१) शाहरुख खान स्टारर आणि ऍटली दिग्दर्शित चित्रपट जवान.
२) रणवीर सिंग स्टारर आणि आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट धुरंदर १ आणि २.
हे गेल्या दोन वर्षातील ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत.
आधी मी जवान चित्रपटाला टाळ्या शिट्ट्या आरोळ्या ऐकल्या आणि लहान मुलाना सीटवर चढून नाचताना पाहिले.
त्यानंतर मी धुरंदर पार्ट २ चित्रपटाला टाळ्या शिट्ट्या आरोळ्या ऐकल्या आणि लोकांना उभे राहून घोषणा देताना पाहिले.
पण या धाग्याचा विषय कुठल्या चित्रपटाची क्रेझ किती आहे किंवा कोणी किती कमावले, कोण मोठा स्टार आणि कोण भारी दिग्दर्शक आहे हा नाहीये. या फॅन वॉर मध्ये मला सध्या तरी बिलकुल रस नाहीये. कारण कमावणारे कमवून मोकळे झाले. कोणी तुलनेत कमी तर कोणी जास्त कमावले. आपण का उगाच जीव जाळा! धुरंदर (दोन्ही) मला कितीही आवडले तरी मी पुन्हा बघू शकत नाही आणि जवान तीन वेळा पाहिला आहे यातच माझ्यापुरते उत्तर दडले आहे, असेच प्रत्येकाने आपापले शोधा..
पण या दोन चित्रपटात एक समान धागा आढळतो. किंवा याला असमान धागा असेही म्हणू शकतो.
जवान चित्रपट हा भ्रष्ट व्यवस्थेवर भाष्य करतो. सरकारला त्याच्या चुका दाखवतो आणि जाब विचारतो.
धुरंदर चित्रपट सरकारच्या धोरणांना आणि निर्णयांना पाठिंबा दर्शवतो. त्याचे समर्थन करतो. त्याचा जयजयकार होईल हे बघतो.
दोन्ही चित्रपटात काही खऱ्याखुऱ्या घटनांचे संदर्भ घेतले आहेत.
पण एक चित्रपट सरकारला प्रश्न विचारणारा आहे.
तर एक सरकारला प्रश्नापासून वाचवणारा आहे. परस्पर उत्तर देणारा आहे.
एक चित्रपटप्रेमी म्हणून मी दोन्ही, किंबहुना तिन्ही चित्रपट, पहिल्याच आठवड्यात थिएटरमध्ये पाहिले आणि फुल एन्जॉय केले.
पण त्या पलीकडे विचार करता जर आपण चित्रपटापासून प्रभावित होणार असू तर जनता म्हणून आपण कुठल्या चित्रपटाला उचलून धरणे योग्य राहील याचे उत्तर आपल्याला या धाग्यावर शोधायचे आहे.
कदाचित हे उत्तर दोन्ही चित्रपटांना उचलून धरणे योग्य असेही असू शकेल. दोन्हीपैकी एकच निवडायची सक्ती नाही. कारण दोन्ही चित्रपट बघताना चित्रपटगृहातील प्रेक्षक भारतीय नागरिक म्हणून एक होतात.
एखाद्याला दोन्ही, सॉरी तिन्ही आवडले नाही तर त्याने एकूणच हे मनोरंजन गमावले याबाबत खेद राहील.
(जवानने ११५० कोटी कमावले, धुरंदर पार्ट १ ने ११०० कोटी कमावले. धुरंदर पार्ट २ पहिल्याच आठवड्यात ५०० कोटी कमावून नवीन विक्रम प्रस्थापित करणार आहे वगैरे आकडे इथे कोणी फेकू नका. ते खोटे असतात असे जाणकार म्हणतात). दोन्ही चित्रपट (जवान आणि धुरंदर २) संपतात तेव्हा जय हिंद म्हणावेसे वाटते हेच त्यांचे यश!
अरे हो, आताच दुसरीकडे प्रतिसाद देताना सुचलेला एक समान धागा म्हणजे संजय दत्त दोन्ही चित्रपटात होता. भावाने २ वर्षात हजार करोड चे ३ चित्रपट दिले 
एखाद्याला दोन्ही, सॉरी तिन्ही
एखाद्याला दोन्ही, सॉरी तिन्ही आवडले नाही तर त्याने एकूणच हे मनोरंजन गमावले याबाबत खेद राहील.>> मनोरंजन गमावण्यात मी पहिली.
जवान आणि धुरंधर १ ott वर (च) पळवत बघितले.
तिसरा पण बघितला तर असाच बघणार. ह्या प्रकारच्या सिनेमांना माझा पास.
ज्याने चपातीबरोबर अमृतांजन
ज्याने चपातीबरोबर अमृतांजन खाल्ले नाही त्याने हा जन्मच वाया घालवला.
खरतर फक्त दणकून पैसे कमावले
खरतर फक्त दणकून पैसे कमावले म्हणून शा खा चा सिनेमा आणि दुसरे सिनेमे ह्यांची तुलना करायची काहीच गरज नाही. माझ्या मते जवान हा तद्दन मसालापट ज्यात अतीरंजनाचा पण इतका अतिरेक कि शेवटी मनोरंजन झालेच नाही उलट हसे झाले, ह्या प्रकारात मोडतो.
धुरंधर किमान तसा नाही. जे काही दाखवले आहे ते अवास्तव व अतीरंजीत आहेच पण सादरीकरणात तरी धुरंधर जास्त बरा वाटला. मी सिनेमा एंजॉय करु शकलो. दोन भाग, तेही ४ तासांचे करायची गरज नव्हती. एकूण एक तास तरी सहज कमी करता आला असता.
रणवीर सिंग चे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्याने त्याची भुमिका प्रचंड सामर्थ्याने उभी केली आहे आणि अभिनयही उत्तम केला आहे. आणि त्याच्या बरोबर इतर सर्व कलाकारांनीही उत्तम काम केले आहे.
शा खा आता ६० वर्षांचा होईल. ह्या जवान आणि किंग सारख्या सिनेमांमधे त्याला बघायला मलातरी अजिबात आवडत नाही. त्याने ह्यापुढे कॅरेक्टर रोल किंवा जास्त मॅच्युअर भुमिका केल्या तर जास्त आवडेल. अभिनेता म्हणून तो उत्तम आहे पण तरिही प्रत्येक भुमिकेत तो शा खा चं असतो. आता तरी त्याने त्यापलिकडे जावे व ऋषी कपूरने (गेला बाजार अमिताभने देखील) जसे उत्तरार्धात अभिनयावर जास्त फोकस करुन वेगवेगळ्या पात्रांना उभे केले ते करावे. रणवीर सिंग त्या बाबतीत आधीच पुढे गेला आहे असे मला वाटते.
जवान आणि धुरंधर ही तुलनाच
जवान आणि धुरंधर ही तुलनाच अत्यंत हास्यास्पद आहे.. धुरंधर खूप गाजतोय म्हणून उगीच शाखा la मध्ये आणून कौतुक करून शिळ्या कढीला ऊत आणण्यासारखे आहे
@ शर्मिला
@ शर्मिला
हो, ज्याची त्याची आवड.. वरचे वाक्य असेच गमतीने लिहिले होते.
सध्याच्या जनरेशनमध्ये दोन्ही हिट आहेत.
माझ्या आईने सुद्धा दोन्ही पाहिले नाहीत. धुरंधर प्रश्नच नाही. पण शाहरुख तिच्या आवडीचा असूनही जवान तिला आवडेल याची खात्री नाही.
या उलट मुलीने जवान माझ्यापेक्षाही जास्त वेळा बघितला आहे. थेटरमध्येच दोन वेळा.
आता धुरंधर सुद्धा दाखव म्हणून मागे लागली आहे. पण बघितल्यास कदाचित तिला तो झेपणार नाही.
काही लोकप्रिय चित्रपटांची क्रेझ ठराविक वर्गात किंवा ठराविक वयोगटात असते.
@ साधा मानूस
@ साधा मानूस
केवळ हजार कोटी क्लब नाही तर लेखात बोल्ड केलेल्या वाक्यामुळे जवान आणि धुरंदर याची तुलना जिथे तिथे होत आहे. मला स्वतःला सुचलेले नाहीये हे.
चौकट राजा,
चौकट राजा,
आपल्या मताचा आदर आहे पण
जवान आणि धुरंदर दोन्ही मसालापट आहेत.
फरक इतकाच की जवान एक नॉर्मल साऊथ इंडियन मसालापट आहे ज्यात एंटरटेनमेंट हाच एक हेतू होता.
पण दुसऱ्यात एंटरटेनमेंट सोबत एक राजकीय अजेंडासुद्धा असल्याने वास्तव भासावे अश्या शैलीत बनवला आहे इतकेच.
ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका दुसऱ्या इनिंग मध्ये केल्या. त्याआधी त्यांच्याही वयाला साजेश्या नसणाऱ्या भूमिका करून झाल्या.
शाहरुख खानची दुसरी इनिंग अजून सुरू झाली नाही. जर साऊथ सुपरस्टार रजनीकांत तरुण बनून भूमिका करू शकतो तर शाहरुखने केले तर हरकत कश्याला. जवान मध्ये खरे तर त्याने बापाचा रोल रजनीकांत स्टाईल मध्येच साकारला आहे. म्हणून त्याला एक वेगळाच फॅन following मिळाला आहे.
रणवीर सिंग माझा सुद्धा प्रचंड आवडता अभिनेता आहे. किंबहुना भारतात अजूनही काही अभिनेते आहे जे मला खूप आवडतात.
पण शाहरुख सुपरस्टार आहे. त्याचा लीग वेगळा आहे. त्याची तुलना किंवा स्पर्धा इतर कोणाशी अभिनय हा निकष घेऊन करण्यात अर्थ नाही.
मी तीन पैकी फक्त पाव ते १/३
मी तीन पैकी फक्त पाव ते १/३ बघितला. धुरंधर - १ साधारण १ तास.
तेव्हा हेडर मध्ये नमूद केलेल्या चित्रपटांबद्दल काही मत देता येत नसल्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.
<<दोन्ही चित्रपटात काही खऱ्याखुऱ्या घटनांचे संदर्भ घेतले आहेत.
पण एक चित्रपट सरकारला प्रश्न विचारणारा आहे.
तर एक सरकारला प्रश्नापासून वाचवणारा आहे. परस्पर उत्तर देणारा आहे.>>
१. खऱ्या खुऱ्या घटनांचे संदर्भ ठीक आहे, पण त्या घटनांची खरी दृश्ये चित्रपटांमध्ये दाखवली असतील तर आपण ती आठवून सुन्न होत असू अशी ती असतील तर त्यामागचे सत्यच सांगितले पाहिजे, त्याचे वास्तव सोडुन फिक्शनल जस्टीफिकेशन नको की फिक्शनल ठपका ठेवणेही नको. एखाद्या घटना मागे कोण होतं हे माहीत नाहीय पण काही अंदाज आहेत तर ते तसे दाखवण्यास , त्याचे लॉजिक देऊन , मला योग्य वाटेल.
अन्यथा चित्रपट बघणार नाही.
२. सरकारला जाब विचारणारे, टिका करणारे बरेच चित्रपट आहेत. सरकारी दरबारात एकीकडे काही मंत्री भ्रष्टाचार करत आहेत आणि मोठे पद असलेले मंत्री व सर्वोच्च पदी नेता मात्र त्यात सामिल नाहीत, त्यांना कळल्यावर ते भ्रष्टाचार विरोधात कारवाई करतात असे दाखवलेले काही चित्रपट आहेत. हा बळेच बॅलन्स करण्यास फक्त वाईटच नाही चांगलं पण दाखवलं पोरकट प्रकार आहे. असे चित्रपट असण्यास हरकत नाही, मला तो भाग पोरकटपणा वाटतो. जो मुद्दा मांडायचाय तो नीट मांडावा, ताकाला जाऊन मध्येच भांड्यातून दुसरे भांडे काढुन एकातून ताक दुसऱ्यातून दूध आणि थोडं थंड ताक प्या, आणि थंड होईल ते म्हणुन हळद घालून दूध प्या प्रकार करण्यात रस नाही. असे चित्रपट मी बहुतकरून बघणार नाही.
३. सरकारवर फक्त टिका असली तरी हरकत नाही अथवा टिका करून काही चांगल्या गोष्टी (वरच्या प्रमाणे उगाच बॅलन्स्ड करायला नको) कौतुकास पात्र असतील तर दाखवल्या तरी चालेल. असे चित्रपट मी बघु शकतो.
४. 3 मध्ये सरकारवर फक्त टिका आणि विरोधी पक्षाची आरती असे असू नये आणि व्हाईस अ व्हर्सा. असल्यास नाही बघणार.
५. सरकार आणि विरोधी दोन्हींवर टिका - थोडक्यात राजकारणावरच टिका : मला असा विषयही आवडेल., बघेन चित्रपट.
६. सरकार व विरोधी पक्षांपैकी एकाला वाचवणारा, त्याला प्रश्न विचारू न देणारा / विचारायची गरज नाही असा संदेश देणारा आणि दुसऱ्याला व्हिलन दाखवणारा चित्रपट मला आवडणार नाही.
या शिवाय मग चित्रपट कथा, मेकिंग, कास्ट, अभिनय, संवाद इत्यादि गोष्टी आहेत चित्रपट म्हणुन आवडायला अथवा न आवडायला.
तर वर पैकी ३ अन ५ मी बघतीले आणि आवडले, किती आवडले यावरून चिकवावर किंवा त्या चित्रपटाचा वेगळा धागा असेल तर तिथे मला कसा वाटला लिहुन रेको देण्या एवढा चांगला वाटला तर देईन.
उचलून धरणे म्हणजे नक्की काय? त्याबद्दल वेगळा धागा सुरू असेल तर तिथे लिहीन, काय आवडलं ते सांगेन काय अचाट अतर्क्य वाटलं ते सांगेन, चर्चेत सहभागी होईन. या व्यतिरिक्त आणखी काही करणार नाही.
जे बघणार नाही म्हटले त्यातील काही ओटीटीवर बघुन मग चिकवावर वराती मागुन घोडं फिरवू शकतो.
जवाण आणि धुरंधर ची तुलना होऊच
जवाण आणि धुरंधर ची तुलना होऊच शकत नाही.
एक चित्रपट म्हणून जवान धुरंधरच्या जवळपास सुद्धा नाही.
जवाणची तुलना फार फार तर सलमानच्या एक था टायगर वैगेरे बरोबर होऊ शकेल.
@ मानवमामा, छान सेल्फ
@ मानवमामा, छान सेल्फ विश्लेषण
माझ्यामते धुरंदर ६ मध्ये येतो.
आणि जवान बहुधा ५ मध्ये येत असावा.
तो टिपिकल रॉबिनहूड स्टाईल भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढा आणि गरिबांचा मसीहा टाईप चित्रपट आहे. पण त्यात जी प्रकरणे दाखवली आहेत ती काही खरोखर घडलेली कांड आहेत. अमुक तमुक पक्षाला किंवा धर्माला टारगेट न करता बनवला आहे.
रात्रीचे चांदणे, टायगर पठाण
रात्रीचे चांदणे, टायगर पठाण वगैरे अगदीच फिक्शन्ल की काय म्हणतात त्यातला प्रकार आहे. त्यात फक्त रॉ आयएसआय अशी नावे तेवढी वापरली आहेत. जशी ती इतर काल्पनिक चित्रपटात आरबीआय, नासा, इस्रो अश्या संस्थाची वापरतात
केस कापले होय ऋन्मेष?
केस कापले होय ऋन्मेष?
हो.. धुरंधर पार्ट टू आला ना
हो.. धुरंधर पार्ट टू आला ना
https://youtu.be/UR67jbnLrFg
https://youtu.be/UR67jbnLrFg?si=zqhllfoXeeFgHt5p
हमजा अली
हमजा अली
झाला
जसकिरत
काय नाय ऋन्मेषने लावलेले माबोवरचे फोटो बघून वाटले

हो.. वेळ मिळाल्यास त्यावर
हो
. वेळ मिळाल्यास त्यावर वेगळा लेख टाकतो
तेवढेच कोणालातरी अनुभवाचा फायदा..
ओरिजनल पोस्ट सापडली
ओरिजनल पोस्ट सापडली
म्हणून शाहरुख स्पेशल आहे
तुझ्यासाठी प्रश्न, योग्य
तुझ्यासाठी प्रश्न, योग्य पर्याय निवड.
भारताच्या फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास किती वर्षे जुना आहे?
१) ३
२) ५
३) ७.५
४) तब्बल १२!
हा हा.. तब्बल 12 वर्षे!
हा हा.. तब्बल 12 वर्षे!
बारा वर्षांपूर्वीचा काळ भारताच्या राजकीय इतिहासात इसवी सन पूर्वीचा म्हणून गणला जातो.
तसेच 35 वर्षापूर्वीचा काळ बॉलीवूडच्या इतिहासात इसवी सन पूर्वीचा काळ म्हणून ओळखला जातो.
त्यानंतर दोन्ही क्षेत्रात दोन सुपरस्टार अवतरले