतन, प्रसूती रजा, ESI हे सगळे देशभर एकसमान लागू होऊ शकतात. कोणताही मालक "आमच्या राज्यात असा कायदा नाही" असे म्हणून सुटू शकत नाही.
थोडक्यात, कामगाराचे हक्क हे राज्याच्या दयेवर न सोडता त्यांना घटनात्मक संरक्षण देण्याचा हा पाया होता. Minimum Wages Act, Factories Act, ESI Act हे सगळे देशभर लागू होऊ शकले ते याच बदलामुळे.
मुख्य कामगार आयुक्त आणि कामगार आयुक्त नेमले
कामगार चौकशी समितीची स्थापन
कामगारांच्या कामाचे स्वरूप असणारा जाहीरनामा सादर केला (सप्टेंबर १९४५)
रोजगार
राष्ट्रीय रोजगार हमी केंद्राची स्थापन
याशिवाय भारतीय रिजर्व बँकेची निर्मिती होण्याचे श्रेय बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रूपी या प्रबंधाला दिले जाते. या वेळी ब्रिटीशांची नाराजी ओढवून घेऊनही या प्रबंधावर बाबासाहेब ठाम होते. पुढे त्यातल्या सूचनांचा विचार करून रिझर्व बँकेची निर्मिती झाली. अनेकांना माहीत नसतं कि बाबासाहेब हे मूळचे कायदेपंडीत नसून ते अर्थशास्त्री होते. इकॉनॉमिक्सची डिग्री घेताना फीस भरता न आल्याने त्यांचे शिक्षण थांबले होते. ते पुन्हा पैशांची व्यवस्था झाल्यावरही एका नियमामुळे सुरू होऊ शकत नव्हते. परदेशातली वकीलाची फीस परवडत नसल्याने त्यांनी मग लॉ चे शिक्षण घेतले. स्वतःची केस विद्यार्थीदशेतच लढली आणि ती जिंकून पुढचे शिक्षण पूर्ण केले.
एक व्यक्ती एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य यासाठी बाबासाहेबांनी जो लढा लढला त्याचे वर्णन संसदेतल्या लायब्ररीत आहे. ते संकलित करून पुस्तकरूपाने प्रसिद्धही झालेले आहे.
वीजेच्या राष्ट्रीय ग्रीडची संकल्पना बाबासाहेबांचीच आहे.
महिलांच्या हक्काचे कायदे ईएसआय, पीएफ हे बाबासाहेबांनी आणले.
आठ तासांचे काम हा कायदा त्यांनी केला. यामागचे शास्त्रीय आधार वाचण्यासारखे आहेत.
तेव्हांचं बॉम्बे क्रॉनिकलन म्हणतं कि "भारताच्या दोनशे वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत इतक्या मोठ्या जनाधाराचा एकही नेता या पदावर बसला नव्हता."
याशिवायही असंख्य पैलू आहेत. मात्र आज एव्हढेच.
राज,
राज,
महापुरूष आणि लेखक, कलावंत यांच्यातला फरक आपण नेमका सांगितला आहे. असे म्हणतात की लता मंगेशकर यांना बाबासाहेबांबद्दल एक तरी गाणे गावे असे सांगण्यात आले होते, पण ते कधीच होऊ शकले नाही.
आयुर्विमा महामंडळ (एल आय सी) हेही बाबासाहेबांनी सुरू केले असे वाचनात आले होते. एवढे सर्व काम त्यांनी एवढ्या कमी काळात कसे केले असेल असा प्रश्न पडतो.
दोन वर्षांपूर्वी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे आंबेडकर जयंतीच्या दिवशी त्यांच्या कागदपत्रांचे एक प्रदर्शन पाहण्याचा योग आला होता. त्यात बाबासाहेबांच्या स्वत:च्या हस्ताक्षरातील पत्रे, फी भरलेल्या पावत्या तसेच प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाची पहिली प्रकाशित प्रत ठेवली होती. एल एस ई चे ग्रंथपाल त्या दालनात स्वतः उपस्थित राहून प्रदर्शनातील वस्तूंची माहिती देत होते. बाबासाहेबांचा अर्धपुतळाही या विद्यापीठात आहे. एक भारतीय म्हणून खूप अभिमान वाटला. प्रदर्शनाचे काही फोटोही असतील माझ्याकडे.
असे म्हणतात की लता मंगेशकर
असे म्हणतात की लता मंगेशकर यांना बाबासाहेबांबद्दल एक तरी गाणे गावे असे सांगण्यात आले होते, पण ते कधीच होऊ शकले नाही.
अश्या अफवा काही अयशस्वी लोक अधूनमधून पसरवत असतात.
त्यांना या कामाबद्धल खरंच असं कुणी विचारलं होतं का? त्याचा काही विश्वासार्ह पुरावा आहे का?
बाकी,
व्यावसायिक कलाकार आपल्या कामाची किती फी घेतात?
फी कमी देऊ केली असेल तर त्यांना काम न घेण्याचा हक्क नसतो का?
तसे काम त्यांनी नाकारले तर त्यांच्यावर टीका व्हावी का?
हे जनरल प्रश्न सध्या सोडून देऊ.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती अश्या अफवांवर अवलंबून नाही.
चांगला लेख आहे. यातल्या बर्
चांगला लेख आहे. यातल्या बर्याच गोष्टी माहीत नव्हत्या. बाबासाहेबांच्या एकेका क्षेत्रातल्या कामगिरीवर स्वतंत्र लेख होऊ शकेल.
एका व्यक्तीने इतक्या कमी कालावधीत, इतक्या बहुविध क्षेत्रांत , इतका दूरगामी परिणाम करणारं कार्य करून ठेवलं हे अचंबित करणारं आहे.
@मूक नायक
@मूक नायक
लता मंगेशकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गाणे म्हटले, न म्हटले त्यावर अर्थातच डॉ बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती अवलंबून नाही या आपल्या मताशी सहमत आहे. त्यांनी ते गाण्यास नकार दिला होता का, याची पडताळणी टीव्ही ९ ने केली असल्याचा संदर्भ खाली आहे. त्यामुळे अगदीच अफवा म्हणणे जरा जास्त होईल. पण या लेखाच्या संदर्भात हे थोडेसे अवांतरच आहे.
https://www.tv9marathi.com/entertainment/marathi-cinema/fact-check-wheth...
या लेखामुळे बर्याच नव्या
या लेखामुळे बर्याच नव्या गोष्टींची माहिती मिळाली. धन्यवाद.
>>एका व्यक्तीने इतक्या कमी कालावधीत, इतक्या बहुविध क्षेत्रांत , इतका दूरगामी परिणाम करणारं कार्य करून ठेवलं हे अचंबित करणारं आहे.>> +१
आंबेडकरी गाणी म्हणजे कोणती
आंबेडकरी गाणी म्हणजे कोणती गाणी? ती कोणी गायली आहेत?
>>> एका व्यक्तीने इतक्या कमी
>>> एका व्यक्तीने इतक्या कमी कालावधीत, इतक्या बहुविध क्षेत्रांत , इतका दूरगामी परिणाम करणारं कार्य करून ठेवलं हे अचंबित करणारं आहे.
अनुमोदन!
या लेखासाठी धन्यवाद.
बाबासाहेबांच्या कामांचा आढावा
बाबासाहेबांच्या कामांचा आढावा घेतलेला एक उत्तम आणि हटके लेख, मनापासून आवडला.
>> बाबासाहेबांचे दोन प्रकारचे मुख्य अनुयायी आहेत.
बाबासाहेब न कळलेले आणि त्यांच्या धम्माच्या आकलनाचा ठावही नसलेले सो-कॉल्ड चळवळ (म्हणजे काय की!) चालवणारे हा ही एक प्रकार आहे.
- (बाबासाहेबांच्या प्रतिभेने अचंबित असलेला) सोकाजी
स्वधर्म. भरत, स्वाती २,
स्वधर्म. भरत, स्वाती २, स्वाती आंबोळे आभार आपले.
सोकाजीराव, तुम्ही आंजाच्या बाहेर बाबासाहेबांच्या किती अनुयायांना भेटल्यावर हे मत ठरवले हे जाणून घ्यायला आवडेल. तुम्हाला समजलेला धर्म कोणता आहे त्यावर स्वतंत्र धागा काढल्यास लाभ होईल.
बाबासाहेब मला माफ करा, फुले मला माफ करा, महाराज मला माफ करा असे लेख पाडणार्यांचीही एक बिरादरी असायची, ती ही मावळली.
नवीन माहिती मिळाली.
नवीन माहिती मिळाली.
लेखाबद्दल धन्यवाद.
छान माहितीपूर्ण लेख!
छान माहितीपूर्ण लेख!
एका व्यक्तीने इतक्या कमी कालावधीत, इतक्या बहुविध क्षेत्रांत , इतका दूरगामी परिणाम करणारं कार्य करून ठेवलं हे अचंबित करणारं आहे. >>> खरे आहे. नेहमीच असे वाटते डॉ आंबेडकरांबद्दल.
इरिगेशन (पाठबंधारे?), श्रमिकांकरता कायदे - त्यातही राज्यांना गैरवापर करता येऊ नये म्हणून केंद्राकडे अधिकार ठेवणे, बँकांसंबंधी अभ्यास व निर्णय - या क्षेत्रांतील त्यांच्या कामगिरीबद्दल माहिती नव्हती.
बाबासाहेबांबद्दल खूप आदर कायमच वाटण्याचे कारण म्हणजे ज्या समाजाने आपल्याला नाकारले त्या समाजाबद्दल घटना व कायदे तयार करताना त्यात कसलाही आकस न आणणे. अगदी सूक्ष्म बाबींबद्दल प्रचंड अभ्यास करून - अगदी मनुस्मृतीपासून ते तत्कालीन प्रचलित कायदे, व आंतरराष्ट्रीय राज्यघटनांचा अभ्यास करून - हिंदू विवाह, मालमत्ता हक्क सारख्या गोष्टींतही केलेल्या न्याय्य तरतूदी. मध्यंतरी माबोवर की कोठेतरी एक लिंक मिळाली होती. घटना समितीच्या अधिवेशनातील चर्चांची. तेथे त्यांची सखोल माहिती व एखादी तरतूद तशीच का असावी याबद्दल त्यांचे स्पष्ट विचार पाहून थक्क व्हायला होते. हे विचार तत्कालीन प्रचलित समजुतींच्या व कायद्यांच्या मानाने आधुनिक होते. तसेच "सेक्युलर", "सोशालिस्ट" सारखे शब्द घटनेच्या प्रिअॅम्बल मधे असावेत की नाही याबद्दलचे त्यांचे स्पष्ट विचारही वाचणार्याला घटनेची व कायद्यांची रचना कशी कसावी याबद्दल माहिती करून देतात. सोमिवरच्या वादात लिहायला आपण काहीतरी शोधायला जावे आणि आपल्या दहा लेव्हल वरचा विचार समोर यावा असे मला तेव्हा वाटल्याचे आठवते.
फारएण्ड, प्रतिसाद आवडला
फारएण्ड, प्रतिसाद आवडला.
स्वतंत्र भारताच्या संविधानाच्या निर्मितीची कहाणी
छान लेख आणि प्रतिसाद.
छान लेख आणि प्रतिसाद.
धरणांच्या कामगिरीबद्दल अजिबात माहिती नव्हती.
>> सोकाजीराव, तुम्ही आंजाच्या
>> सोकाजीराव, तुम्ही आंजाच्या बाहेर बाबासाहेबांच्या किती अनुयायांना भेटल्यावर हे मत ठरवले हे जाणून घ्यायला आवडेल.
बाबासाहेबांचे दोन प्रकारचे मुख्य अनुयायी आहेत हे ठरविण्यासाठी जितक्या अनुयायांना भेटणं झालं त्यापेक्षा जास्तच असणार कारण त्यामुळेच तिसरा प्रकार कळला.
- (बाबासाहेबांच्या प्रतिभेने अचंबित असलेला) सोकाजी
माहिती बद्दल धन्यवाद.
राज अज्ञानी- माहिती बद्दल धन्यवाद.
<< एका व्यक्तीने इतक्या कमी कालावधीत, इतक्या बहुविध क्षेत्रांत , इतका दूरगामी परिणाम करणारं कार्य करून ठेवलं हे अचंबित करणारं आहे.>>
—— सहमत
शतशः नमन.
डाॅ आंबेडकरांना शतशः नमन. खरोखर महामानवच.
केवळ 100 वर्षापुर्वी काय दर्जाच्या लोकांना नेते समजले जायचे आणि आजच्या काळात कसल्या टपराट लोकांना नेते समजले जाते हे पाहिले तर मनुष्याच्या सामाजिक मेंदुची अधोगती झाल्याचे साफ दिसते.
सोकाजीराव, एखादा व्यक्ती
सोकाजीराव, एखादा व्यक्ती प्रांजळ असेल तर तो आकडा देईल. मी शून्य व्यक्तींना भेटलो असेन तर तुम्ही किती व्यक्तींना भेटला आहात हे जाणून घेण्याची आता तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. शिवाय धम्माचं आकलन याचे तुमचे निकष सुद्धा जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. समजा मी नालायक, खोटारडा किंवा अन्य काही आहे, तुम्ही तसे नाही आहात तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही नक्की उत्सुक असाल. कृपया वेगळ्या धाग्यावर तुम्हाला अभिप्रेत असलेला धम्म कोणता हे कळवा. मी तुम्हाला धम्माची आकलन असलेले माझ्या माहितीतले किमान एक नाव सांगेन. इथे मी या धाग्यावर थांबतो. विषयाशी संबंधित संवाद साधायचा असल्यास केव्हांही हाक मारा. इथेच आहे.
राज,
राज,
आकडा देण्याचा आणि प्रांजळपणाचा संबंध नसावा. कारण तसं असतं तर तुम्ही 'मी शून्य व्यक्तींना भेटलो असेन' असं म्हटलं नसत. पण जर तुम्हाला आकड्यात रस आहे तर, जर तुम्ही शून्य व्यक्तींना भेटला असाल आणि त्यातून २ प्रकार कळले असतील तर मी एका व्यक्तीला भेटलो त्याने तिसरा प्रकार कळला.
>> समजा मी नालायक, खोटारडा किंवा अन्य काही आहे, तुम्ही तसे नाही आहात तर या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तुम्ही नक्की उत्सुक असाल.
ह्याचा मूळ लेखाशी आणि माझ्या प्रतिसादाशी काय संबंध आहे हे कळले नाही.
'धम्माचे आकलन' हे, स्पेसिफिकली ह्या धाग्यावर अस्थानी व अवांतर आहे आणि नक्कीच दुसऱ्या स्वतंत्र लेखाचा विषय आहे. त्यामुळे माझ्या आधीच्या प्रतिसादात त्यावर काही लिहिले नव्हते आणि यापुढेही लिहीणे अवांतर असेल.
>> विषयाशी संबंधित संवाद साधायचा असल्यास केव्हांही हाक मारा.
लेखाचा गाभा आणि बाबासाहेबांच्या कामाचा घेतलेला आढावा स्तुत्य आहे आणि लेख मनापासून आवडला हे नमूद करणं हे संवाद साधणच होतं. पुढे विषयाला धरून जशी चर्चा होईल तशी नक्कीच हाक मारेन
- (अवांतर केलेला) सोकाजी
अवांतर टाळणारा >> याला खूप
अवांतर टाळणारा >> याला खूप हसलो.
लेखातलं तुम्हाला आवडलेलं वाक्य हे मी या लेखाच्या सोयीने लिहीले आहे, कारण या संबंधी माहिती का दिली जात नाही त्याबद्दल आहे ते. याचा अर्थ याच दोन कॅटेगरी महत्वाच्या आहेत असं होत नाही. तुम्ही सांगितलेली तिसरी कॅटेगरी भोंगळ आहे आणि ते तुम्हाला महत्वाचं वाटलं यासाठी धम्माचे तुमचे आकलन तुम्ही (या नको) वेगळ्या धाग्यावर सांगितले पाहीजे. तुम्ही बाबासाहेबांचे बुद्ध आणि त्याचा धम्म मी का वाचू असे म्हटल्याचे आठवते. (तुम्ही नसाल ते तर माफ करा). तरीही गोएंका गुरूजींना अपेक्षित असलेला धम्म हाच धम्म आहे आणि त्याचे आकलन नसलेले आकलनशून्य असे तुम्हाला म्हणायचे असेल तर मी तुम्हाला अ तुल भोसेकर, महेंद्र सेनगावकर यांची नावे तुम्हाला माहीत आहेत का हे विचारीन.
>> बाबासाहेबांचे बुद्ध आणि
>> बाबासाहेबांचे दोन प्रकारचे मुख्य अनुयायी आहेत.
ह्या प्रतिसादानंतर लेख परत एकदा वाचला. आणि 'मुख्य' ह्या शब्दाच्या प्रयोजनाचे नव्याने आकलन झाले. पहिला प्रतिसाद देताना हे लक्षात आले नव्हते. त्यामुळे लेखाच्या गाभ्याशी तो तिसरा प्रकार अवांतर होतो*, मान्य! आता तो प्रतिसाद एडीट करता येत नाहीयेय.
*पण तो तिसरा प्रकार भोंगळ नाही, त्याबद्दल दुसर्या योग्य धाग्यावर बोलूया.
>> तुम्ही बाबासाहेबांचे बुद्ध आणि त्याचा धम्म मी का वाचू असे म्हटल्याचे आठवते. (तुम्ही नसाल ते तर माफ करा). तरीही गोएंका गुरूजींना अपेक्षित असलेला धम्म हाच धम्म आहे आणि त्याचे आकलन नसलेले आकलनशून्य असे तुम्हाला म्हणायचे असेल
हे असं मी कुठेही म्हणालो नाहीयेय
- (माणूस) सोकाजी
चांगली माहिती दिलीत!
चांगली माहिती दिलीत!