विषारी चित्रपटांचा हैदोस

Submitted by खंडहर on 24 March, 2026 - 21:30

एक विशिष्ट जातसमूह आहे ज्याचा इतिहास चांगला नाही.
हे मुस्लीम किंवा ख्रिस्ती या धर्मावर आलटून पालटून टीका करताना कचरत नाहीत, पण आपल्या जातीसमूहावर टीका झाली कि गळे काढतात. रिव्हर्स जातीयवादाचा आलाप आळवतात, अशा लोकांनी समाजात विष पेरायचं काम चालू केलेलं आहे.

यांचा इतिहास पाहिला तर ज्या मुघलांवर ते सडकून टीका करतात, त्यांचे प्रशासन कोण चालवत होते ? ज्या ब्रिटीशांविरूद्ध ते टीका करतात त्यांच्या प्रशासनात कोण होते ? कोण त्यांच्या लष्करात अधिकारी होते ? परदेशी टोळ्यांशी आधी संघर्ष आणि नंतर त्यांच्याशी मैत्री कुणी केली ? क्रूर अशा हूणांचे कोण भाट होते ?

छत्रपती शिवाजी महाराजांवर तलवारीचा वार करणारा अफजलखानाचा वकील होण होता ?

या सर्व प्रकरणांवर जर एक एक सिनेमा बनू लागला तर या मंडळींना सहन होईल का ? नुसता इतिहास सांगायला लागलं कि हे अस्वस्थ होतात. सांगू द्या ना इतिहास, तुम्ही का वळवळ करता ? का गळे काढता ?

मग केरळा स्टोरी १, २ , ताश्कंद फाईल्स, कश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स, ताज स्टोरी, इंदू सरकार असे विषारी सिनेमे यायला लागले, ज्यांना त्याच्यात कारस्थान दिसतं त्यांना तुम्ही लगेच देशविरोधी कसे ठरवता ?

धुरंधर १ मधे ८०% कल्पनाविलास आणि २०% प्रपोगंडा होता. धुरंधर २ मधे ५% कल्पनाविलास आणि ९५% प्रपोगंड आहे. हे सत्ता हातात असल्याचे दुष्परिणाम आहेत.

जी नोटबंदी उत्तर प्रदेशच्या निवडणुकात विरोधी पक्षाकडे पैसाच राहू नये या नीच आणि कपटी हेतूने केली, तिचा संबंध फालतू प्रपोगंडाशी केला आहे. नोटबंदी केल्यानंतर जुन्या नोटा बदलून ४०% रक्कम घेऊन कसे भाजप आणि अमित शहाने पैसे छापले याचे स्टिंग ऑपरेशन्स असलेले व्हिडीओ पब्लिक व्ह्यूइंग साठी बंद केले. धुरंधर २ ला जर खुले प्रदर्शन करू देता तर नोट्बंदी मधला काळाबाजार पण नको का दाखवायला ?

जेव्हढे पैसे काळा धन म्हणून होते ते तर परत आले, मग कुणाचे पैसे बुडाले ?
उत्तर प्रदेशच्या निवडणुका होऊन गेल्यानंतर जुन्या नोटा बदलून दिल्या गेल्या. सर्व काळ्याबाजार वाल्यांचे पैसे परत आले. सोन्याचा व्यापार करणार्‍यांनी त्याच वेळी ३५ ते ४०% जादा रेट लावून जुन्या नोटात व्यवहार केले.

धुरंधर २ च्या अजेण्डाबद्दल चर्चा व्हायला पाहीजे आणि सरकारने काळ्या बाजारातले किती पैसे परत आले किती नाही हे स्पष्ट करायला पाहीजे.

काँग्रेस पक्षाबद्दल व्यक्तीशः गंभीर आक्षेप आहेत. पण सर्व विरोधी पक्षांची सरकारे पाकिस्तानची हस्तक होती हे दाखवणे प्रेक्षकांना बालबुद्धीचे बनवून टाकणारे आहे. जे प्रेक्षक असा प्रचार असणार्‍या चित्रपटाची तोंड फाटेस्तोवर स्तुती करताहेत एक तर ते बदमाष आहेत किंवा मूर्ख. अशा मूर्खांच्या जोरावर विषारी प्रचार यशस्वी होत असतो. जर उत्तर प्रदेशाच्या निवडणुका काँग्रेस गैरप्रकार करून जिंकत होता, दंगली घडवून जिंकत होता हे दाकवले असते तर काहीही प्रॉब्लेम नव्हता. कारण असे आरोप होत आलेले आहेत. पण पाकिस्तानात बसून दाऊद इबाहीम "क्या अब की बार भी हमारी सरकार नही आयी ?" असे विचारतो हे दाखवणे निश्चितच गंभीर आहे. हा अजेण्डा ज्यांना गुदगुल्या करतोय तेच धुरंधर २ चं तोंड फाटेस्तवर कौतुक करतील. आणि जे छुपे रुस्तम आहेत त्यांना हे खटकत नाहीये. ते अभिव्यक्तीस्वातंत्र्याची भाषा करतील सिनेमा म्हणून पहा म्हणतील. म्हणूनच सुरूवातीला जे विषय दिले त्यावर सिनेमे आलेले चालतील का ?

सिनेमात आम्हाला मूर्ख बनवले जात आहे ही जाणीव जर अस्वस्थ करत नसेल तर अशा मूर्खांना त्यांच्या लायकीचेच नेते मिळत असतात.

सिनेमात अजेण्डा असतोच असे सांगणारे बदमाष आहेत. अजेण्डा असणे वेगळे आणि हिंसा भडकवणे, द्वेष भडकवणे आणि विषारी अजेण्डा असणे वेगळे हे यांना समजत नाही का ? तुम्हाला असे सांगणारे लोक हे उच्च कोटीचे बदमाष लोक आहेत. अशा बदमाषांपासून सावध. जर तुम्हाला त्यांना एक्स्पोज करायचे नसेल तर.

अशांशी मैत्री ठेवणे घातक. अशांशी संबंध ठेवणे घातक. अशांचे उपकार घेणेही घातक. कारण यांच्या विषाच्या फॅक्टरीचा आपणही एक घटक होऊन जातो. विषाशी कसली दोस्ती ?

मूठभरांकडे सत्ता येते तरीही त्यांना असे सिनेमे का बनवावे लागतात ? कारण आपली सत्ता मूठभरांसाठी आहे हे जनतेच्या लक्षात येऊ नये म्हणून असे प्रचारकी सिनेमे बनवावे लागतात. इतरांना अशा चित्रपटांची गरज पडत नाही.

टिव्ही मालिका, न्यूज चॅनेल्स, वर्तमानपत्रे आणि आता चित्रपट या सगळीकडे मूठभरांचे वर्चस्व का आहे ? कारण असुरक्षितता. सत्य बाहेर येऊ नये यासाठी ताबा घेऊन सातत्याने असत्य प्रचारीत करणे हा यांचा हेतू आहे. मालिका तर सर्व एकजात एकजातीय आहेत.त्यात एकजातीय कल्चर दाखवले जाते. एकाच जातीची आडनावे असतात. सर्व सणवार एकाच जातीच्या चष्म्यातून दाखवले जाते.

कशासाठी चाललेय हे सगळे ?
अती तिथे माती.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषारी चित्रपट हा शब्दप्रयोग आवडला.
समाजात दुही नको हा अजेंडा वाईट आहे म्हणून एका धर्माला टार्गेट करणे योग्य अशी विचारसरणी विषारी आहे याच्याशी सहमत.

दुही माजविण्याचा अजेंडा पूर्वी मुसलमान चांगले दाखवले म्हणून योग्य असे म्हणणाऱ्यांच्या मेंदूत किती विष भिनलेय. सर्व धर्मियांनी शांततेने नांदावे ही इच्छा बाळगणे वाईट कसे काय?

अशा प्रकारावर मूग गिळून गप्प बसणे हा जितका गंभीर अपराध आहे तितकाच अशा विषारी चित्रपटांना उदारमतवादी दृष्टीकोण दाखवून महान बनण्याचा सवंग प्रयत्न करुन चमकोगिरी करणे हा सुद्धा गभीर गुन्हा आहे. सापाला दूध पाजण्याचा प्रकार आहे.

सिनेमात आम्हाला मूर्ख बनवले जात आहे ही जाणीव जर अस्वस्थ करत नसेल तर अशा मूर्खांना त्यांच्या लायकीचेच नेते मिळत असतात.>> + १०० आणि उरलेल्यांना ते सहन करावे लागतात.

परखड आणि अत्यंत मार्मिक लेखन..

असल्या प्रोपागंडा चित्रपटांना संपूर्ण पाठिंबा द्यायचा आणि Godhra (Accident or Conspiracy) हे वास्तव दाखवणारे चित्रपट आंतरजाल वरून प्रचंड पैसा ओतून गायब करायचे आणि समर्थनार्थ प्रोपागंडा चित्रपट The Sabarmati Report मात्र संपूर्ण पाठिंबा देऊन लगेचच RELEASE करायचे .असली झुंडशाही मला नाही वाटत आजपर्यंत कुठल्याच राजकीय पक्षाने केली असेल.

एक लेखक,
स्वतःच्याच डु आय डीच्या लेखाला दुसऱ्या आयडीने प्रतिसाद देऊन स्वतःशीच चर्चा करण्याचा टाईमपास करण्या इतपत वेळ आहे?

" का ? "

स्पेस देऊन प्रश्नचिन्ह कॉमन पॅटर्न आहे. आणि "का ?" हे देखील.

जेव्हढे नवीन ड्युआयडी येतील ते सगळे माझेच ड्युआयडी आहेत.
तुझी बालबुद्धी जगजाहीर झाली. मुळात अशा लेखावर पहिला प्रतिसाद द्यायला मला तुझ्यासारखा भेकडपणा करायची काही गरज नाही.
अगदी तुझा प्रेमाच्या पन्नास छटा हा सुद्धा माझ्याच नावावर खपव रॉय उर्फ एकावन्न लाटा उर्फ .................... .
माझा ओरिजिनल कुठलाच शाबूत नाही तुझ्यासारखा लपवून ठेवायला..

<< पण पाकिस्तानात बसून दाऊद इबाहीम "क्या अब की बार भी हमारी सरकार नही आयी ?" असे विचारतो हे दाखवणे निश्चितच गंभीर आहे. हा अजेण्डा ज्यांना गुदगुल्या करतोय तेच धुरंधर २ चं तोंड फाटेस्तवर कौतुक करतील. आणि जे छुपे रुस्तम आहेत त्यांना हे खटकत नाहीये. ते अभिव्यक्तीस्वातंत्र्याची भाषा करतील सिनेमा म्हणून पहा म्हणतील. >>

------ प्रचारी चित्रपट आहे.
प्रचारक कसा नेहेमी खोटे पसरवत असतो तसेच हे चित्रपट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आडोसा घेत अजेंडाचा प्रचार करत आहेत.

गोध्रा घडविल्यानंतर झालेल्या हिंसाचारावर BBC ची fact based documentary आहे पण तिथे गैरसोय होते म्हणून त्वरित बंदी आणली गेली.