हरवलेली माणुसकी

Submitted by 'कल्पनेचा कुंचला' ✍️ on 9 April, 2026 - 11:24

नको नको देवा पुन्हा, मनुष्यजन्म या पृथ्वीवर,
माणुसकीचा गंध आणि प्रेम, उरले नाही या जगण्यावर।

स्वार्थासाठी ओरबाडून, निसर्ग हा संपत चालला,
“आपलाच हक्क असावा”, असा अट्टाहास का मांडला?

माणूस आता माणूस नाही, अपेक्षांचा तो गुलाम झाला,
जाती-धर्माच्या कुंपणांनी, तुकड्यांत तो विभागला।

डोंगर-दऱ्या अन अथांग सागर, ओसंडून वाहती नदी,
एवढ्या सुंदर पृथ्वीची, कोणालाच का कळेना महती?

सुंदर या वसुंधरेवर, सीमारेषा अनेक आखल्या,
शेजारी असूनही माणसांच्या, कुरापती मात्र वाढल्या।

जमीन ज्यांनी घडवली नाही, आभाळ ज्यांना कळले नाही,
मालकीचा हक्क सांगती, ज्यांचे स्वतःचे अस्तित्वही नाही।

सोबत काही येणार नाही, हे सत्य का त्याला कळेना?
माणूस फक्त प्रेमाचा भुकेला, हेही त्याला उमजेना।

लोकांना देवा, थोडी विवेकबुद्धी आणि सहानुभूती दे,
दुसऱ्याचे दुःख कळावे, इतकी तरी चांगली बुद्धी दे।

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>जमीन ज्यांनी घडवली नाही, आभाळ ज्यांना कळले नाही,
मालकीचा हक्क सांगती, ज्यांचे स्वतःचे अस्तित्वही नाही।

या कडव्याचा अर्थ सांगाल का?

कविता ठीक.

धनश्री .
तुम्ही दिलेल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
या दोन ओळींमधून मी एवढेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, 'माणूस स्वतःला सृष्टीचा मालक समजतो, पण तो प्रत्यक्षात फक्त एक पाहुणा आहे.' तरीही आपण जणू या जगाचे कायमस्वरूपी मालक आहोत, अशा आविर्भावात वावरतो. ही पृथ्वी करोडो वर्षांपासून अस्तित्वात आहे आणि पुढेही राहील; मग ज्याचे स्वतःचे आयुष्यच क्षणभंगुर आहे, तो या शाश्वत निसर्गावर स्वतःचा 'हक्क' कसा काय सांगू शकतो? हा निव्वळ माणसाचा अहंकार आहे. माणसाने स्वतःसोबतच इतर प्राणी आणि पक्ष्यांच्या अस्तित्वाचाही सन्मान राखला पाहिजे.