गेल्यावर्षी समय रैना याच्या India's got latent - या वादग्रस्त शो वर मी निषेध स्वरूपाचा धागा काढला होता.
https://www.maayboli.com/node/86266
मधल्या काळात त्याचे काय झाले फार कल्पना नव्हती. पण तीन दिवसांपूर्वी त्याचा युट्युब वर नवीन व्हिडिओ आलेला दिसला. समय रैना स्टील अलाईव्ह म्हणत त्याने कमबॅक केले होते.
पुढच्या दोन दिवसात त्याचे वेगाने वाढते व्ह्यू बघून मी त्या व्हिडिओ खालच्या कॉमेंट वाचल्या तर उत्सुकता वाढली. तसेही काही त्याच्याशी वैयक्तिक वैर नव्हते. उलट त्याचे काही व्हिडिओ ज्याचे कंटेंट मला झेपणारे होते ते आवडले सुद्धा होते. तसेच जर मी एखाद्या गोष्टीवर निषेधाचा धागा काढतो तर ते प्रकरण पुढे फॉलो करणे ही सुद्धा एक प्रकारे माझी नैतिक जबाबदारी आहे असे वाटते. त्यामुळे कुठलेही पूर्वग्रहदूषित मत न ठेवता किंवा आधीच जज न करता काल त्याचा त्या प्रकरणावरचा लेटेस्ट व्हिडिओ बघायला घेतला.
तुम्ही व्हिडिओ इथे बघू शकता
https://youtu.be/LhpZJwUboeI?si=LeJFtXCL8b8fvvhX
समयची स्टँडअप कॉमेडी स्टाईल चांगली आहे, विनोदाचा टायमिंग आणि स्टेजवरची कमांड भारी आहे हे माहीत होतेच. पण कालच्या शो मध्ये त्याने हसवले, रडवले, कॉमेडीसह अँक्टींग सुद्धा केली, एक कॅरेक्टर तो जगला, त्यामुळे हा शो नेक्स्ट लेव्हल वाटला.
त्याने या शोमध्ये त्याची त्या प्रकरणात काय चूक झाली, का झाली, त्याची कारणमीमांसा आणि त्यानंतर त्याला काय काय भोगावे लागले आणि कसा बाहेर पडला हे सगळे विनोदी ढंगात सादर केले.
त्याच्या म्हणण्यानुसार त्या वादग्रस्त शोमध्ये यापेक्षा जास्त वाह्यात गोष्टी व्हायच्या. पण तो युट्युबवर टाकताना एडिट करून त्या उडवून टाकायचा. पण त्या शो मध्ये जे दोन वादग्रस्त आयटम होते ते त्याने का उडवले नाहीत याचे त्याने कालच्या शो मध्ये स्पष्टीकरण दिले. मला ते काही पटले नाही.
१) इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये भाग घेणारा एक रँडम मुलगा तिथे गेस्ट म्हणून आलेल्या मुलीला म्हणतो मे तेरे vagina मे sensation कर दुंगा..
आणि ती प्रत्युत्तरादाखल त्या मुलाला म्हणते, पैदा होने के बाद फिर कभी vagina देखी भी है लौडे...
याचा संबंध समयने काल वुमन एम्पॉवरमेंट, स्त्री सक्षमीकरणाशी जोडला. एका मुलीने एका मुलाला सडेतोड उत्तर दिले म्हणून तिचे कौतुक केले. ज्यात आधी ती मुलगी सगळे आपली खेचत आहेत म्हणून रडत होती. आणि मग तिने एकाला असे कडक उत्तर देत समोरच्याची बोलती बंद केली आणि कमबॅक केले. याचे कौतुक वाटून त्याने एडिट करताना हे उडवले नाही असे त्याचे म्हणणे होते.
पण मुळात हे काही एका मुलीने रस्त्यावरच्या छेड काढणाऱ्या मवाल्यांना उलट दिलेले उत्तर नव्हते. अश्या केसमध्ये मलाही कौतुक वाटले असते की जश्यास तसे उत्तर दिले. पण इथे मुळात त्या कार्यक्रमाचीच रूपरेषा तशी होती. इथले मवाली स्वतःहून आमंत्रित केले होते आणि त्यांना म्हटले होते की या आणि आमची इज्जत लूटा मग आम्ही सुद्धा बघा तुम्हाला कसे सडेतोड उत्तर देत तुमचीही लाज काढतो. त्या मुलाला एका मुलीवर अशी घाणेरडी कॉमेंट करायला प्लॅटफॉर्म तुम्हीच उपलब्ध करून दिला होता. स्वतःच असे वाह्यात प्रकार आयोजित करायचे आणि मुलीने सुद्धा बघा काय बिनधास्त उत्तर दिले म्हणून तिची पाठ थोपटायची हे मला तरी एकूणच हास्यास्पद वाटले.
२) बिअर बायसेप मुलाने जे आईवडिलांबद्दल म्हटले ते मला इथे लिहावेसे सुद्धा वाटत नाही इतके खालच्या पातळीचे आहे. समाधानाची गोष्ट म्हणजे समय रैनाने स्वतःही हे मान्य केले की ते खरेच तितके घाणेरडे होते जे त्यालाही स्वतःहून कोणाला सांगावेसे वाटत नव्हते. पण तरी देखील त्याने ते का उडवले नाही याचे स्पष्टीकरण देताना तो म्हणतो की त्या बिअर बायसेपने तो सेम प्रश्न एकूण आठ स्पर्धकांना विचारला होता. म्हणून त्याने नाईलाजाने त्याचे मन राखायला तो ठेवला. हे काय लॉजिक झाले त्याचे त्यालाच ठाऊक.
..
वरची दोन्ही स्पष्टीकरणे पटली नाहीत पण तरी त्याची एक गोष्ट पटली की त्यानंतर त्याच्याशी जे झाले ते अती होते.
गेलो वाहवत, झाली चुकी, शेवटी तो एक जोक होता, त्या बदल्यात जीव घ्याल का आमचा? हे त्याचे म्हणणे पटले.
पण दुर्दैवाने जसे ते लोकं पैसे कमवायला असे वल्गर शो आयोजित करतात तसेच आपली मीडिया सुद्धा टीआरपी मिळवून पैसे कमवायला कुठे कांड दिसले की हात धुवून मागे लागते. आणि काही सो कॉलड संस्कृतीरक्षक राजकीय संघटना देखील आपली पोळी भाजायला ताणून मोठा इश्यू करतात. या सिस्टिमचा त्याला फटका बसला. थोडक्यात त्याने केले ते चुकच होते आणि त्याच्याशी नंतर जे अती झाले ते सुद्धा चूक झाले.
पण पुढील महत्वाचा मुद्दा ज्यासाठी हा धागा काढावा असे वाटले,
एकूण झाल्या प्रकारावर त्याने म्हटले की आपल्या देशात बिनधास्त विनोद करायची चोरी आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बोंब आहे. आणि हे खरेच आहे.
पण,
हा मुद्दा तेव्हा लागू जेव्हा कोणी कॉमेडियन कुठल्या नेत्यावर, भ्रष्ट सिस्टीमवर, समाजाच्या डबल स्टॅंडर्डवर, संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गोष्टींवर विनोद करतो आणि संबंधित लोकांना ते विनोद म्हणून घेता येत नाही. ते लोकं श्रद्धा भावना दुखावल्या म्हणून त्यांच्या मागे लागतात किंवा राजकीय संघटना आपल्या विरोधात असलेल्या मताची मुस्कटदाबी करतात.
पण या केसमध्ये तुम्ही विनोदाच्या माध्यमातून अशी काही टिप्पणी केली नव्हती. त्यामुळे इथे कलेची मुस्कटदाबी झाली म्हणत त्याने स्वत:ला आणि अश्या वाह्यात विनोदाना त्या पंक्तीत बसवू नये असे वाटते. मुळात वरचे दोन विनोद हे विनोद तरी होते का हा मला पडलेला पहिला प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याकडे अभिव्यक्तिस्वातंत्र्याची तशी बोंबच आहे हे कितीही खरे असली तरी या प्रकरणात विनोदाची मुस्कटदाबी झाली म्हणणे मला पटले नाही. हा कांगावा वाटला. आणि तो घातक वाटला. कारण अश्याने जिथे खरेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे तिथे कोणी स्टँड घेणार नाही.
याव्यतिरिक्त त्याने कालच्या शो मध्ये अजून एक ताजा विनोद मारला. अमिताभ बच्चन यांच्यावर विनोद करताना म्हणाला की तुम्ही सगळ्यांना पोलिओ डोस वाटत फिरता मग स्वतःच्या मुलाला आपल्या पायावर का उभे करू शकला नाहीत. याला मात्र विनोद म्हणू शकतो. भले मला असले विनोद आवडत नाहीत. पण ज्याची त्याची चॉईस. आणि प्रत्येकाच्या आवडीचा आदर आहे.
पण त्याचवेळी मनात हा प्रश्न देखील आला की जर या केसमध्ये अमिताभने किंवा अभिषेकने हे स्पोर्टिंगली घेतले नाही तर त्यांचे वागणे अयोग्य ठरेल का? काहीही संदर्भ आणि संबंध नसताना कोणी अशी अनावश्यक वैयक्तिक टिपणी करत असेल तर संबंधिताने ती विनोद म्हणूनच घ्यावी हा अट्टाहास सुद्धा चुकीचाच नाही का?
काही गोष्टी मला आवडल्या. इतक्या की माझे स्वतःचेच विचार आणि स्वतःचीच जगायची शैली वाटली त्या सुद्धा नमूद करतो.
१) आपले आयुष्य आपल्या मर्जीने जगावे. लोकांची पर्वा करू नये. महत्वाचे म्हणजे इमेज जपायची पर्वा करू नये. जसे आपण आहोत तसे राहावे. अन्यथा इमेज जपायचे स्ट्रेस घेऊन आयुष्यभर राहावे लागते. आणि त्यातही एकदा का तुम्ही चुकलात की संधी साधून असलेले लोक तुमच्यावर तुटून पडतात.
२) या काळात त्याला मिळालेला फॅमिली सपोर्ट. आणि त्या अनुषंगाने वडिलांबद्दल त्याने मांडलेले विचार. भले ते क्लिशे असले तरी एक मुलगा आणि आता एक बाप म्हणून ते पटतातच.
३) शोच्या अगदी शेवटी आलेला विचार. ऑफिसमध्ये दोन पीपीटी आणि चार एक्सेल शीट बनवल्या म्हणजे दिवस प्रॉडक्टिव गेला असे आपण समजतो आणि काही काम न करता मित्रांसोबत दिवसभर चकाट्या पिटतो तेव्हा तो वाया गेला असे समजतो.
पण प्रत्यक्षात हे उलटे असते 
हे विचार पटले. माझेच वाटले. मी साधारण असाच जगतो म्हणून आवडले. पण नसतेही मला रिलेट होणारे तरीही या विचारांचे कौतुकच केले असते.
Moral of The धागा --
बंदे मे टॅलेंट तो कूट कूट के भरा हुआ है.
फक्त त्याने ते योग्य प्रकारे वापरावे यासाठी त्याला शुभेच्छा 
शुभेच्छुक,
-ऋन्मेऽऽष
अभिषेक वरचा जोक बिअर
अभिषेक वरचा जोक बिअर बायसेपच्या जोकपेक्षा क्रूर आहे.
बाकी तेव्हाही गळचेपी निषेधार्ह वाटलेली, त्यात आजही काही बदल नाही. व्यक्तिशः मला समय रैना आणि बियर बायसेप कधी आवडले नाहीत पण तरीही.
तुम्हाला व्यक्तिशः एखादा जोक offensive वाटला म्हणून तो इव्हेंट अरेंज करणाऱ्यांवर, जोक मारणाऱ्यांवर पोलिस केस करणे साफ चुकीचे आहे आणि असे करू देणारा कायदा साफ भंकस आहे.
हो, आसाम पोलिस वगैरे त्याच्या
हो, आसाम पोलिस वगैरे त्याच्या मागे लागलेले हे हास्यास्पद आहे.
याबाबत काहीतरी ठोस कायदा हवा, सिस्टीम हवी. जेणेकरून कोणाला तक्रार करायची असेल तर त्याला तक्रारही करता येईल आणि ज्यांचा अश्या प्रकरणाशी काही संबंध नाही त्यांना दूर सुद्धा ठेवता येईल. जेणेकरून ज्यावर तक्रार झाली आहे त्याला इतरांचा नाहक मनस्ताप होणार नाही.
बाकी अभिषेक वरील जोक तुमच्या-माझ्या मते क्रूर असला तरी निदान जोक तरी होता. तो जोक म्हणून आवडणारे सुद्धा असतीलच या जगात. मला पडलेला प्रश्न असा की अभिषेकला आपली नाराजी व्यक्त करायचा आणि कुठेतरी तक्रार करायचा अधिकार असावा का? जर या जोकमधून समय रैना पैसे कमावणार असेल तर टेक्निकली त्यातही तो वाटा मागू शकतो का?
जर या जोकमधून समय रैना पैसे
जर या जोकमधून समय रैना पैसे कमावणार असेल तर टेक्निकली त्यातही तो वाटा मागू शकतो का? <<
या वाक्याचे प्रयोजन केवळ प्रतिसाद वाढावेत हेच असावे..
बाकी अभिषेक वरील जोक तुमच्या
बाकी अभिषेक वरील जोक तुमच्या-माझ्या मते क्रूर असला तरी निदान जोक तरी होता.
>>>आई वडिलांवरचा हायपोथेटिकल प्रश्न तुम्हाला विचित्र वाटेल आणि अन्कमफोर्टेबल करू शकणारा असेल. पण एका विशिष्ट व्यक्तीची क्रूर थट्टा होत नाहीये. इथे थेट अभिषेकला टार्गेट केले जात आहे. तरीही लोकांनी एका जोकवरून दंगा केला दुसऱ्यावर केला नाही. ठीक आहे, दंगा करा. पण पोलिस केस करणे चुकीचे आहे. पोलिसांनी एंटरटेन करणे चुकीचे आहे.
अभिषेकला नाराजी व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत. तो पब्लिक स्टेटमेंट देऊ शकतो. तक्रार करण्याचा अधिकार नसावा. जोक मुळे त्याची थेट बदनामी किंवा प्रायव्हसी भंग झाली नाहीये किंवा थेट नुकसान झाले नाहीये. आता थेट नुकसान कधी होते ह्याचे तपशीलवार कायदेशीर स्टँडर्ड आहेत. त्याबाबतही मतभेद असू शकतात. पण केवळ "भावना दुखावल्या" "अश्लिल" हा तक्रार नोंदवण्याचा निकष अमान्य आहे.
<<<< जोक मुळे त्याची थेट
<<<< जोक मुळे त्याची थेट बदनामी किंवा प्रायव्हसी भंग झाली नाहीये
>>>>>
बदनामी झाली नाहीये? मला तर वाटते झाली आहे. थेट बदनामी काही वेगळी असल्यास कल्पना नाही.
आणि बदनामी झाली नसेल तर तो विनोद तुम्हाला तरी क्रूर का वाटला हे आहेच.
<<<< तो पब्लिक स्टेटमेंट देऊ शकतो. तक्रार करण्याचा अधिकार नसावा.
>>>>
त्याने तक्रार केली तर निदान त्याला आर्थिक फायदा किंवा मानसिक समाधान तरी मिळेल. पण पब्लिक स्टेटमेंट देणे म्हणजे आणखी त्या विनोदाला गावभर पसरवणे.
म्हणजे रस्त्यात एकट्या दुकट्या मुलीची कुठल्या मवाल्याने छेड काढली तर तिने स्टेटमेंट द्यावी, आपल्याशी जे घडले ते गावभर करावे, पण तक्रार करू नये. कारण त्याने तिच्या अंगाला हात लावला नाही. फक्त कॉमेंट पास केली आहे. त्यामुळे हा थेट विनयभंग नाहीये हे काय लॉजिक आहे
अर्थात, अभिषेक सेलिब्रिटी आहे. तो हे प्रकरण वाढवणार नाही याची आपल्याला आणि समय रैनाला सुद्धा कल्पना आहे. एका अर्थी तो सॉफ्ट टारगेट आहे.
@ अनिरुद्ध,
@ अनिरुद्ध,
तुम्हाला असे का वाटले की माझा तो मुद्दा जेन्युइन नव्हता?
Copyright हा शब्द ऐकला असेलच. आपल्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी कुठल्याही व्यक्तीचे किंवा त्याच्या कलाकृतीचे नाव गाव फळ फूल वापरत असाल तर परवानगी घ्यावी लागते आणि मागणी झाल्यास पैसे मोजावे लागतात.
तसेच जाहिरातीसाठी जे चेहरे वापरले जातात त्याचेही पैसे मोजावे लागतात. अन्यथा कोणीही लोकल ब्रँड आपल्या प्रॉडक्टवर शाहरुखचा फोटो किंवा नाव लाऊन जाहिरात करेन.