Submitted by किरण कुमार on 20 March, 2026 - 05:50
आजही मी तुला टाळले
काळजाला पुन्हा जाळले
दंश झाला कळेना कसा
साप येथे कुणी पाळले
सांग डोळ्यात या तुझ्या
चांदण्यांना कुणी माळले ?
हे तुझे की फुलांचे म्हणू
दुःख वेणीवरी वाळले
होत गेली गझल वेदना
लोक होते उगा भाळले
किरण कुमार
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान आहे.
छान आहे.