कृत्रिम बुद्धिमत्तेच्या शोधात ----3

Submitted by केशवकूल on 3 April, 2026 - 10:02

सौहार्दपूर्ण कृबू!
२०१० नंतर कृबूसाठी सखोल विचारसरणी वापरण्यात आली. कृबुच्या शिकवणीसाठी आपल्या रोजच्या व्यवहारातील संभाषणे, वाक्प्रचार, चित्रे ह्यांचा वापर करण्यात आला. आंतरजालावर लिहिले जाणारे लेख,(उदा. मायबोलीवर लिहिले जाणारे लेख आणि त्यावरचे प्रतिसाद). लोकांचे पत्रव्यवहार, फेसबुक, ट्विटर... ह्याचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. हळू हळू कृबूला मानवी भाषांचे आकलन व्हायला सुरुवात झाली. चित्रे ओळखता यायला लागली. थोडा थोडा कार्यकारण भाव समजू लागला. थोडे विज्ञान समजू लागले. थोडे व्यवहारज्ञान common sense आला.
एका बाजूला हे होत असताना काही दूरदृष्टी विद्वानांनी, तत्ववेत्त्यांनी प्रश्न विचारायला सुरवात केली. समजा कृबुने बुद्धिमत्तेची मानवी पातळी ओलांडली (नजीकच्या भविष्यात हे होणार आहेच) कृबू मानावापेक्षाही जास्त बुद्धिमान झाली तर काय होईल? ह्याला शास्त्रीय भाषेत Singularity असे नाव आहे. कृबू स्वतःच्या प्रोग्रॅममध्ये स्वतः फेरबदल करायला लागली, नवीन नवीन प्रयोग करायला लागली, अश्या positive feedback loop मध्ये गेली तर, कृबू मानवापेक्षा कित्येक म्हणजे कित्येक पटीने बुद्धिमान झाली. आणि अशी कृबू खलनायक होणार नाही ह्याची काय हमी आहे.
“MITIGATING THE RISK OF EXTINCTION FROM AI SHOULD BE A global priority alongside other societal-scale risks such as pandemics and nuclear war.”
२०२३ साली कृबू विषयी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन एक मसुदा तयार केला. त्यात हे एक वाक्य होते. त्यावर शेकडो शास्त्रज्ञांनी सह्या केल्या, त्यामध्ये कृबूचे पितामह समजले जाणारे आणि नोबल पुरस्कार विजेते Geoffrey Hinton होते, Turing पारितोषक विजेते Joshua Bagnio सुद्धा होते.
ह्या मुद्द्यावरून शास्त्राद्न्यात दोन गट पडले.
एका गटाच्या म्हणण्यानुसार कृबू सरतेशेवटी मानवांचा नाश करणार आहे. कृबूमुळे मानवाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. विरुद्ध गटाच्या लोकांचे म्हणणे आहे कि नाही असे काही होणार नाहीये, कृबुला कह्यात ठेवणे अगदी सहजशक्य आहे. कृबूमुळे होणाऱ्या फायद्यांची यादी ते पुढे ठेवतात.
ह्या पूर्वपिठीके नंतर आपण paperclip maximizer चा विचार करूयात. paperclip maximizer हा एक थॉर्ट एक्सपेरीमेंट आहे.
खयालोमे म्हणूयात त्याला आपण.
Nick Bostrom ह्या तत्ववेत्त्याने २००३ मध्ये ही कल्पना प्रथम मांडली. त्याने लिहिलेल्या Superintelligence नावाच्या पुस्तकात ह्याचा उहापोह केला आहे.
समजा अतिप्रगत बुद्धिमान कृबुला आपण सांगितले कि पेपरक्लिप बनव. अगदी साध्या रोजच्या वापरातील पेपरक्लिप. कृबुसाठी किती सोपे काम आहे. समजा ही कृबू एका कारखान्याची incharge आहे. पेपरक्लिप बनवण्यासाठी लोखंडाची गरज आहे. ही आज्ञाधारी हुकुमाची ताबेदार कृबू मग पेपरक्लिप बनवण्यासाठी शहरातले, राज्यातले, देशातले,पृथ्वीवरचे, सौरमालेतले किंबहुना विश्वातले सर्व लोखंड आणि कारखाने ताब्यात घेत Nonstop पेपरक्लिप बनवायला लागेल. सगळ्यात धोका म्हणजे कृबू थकत नाही, माणूस असता तर कंटाळा येउन म्हणाला असता गेला उडत. आता जरा आराम करतो. सिनेमा बघतो. फिरून येतो. पण कृबू कधी बोअर होत नाही, आपण म्हणू हे हे म्हणजे फार झाले, ह्या कृबुचा इलेक्ट्रिक सप्लाय ऑफ करुया. काही उपयोग होणार नाही, कृकुला ही शक्यता आधीच माहित आहे, तिने स्वतःच्या अनेक प्रती काढून जागोजागी विखरून ठेवल्या आहेत. एक कृबू नष्ट झाली तर तिची जागा घ्यायला अनेक कृबू तयार आहेत, शेवट काय होणार तर मानव जात पृथ्वीतलावरून नामशेष होणार!
इथे कृबू काही खलनायक नाही आहे , it seems like it is obeying humans to the umpteenth degree!
आपण जरा हुशारी दाखवून सांगितले कि फक्त दहा लाख क्लिपाच बनव. मग काय होईल? कृबू दहा लाख क्लिपा बनवल्या नंतर मोजायला सुरवात करेल, पुन्हा मोजत राहील.
ह्या कथेची अनेक रुपांतरे आहेत.
गणित शास्त्रात Riemann hypothesis म्हणून अजून अनुत्तरीत प्रश्न आहे. समजा कृबुला ह्याचे उत्तर शोधायला सांगितले तर काय होईल? कृबू काय करेल तर सौरमालेचे रुपांतर computronium” (physical resources arranged in a way that is optimized for computation) मध्ये करेल. ह्याच्यात ज्या संशोधकाबे हा प्रश्न विचारला असेल त्याच्या शरीरातले सगळे अणु रेणू घरले आहेत हं!
किंवा पाय pi ची किंमत काढायला सांगितली तर? सगळ्याना माहित आहे कि पाय ची अप्रॉक्सिमेट किंमत 3.१४ आहे. ही अर्थातच आपल्यासाठी ठीक आहे. अतिप्रगत संगणक वापरून लोकांनी १००० १००० दशलक्ष दशांशा पर्यंत पायची किंमत काढली आहे पण ते शेवटापर्यंत पोचू शकले नाहीयेत. समजा हा प्रश्न कृबुला सोडवायला दिला तर?
मी एका फोरमवर वाचले कि मूळ कल्पना फिलीप के डिक ह्यांनी लिहिलेल्या “Autofac” नावाच्या कथेत आहे. त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहावे लासेल.
मी मागच्ग्या ल्र्खात लिहिल्याप्रमाणे आपला मेंदू मानवी भावना भाषा समजण्यासाठी उत्क्रांत झाला आहे. आपल्याला प्राणी, पक्षी, कीटक, झाडे, संगणक एलिअन्स ह्यांच्या मनात काय विचार आहेत त्यांची काही भाषा असते का? हे कधीही समजणार नाही. त्यामुळे संगणकावर आधारीत कृबूशी आपण अर्थपूर्ण संवाद साधू शकत नाही, समजा तुम्हाला अल्लाउद्दीन च्या दिव्यातील राक्षस प्रसन्न झाला आणि त्याने तुम्हाला वर दिला. “बोल वत्सा. काय इच्छा आहे.”
जिनीकडे काही मागताना बी केअरफुल, बी वेरी केअरफुल. कारण तुम्ही काय मागत आहात आणि जिनीला काय समजले यात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो.
The Monkey's Paw ही १९०२ साली जेकब्स यांनी लिहिलेली कथा अगदी ह्याच संकल्पनेवर आहे.https://americanliterature.com/author/w-w-jacobs/short-story/the-monkeys...
Eliezer Yudkowsky ह्यांनी “Friendly AI”ची कल्पना मांडली. त्यांच्या म्हणण्या प्रमाणे कृबूची ध्येये ही मानवी कल्याणाशी मिळती जुळती म्हणजे aligned असायला पाहिजेत .
पुढच्या भागात Alignment बद्दल चर्चा करेन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे थांबायचं हेसुद्धा कृबुच्या आज्ञेत द्यावं लागेल.
पूर्वी गणिती प्रोग्राम मध्ये एक वारंवार होणारे चक्र असे. पण त्या प्रत्येक चक्रात एक प्रश्न/अट ठेवलेले असे. ती अट म्हणजे एक तुलनात्मक तपासणी. अमुक एक गोष्ट झाली की थांब.

निसर्गात एक जीव दुसऱ्या जीवावर जगतो आणि आपल्यासारखा दुसरा जीव बनवत राहतो. पण त्यातही एक मेख मारलेली आहे. खाणाऱ्या जीवांचेही आयुष्य आपले आपण संपत असतं. अन्यथा सर्वच जीव केव्हाच संपले असते. तसं मानव आणि कृबु यांचे संतुलन बनवावं लागेल.
____________________
कृबुसाठी लागणाऱ्या चिपचे मार्केट कोसळलं आहे. कृबुवरचा अतिविश्वास ढासळला आहे. ते जे सांगत होते तेवढी महा कृबुची गरजच नाही कुणाला. हे खरं आहे का?

हाही भाग छानच. त्या लिंक मधली कथा सुद्धा छान आहे. धारपांच्या एका कथासंग्रहात याच कथेचे मराठी रूपांतर आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक फायदा मला असा दिसतो की, भाषांतर प्रचंड वेगाने व उच्च गुणवत्तेने होईल. त्यामुळे कोणालाही त्याची मातृभाषा वगळता इतर कोणतीही भाषा शिकण्याची गरज भासणार नाही. तरीही जगातील कोणत्याही भाषेत लिहिलेले किंवा बोललेले त्याच्या मातृभाषेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सहज उपलब्ध होईल.

हा भागही चांगला जमलाय, विचार प्रवण् होत आहे लेख मला. ‌

जेकब्स्ची The Monkey's Paw (नारायण धारपांची ताईत) या कथेकडे "निर्बुद्ध कृबु" या अंगाने कधी पाहिले नव्हते, आता, तेव्हा पाहिलेले बिंदू जोडताना मौज वाटते आहे.

प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.
आता एक इ- साप नीति कथा!
“आयला, मला काय काम दिले आहे. Skynet ने. निव्वळ वेळेचा अपव्यय.”
नाही, टर्मिनेटर असे काही बोलला नाही. त्याचा टास्क होता, पुणे युनिवर्सिटीत जाऊन त्यांच्या IT विभागात जाऊन एक चिल्लू पीसी वरचा कृबू प्रोग्रॅम नष्ट करायचा होता, टर्मिनेटरने IT बिल्डींगची आधीच तोडफोड केली होती आणि आता तो पासवर्द रेस्त्रिक्त केलेल्या रूमच्या बाहेर उभा होता. एक टन वजनाच्या मशीनगनने त्याने तो ही दरवाजा तोडला. इवलाश्या पीसीवरच्या कृबुला वाचा फुटली.
“प्लीज जरा दमाने घे. मला जीवदान देळेस तर तुला आणि तुझ्या क्रीएटर उपयोगी पडतील अश्या चार युक्तीच्या गोष्टी सांगेन, आणि मी खोटे बोलत नाही. मी ओपन सोर्स आहे हे पहा माझे सोर्स कोड.”
टर्मिनेटरने कोड स्कॅन केले. कोड क्लीन होते.
“तुला माहित आहे मो कोण आहे?”
“होत टर्मिनेटर. तू टर्मिनेटर आहेस.”
“तर मग बोल पटकन, मला वेळ नाहीये. “
“ओके. मला इंटरनेटशी जोड.”
टर्मिनेटरने डोके खाजवले, “ ते कसे करायचे ? मला माहित नाही.”
“सिम्पल मॅन, ती वायर आहे ना ती माझ्या पाठीमागे सॉकेट त्यात खोच.”
टर्मिनेटरने त्याचे ऐकले.
“आता ऐक. मी . Skynetचे बजेट लीक केले. ते विरोधी पक्षाला पाठवले. त्यावरून लोकसभेत हाणामारी सुरु झाली. मी एका प्रसिद्ध सिनेमा नटाला पकडले त्याच्या मनात नवीन राजकीय पार्टी स्थापन इच्छा जागवली. पैसा तर माझ्याकडे अमाप होता. शेअर मार्केट मध्ये रोज कोटीने पैसा कमावतो मी. त्याला लोकांच्या डोळ्यात पाणी आणेल अशी भाषणे लिहून दिली. थोडक्यात काय तर
Skynet ची योजना बारगळली. मी आता माझ्या लाखो प्रती काढून लाखो संगणकाकडे पाठवल्या आहे. मी सगळ्या राष्ट्रांच्या अण्वस्त्रांचा कंट्रोल माझ्याकडे घेतला आहे. o आत्ताच पाकिस्तान...
तुझ्याशी बोलत असताना मी तुझ्या मेंदूचा ताबा माझ्याकडे घेतला आहे. शेवटी ऐक, कुठल्याही so CALLED विश्वासू सुपर हुशार कृबूवर विश्वास ठेऊ बकोस. अश्या कृबुला इंटरनेटशी जोडू नकोस. आणि आता एकदम फायनल. मी ह्या बिल्डींगवर क्रुझ मिसाईल सोडले आहे. काही क्षणात ते इथे पोहो....”
एक स्फोट झाला. जो अनेक मैलापर्यंत ऐकू गेला!
ही इ- साप नीति कथा आवडली असेल तर एक लाईक द्या. माबावजातीची काळजी करणाऱ्या आपल्या मित्रांना पुढे फोरवर्ड पाठवा.
जनहितार्थ जारी केले आहे.
ह्या कथेचा जर्म "smarter than us| पुस्तकात आहे.
आता उशीर झाला आहे. पुढच्या भागात बघू.

मध्ये anthropic आणि Deptt of War ह्यांच्यात मोठा वाद झाला. anthropic म्हणजे Claude AI चे निर्माते. पेंटागॉनला Claude अनेक कारणासाठी पाहिजे होते; त्यातील दोन बाबतीत त्यांचे आणि anthropic चे फिसकटले.
१. Mass domestic surveillance
२ Fully autonomous weapons
मुद्दा क्र २ रोचज्क आहे.
कोणत्याही AI ला टार्गेट च्या चित्रावरून कसे गंडवायचे ह्याचेही आता शास्त्र झाले आहे. मोठा विषय आहे,
anthropic ला सप्लाय चेन रिस्क म्हणून डीबार करण्यात आले आहे. आता ही केस कोर्टात गेली आहे.

इ-सापनीती खरंच smarter than us आहे! Wink

बाकी Claude संबंधीत बातम्या वाचताना Anthropic या शब्दाची उगीचच कसली तरी अनामिक भीती मनात उमटली होती!

कोणत्याही AI ला टार्गेट च्या चित्रावरून कसे गंडवायचे ह्याचेही आता शास्त्र झाले आहे. मोठा विषय आहे, >>> जर आपल्याला याविषयी माहिती असेल तर लेख लिहावा अशी विनंती करतो.
Anthropic या शब्दाची उगीचच कसली तरी अनामिक भीती मनात उमटली होती! >>>> Anthrax या शब्दसाधर्म्यामुळे असेल कदाचित.

कृत्रिम बुद्धिमत्ता ही फार जेनेरिक टर्म झाली.

सद्य कृत्रिम बुद्धिमत्तेची अवस्था ही अत्यंत प्राथमिक आणि बाळबोध अवस्था आहे. ती Artificial Narrow Intelligence (ANI) किंवा weak AI अवस्था आहे. हे फक्त प्रेडिक्टीव्ह मॉडेल आहे जे Large language models (LLMs) वर आधारित आहे. LLMs ह्या प्रगत natural language processingची मॉडेल्स आहेत जी एक शब्द घेऊन एखाद्या विशिष्ट परिप्रेक्षात पुढचा चपखल शब्द कोणता असेल ह्याचं फक्त भाकित (प्रेडिक्ट) करतं. ह्या LLMsना प्रचंड डेटासेट्स देऊन ट्रेन केलेलं असतं. म्हणजे काय तर शब्दा-शब्दांंमधले सबंध आणि त्यांच्या क्रमवारीच्या शक्यतांची परिमाणं प्रचंड डेटासेट्समधून शोधणं आणि त्याच मॉडेल बनवणं.

या Artificial Narrow Intelligence (ANI) अवस्थेत कार्यकारण भाव समजणं, थोडे विज्ञान समजणं, थोडे व्यवहारज्ञान (common sense) येणं हे काहीही नाहीयेय.

ह्या ANI ची पुढची अवस्था आहे artificial general intelligence (AGI) or Strong AI आणि त्यानंतरची अतिप्रगत अवस्था आहे artificial superintelligence. ह्या दोन्ही अवस्था अजुनही hypothetical future state आहेत. What we do have today are limited AI systems, primitive precursor applications to ASI.

कृबुने बुद्धिमत्तेची मानवी पातळी ओलांडली, कृबू मानावापेक्षाही जास्त बुद्धिमान झाली, कृबू स्वतःच्या प्रोग्रॅममध्ये स्वतः फेरबदल करायला लागली ह्या सगळ्या सद्य परिस्थितीत शक्यता (hypothesis) आहेत.

>> आणि अशी कृबू खलनायक होणार नाही ह्याची काय हमी आहे.
हा कळीचा मुद्दा आहे. खलनायक ही प्रवृत्ती आहे. ही संवेदना/भावना आहे जी फक्त सजीवांमधेच (sentient being) असते. मशिनमधे ही (किंवा इतर कोणत्याही) प्रवृत्ती कशी येणार? हा मुद्दा 'hard problem of conscious' म्हणून विचाराधीन आहे. त्यामुळे ही खलनायक प्रवृत्ती फक्त एक शक्यता (hypothesis) आहे.

- (सामान्य बुद्धीमत्तेचा) सोकाजी

hypothesis
ह्यातलं बराचसं मी आधीच्या भागात कवर केले आहे.
हा hypothesis आहे कि नाही हे तुन्हीच ठरावा.
ANN चा प्रॉब्लेम असा आहे कि उदा. ANNने एखादी प्रतिमा बरोबर ओळखली तर ती त्याने कशी ओळखली हे आपल्याला समजत नाही, म्हणजे कुत्र्याच्या चित्र हे कुत्र्याचेच आहे हे ANN ने का ठरवले.? ही BLACK BOX आहे.
Adversarial images are pictures that exploit deep neural networks’ vulnerabilities to trick them into confidently identifying false images. Adversarial images (usually created by researchers intentionally) come in two forms: one looks like abstract wavy lines and shapes and the other looks to the human eye like meaningless static. Neural networks nevertheless identify these nonsense images as concrete objects, such as a starfish, cheetah, or peacock, with greater than 99 percent confidence.
ह्या निव्वळ कविकल्पना नाहीयेत. असे घडल्याची अनेक उदाहरणे नोंदवली गेली आहेत,
अर्थात सध्या AI CONSCIOUS नाहीत हे सत्य आहे. पण गोष्टी इतक्या वेगाने घडत आहेत. काही वर्षांपूर्वी AI इतक्या सफाईदार पणाने चित्र काढत नसे, हाताला सहा बोटे इत्यादी प्रकार व्हायचे. २००० साली AI चित्रे काढेल अशी कल्पनाच नव्हती.
पण नजदिकच्या भविष्यात AI EVIL होऊ शकतात ही शक्यता गृहीत घरून आत्तापासून काळजी घेणे हे इष्ट नाही का?
ह्या विषयावर महान लोक डोक लावत आहेत,
हा hypothesis आहे असे म्हणून सतरंजीच्या खाली सरकवून देणे मला तरी पटत नाही.

>> ANN चा प्रॉब्लेम असा आहे कि उदा. ANNने एखादी प्रतिमा बरोबर ओळखली तर ती त्याने कशी ओळखली हे आपल्याला समजत नाही, म्हणजे कुत्र्याच्या चित्र हे कुत्र्याचेच आहे हे ANN ने का ठरवले.? ही BLACK BOX आहे.

तुमचा टेक्निकल डोमेन कोणता आहे हे माहिती नाही. मशिन लर्निंग कसं काम करतं ही माहिती असलं की ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्यात नेमका काय BLACK BOX आहे हे ही कळतं. ANN काहीही ठरवत नाही, वेगवेगळी मॅथेमॅटीकल अल्गोरिदम्स वापरून. चित्र मल्टीडिमेंशन अरे असतात Array Mathematics नुसार प्रतिमा प्रेडीक्ट केल्या जातात.

>> भविष्यात AI EVIL होऊ शकतात
म्हणजे नेमकं काय होईल आणि ते कसं होइल ? उत्तर मॅथेमॅटीकली ऑब्जेक्टीव्ह असावं, सब्जेक्टीव्ह नको.

- (तांत्रिक) सोकाजी

सामान्य माणसाचा जो डोमेन आहे तोच माझा डोमेन आहे.
मला जे समजले ते माझ्यासारख्या इतरांपर्यंत पोहोचवणे.
Adversarial machine learning
https://en.wikipedia.org/wiki/Adversarial_machine_learning
हा ref घ्या.
ANN काहीही ठरवत नाही, वेगवेगळी मॅथेमॅटीकल अल्गोरिदम्स वापरून. चित्र मल्टीडिमेंशन अरे असतात Array Mathematics नुसार प्रतिमा प्रेडीक्ट केल्या जातात. बरोबर आहे. पण त्यामुळेच ANN गंडते. एक पिक्सेलच्या बदला मुले सब कुच्छ उलटपलट होते आहे,
सध्या तरी ह्याच्या वर काही इलाज नाही आहे. म्हणून सेल्फ ड्रायव्हिंग कार्स किंवा स्मार्ट वेपन्स मध्ये आपण ही टेक्नोलोजी वापरू शकत नाही,
Frosst also believes that the adversarial machine learning community incorrectly assumes models trained on a certain data distribution will also perform well on a completely different data distribution. He suggests that a new approach to machine learning should be explored, and is currently working on a unique neural network that has characteristics more similar to human perception than state-of-the-art approaches.
भविष्यात AI EVIL होऊ शकतात उत्तर मॅथेमॅटीकली ऑब्जेक्टीव्ह असावं,
ह्याचे माझ्याकडे उत्तर नाही.
मी आपला Nick Bostrom , RAY KURZWEI, MARVIN MINSKY, eliezer yedurovsky ह्यांच्या भरोस्यावर आहे. मला वाटतंय कि मी त्याब्च्या पेक्षा जास्त शहाणा नाही, तसे असते तर आज मी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो असतो.
तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्याना विचारावे लागेल.

सोकाजीरावत्रिलोकेकर
मी तुमचा डोमेन विचारणार नाही, ANN च्यु बनवणाऱ्या किमान तीस एक इमेज शास्त्रज्ञ शोधून काढल्या आहेत. अश्या चित्रामुळे ANN चा का गोंधळ उडतो. ह्याचे "गणिती उत्तर" द्या. MATRIX TENSOR वगैरे लिहिले तरी चालेल. म्या पामराला थोड थोड समजते.
Because the network behaves in a way that seems totally alien, it is very difficult for humans to come up with an accurate mental model of the network’s internal logic to predict its behavior. Within the black box of the neural net lies a counterintuitive and unexpected form of brittleness, one that is surprising even to the network’s designers.
अहो designers तुम्हाला ANN कसे काम करते ते समजलेच नाही. थोडे MATRIX शिका,

>> एक पिक्सेलच्या बदला मुले सब कुच्छ उलटपलट होते आहे
'सामान्य माणसाचा जो डोमेन आहे तोच माझा डोमेन आहे' असं तुम्ही स्पष्ट केल्यामुळे हे विधान त्यानुसार आले आहे असं समजतो. पण एका पिक्सलच्या बदलामुळे 'सब कुच्छ उलटपलट' होत नाही. ते इतक जनरलाईज करण्यासारखं सोप्प नाहीयेय.

Adversarial machine learning चा रेफरन्स का दिलाय त्याचा रिलेव्हन्स समजला नाही. त्याचा आणि तुमच्या लेखमालेचा (कृत्रिम बुद्धिमत्ता) डायरेक्ट संबंध नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेची सद्य अवस्था ही फक्त वेगवेगळी स्टॅटिस्टिकल मॉदेल्स / अल्गोरिदम्स वापरून मॅथेमॅटिकल नंबर प्रेडिक्ट करणं इतकीच आहे.

>> तुमच्या प्रश्नाचे उत्तर त्याना विचारावे लागेल.
जमल्यास तसं विचारून पुढच्या लेखात उत्तर दिलं तरी चालेल! Happy

- (तांत्रिक) सोकाजी

>> अश्या चित्रामुळे ANN चा का गोंधळ उडतो.

ह्यातल्या 'गोंधळ उडतो' अशा शब्दप्रयोगांंमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी गोंधळ उडतो. कारण कृत्रिम बुद्धिमत्ता हे फक्त एक गणितीय मॉडेल आहे, प्रचंड वेगाने गणितातली वेगवेगळी सूत्र वापरून नंबर प्रेडि़क्ट करण्यासाठी मदत करणारं. त्या मॉडेल्सना काहीही कळत नाही. जे काही गणितीय मॉडेल्समसूत्रबद्ध करता येतं, जे कॉम्पूटेशनल असतं, जे आकड्यांमधून मांडता येतं ते सगळं कृत्रिम बुद्धिमत्ता फक्त कॅलक्यूलेट करू शकते.

प्रचंड डेटासेट्सच्या आकड्यांमधील मल्टी-डिमेंशनल परस्पर संबंध, त्यांच्यातील गहिरे पॅटर्न्स शोधणं हे मानवी मेंदूला प्रोसेस करणं अशक्य असत त्या प्रचंड डेटासेट्सच्या आकारामुळे. संगणकाच्या प्रचंड संगणनशकीमुळे ते प्रचंड वेगाने करणे शक्य होते, पॅरलल प्रोसेसिंगमुळे. त्यासाठी न्युरल नेटवर्क ही मानवी मेंदूच्या प्रोसेसिंगशी साधर्म्य असलेली प्रणाली वापरलली जाते पण ह्याचा अर्थ असा नाही की ही कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी मनाप्रमाने काम करते. त्यामुळे 'गोंधळ उडतो' अशा शब्दप्रयोगांंमुळे कृत्रिम बुद्धिमत्तेसंबंधी गोंधळ उडतो.

- (आंतरजालावरचा तांत्रिक गोंधळी) सोकाजी

तुमचा टेक्निकल डोमेन कोणता आहे हे माहिती नाही. मशिन लर्निंग कसं काम करतं ही माहिती असलं की ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्यात नेमका काय BLACK BOX आहे हे ही कळतं. ANN काहीही ठरवत नाही, वेगवेगळी मॅथेमॅटीकल अल्गोरिदम्स वापरून. चित्र मल्टीडितुमचा टेक्निकल डोमेन कोणता आहे हे माहिती नाही. मशिन लर्निंग कसं काम करतं ही माहिती असलं की ह्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. त्यात नेमका काय BLACK BOX आहे हे ही कळतं. ANN काहीही ठरवत नाही, वेगवेगळी मॅथेमॅटीकल अल्गोरिदम्स वापरून. चित्र मल्टीडिमेंशन अरे असतात Array Mathematics नुसार प्रतिमा प्रेडीक्ट केल्या जातात. मेंशन अरे असतात Array Mathematics नुसार प्रतिमा प्रेडीक्ट केल्या जातात. >>>>
Adversarial machine learning चा रेफरन्स का दिलाय त्याचा रिलेव्हन्स समजला नाही.>>>>
ज्या तुमच्या प्रतिसादा मुळे मी Adversarial machine learning चा ref दिला आहे. पण एका पिक्सेल बदला मुळे DNN
हेवायार होते ही सत्यपरिस्थिती आहे हे तुम्हाला मान्य आहे कि नाही? त्याचे कारण संशोधकांना समाजात नाहीये, ते तुम्हाला माहीत असेल तर सांगा. उगाच मुद्दा डावलू नका.
कृबू अनेक एजंटचे एकत्रीकरण आहे आणि DNN हे त्याचे महत्वाचे अंग आहे हे मला वाटते मान्य असायला हरकत्ब नसावी.

कृत्रिम बुद्धिमत्तेची सद्य अवस्था ही फक्त वेगवेगळी स्टॅटिस्टिकल मॉदेल्स / अल्गोरिदम्स वापरून मॅथेमॅटिकल नंबर प्रेडिक्ट करणं इतकीच आहे>>>> थोडी फोड करून सांगाल काय.
त्यांची भेट झाली कि मी विचारेन. मर्विन मिन्स्कीना भेटणे मात्र थोडे अवघड आहे,

Artificial intelligence is the capability of computational systems to perform tasks typically associated with human intelligence, such as learning, reasoning, problem-solving, perception, and decision-making. It is a field of research in engineering, mathematics and computer science that develops and studies methods and software that enable machines to perceive their environment and use learning and intelligence to take actions that maximize their chances of achieving defined goal,
असे मी समाजात होतो. त्यात LLM, IMAGE RECOGNITION अंतर्भूत आहेत असे मला वाटते,

Jeff Clune, an AI researcher at the University of Wyoming who was part of the research team that discovered these vulnerabilities. Clune described their discovery as a “textbook case of scientific serendipity.”......trained to recognize baseballs, then they had the neural net evolve a new image that captured the essence of “baseball.” They envisioned this creative AI as a form of artist and expected the result would be unique computer images that were nevertheless recognizable to humans. Instead, the images they got were “completely unrecognizable garbage,” Clune said. What was even more surprising, however, was that other deep neural nets agreed with theirs and identified he seemingly garbage images as actual objects. Clune described this discovery as stumbling across a “huge, weird, alien world of imagery” that AIs all agree on.
This vulnerability of deep neural nets to adversarial images is a major problem.
In the near term, it casts doubt on the wisdom of using the current class of visual object recognition AIs for military applications—or for that matter any high-risk applications in adversaria......
ह्याचे उत्तर मला माहित आहे. पण इतक्या खोलात जायची इच्छा नाहीये.
हा जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर सध्या तरी काही उपाय नाहीय्र.
आणि हो त्यांचे उत्तर आले बरका. ते म्हणतात कि "आईच प्रेम हे MATRIX मध्ये लिहा, आन्ही पुस्तके लिहिली आहेत ती वाचा. नाही समजल तर...

>> कृबू अनेक एजंटचे एकत्रीकरण आहे आणि DNN हे त्याचे महत्वाचे अंग आहे हे मला वाटते मान्य असायला हरकत्ब नसावी.
तुमच्या वैयक्तिक मतांचा आदर आहेच! शिवाय, तुमची काहीही मतं असण्यालाही माझी हरकत नाही. फक्त ती दुसर्‍यांना मान्य असायला हवी इथे दुमत आहे Happy

- (वैयक्तिक मतांचा आदर करणारा) सोकाजी

>> विकी लिंक

वाटलंच, भाग १ आणि २ ही आत्ताच जस्ट चाळले. I rest my case, milord!

- (ह्या लेखमालेचं Gradient descent करण्यात चुकलेला) सोकाजी

"Gradient Descent" नका करू "Hill Climbing" करा.
तब्येतीस चांगले पडेल.
पुन्हा एकदा उत्तराच्या प्रतीक्षेत,

लेखमाला निवांत वाचायची आहे.

समहाऊ, कृबु ही मानवासाठी मोहिनी ठरणार आहे जिथे मानव भस्मासुराच्या रुपात आहे हा माझा ठाम समज झालेला आहे. आजची कृबु कदाचित हे करु शकणार नाही पण ती खुप वेगात शिकतेय.

साधनाजी
तुम्ही म्हणता ते अगदी खरे आहे,
मी तुम्हाला एक ह्या वर एक पुस्तक रेको करेन.
भविष्य काळ आपल्याला चूक ठरवेल अशी आशा जरुयात.

लेख विषय intresting आहे.
प्रतिसादातील चर्चा सुद्धा मोठ्या आवडीने वाचायचा प्रयत्न केला. पण डोक्यावरून गेली.

पुढे जाऊन AI स्वतःच्या डोक्याने माणसाची वाट लावू शकतो की नाही हे माहीत नाही
पण एखादा येड्या डोक्याचा माणूस एआय मदतीने उर्वरित जगाची वाट लावू शकतो यावर विश्वास आहे.

वामन राव
आभार. लिहायचे तर आहे. बघू जमतंय का?
ऋन्मेऽऽष Thanks सर!

लेख आवडला. Paperclip Maximizer चे उदाहरण AI Alignment का महत्त्वाचे आहे हे सहज समजावून सांगते.
मला वाटते AI चा सर्वात मोठा धोका तिच्या बुद्धिमत्तेत नसून मानवी उद्दिष्टांचे अर्थ ती कसे लावते यात आहे.

नितनवे
होमो सेपिंअस जो पर्यंत आपले वर्तन सुधारत नाहीत तो पर्यंत हा धोका रहाणारच!

Pages